खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रांत ची अशी काय मजबुरी आहे की तो हे सगळं घडाघडा बोलत नाहीये ? ? >>>> घडाघड बोलला, तर २ दिवसात मालिका संपून जाईल. मग या सगळ्या कलाकारांच काय होणार, म्हणून कदाचित तो बोलत नसेल ...... Happy

हो ना...काहीही..!
वीणा वर्ल्ड पासून विम बार...कशाचीही जाहीरात आता सिरीयल मधे करायला लागलेत. प्लीजच.....ऑलरेडी ब्रेक मधे जाहीरतींचा भडीमार असतोच!

जुयेरेगा मध्ये पण असाच जाहिरातिन्चा भडीमार होता मध्यंतरी .
गस्टो , गोदरेज गूड नाईट .

प्रॉब्लेम इज -- वि तिला घाबरतो आणि तिला हे माहिती आहे !!!!!!!

Angry

ती बोलायला लागली की याची बोलतीच बंद होते. धिस इज समथिंग व्हेरी डिसगस्टींग!!

विक्रांत ची अशी काय मजबुरी आहे की तो हे सगळं घडाघडा बोलत नाहीये ? ? >>>>

बर्‍याच दिवस हि सिरीयल पाहिल्यावर एक लक्षात आले आहे..ते असे..

मला वाटत विक्रांत हा गे आहे... वा गे असावा.

जगातील कितीही लिबरल नवरा असो तो हे कदापी मान्य नाही करु शकत कि त्याची बायको गरोदर आहे व ते बाळ कुणा तिसर्‍याचच आहे.. अन्लेस..
१. ति त्याची बायको नाही....
२. त्यानी दोघांच्या संमतीने स्पर्मबँके द्वारे ति बायको गरोदर झाली आहे.. किंवा
३. तो स्वःता गे आहे व त्याला हे माहीत आहे की तो तिल मुल नाही देउ शकत..तरच तो अ‍ॅक्सेप्ट करु शकेल..

आत्या वि-मा चं लग्न लावायला निघाल्ये तर.

आत्याच्या नवर्‍याला डिव्होर्स् चं माहीत्ये का ? काल तो तसं काही बोलला नाही, की एकदा लग्न झालेल्या भाच्याचं त्याच मुलीच्या बहीणीशी का लग्न लावत्येस ?

आत्या म्हणे मला विक्रांतच भलं करायचं आहे. मग जगात मुलीच नाहीत का?

मोठ्या बहिणीशी डिवोर्स घेउन, ते ही अशा कारणामुळे, लहान बहिणीशी लग्न करायचं वा मस्तच.

आत्याने सांगितलं की नवर्‍याला की विमोचा डायव्होर्स होऊ घातलाय.

आत्याला मानसी पहिल्यापासूनच विक्रान्तसाठी योग्य वाटत आलीय.

सलिल पंडित मुंबईत एकटाच राहतोय, तर स्वतःच्या खोलीत स्वतःचीच मोठी मोठी पोस्टर्स लावलीत. श्रीबाळाच्या खोलीतही त्याचा मोठा फोटो होता. पण तो त्याच्या मावशांचा हट्ट असं समजू. की ही काही नवी पद्धत आहे गृहसजावटीची? आणि लाजण्याची किती ओव्हर अ‍ॅक्टिंग? मानसीला लाजण्याचा अभिनय जमणार नाही, म्हणून हे सलिलवरच ढकलंलय.

कोणीतरी इथे लिहिलेलं की मानसी विक्रान्तकडे हावरटपणे बघते. आता सलिल मानसीकडे ज्या पद्धतीने बघतो त्याला काय म्हणायचं? आणि ती जगातली एकमेव अविवाहित तरुणी असल्यासारखी आशा काय लावायची?

मोरपंखीस, मानसी लेस्बियन असल्यामुळे तिला लग्नात इंटरेस्ट नाही, असं तुम्हाला वाटलं नाही का अजून? Wink

सलिल पंडित मुंबईत एकटाच राहतोय, तर स्वतःच्या खोलीत स्वतःचीच मोठी मोठी पोस्टर्स लावलीत. श्रीबाळाच्या खोलीतही त्याचा मोठा फोटो होता. >> माझ्याही मनात हाचं विचार आला. केकता च्या मालिकां मधून ढापलेला ट्रेंड.

आत्याने सांगितलं की नवर्‍याला की विमोचा डायव्होर्स होऊ घातलाय. >> हे मी मिसलं.

केकता च्या मालिकां मधून ढापलेला ट्रेंड. >>>>ती पोस्टर्स पण अशी असतात कि ती व्यक्ती जरी माठ असली तरी फोटोत मात्र थाट असतो.

Lol तरी संकर्षण बराच बरा आहे की!

या मालिकेत कोणीच नीट काहीच बोलत नाही. विक्रांत मोनिकासमोर काही बोलत नाही. विक्रांत घरच्यांसमोर काही बोलत नाही. मानसी कोणासमोरच काही बोलत नाही. तै, आजी-आजोबा किंवा सलिल - सगळ्यांसमोर गप्पच मुलगी! बयो, घडाघडा बोल की!! करिअर करायचंय तर ते ठामपणे सांग. हा गप्प राहून गैरसमज वाढवायचा कसला आलाय समजूतदारपणा?

भरत. | मानसी लेस्बियन असल्यामुळे तिला लग्नात इंटरेस्ट नाही, असं तुम्हाला वाटलं नाही का अजून? >>>>>>

Lol आजुन तरी तस नाही वाटत...

तो विक्रांत काय बावळट दाखवलाय ... अरे एवढ घाबरट, सोशीक कळस आहे..!!!
त्याच्या पुढे ती माहेरची साडी मधली आलका कुबल पण आत फिकी वाटायला लागलीय.. Lol

>>>>>केकता च्या मालिकां मधून ढापलेला ट्रेंड. >>>>ती पोस्टर्स पण अशी असतात कि ती व्यक्ती जरी माठ असली तरी फोटोत मात्र थाट असतो.--- हा हा हा

मला पण ती सगळ्यांची पोस्टर्स पहावत नाहीत. कादिप मध्येसुद्दा निशाच्या खोलीत (जुनं घर ) तिची पोस्टर्स. हम्माच्या खोलीत हम्माची पण आहेत.

सलिल पंडित विक्रांतपेक्षा बावळट वाटतो.

नाही सलिल वि पेक्षा ठीक वाटतो मला....त्याचा काय प्रॉब्लेम आहे? हीच त्याला नीट सांगत नाहीए....
वि पेक्षा अ‍ॅक्च्युअली तिला सलीलच योग्य नाही का? वि असा मुखदुर्बल, भेकड..शिवाय दुसरपणा चा!! Happy

मानसी सलिलला नाचवतेय. मोनिका विक्रांतला.विक्रांत मीठाची गुळणी घेवुन बसलाय. आणि बाकी सगळे रिकामटेकडे आनंदोत्सव करताहेत. आत्याबाई मनातले मांडे रचताहेत.

राया, विक्रांतने टाकली की गुळणी. आत्याबाईंनी मांड्यांचा बेत रद्द केला; त्यांच्या मिस्टरांनी डोस दिल्यावर.

घरी नाही सांगितलं.
पण निदान त्या कौन्सेलर बाईसमोर घडाघडा बोलला.
मोनिका तिथेही घाबरल्याचा अभिनयच करत होती.
मोनिकाच्या थापा ऐकतानाचे मानसीचे एक्प्रेशन्स (!)

वि ची सुटका होतेय बहुतेक...बाळ आणि आई या पैकी एक जण जगेल असं म्हणत होती काल आत्या आणि झी च्या सरकत्या पट्ट्यांवर बाळाचे आगमन अशी अपडेट दिसली....

वि ची कुठली सुटका होयला, मो ची सुटका होईल. आई आणि बाळ ह्यापैकी आईला वाचवायला प्रेफरंस देतात नेहमी. आता मा सलीलच्या प्रेमात पडणार, मो ला हेचं तर हवं होतं, आता दळवी पुन्हा मो ला गोंजारणार, बिचार्‍या वि ची कळी खुलता खुलेना राहणात Wink

काल सलील कसा आला होता दवाखान्यात...? अजून कशात काय नाय अन! Happy
तै ला वाचविणार का वि? नको असं व्हायला

सलील आजी आजोबांना घेउन आला होता. मा चा टेन्स आवाज ऐकून आला असेल बिचारा, हाचं त्याचा चांगुलपणा तर मा ला आवडणार आहे आणि तिचं वि बरोबर जमता जमता राहून जाणारे .......

Pages