तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
गुड इव्हिनिंग / मॉर्निंग...
गुड इव्हिनिंग / मॉर्निंग... टाईमझोन नुसार.
फुल्ल टू मनोरंजन, एकदम कॅशलेस
:हाहा::हहगलो:
फुल्ल टू मनोरंजन, एकदम कॅशलेस !!
किती तो आटापिटा. ते काका अॅडमिनला भेटले होते म्हणे. एकही गटग कधी चुकवलेलं नाही. प्रोफाईलचा त्यांचा स्वतःचा फोटो, प्रत्येकाकडे असलेला फोन नंबर, त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, गरिबांबद्दलची कळकळ ( एका धाग्यावर मी का फुकट ट्रीटमेंट द्यावी असे यांच्याप्रमाणेच मनमिळाऊ भाषेत इब्लीस कि कुणा आयडीने म्हटलेले वाचले बै) हे सगळे पॉईण्ट्स यांचे अस्तित्त्व सिद्ध करत असताना ....
शक करनेवालों को ट्रीटमेंट की जरूरत है !
काय बै एकेक... मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी हसली असेन.
अॅडमिन, सतत इकडुन तिकडून
अॅडमिन,
सतत इकडुन तिकडून स्क्रिनशॉट टाकून विषयांतर करणार्या आयडींना कृपया समज द्यावी. मुद्दे नसेल तर नुसते वाचनमात्र झाले तरी चालेल इतकी शिकवण त्यांना दिली तरी चालेल.
गुप्त जागांचा वापर कसा करावा
गुप्त जागांचा वापर कसा करावा या बाबत प्रशासन गंभीरपणे विचार करत आहे. सातबारा नावावर केल्याप्रमाणे घरात बसून इतरांबद्दल वाटेल ते बोलले तर इथे कॉपी पेस्ट होणारच. किमान ईमेल बाहेर जाणार नाहीत याची काळजी अशा मेंब्रांनीच घ्यावी. समजत नसेल तर नाईलाज आहे.
http://www.loksatta.com/vishe
http://www.loksatta.com/vishesh-news/dhasai-maharashtras-first-cashless-...
टायं टायं फिस्स्स्स्स्स्स्स्स्स्स
आपकी घर की कमाई मेरे हवाले
आपकी घर की कमाई मेरे हवाले करो.
और अपने घर खर्चे के लिये " पे टीएम " इस्तेमाल करो....!!!!
हेच लिहायला आलो होतो. त्या
हेच लिहायला आलो होतो.
त्या गावात ........
ब्यान्का रोज लाखो रुपये डिस्बर्स करतात.
निम्म्या व्यापार्यaंकडेही स्वाइप मशिन नाहीत.
गावात नेट कॅफे चोवीस तास नसते.
ऑनलाइन खरेदी केली तर कुरियर गावापर्यंत येत नाही.
मग हे क्याशलेस व्यवहार कसे करतात म्हणे ?
माझा प्रश्न- दुकानातले वगैरे
माझा प्रश्न- दुकानातले वगैरे रोखीचे व्यवहारही नोंदले जावेत म्हणून प्रोग्रॅम केलेली कॅश रजिस्टर ठेवता येतील का?
मला इथे अमेरीकेत रोजच्या किरकोळ खरेदीसाठी कॅश्,चेक, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड असे पर्याय आहेत. जे लोकं दारिद्र्यरेषेखाली आहेत त्यांच्यासाठी यात योग्य खरेदीबाबत फूड स्टँपचाही पर्याय आहे. ज्या वस्तूंवर विक्री कर आहे त्या वस्तूंचा विक्रीकर वगैरे मोजून , कुपन्स असल्यास त्याप्रमाणे वजावट होवून पक्की रिसीटच मिळते. मी कॅश किंवा क्रेडीट कार्ड वापरते. काही ठिकाणी चेकने पैसे देते. जसे की हॉस्पिटल, डेंटिस्ट वगैरे ठिकाणी इंनशुरन्स ने न दिलेली मोठी बिले किंवा बिलांचे हप्ते.
आता इथे हिवाळ्यात हिमवादळामुळे वीज गेल्यास हाताशी असावे म्हणून लोकं, विशेष करुन युनिवर्सिटीकँपसवर रहाणारी मुले जवळ कॅश ठेवतात . वादळातही रात्रंदिवस काम करुन वीज पुरवठा सुरळीत करायचे काम केले जाते तरी याला १-२ दिवस लागतात. अशा वेळी हाताशी जास्तीची कॅश ठेवा असे रेडक्रॉसच्या माहितीपत्रकातही लिहिलेले असते.
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर जिथे सर्रास ८-८ तासाचे लोड शेडिंग चालते तिथे कॅशलेस व्यवहार कितपत शक्य होणार आहेत?
बाकी कॅशलेसबद्दल बोलायचे तर भारतात कॅशलेस भ्रष्टाचार पूर्वीपासून आहेच. यात सकारी अधिकार्यांचा महिन्याचा किराणामाल भरणे, सिनेमानाटकाची घरपोच तिकीटे, भेट म्हणून दागिने, महागड्या दुकानातून शॉपिंग, नातेवाईकाच्या नावावर स्वतःच कंत्राट घेणे, मुलांच्या अगदी परदेशातल्या उच्च शिक्षणासाठी 'मदत' , महागडे परदेशी मद्य आणि उच्च दर्जाची एस्कॉर्ट सर्विस वगैरे सर्व काही होते. हे सगळे २५-३० वर्षांपूर्वी होते. आता तर यात अजूनच भर पडली असणार. माझे अगदी जवळचे नातेवाईक सरकारी खात्यात, लष्करात अधिकारी. भ्रष्टाचाराच्या साखळीचा भाग होणे नाकारले म्हणून नोकरीत आणि समाजातही त्रास सोसला. बदल्या, कुभांड रचणे, चौकश्या वगैरे असेच पण समाजात वावरतानाही त्रास होई. मुलीचे वडील सरकारी अधिकारी तेव्हा त्यांनी याना त्या रुपात महागड्या भेटी द्याव्यात म्हणून मुलीच्या सासरच्या लोकांची अपेक्षा आणि ती पूर्ण होत नाही म्हणून मुलीला सतत टोमणे, भिकारडे म्हणून हेटाळणी वगैरे प्रकार होत. घरातील पैसा भ्रष्टाचाराचा आहे हे माहित आहे म्हणून 'स्थळ ' नाकारले तर ' भिकेचे डोहाळे ' अशी हेटाळणी तर मी स्वतःच झेलली आहे.
आपल्या अडचणी काय आहेत ते
आपल्या अडचणी काय आहेत ते सांगितले तर उपाय सुचवता येतील. (Assuming we are moving towards १००% cashless economy, which is not the case right now or in near future)
Double post, Edited.
Double post, Edited.
आपल्या अडचणी काय आहेत ते
आपल्या अडचणी काय आहेत ते सांगितले तर उपाय सुचवता येतील >> असल्या अॅक्शन्स घेताना अडचणी काय येतील त्याचा आधीच अभ्यास करून तसे उपाय करायचे असतात.. ऑन द फ्लाय "आली अडचण घ्या उपाय" असं जनरली या लेव्हलला करत नसतात..
ज्या संसदेच्या पायऱ्यांवर
ज्या संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवण्याचा अभिनय केला, त्याच संसदेत न बोलता राजकीय प्रचारसभा, पक्षीय कार्यक्रमात मन की बात करीत फिरणे, याला भंजाळणे म्हणतात.
14 dec la taklela cheque ajun
14 dec la taklela cheque ajun hi clear zalaela nahi,cash tar miltach nahi,nidan clearing fast hotil yachyakade tari laksh dyayla pahije hot.
अरे मला सांगा, आज मला गोखले
अरे मला सांगा, आज मला गोखले रोडवरच्या जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या atm मध्ये २-२-२ असे सहा हजारची रोकड मिळाली. ह्या बॅंकांची atm आजपासून सुरू झाली का? atm चा सिक्युरिटी म्हणाला आजच पहिल्यांदा कॅश आली आहे atm मध्ये.
पुढल्या अर्ध्या तासात त्यातल्या दोन नोटा गोखले रोडलाच सुट्ट्या करून घेतल्या ४०० + ४५० रुपयांच्या खरेदीवर.
अश्विनी के, प्लिज एटिएम मध्ये
अश्विनी के, प्लिज एटिएम मध्ये पैसे लगेच मिळतात, सगळिकडे आलबेल आहे अशा स्वरुपाच्या कामेंट्स टाकु नका. त्यामुळे होतं काय; या धाग्याचा आणि ओवरआॅल माबोचा इक्यु सटाककरुन खाली उतरतो...
राज, तुम्ही अमेरिकेत बसून
राज,
तुम्ही अमेरिकेत बसून असल्या पोस्टी लिहित जाउ नका, तुमचा आयक्यू व इक्यू, दोन्ही दिसून येतो.
ऑन द फ्लाय "आली अडचण घ्या
ऑन द फ्लाय "आली अडचण घ्या उपाय" असं जनरली या लेव्हलला करत नसतात----- प्रश्न तुमच्यासाठी नव्हता. It was more of a interpersonal query. कधी उपाय डोळ्यासमोर असू शकतो, पण सुचत नाही. ज्यांना प्रश्न होता त्यांनी पण काही सांगावं अशी अपेक्षा, आग्रह, विनंती नाही.
आता हे तुमच्यासाठी --- आपलं रडगाणं, tanturms चालू द्या!
राज,
राज,

झाडु, जाने दो ये आपकि बस कि
झाडु, जाने दो ये आपकि बस कि बात नहि. आयक्यु/इक्यु तो दूरकि बात है, आपकि अबतक तो सिर्फ उमर हि बडि है, और कुछ नहि. प्रत्येक धाग्यावर अपमान करुन घ्यायचाच असं ठरवुन रोज इथे हजेरी लावता काय? जनाची नाहि तर मनाची तरी लाज बाळगा...
<<<आज मला गोखले रोडवरच्या
<<<आज मला गोखले रोडवरच्या जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या atm मध्ये २-२-२ असे सहा हजारची रोकड मिळाली.
>>>
जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेने एटीम कधी पासुन सुरु केले?
माझे बाबा या बॅंकेत काम करतात आणी अजुन पर्यन्त बॅंकेने जळगाव मध्ये तरी एटीम सेवा सुरु केली नाहीये.
राज, तुमच्यासारख्यांना
राज,
तुमच्यासारख्यांना इतरांचा अपमान करणे सोडून दुसरे काही जमते का?
you dont have any idea of ground realities, dont know anything about whats going on.
अहो आहे की atm त्यांचे. ठाणे
अहो आहे की atm त्यांचे. ठाणे स्टेशनपासून तसं जवळच आहे. ओह सॉरी, atm ची स्लिप बघितली त्यावर जळगाव जनता सहकारी बॅंक लिहिलं आहे. मोबाईलवरून फोटो upload करायला जमलं तर टाकते.
युनिक रोहित, भक्तांनी
युनिक रोहित,
भक्तांनी प्रच्छन्न थापा मारायच्या असतात. त्याला कुणी प्रश्न विचारायचे नसतात.
इतरांनी सत्यकथन केले तर भक्त त्याला खोटे म्हणू शकतात.
सत्तेत आहेत भौ ते.
सोडा.
जळगाव जनता इज नॉट जेडीसीसी.
जळगाव जनता इज नॉट जेडीसीसी. अश्विनी, चुकून का होईना, थाप मारली तुम्ही.
आपलं रडगाणं, tanturms चालू
आपलं रडगाणं, tanturms चालू द्या! >>
ते तुम्ही सांगायची गरज नाही.. 
राज, इन्स्टन्ट पुरावा मिळून
राज,
इन्स्टन्ट पुरावा मिळून तोंडावर पडलात हे कबूल करणार का आता तरी? की "सन्मानास्पद" टांग आहेच उपर कुठेतरी?
>>you dont have any idea of
>>you dont have any idea of ground realities, dont know anything about whats going on.<<
या राईट; ग्राउंड रियॅलिटी तुमच्यासमोरच नेहेमी आ वासुन उभी असते, बाकिचे सगळे हवेत उडत असतात. बरोबर ना?
आणि कसला घंट्याचा पुरावा? अश्विनी के यांचा कदाचीत तो टायपो असावा. पण मुळ मुद्दा एटिएम मधुन पैसे मिळाल्याचा आहे, तो तुम्हि सवयीनुसार विसरुन थापा मारण्याची बोंब ठोकलीत. कुछ पल्ले पड रहा है?...
अश्विनी के, फोटो upload
अश्विनी के,
फोटो upload करायची गरज नाही. सहज विचारले.
आहे आहे. टांग उपर॑च आहे. चालू
आहे आहे. टांग उपर॑च आहे. चालू द्या भक्तीगीत.
८ नोव्हेंबरपासून आजतागायत
८ नोव्हेंबरपासून आजतागायत नोटबंदीमुळे माझी एकदाही गैरसोय झाली नाही असे मी खेदपूर्वक मान्य करतो.
Pages