Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपला निषेध विक्रातच्या आजिला
आपला निषेध विक्रातच्या आजिला कळल बहुधा! काल म्हणत होत्या ना काय सारखे पडलेले चेहरे घेवुन फिरत असतात ते? या दोघाना मालिका सुरु झाल्यापासुन एकदाही मनापासुन हसताना पाहिल नाही, तो विक्रात तर सगळे डायलॉग इतके कुन्थुन म्हणतो की म्हणावस वाटत अरे बाबा! पाहिजे तर काहितरी घेवुन सगळ मोकळ झाल की बोल सारख काय उसासे टाकत बोलायच.
Nidhii | 19 December, 2016 -
Nidhii | 19 December, 2016 - 23:52 नवीन
ओ मोरपंखी, त्या थंडाक्काला मी न्हाई सरळसाधी म्हंटलेलं.. सनवनी म्हटलंय.. उगाच अर्धवट काॅपी पेस्ट करु नकासा माझी वाक्य. >>>
अरेच्या हे लक्षात आल नाही माझ्या !!! ...बदल केला आहे..
रिचा ने विक्रांत ला ऑफर दिली
रिचा ने विक्रांत ला ऑफर दिली कसली तरी... नक्की कसली?

मी नेमकी त्या शॉट ला काहीतरी दुस्र्रंच करत होते त्यामुळे चुकलं
की तू जे पैसे मोनिकाला देणार
की तू जे पैसे मोनिकाला देणार होतास ते पैसे मेला दे..मी तुझ्या बाजूने साक्ष देते कोर्टात...
ती रिचा ची एन्ट्री झाल्यवर
ती रिचा ची एन्ट्री
झाल्यवर काय म्युझिक वाजत
राई राई राई राई राई... की
राई आई राई आई राई आई...की
राई साई साई राई ...असच काही तरी...
यारी यारी यैऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
यारी यारी यैऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

rmd | 21 December, 2016 -
rmd | 21 December, 2016 - 00:10
यारी यारी यैऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
>>> Got it... आभार...
राई साई साई राई ...असच काही
राई साई साई राई ...असच काही तरी...
>>>>>
आम्ही ते आईं आईं आईं असं ऐकतो..
म्हणजे आई आई गं ! आली ही परत अश्या टाईप..
rmd | 21 December, 2016 -
rmd | 21 December, 2016 - 00:10
यारी यारी यैऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
>>>>
काल नीट पाहिल...
रा ऽऽऽऽ री ऽऽ रा ऽऽऽऽ री ऽऽरा ऽऽ इ ऽऽऽऽऽ असच आहे...
मला ते म्युजिक "यांई यांई
मला ते म्युजिक "यांई यांई यांई" असं ऐकू येतं.
काही प्रोग्रेस झाली का वि-मा
काही प्रोग्रेस झाली का वि-मा च्या आयुष्यात ?
विक्रांत हसणंच विसरलाय.
विक्रांत हसणंच विसरलाय. एकट्यानेच का होइना गाणं गुणगुणनं विसरलाय. पार्टीत मजा करणं विसलाय.
हे सगळं मान्शीतै म्हणतात.
विक्रांत हसणंच विसरलाय.
विक्रांत हसणंच विसरलाय. एकट्यानेच का होइना गाणं गुणगुणनं विसरलाय. पार्टीत मजा करणं विसलाय.>>>
हे सगळे कधी केलेले त्यने मानसीतै समोर???
कदाचित इक्रान्त वरची संक्रान्त टळल्यावर तो असे काही करत होता असे डायरेक्टरला दाखवायचे असेल!
काल इक्रान्त पहिल्यांदा जोरात ठामपणे के काही तरी वाक्य बोलताना बघितला टेव्ही समोरून जाता येता!
विक्रांत आणि मानसी सीन बोअर
विक्रांत आणि मानसी सीन बोअर होतात, काल प्रोमो बघितला. एक सीनही बघितला. ती मोनिका होती तो बघायला बरा वाटला. त्या विमाची लवस्टोरी बोअर होईल बघायला एकंदरीत. असो.
वि-मा सारख्याला वारखे आहेत.
वि-मा सारख्याला वारखे आहेत. नुसते रडवेले चेहरे घेउन उसासे टाकत ड्वायलॉग बोलतात.
तु ह्याव मजा कर त्याव गाणं गा म्हणताना पण मन्शीतैच्या स्वतःच्या चेहर्यावरची माशी हलत नव्हती.
आता जरी विक्रांत हसु बोलु खेळु नाचु गाउ लागला तर तो पुर्वीसारखा वागु लागलाय असं आम्हा बापड्या पेक्षकांना कसं वाटणारे? कारण तो आधी म्हणजे लग्नाआधी कसा वागत होता ते आम्हाला दाखवलेलंच नाही. (मान्शीला एकवेळ अग्गबै किंवा डिम्पल काकीकडुन समजलं असॅल तो कश्श्सी मज्जा करायचा ते.) मग अचानक मान्शीतचं ऐकुन हबोखेनागा लागला तर ह्या शा प्रसंगी त्य्च्या डोक्यावर प्रीणाम झालाय असंच वाटण्याची शक्यता आहे.
आता हे दोन उदास ठोकळे पार्टीत काय मजानु लाइफ करतात ते बघायचंय.
आठवा. एकदा रात्री बारा वाजून
आठवा. एकदा रात्री बारा वाजून गेल्यावर विक्रांत आणि मानसी रस्त्यात हिंडत होते. कॉफी प्याले. तेव्हा विने माला त्याच्या कॉलेज लाईफबद्दल सांगितलेलं. वर मा म्हणाली मी यातलं काहीच केलं नाही.
सस्मित. सारख्याला
सस्मित. सारख्याला वारखे...खूप दिवसांनी ऐकला शब्द!!! . ...
आता जरी विक्रांत हसू बोलू खेळू नाचू गाऊ लागला तर तो पूर्वीसारखा वागू लागलाय असं आम्हा बापड्या प्रेक्षकांना कसं वाटणारे? कारण तो आधी .. म्हणजे लग्नाआधी कसा वागत होता ते आम्हाला दाखवलेलंच नाही. ....मला तर विक्रांत मोकळेपणाने हसतो-बोलतोय ही कल्पनाही करता येत नाही ! सदा आपलं उतरलेलं तोंड आणि घुसमटलेले भाव...
त्या मानाने साईप्रसाद किती मोकळा हसायचा !! यात काय झालं कुणास ठावं!!
भरत., ... "आठवा"
मला तर विक्रांट मोकळेपणाने
मला तर विक्रांट मोकळेपणाने हसतो-बोलतोय ही कल्पनाही करता येत नाही> अॅक्चुली.
यात काय झालं कुणास ठावं!!> यात त्याचं लग्नावेळी साडेतीन महिन्याची प्रेग्नंट असलेल्या मुलीशी लग्न झालंय. खरंतर झालंय नाही त्याने केलंय.
आठवा. एकदा रात्री बारा वाजून
आठवा. एकदा रात्री बारा वाजून गेल्यावर विक्रांत आणि मानसी रस्त्यात हिंडत होते. कॉफी प्याले. तेव्हा विने माला त्याच्या >>>
भरत, नाही हो मी एवढे आवर्जून सिरिली पहात नाही! मातोश्रींच्या कृपेने आजकाल आदेशभावजींपासून निलेशभावजींपर्यन्त 'झी'मय असतो टीव्ही त्यामुळे अधून-मधून पाहिले जाते!
वि आणि मा.. भारी शाॅफाॅ.
वि आणि मा.. भारी शाॅफाॅ.
"आठवा".. हे जबरदस्त आहे.
हबोखेनागा >>
सस्मित, कसले भयानक शाॅफाॅ करतेस तू.
मी वि, मा नि मो सगळ्यांना बोअर मारुन मालिका बघणे सोडलं.
उदास ठोकळ्यांची पार्टी आहे?
उदास ठोकळ्यांची पार्टी आहे? कधी?
असेल रविवारी. म्हाएपि आहेना.
असेल रविवारी. म्हाएपि आहेना.
पण काल बघितलं का ती मोनिका
पण काल बघितलं का ती मोनिका ब्यागा भरून तयार . वरती काकी ला फोन करून सांगितलं आम्ही येतोय . अशी जादा ती पहिल्या पासूनच दाखवलेय. स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेणारी . काही वेळा प्रश्न पडतोच इतके दिवस भरल्यावर आता सातव्या महिन्यात विक्रांत ने तिला नोटीस पाठवली हे बरोबर आहे का ? हि ऍक्शन आधीच घेतली असती तर. आता नाही म्हटलं तरी हे असं भरल्या दिवसात मोनिकाला रडताना बघून बर नाही वाटत जरी विक्रांतची बाजू बरोबर असली तरी

भरत.. अजून एक आठवा (नववा
भरत..
) विक्रांत ने मानसीला लग्नाच्या आदल्या रात्री फोन केला होता. "मला वाटलं तुला माझी आठवण येत असेल" असा कहितरी माफक रोम्यँटीक ड्वायलॉग थोडसं(च) हसून म्हटला होता ना. हीच असावी धमाल आणि पार्टी.. 
अजून एक आठवा (नववा म्हणायचं का ह्याला ?
>>>काही वेळा प्रश्न पडतोच
>>>काही वेळा प्रश्न पडतोच इतके दिवस भरल्यावर आता सातव्या महिन्यात विक्रांत ने तिला नोटीस पाठवली हे बरोबर आहे का ? हि ऍक्शन आधीच घेतली असती तर. आता नाही म्हटलं तरी हे असं भरल्या दिवसात मोनिकाला रडताना बघून बर नाही वाटत जरी विक्रांतची बाजू बरोबर असली तरी ---
हो ना. पटत नाही त्याचं वागणं. आधी एवढा आव आणुन आता हे असं.
पटत नाही त्याचं वागणं. आधी
पटत नाही त्याचं वागणं. आधी एवढा आव आणुन आता हे असं.>>
अरे आधीची परिस्थिती वेगळी होती, आताची वेगळी आहे.
मो आधी वि ला सांगते की तिला ती प्रेग्नंट असल्याबद्दल काहीच माहित नव्हतं म्हणून तो स्वीकारतो. पण आता जेव्हा त्याला कळलंय की मो ला लग्नाआधीच ती प्रेग्नंट असल्याचं कळलंय नि तरीही तिने विच्या पैशांसाठी त्याच्याशी लग्न केलंय तर त्याने का मो ला स्वीकारावं. ही त्याची फसवणूक आहेच आणि त्याच्या कुटुबियांशी ती निखालस खोटं बोलते, की हे मुलं विचंच आहे. यावर त्याचं वागणं अगदीच योग्यच आहे. आधी त्याने आव वगैरे काही आणलेला नव्हताच. पण तो त्याचा मोठेपणा होता पण मो प्रत्येक गोष्टीचा गैरफायदा घेतेय असं वाटू लागलेलं असतानाच वि ने निर्णय घेऊन टाकला.
मोनिका मस्त एक्टिन्ग करतेय,
मोनिका मस्त एक्टिन्ग करतेय, सन्ताप्,चिडचिड, मधेच खोट हसण, कॅरेक्टरची नस तिने अचुक पकडलीये , थोडक्यात सध्या राणी, वहिनीसाहेब आणी मोनिका जोरात आहेत बाकि कादिप ची कल्पना नाही- ती नो झेप सिरियल आहे माझ्यासाठी.
हो निधी, कबुल आहे. पण तरीही
हो निधी, कबुल आहे. पण तरीही तो मुळात चांगला आहे ना? शिवाय गायनॅक आहे. असं मोनिकाला त्रास देणे शोभत नाही त्याच्या कॅरेक्टरला. दोन महिने थांबु शकतो ना तो.
मुल व्हायच्या आधी डिवोर्स
मुल व्हायच्या आधी डिवोर्स हवाय त्याला.
आज त्या मोनिकाची चांगली
आज त्या मोनिकाची चांगली जिरली. ते आजोबा रागावले तेही अतिशय योग्य होत..प्रचंड स्वार्थी दाखवलेय ती . आता तिने डिव्होर्स पेपर वर सही केल्याने विक्रांतचा रस्ता खुला होणार का ? माझ्यामते नाही आत्त्ता खरी खुलता कळी ( आणि कळा सुद्धा ) खुलेना सुरु होईल. एकदा कळी खुलणार नाही एकदा कळा . दोघेही खुलले कि त्यांचं लग्न होणार आणि मालिका संपणार .हुश्श
Pages