आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४६७.

हिंदी

छुप्पा छुप्पी, ओ छुप्पी, आगड़ बागड़ जाई रे
चूहे मामा, ओ मामा, भाग, बिल्ली आई रे

घ्या कुणी लिहीत नाही तर मी लिहितो!

४६८.

हिंदी

त प ह ज प ल ह
ज त ज अ प ल ह

घ्या सोप्पे एकदम!

४६९
मराठी
क घ ज र ध घ ज
स च श स म ब म

४६९ -
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय
संगे चाले श्रीदाम सुदाम मागे बोले माय

४७०. मराठी
ह म अ र झ द अ र क द व
क द घ घ क क क

कृष्णा , तुम्हाला क्लु ची काहीच आवश्यकता नाही, खुपच सोप्प आहे.>>>>

हे म्हणणे जरा अतीच झाले!!

असेलही कदाचित सोप्पे. पण कधी कधी सोप्पे गाणे ओळखायला देखिल कठीण जातात अक्षरे!

मी त्यांचा तो क्लु वाचून क च्या ठिकाणी कृष्णा, कान्हा, कन्हैया वगैरे बसवायचा प्रयत्न केला. पण क्लिक झाले नाही.

आणि मी @कृष्णाचे "हवाच" वाचुन सगळ्या "हव्या हव्या , हवेतल्या", वगैरे वगैरे गोष्टी ट्राय केल्या.. पण इन व्हेन..

अरे सॉरी, सॉरी
बरं क्लु - राजकारणाशी संबंधीत चित्रपट

नका सांगू...
क्लू सांगा कि १-२ अजून ...

४७० -
हा महाल असला रानझाडीही दाट, अंधार रातिचा, कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव केलि कशी करणी .............................
Sad

स्निग्धा, तुम्ही कल्यु दिल्यावर थोड्या थांबला का नाही??

द्या पुढची अक्षरे जरा सोप्पे!!

स्निग्धा, तुम्ही कल्यु दिल्यावर थोड्या थांबला का नाही?? >>> अहो कृष्णा, माझ्या मते हे ही गाणं सोप्पच होत हो. आणि सकाळी ११ ला क्लू दिला होता, १ वाजला तरी कोणी काही लिहीना म्हणुन मला वाटल की कदाचित जास्तच कठीण दिलय कोड मी Sad जाऊ द्या.

पुढलं कोड द्या तुम्हीच

४७१ -
नरवर कृष्णासमान घेतसे जन्मा,
भाग्य उदेले हे, शिकवी सुकर्मा
::हाहा::

Pages