खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भीषण कसल्या? शेवटी दृष्टिकोन जसा असेल तशा गोष्टी दिसणार. शिरेलित दाखवतात तसं त्याला आपण तरी काय करणार म्हणा.
विक्रांत ला मो पासून सुटका हवी आहे, आणि मानसीला एक चांगला मुलगा भेटणार, जो आयुष्याचा जोडिदार होउ शकतो म्हणजे नवा माणूस अभ्यासायला मिळणार असा दृष्टिकोन ठेवला तर काय भिषण आहे त्यात? Uhoh
उगिचच ती जबरदस्तीने बोहल्यावर चढवत असल्याचा आव आणते.

वि आणि म च भीषण आहेत या शिरेलित, बाकी सगळं सुसह्य आहे Lol

पण मा ला नकोचे नं दुसरा जोडीदार !
आणि वि ला हवा असला तरी मोनिका त्याला सहजासहजी घटस्फोट नाही देणारे.
म्हणून सगळं भीषण.....पार्श्व संगीत, मा चं घोळत बोलणं, मोनिकाचं सायकिक पात्र, वि ची 'सर्वाथाने' घुसमट...
सर्वच भीषण! Happy

दोघांनी किंवा तिघांनी आजचं मरण पुढल्या वर्षावर ढकललं.

काकाने "मोनिकाला घेऊन ये" हे सांगायला विक्रांतला फोन केलेला, ते सांगितलेच नाही. मोनिका हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे हेही घरच्यांना सांगितलं नाही का?

यांच्या काळवेळेचे गणित समजत नाहीए. परवाच्या भागात कोर्ट हिअरिंग असलेल्या दिवसाची सुरुवात झाली होती ना? विक्रांत म्हणत होता, मी आधी घरी जाऊन आशीर्वाद घेतो. मग अगबाईंला विक्रांत ब्रेकफास्ट न करता गेल्याचा धक्का काल कसा बसला?

ते घटस्फोटाचं घरी का सांगितले नाही अजुन? काही खास कारण का एपिसोड वाढवणे किंवा लपवाछपवी ही झीच्या हीरो / हिरविणींची परंपरा म्हणून?

एपिसोड वाढवणे किंवा लपवाछपवी ही झीच्या हीरो / हिरविणींची परंपरा म्हणून?>> एवढेच.. आता ते बाळ येऊन परत घरी रहायला आली तरी लपवाछपवी अमर रहे Proud

झी वाल्यान्ना लपवाछपवी जितकी चांगली हॅन्ड्ल करता येते तितकं बिन्ग फुटल्यावरंच्या सिचुएशन्स नाही हॅन्ड्ल करता येत.....का रे दुरावा मध्ये, सगळ कळल्यानन्तर ज्यान्च्या पासून लपवलं ते, हो का, बर बर म्हणून मोकळे झाले होते, कादिप मधे ही तेच....नील-ललिता थोड्या फार फरकाने तेच....
सुतळी बॉम्ब आता फुटेल फुटेल म्हणता म्हणता, फुस्स्स व्हाव तस आहे हे सगळं

झी वाल्यान्ना लपवाछपवी जितकी चांगली हॅन्ड्ल करता येते तितकं बिन्ग फुटल्यावरंच्या सिचुएशन्स नाही हॅन्ड्ल करता येत....>> सगळ्यात महान तर लक्ष्मी होती .

आता मो सही डिले करणार, तो वर प्रिमॅच्युअर बाळ येणार.. मग घटस्फोट रद्द. मो आणि वि भिषण्बहू प्रेम प्रेम खेळत बसणार. मो त्यांना सारखी खो देणार.
अगंबई अन्थ्रुणाला खिलनार, आजी तोवर वर जातीलच.

ह्या झी वाल्यांच्या सगळ्या सेरेली जुन्या नव्या एकत्रीत करुन करुन कथानका कडे नजर टाकली तर सगळे सारखेच आहे!

काही काही सिरेलीतले प्रसंग देखिल एकमेकात सरमिसळ होतील!

ह्या झी वाल्यांच्या सगळ्या सेरेली जुन्या नव्या एकत्रीत करुन करुन कथानका कडे नजर टाकली तर सगळे सारखेच आहे!

काही काही सिरेलीतले प्रसंग देखिल एकमेकात सरमिसळ होतील!
>> मग एक छान मोबाइल अ‍ॅप बनवायला पाहिजे, मेक - अ - सिरियल फॉर झी
त्यात सगळा मेनु देउ, खाष्ट/सोशिक सासू, खाष्ट/सोशिक सून, गरिब गाय/बैल, ढवळाढवळ, अफरातफर, लपवा छपवी, काय लपवायचे आहे, किती दिवस, किंचित हॉरर/इनोदि/लग्न/.......

किती साचेबद्ध असाव सगळ?!

मग एक छान मोबाइल अ‍ॅप बनवायला पाहिजे, मेक - अ - सिरियल फॉर झी>>

अगदी!!

त्या जिग्सॉ पझल मध्ये तरी वेगळ्या चित्रांचे वेगळे भाग असतात! इथे तर कुठला तुकडा कुठेही कसाही बसवा! सिरेल तयार!

>>>अगंबई अन्थ्रुणाला खिलनार, आजी तोवर वर जातीलच.---

अरे देवा. कशाला आजींना वर पाठवताय. हल्ली कमी ओरडतात त्या.

काय चालू आहे सध्द्या.....हल्ली मला बघायला मिळत नाहि.

विक्रांतने मोनिकाला घटस्फोटाची नोटीस दिल्येय . त्यांची कोर्टात तारीख असताना त्याच दिवशी कोर्टात जात असताना मोनिकाला चक्कर येते . तिच्या बरोबर मानसी होती . विक्रांतला वाटेत त्या दोघी दिसल्या . तिची ( मोनिकाच्या ) स्थिती बघून विक्रांत ने तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलाय आणि पुढची डेट मागून घेतलेय . मानसी आणि सलील पंडित भेटणार होते ते भेटू शकले नाहीत . शेवटी सलील पंडित ने त्या दिवशी "न" येण्याचं कारण मानसीला सांगितलं आहे . तिला ते पटलेलं आहे. आणि मोनिकाला दळवींच्या घरी यायचंय म्हणून आजी / गीता काकींना फोन करून मनवत असते. तिच्या प्रयत्नांना फळ येऊन प्रोमो मध्ये असं दिसतंय कि आजी मोनिकाला दळवींच्या घरी नेण्यासाठी हॉस्पिटल मध्ये आलेल्या आहेत आणि विक्रांत तिला विचारतोय . आजीला असं कोणी कळवलं. मोनिका सांगते मी Happy

कुरुडी,
"झी वाल्यान्ना लपवाछपवी जितकी चांगली हॅन्ड्ल करता येते तितकं बिन्ग फुटल्यावरंच्या सिचुएशन्स नाही हॅन्ड्ल करता येत.....का रे दुरावा मध्ये, सगळ कळल्यानन्तर ज्यान्च्या पासून लपवलं ते, हो का, बर बर म्हणून मोकळे झाले होते, कादिप मधे ही तेच....नील-ललिता थोड्या फार फरकाने तेच....
सुतळी बॉम्ब आता फुटेल फुटेल म्हणता म्हणता, फुस्स्स व्हाव तस आहे हे सगळं..."
अगदी अगदी.......

उगीच नको तितकं ताणायचं आणि मग अगदी पार उत्सुकता संपल्यावर काहीतरी भोंगळ पणा दाखवायचा....लक्श्मी च्या सिरेलीत तर वात आणलेला यांनी ::राग::

Pages