आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रितु बसंत अपनो xx गोरी गरवा लगाए>>

रितु बसंत अपनो कन्त गोदी गरवा लगाए
झुलना में बैठ आज पी के संग झुले

द्या माधवराव पुढची अक्षरे!

४८५ हिंदी

अ द ब अ
क म प प ह त
ग स ह स
ब त प प ह ह

४८५
ओ दिलदार, बोलो इक बार
क्या मेरा प्यार पसन्द है तुम्हें
ओ गोरी सुकुमार, हमारी सरकार
बड़ा तेरा प्यार पसन्द है हमें

जर सगळी अक्षरे जुळत असतील तर दिलेले अुत्तर बरोबरच, जरी कदाचित अगदी त्याच अक्षरांचे दुसरे कुठले गाणे कोडे देणाऱ्याला अपेक्षीत असले तरी.

तेव्हा सगळी अक्षरे जुळली की कोडे देणाऱ्याकडून त्याचा शहनिशा करण्याची आवश्यक्ता नाही.

जर खरेच त्याच अक्षरांचे दुसरे गाणे असेलही तर कोडे देणारी व्यक्ती तीच अक्षरे परत देअु शकते आणि तेव्हा अेक अुत्तर आधीच दिले असल्याने दुसरे अुत्तर अपेक्षीत आहे असे सांगु शकते.

४८६.

हिंदी

म त अ अ र
स म क
ज ज स म ज ज म

पुढचे कोडे येई पर्यन्त हे सोप्पे सोडवा!

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
>>>>>>
पुब्लिक हा मुद्द्दा विसारताएत.. गेले 3 पेजेस न माहित अस्लेलि गानी ताकताईत..

च्रप्स, उपरोक्त ४८६ गाणे हे अत्यंत गाजलेले आहे!
खूपच सोपे.

आणि आधी देखिल आलेली जवळापास ४८५ पैकी किमान ४७५ गाणी तरी बहुतेक बरीच प्रसिद्ध होती!

कोडे क्र.४८६ उत्तर,
में तो आरती उतारू रे संतोषी माता कि,
जय जय संतोषी माता जय जय माँ...

प्लिज चुकलं असेल तर हसू नका,एकतर आधीच मला हे कोडे सोडवता येत नाही....खेळायची इच्छा असते,पण एवढी जुनी गाणी देतात जी मी कधी ऐकली पण नाही.

वा कावेरी!

श्री संतोषी माता पावली! Happy

दे आता पुढचे कोडे पाहू! सर्वाना माहिती असलेले! Happy

हो कृष्णाजी...एकदम सोपे देते,जे मी पण ऐकले आहे आणि तुम्ही लोकांनी पण नक्कीच ऐकले असेल असे.....
कोडे क्र.४८७
हिंदी,
अ म स र स र स,
द द ज ज म ह र,
म त ज द स ज ,
ह क ख म ह र....

४८७
ओ मेरे सोना रे सोना रे सोना
दे दूंगी जान जुदा मत होना रे
मै ने तुझे ज रा देर से जाना
हुवा कसूर खफा मत होना रे

वा खूपच सोप्पे की स्निग्धांना केवळ ५ मिनिटे लागली गाणे ओळखायला! Happy

आणि आता जमलयं हे पण कोडे सोडावयला त्यामुळे नुसते प्रतिसाद द्यायची आवश्यकता नाही! Happy

४८८ हिंदी
म प र ह त ज स म
क द ठ ज
त अ म ह क छ क च द
य स क घ

हे ही सोप्पच आहे, हं........... पण जुनी गाणी माहिती असतील तर....

आता जुनं गाणं म्हणजे पोरीने पिच्चर पाहिला नसावा ना माधव...
.

(तिचं नाव पुढं करुन, अजून क्लु काढण्याचा प्रयत्न Wink )

तिचं नाव पुढं करुन, अजून क्लु काढण्याचा प्रयत्न >>> फिरक्या घेऊ नका. एकेकाच्या मुसक्या बांधेल स्निग्धा Happy

आता आलंच पाहिजे.

Pages