आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिल्यांदा कोडे देतेय.....>>>

छान कावेरिताई! तेवढे मराठी हिंदी सांगा ना प्लीज! Happy

अभिनंदन काय त्यात.
करायचे तर माझ्या ऐवजी इतरांचेच करावे लागेल जी दिग्गज मंडळी आहे गीतभांडाराची अन जे हा खेळ सुरु ठेवताहेत. Happy
तरी पण धन्यवाद.

@मानवजी, एका नविन नियमाची भर घालावी का?

कोडे देण्यर्याने त्या गाण्याचे दशक ही द्यावे.
आता बरीच नवी मंडळी सदस्य झाली आहेत, आणि नवी गाणी अजुन तितकीशी कानावर रुळलेली नाहीत, त्यामुळे ओळखायला जरा मदत होईल.

कोडे देण्यर्याने त्या गाण्याचे दशक ही द्यावे.>>>

दशकाची आवश्यकता नाही! फारफार तर नवे जुने एवढे लिहले तर ठीक. आणि थोडा वेळ वाट बघून क्ल्यु मात्र द्यावेत!

दशकाची आवश्यकता नाही! फारफार तर नवे जुने एवढे लिहले तर ठीक. आणि थोडा वेळ वाट बघून क्ल्यु मात्र द्यावेत!>>>>>कितना टाइम के बाद क्लू देणे का कृष्णाजी????

ज ए स ह स....
य क क ह क ज

जिंदगी एक सफर है सुहाना
यहा कल क्या हो किसने जाना.

नवे / जुने मध्येही पिढ्यांप्रमाणे यांना नवे ते त्यांना जुने आणि व्हाइस अ व्हर्सा असू शकते.
मला वाटते, सोडवणार्‍यांनी क्लू मागताना, कुठल्या दशकातील आहे असे विचारावे.

कोड्यांचे क्रमांक पूर्वीपासूनचे पुढे नेउयात.
वरचे ४६२ क्रमांकाचे होते.

पुढील

४६३. हिंदी
क ड ह द म म ह
ज त क क ह

क्ल्युज ४६६

१.दोन्ही नायक नायिकेचा पहिला चित्रपट "love" सिरीज चा होता.,
२.टांगे वाला संगीतकार, भरमसाठ गाणी
३.हे गाणे धमकी म्हणायचे की छुपा इकरार?

एकास एक ..

४६६ :
आप यूँ ही अगर हमसे मिलते रहे
देखिये एक दिन प्यार हो जाएगा
ऐसी बातें न कर ऐ हसीं जादूगर
मेरा दिल तेरी नज़रों में खो जाएगा

४६७ : हिंदी
छ छ अ छ, अ ब ज र
च म अ म, भ ब अ र

Pages