मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)

Submitted by राज1 on 23 January, 2017 - 03:47

मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)
दोन वर्षापूर्वी मी माझ्या मुलाचा आभ्यासा बद्द्ल विचारले होते. दोन वर्ष्यानी तरी तो अभ्यास करायला लागेल असे वाटले होते. पूर्वी थोडा तरी अभ्यास करायचा आता ५ मिनिट पण अभ्यास करत नाही. सकाळी ८ किंवा ८.३० ते ९.०० वाजे पर्यंत उठतो व २ किंवा ३ वर्ष्याच्या मुलासारखा खेळत बसतो. मला व माझ्या मिसेस ला कारण नसताना त्रास देतो. त्याच्या आजी, आजोबाना पण असाच त्रास देतो. अभ्यासात हुशार आहे. (७०% किंवा ८०% मार्क मिळतात). खेळाची खूप आवड आहे म्हणून ground लावले पण तेथे जात नाही. घरीच T.V. बघत बसतो. रविवारी तर ५ ते ६ तास T.V. बघत बसतो व T.V. नसेल तर mobile वर ३ ते ४ तास गेम खेळत बसतो. mobile काढून घेतला किंवा T.V. बंद केला तर आम्हाला मारतो.
तोंडात बोट घालयाची सवय आजून गेली नाही.
बोबडे बोलणे कमी करण्यासाठी स्पीच therapist कडे गेलो. त्यांनी दिलेला अभ्यास त्याने केला नाही म्हणून आम्ही स्पीच therapist कडे पुन्हा गेलो नाही.
आत्ता त्याची Thyroid टेस्ट positive आली. वजन ४३.५ किलो.
त्याच्या आक्रस्ताळेपणा बद्दल आमच्या एका councillor मित्राने त्याला psychiatrist कडे नेण्याचा सल्ला दिला त्या मित्राला Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) ची शंका येते आहे. काय करावे काही समजत नाही.

कृपया सल्ला द्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांचा प्रश्न सिरीयस आहे. काही उपयुक्त सल्ला देता आला तर पहा भाषेच्या आणि व्याकरणाच्या चुका काढण्यापेक्षा.

वेताची काठी विकत घ्या व चुकला की ढुंगणावर फटका द्या.मुलांच्या कलेने घेतले तर मुलं वाया जातात हे मी माझ्या अनुभवावरुन सांगू शकतो.मी असाच वाया गेलो,आता तीशीत चार एकर शेती कशीबशी सांभाळत बसलोय,ना नोकरी ना लग्न.तुमच्या मुलाचे उज्वल भविष्य हवे असेल तर आतापासुनच कठोर वागा,
तुम्हाला मारतो हे लाडात का सांगताय? चांगला फटकवत जावा चुकला की.हे मी त्याच्या चांगल्यासाठीच सांगतोय ,बघा बुवा.

मुलांना फटके देताना, शिक्षा करताना उद्या तुमची मुले जेव्हा करतीसवरती होतील आणि तुम्ही वृद्ध झाल्यावर विक्षिप्तपणे वागाल तेव्हा त्यांच्याही हाताचे रट्टे खायची तयारी करून ठेवा हां.

तुमचा मुलगा खरेच खूप हायपर असेल तर बाकी लोकांचे सल्ले ऐकण्यापेक्षा डॉक्टरला भेटा.

तुमच्या काउन्सिलर मित्राच्या सल्याप्रमाणे सायकीयाट्रीस्टला दाखवणे उचित. तुमच्या त्या मित्राच्या मदतीने कोण चांगले चाईल्ड सायकीयाट्रीस्ट आहेत याची माहिती मिळेल , नसल्यास तर अन्यत्र माहिती मिळवून (कदाचित इथे कोणी पोस्ट करेल), जावे. आपण योग्य ते इनपुट्स देउन त्यांना निदान करु द्यावे.
अशा वेळेस डॉक्टरांपुढे सांगताना आपला काळजीचा आणि तसेच एक तक्रारीचा सूर असू शकतो, आपण भावुकही होतो. डॉक्टरांना या सगळ्यांची सवय असते. तरी आपण काय काय सिम्पटॉम्स आहेत याची उजळणी आणि नोंद करुन जावे.

सिंथेटिक जिनियस
मुलगा मारतो हे लाडाने नाही सांगत. ऐक दोन वर्ष्यापूर्वी त्याला ओरडलं किंवा एखादा फटका मारला तरी उलटून मारत नव्हता व सांगितलेल्या गोष्टी अयकायचा (आम्ही दोघही मुलांना मारण्याच्या किंवा ओरडण्याच्या विरुद्ध आहोत.) पण आता तो त्याला ओरडलं तरी उलट मारतो. कालच त्याने त्याला ओरडलं म्हणून spray ची बाटली फेकून मारली त्या मुळे spray ची बाटली फुटली

तुम्हाला त्याने किती मार्क मिळवावेत अशी काही अपेक्षा आहे का?
अभ्यास न करता जर इतके मार्क मिळवत असेल तर तुम्ही आनंदी नाही आहात का?
कोणतीही गोष्ट फक्त एकदाच सांगून बघा - दप्तर आवर, खेळ भरून ठेव, होमवर्क कर. सांगताना तुमच्या बोलण्यातून त्याच्यावर विश्वास दिसला पाहिजे की तो हे काम करेलच. मग करेल. समजा एकदा सांगून नाही केलं तर दुर्लक्ष करायचं. त्याला रागावणं किंवा ओरडा असं काही करायचं नाही.
जेव्हा तो तुमच्याकडे काही सांगायला किंवा मागायला येईल तेव्हा आपण दुर्लक्ष / ऐकलं ना ऐकलं करायचं. मग तो जेव्हा त्याच्या म्हणण्यासाठी (especially एखादी मागणी) लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करेल तेव्हा त्याला समजावून सांगायचं मी तुझ्याकडे लक्ष दिले नाही तर तुला चांगलं वाटलं का? मग मी तुला मगाशी काय सांगितले त्याच्याकडे तुझा लक्ष होता का?
सध्या फक्त तो तुमच्याशी चांगला (आज्ञाधारक?) कसा वागेल ते बघा. एखाद आठवडा त्याच्या अभ्यासाकडे तुम्ही दुर्लक्ष केलेत तरी चालेल. शाळेत शिक्षक बघून घेतील अभ्यासाचं. जर वागण्यात फरक जाणवला तर पुढे तसेच करता येईल.
बाकी तो रोबोट किंवा खेळणं नाही दिलेल्या आज्ञा पाळायला.

त्याला दुसऱ्याने तक्रार केली म्हणून रागावू नका. (ह्यात आजी-आजोबा पण आले) ज्याने त्याने आपापले रागवायचे. आणि घरांत एकतरी व्यक्ती सध्या अशी हवी जी त्याला अजिबात रागावणार नाही.
मी माझ्या trial and error, work-in-progress अनुभवावरून लिहिले आहे. उपदेश करायचा हेतू नाही. राग आला असेल तर कृपया दुर्लक्ष करा.

मी child psychology विषयातली तज्ञ नाही. पण psychology student आहे. माझ्या आत्तापर्यंत च्या वाचना नुसार आणि अभ्यासानुसार "वेताची काठी विकत घ्या" प्रतिसाद म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार. मुळात मुलं आक्रस्ताळी वागतात कारण त्यांना आपल्याकडुन वेळेची, संवादाची अपेक्षा असते. फक्त हे कर आणि ते करू नको हा संवाद नव्हे. या सुचना झाल्या.

त्यांच्यासोबत मुलात मुल होउन खेळण, त्यांच्या समस्यांना कमी न लेखता, त्यांना involve करुन त्यावर चर्चा करणं, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना सहभागी करुन घेणं, त्यांच्या वयाला सजेसे निर्णय त्यांना घेउ देणं, त्यात काही चुक झाली तर ती स्विकारुन पुढे जाणं किंवा माहीत असतील तर धोक्यांची पुर्व कल्पना देणं.. या आणि अशा असंख्य गोष्टी येतात. this behavior of ours also make children sure that they are important for parents and they are essential part of family. मुलांवर विश्वास ठेवा.
या सर्वामधे काही कमतरता राहिली तर मुलं attention seeking साठी आक्रस्ताळी वागु शकतात.

अर्थात या सर्वामधे hormonal imbalance can play a major part. as I said earlier मी तज्ञ नाही. तुम्ही प्लीज डॉक्टर कडे जा आणि वेळेत उपचार घ्या.

शक्यतो मी कधी प्रतिसाद देत नाही पण "वेताची काठी विकत घ्या" वाचुन अगदीच रहावलं नाही म्हणुन....

चांगल्या counselor किंवा psychologist कडे जा. माझ्या ओळखीतली एक छोटी मुलगी थोडीफार अशीच आहे. तुम्ही सांगितलेली लक्षणं - अंगठा चोखणे, आक्रस्ताळेपण - बर्‍यापैकी जुळतात.
खूप जास्त मार देऊ नका. मुलगा पूर्ण कोडगा होईल.
बेसिकली ही मुलं average मुलांपेक्षा थोडीशी जास्त हटवादी असतात. त्यांच्याशी कसं वागायचं हे psychologist नीट सांगू शकेल.

मला व माझ्या मिसेस ला कारण नसताना त्रास देतो. त्याच्या आजी, आजोबाना पण असाच त्रास देतो. अभ्यासात हुशार आहे. (७०% किंवा ८०% मार्क मिळतात). खेळाची खूप आवड आहे म्हणून ground लावले पण तेथे जात नाही. घरीच T.V. बघत बसतो. रविवारी तर ५ ते ६ तास T.V. बघत बसतो व T.V. नसेल तर mobile वर ३ ते ४ तास गेम खेळत बसतो. mobile काढून घेतला किंवा T.V. बंद केला तर आम्हाला मारतो. >>> थोड्या फार फरकाने आम्ही हा त्रास सहन केलेला , पण तेन्व्हा माझा मुलगा ४-५ वर्शांचा होता.रोज संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आल्यावर काहितरी नविन गोष्ट असायची आजी-आजोबांकडे सांगायला . आता २-३ वर्शात बराच सुधारला आहे . आम्हीही काही गोष्टी प्रयत्नपूर्वक अमलात आणल्या. पण तुमचा मुलगा त्यामानाने मोठा आहे आणि त्याचे बहुतेक एकापेक्शा जास्त प्रोब्लेम्स आहेत. सगळे म्हणतायेत तसं , खरच चान्गल्या psychologist ला किन्वा थेअर्पिस्ट दाखवा . पण कृपा करून त्याला मारू नका , त्यामुळे प्रकरण जास्त चिघळेल . आणि मुख्य म्हणजे काही झालं तरी उपचार अर्धवट सोडू नका . सुधरत आलेली मुलं , अर्धवट उपचारामुळे परत बिघडल्याची बघितली आहेत.

डॉककडे तर जाच. पण असेच मनात आले म्हणुन लिहिते, कदाचित हे तुमच्या फॅमिलीला लागु होणार नाही. मुलाला अटेंशन हवे आहे का? घरातले कुणी त्याच्याशी खेळते का? संवाद साधते का? एकटेपणा वाटतो का त्याला घरी म्हणुन तो टिव्हीत रमतो. कुठले कार्यक्रम पाहतो (यावरुन त्याची आवड कळेल). त्याला आजीआजोबांबरोबर रहायला आवडते का? की आई वडीलांपैकी कुणीतरी घरी असावे असे वाटते? वस्तु फेकण्याइतका राग का येतो त्याला? तोंडात बोटे घालतो, बोबडे बोलणे हे दोष तर कालांतराने जातीलच पण त्याच्या इतर वागणुकीचे कारण हे तुमच्या घरातच किंवा शाळेत असण्याची शक्यता आहे. अभ्यासाचे जाउदे, तो आधी तुम्हा सर्वांशी नीट का वागत नाही ते तपासा. चुभुदेघे.

राया + १ .
तो ओव्हरवेट वगैरे आहे का ? कोणी त्यावरून काही बोलतं का ? काही ईन्सिक्युरीटीज ? न्यूनगंड ?
माझ्या अनुभवावरून शिकले आहे , अशावेळी अभ्यास वगैरे फार दुय्याम गोष्टी आहेत . संवाद महत्वाचा .
एक्दा का गाडं रूळावर आलं की अभ्यासाची गोडी आपोआप लागते .

राया +१

तुम्ही डॉक्टर कडे जा आणि काळजी करू नका..सल्ल्यांसाठी डॉक्टरकडे जाण्यात काहीच चुक नाही..

तिथे गेल्यावर समजा तुम्हाला कळालं की त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये तर तुम्हाला स्ट्रि़क्ट होता येईल पण बिचार्‍या एवढ्याश्या जीवाला काही तरी छळत असेल तर ते निघणं फार जरुरी आहे.
इतके प्रॉब्लेम्स पहाता मला नाही वाटत तो मुद्दाम केवळ लक्ष वेधुन घेण्यासाठी काही करत असेल.
ही नीड्स हेल्प

लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांना अश्या केसेस हँडल करायची सवय असते. ते सांगतील त्या टेस्ट्स जरुर करा. आणि ते सांगतील तसेच वागत रहा. घरातील सगळ्यांनी याबाबतीत सहकार्य केले पाहिजे.
त्यांनी जर फॉलो अप ला बोलावले तर अवश्य जा. सध्या असे फारच कमी आजार आहेत, कि ज्यावर उपाय नाही. अलोपथी पासून पुष्पौषधी असे अनेक पर्याय आहेत.

नेटवर अनेक डॉक्टरांची माहीत आहे, त्यांचे रिव्हूज पण आहेत. ओळखीचा संदर्भ मिळाला नाही तर हे अवश्य वाचा.

आणि मुख्य म्हणजे तूम्ही धीर धरा. मुलाला काहितरी समस्या आहे ( तो म्हणजे समस्या नाही ) आणि ती सोडवायला आपल्याला मदत करायची आहे.

>>>Thyroid टेस्ट positive आली.----

या अनुशंगानेही उपचार आवश्यक आहेत. अर्थात ते टेस्ट झाल्यावर डॉकनी सांगितले असतिलच. जर त्यांनी वजन कमी करावयास सांगितले असेल तर त्याचा आहार, दिनक्रम सगळेच बदलेल आणी तो आणखी चिडु शकतो. सगळ्या मुलांची खायची प्यायची, अभ्यासाची, टिव्ही बघायची नाटके असतातच. पण Thyroid मुळे हे जास्तं स्ट्रेसफुल असु शकते.

Please Please Please visit the doctor. Do not take anyone's opinion here. People will give you 1000 suggestions.
This matter is serious. As your kid is getting 70% and 80% marks, situation is not bad. He is able to concentrate.
Little professional help and everything will be alright. As he is able to play Video Games ( Which need lots of eyes -brain - hands co-ordinations) it should not be ADHD.

सर्वांचे प्रतिसादा बद्दल धन्यवाद
उत्तर द्यायला उशीर झाला म्हणून माफ करा
पुण्यातील कोणी child psychologist असतील तर कृपया सांगाल का? कारण आमचा councillor मित्र लातूर चा आहे
ते psychologist मुलाला त्याने कस वागाव हे सांगतात का? कारण तो सकाळी ८ किंवा ८.३० ते ९.०० वाजे पर्यंत उठतो व २ किंवा ३ वर्ष्याच्या मुलासारखा खेळत बसतो व ५ ते ६ तास T.V. बघत बसतो ह्या बद्दल समजावतील का.
राजसी
राग येण्यासारख काहीच नाही तुम्ही सांगता ते चांगल व्हाव म्हणून सांगत आहात
त्याच्या मार्कांबद्दल आम्ही आनंदी आहोत पण घरी अभ्यास केला तर आजून चांगले मार्क पडू शकतील याची खात्री आहे, पण तो अभ्यास करतच नाही (वर्षभरात त्याने ५ मिनट पण अभ्यास केला नाही). आत्ता अभ्यास केला तर पुढे अभ्यासाची आवड निर्माण होईल, आजून पुढे खूप अभ्यास वाढत जाइल.
Dietitian त्याचा आहार लिहून दिला आहे पण तो आहाराची पथ्ये व व्यायाम काहीच करत नाही

मित्रं आहेत का त्याला? त्यांना घरी बोलावून त्यांच्याबरोबर थोडा अभ्यासाला बसवला तर? शिकवणी लावली तर? घरी येणारे शिक्षकही असतात.

थोडं फार प्रत्येक मूल एकेका फेजमधून जातं. तो जो काही आक्रस्ताळेपणा करतो त्यावर रिअ‍ॅक्ट होऊ नका. तो जे वाईट वागेल त्याकडे दुर्लक्ष्य करून जे चांगलं करेल (कितीही लहानसहान गोष्ट असो) त्याबद्दल त्याच्या कृतीचं कौतुक करा ( त्याचं नाही ). म्हणजे समजा दप्तर आवरून ठेवलं तर "अरे वा! दप्तर आवरलंस हे छान काम केलंस." इतपतच बोलायचं.

याकरता घरातल्या सगळ्यांना विश्वासात घ्या.

सायकीआट्रिस्ट कडेही तुम्ही जाऊन या आधी. मुलाला गरज नसेल तर नका नेऊ.

i am not used to type in marathi so typing in english.
you consult a doctor thats must but these are some dos and donts in home which u try to follow and it is certainly change him positively.
1. pl do not discuss about him in front of him.
2. if u want to spk about him then say all that which u want him to do. eg. if he throws sumthing at you then be clam and say oh he might have done it by mistake otherwise he will never do this. he is a good boy. i hope u understood this.
3. pls pls ban the smartphones television videogames not just for him but for all your family member and do play with him football cricket etc. this will reduce his wt too.
4. start the change by doing the things which he likes and not the things which you want him to do. this will help in changing the relationshipamong you.
5. and try not to react negetively.

मी काही यातला तज्ञ नाही ना अनुभवी आहे, त्यामुळे सल्ला देऊ शकत नाही,
फक्त एवढेच, काहीही करा, फक्त कुठला चुकीचा सल्ला ऐकून पोराला मारू नका __/\__
लहान मुलांना फक्त तुमचा वेळ आणि प्रेम हवे असते ते द्या. बाकीचे सल्ले डॉक्टर देतील.

मायबोलीकर मितान या स्कूल सायकॉलॉजिस्ट आहेत. त्यांना संपर्क करा. http://www.maayboli.com/user/29345
लहान मुलाच्या वर्तन समस्येबाबत शॉर्ट्कट उत्तर नसते. बराच अवधी द्यावा लागतो. मुलापेक्षाही घरातील इतर व्यक्तींनी आपले वर्तन बदलणे आणि त्यात सातत्य ठेवणे आवश्यक असते. मात्र सकारात्मक बदल नक्की घडतो.

डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशनना दाखवा प्लीज.
तसेच, कोणत्याही परिस्थितीत मुलावर त्रास काढूनका. तो असं वागतोय ह्याच्यापाठीमागे कारण आहे व ते तुम्हाला माहित नाहीये आणि ते शोधून काढणे हे महत्वाचे काम आहे हे आधी पक्कं ध्यानात घ्या. मुलं मुद्दाम त्रास द्यायला अशी वागत नसतात. थायरॉईडही नीट मॅनेज करणे अत्यंत गरजेचे आहे. थायरॉईड हे पूर्ण चयापचय व्यवस्था पाहते. त्यामुळे तिकडे लक्ष देणे, गोळ्य हव्या असल्यास त्या चालू करणे हे केले पाहिजे.
हे कदाचित रिलेटेड नसेलः पण एक शंकानिरसन म्हणून मी 'मदर वॉरियर' ह्या नावाने मायबोलीवर ऑटीझम बद्दल लेख लिहिले आहेत. त्यातील काही उपाय, बिहेविअरल चेंजेस ट्राय करून पाहता येईल. एडीएचडी, ऑटीझम स्पेक्ट्रम वरील मुलं अशी वागू शकतात.

When little people are overwhelmed by big emotions, it is our job to share our calm and not join their chaos.
हे वाक्य मी मध्यंतरी कुठेतरी वाचलं. आणि मी ते सातत्याने लक्षात ठेवते. माझा मुलगा २ वर्षांचा होईल. पण आता त्याला थोडासा "अहं" भाव येऊ लागला आहे. त्यामुळे जेवणाच्या वेळा तणावपूर्ण झाल्या आहेत. पण सुरुवातीला मुलांनी खूप मोठा tantrum दिला की मी पण रडायला लागायचे. पण आता मी त्याला शांतपणे खुर्चीवरून खाली उतरवते आणि जो काय दंगा घालायचं तो त्याला एकट्याला घालू देते. त्याला पर्याय देत नाही (म्हणजे भाताच्या ऐवजी केक वगैरे), त्याला भुलवून जेवायला देत नाही (टी वी, व्हिडियो) किंवा त्याला जबरदस्ती खायला लावत नाही (माझ्या मुलाच्या बाबतीत हे आधीपासून अशक्य आहे). असे सातत्याने केल्यावर मला लक्षात आले की त्याचा दंगा हा त्याला जेवण आवडत नाही किंवा भूक नाही म्हणून नसून, फक्त मी त्याला जेव म्हणतीये आणि त्याला माझं ऐकायचं नाहीये म्हणून असतो. मी शांतपणे कोपऱ्यात बसले की तो परत येतो आणि जेवायला बसतो. (अर्थात हे सध्या चालतंय. उद्या त्याला त्याचा पण राग येऊ शकतो).

आपण शांत राहणे हा सगळ्यात सेफ चॉईस आहे. त्यांनी फायदा होईल की नाही माहित नाही. पण अजून तोटा नक्की होणार नाही.

राजेन्द्र, तुमच्या काऊन्सिलर मित्राने ADHD ची शक्यता दर्शवलीय. जर त्या शक्यतेस वाव आहे असे तुम्हाला वाटत असेल तर शक्य तितक्या लौकर त्याचे निरसन करणे योग्य. कारण अशा डिसॉर्डर करता शक्य तितके लौकर उपचार केलेले योग्य. .आणि जर त्याला असे काही नसेल तर त्याचे शंका निरसनही होईल.
सायकीयाट्रीस्ट निदान करु शकतील आणि गरज असल्यास औषधे देऊ शकतील. सायकॉलॉजीस्ट औषधे देऊ शकत नाहीत. आणि जर कुणी सायकीसाट्रीस्ट थेरपी / काऊन्सेलिंग सुद्धा करणारे (सायकीयाट्रीस्ट + सायकोथेरपीस्ट) असतील तरी त्यांच्याकडे बहुदा काऊन्सेलिंग/थेरपी साठी वेळ नसतो. तेव्हा असे क्लिनिक जिथे सायकीयाट्रीस्ट आणि सायकॉलॉजीस्ट दोन्ही असतात ते निवडलेले चांगले. (जे वर केदार यांनी दिलेल्या क्लिनिकमध्ये आहे.) म्हणजे ADHD असेल नसेल त्या प्रमाणे पुढे औषधांची गरज आहे की नाही, त्याला अन कुटुंबाला काउन्सेलिंगची गरज आहे का वगैरे इत्यादि एकाच ठिकाणी ठरेल.

राजेंद्र
तुमच्या मुलाच्या आक्रस्ताळेपणासाठी त्याला कोणत्या डॉक्टरांची tritment चालू केली?

सुरज, मुलाला आम्ही डॉ भूषण शुक्ला यांच्या कडे नेलं होत. त्यांनी त्याच्या शाळेच्या लिहिलेल्या वह्या बघून dyslexia(डिस्लेक्सिया) असल्याचं सांगितल. Dyslexia साठी दोन तीन session (टेस्ट) झाल्या, टेस्ट झाल्यावर त्यांनी त्यांच्या रेपोर्ट मध्ये त्याला Remedial Coaching ची गरज असल्याचं सांगितल. Remedial Coaching साठी दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला सांगितल पण त्यांनी सांगितलेल्या वेळी आम्हाला जायला जमत नसल्याने अजूनतरी आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही.
मुलाचं T.V. खूप वेळ बघण, Mobile खूप वेळ खेळत बसण, आम्हाला व त्याच्या आजी-आजोबाना खूप त्रास देण यावर काहीच उपाय सांगितले नाहीत.

Pages