खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरारारा.. काय ती पार्टी !
"डोळ्याण्णी", "इशार्‍याण्णी" आणि "शब्दाण्णी" इक्सप्रेस झाले दोघं. Proud

पण वि आणी मा छान दिसत होते की.... नाचलेही छान! म्हणजे विक्रांत एनी वे ऑक्वर्ड असतोच...त्याला सूट झाले ते!
मानसी ने झटक्यात केशभूषा, वेषभूषा कधी व कशी बदलली?
आणि घरी सांगितले नाही की मी विक्रांत बरोबर जातेय ते?
आणि काहीही हं...!! यांना किती सांगायचं असतं की ते मि अँड मिसेस दळवी नाहीयेत...पण कुणी ऐकूनच घेत नाही म्हणे!

Happy
पण मराठी मालिकेच्या मानाने सलसा आणि ब्लॅक ड्रेस वगैरे म्हणजे खूपच झालं....!!
आणि ऑफ ऑल साँग्ज, "अजीब दास्ता है ये.." का म्हणे?

ते मोनिकासाठी सूट होतं म्हणून.

परवा रिचाशी बोलताना मोनिका नाटक करतेय हे दाखवायला नको होतं.

मानसीच्या नवीन स्थळाची एन्ट्री झाली काल, सन्कर्षण कर्हाडेची.

इतके निरक्षर कसे वि आणि मा. इन्विटेशन कार्ड वर 'कपल्स ओन्ली' हे त्यानी वाचलेच नाही? Uhoh

हो संकर्षण कऱ्हाडेंची एन्ट्री झाली काल . आता काय ? खुलता कळा च खुलेना होणारे बहुतेक .
आता आता कळा खुलायला सुरवात झाली होती आणि तेवढ्यात ढ्यन्ग Happy Wink

संकर्षण कऱ्हाडेंची एन्ट्री झाली काल >>> हो! मला वाटतंय की आता मानसीला तो आवडायला लागेल. त्यांचं लग्न ठरेल. विक्रांतची चिडचिड होईल. आणि फायनली समजेल की हाच मोनिकाच्या बाळाचा बाप! मग मानसी परत विक्रांतकडे आणि कळी खुलणार!

वि आणि मा एकमेकांच्या प्रेमात आहेत की नाहीत....? काही समजेना झालंय राव! मोनिका अतीव संताप मस्त व्यक्त करते.... काय भयंकर आहे तिचा राग!
संकर्षण मला तरी सभ्य वाटला त्याच्या एकूण गेटप वरुन! पाहूया आता कसा निघतो ते! Happy
मा फारच भोचक पणा करत्ये वि च्या मॅटर्स मधे!

आणि मला हे कळले नाही की मोनिका चे कोण इतके कॉमन मित्र आहेत ज्यांनी तातडीने तिला एफ बी अपडेट्स दिले पार्टी बद्दल ? ती पार्टी तर मेडिकल असोसिएशन वाल्यांची होती ना? हिचा काय संबंध?

मला वाटतंय की आता मानसीला तो आवडायला लागेल.>> हो ना, जेव्हा तो संकर्षण गाडी रिपेअर करत होता तेव्हा मानसी त्याच्याकडे attract झाल्यासारखी बघत होती. त्या क्षणी ती विक्रान्तला जणू विसरली होती.

संकर्षण यात सलील पन्डीत झालेला आहे, काल प्रोमोंमध्ये दाखवल.

तुम्हाला ही मा नेहमी अशीच पहाते असं वाटतं का? आधी ती वि कडे हावर्‍या सारखी बघायची म्हणे..आणि आता सं कडे! Wink

मानसीचे उच्चार फार सदोष आहेत
अज्जी, अजोबा, तई, अत्या वैगरे स्वतःचे नाव सांगताना मनसी सांगते का?

राजस्थानी कठपुतळी वाटते ती. तिच्या तारा जेवढ्या आवळल्या जाणार तेवढेच तोंड उघडते ती. अजिबात आवडत नाही मला. परिस्थिती काहिही असो, बहिणीच्या बाजुने उभे रहायला नको? बरं ते नाही तर अ‍ॅट्लिस्ट तिच्या नवर्याबरोबर तरी फिरु नये.

बहिणीच्या बाजुने उभे रहायला नको? बरं ते नाही तर अ‍ॅट्लिस्ट तिच्या नवर्याबरोबर तरी फिरु नये.>> सोळा आणे सच !
ह्या सीरिअल मध्ये हिरवीन व्हिलन व व्हिलन हिरवीन झालीय !

बहिणीच्या बाजुने उभे रहायला नको? बरं ते नाही तर अ‍ॅट्लिस्ट तिच्या नवर्याबरोबर तरी फिरु नये >>> आँ? कळी कशी खुलणार मग? Proud

परिस्थिती काहिही असो, बहिणीच्या बाजुने उभे रहायला नको? - असहमत!
अर्थात विक्रांत बरोबर फिरायला नको हेही मान्य. पण ते चुकार मनाचं पाखरु म्हणून माफ!

बरं ते नाही तर अ‍ॅट्लिस्ट तिच्या नवर्याबरोबर तरी फिरु नये. >>> तो तिच्या बहिणीचा नवरा आहे तसाच तो तिचा कलिग ही आहे Happy . अस तिचं म्हणाली होती .

खरं तर या मा-वि.च्या एकत्र फिरण्यामुळे आणि पार्टीत मिस्टर अँड मिसेसची घोषणा झाल्यामुळे विक्रान्त चांगलाच अडचणीत येऊ शकतो. या दोघांचे आधीपासूनच संबंध आहेत आणि म्हणूनच वि. मो.ला डिवोर्स देतोय असं आर्ग्युमेंट मोनिकाच्या बाजूने होउ शकतं. रिचा वि.ला ब्लॅकमेल करून जास्तीत जास्त पैसे उकळू शकते. सगळी केस वि.वरच उलटू शकते.

सुलू... .इतके निरक्षर कसे वि आणि मा. इन्विटेशन कार्ड वर 'कपल्स ओन्ली' हे त्यानी वाचलेच नाही? Happy

तिला आधी वि चा मूड सुधरवायचा होता ना!
आपल्या सारखे थोडीच आहे ते...पत्रिका आली की डिटेलवार वाचून काढायची..... Happy
कपल्स ओन्ली आहे का.....आहेर व पुष्प्गु अलाऊड आहेत की नाही इ इ..... Happy , प्रि रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड आहे का... फोटो आयडी लागतील का................

आवो, ती सिरीयल आहे, ते सगळं खोटंखोटं असतंय.
आता खर्‍या आयुष्यात घडते तसे आणी तेच सिरीयलमधेपण दाखवायला लागले तर काय मजा राहील ते बघण्यात? त्यामुळे त्यात अतिरंजीतपणा रहाणारच.

ओळख वेळेत न सांगणं मुद्दाम कोर्टात साक्ष देताना मोनिका ला एक मुद्दा असावा म्हणून ठेवला अस वाटलं....बाकी वि-मा च वागणं परिस्थिती शी धरून वाटत नाही...मोनिका खूप चुकली आणि मा सुद्धा चुकतच आहे सुरवातीपासून...फक्त संवेदनशील आहे हा मोठा फरक दिसतो...

>>>आवो, ती सिरीयल आहे, ते सगळं खोटंखोटं असतंय--

हा हा. पण कुरुडीशी सहमत. (>>>बाकी वि-मा च वागणं परिस्थिती शी धरून वाटत नाही).

तुनळीवर फिरता फिरता एक माहिती मिळाली .

१. परवा वि-मा पार्टीला जातात तेन्व्हा काउंटर वर , एक स्त्री व एक पुरुश असतात , जे इन्व्हिटेश्न चेक करतात आणि मग नावाचे स्टीकर लावतात .
२.मागे एक्दा मोनिका पहिल्यान्दा ईडल्या बनवते आणि त्या खाण्याच्या ( वाट पहाण्याच्या) नादात विक्रांत ला हॉस्पिटलला जायला उशीर होतो. एका बाईचा नवरा त्याची वाट बघत असतो , त्याच्या बायकोचं ऑपरेश्न असतं आणि ती क्रिटिकल आहे , विक्रांत अजून पोचला नाही म्हणून तो व्वैतागतो.
३.मानबा मध्ये शनाया नविन जॉब शोधायला जाते . अंगचटीला येते म्हणून तो बॉस तिला हाकलवून लावतो.

तो काउन्टर्वरचा पुरुष , नवरा आणि बॉस - तिन्ही ठिकाणी एकच कलाकार आहे .

केला बदल Wink

Proud Proud Proud

मा आणि वि एकमेकांना एसेमेस पाठवतात. व्हॉट्स अ‍ॅप नाही वापरत?

दोघांचाही आयुष्यातल्या भीषण गोष्टींशी सामना एकाच दिवशी एकाच वेळी. हा नियतीचा संकेत म्हणावा का? Wink

Pages