Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक कळलं नाही आजच्या भागात
एक कळलं नाही आजच्या भागात पोलीसीण बाई जेव्हा राणी ला बोलवायला खोलीत आली तेव्हा राणी मोबाईल वर कोणाला तरी मेसेज करत होती ( त्या माणसाला ज्याच्या करवी पटवर्धनांचा खून केला अर्थात त्यालाच असावा. ) तिला जेव्हा पोलीस म्याडम बोलवायला आली तेव्हा खरं तर भले तिने राणीला मोबाईलवर बघितलं नसेल तरी ती इतका वेळ बाहेर यायला का लावत होती हे खोलीत उचक पाचक करून बघायला पाहिजे होत . त्या ऐवजी राणी म्हणाली तुम्ही व्हा पुढे . तर हि आपली "लवकर या" सांगून बाहेर
राणी "हाय प्रोफाइल" आहे
राणी "हाय प्रोफाइल" आहे म्हणून असेल. एवढे मात्र खर्या पोलिसांसारखे झाले.
काल परवा नाही का भुजबळांना तुरुंगात परत पाठवायला पोलीस आणि हॉस्पीटलवाले घाबरत होते.
राणीच्या मोबाईल रेकॉर्डवर
राणीच्या मोबाईल रेकॉर्डवर लक्ष ठेऊन असतीलना पोलीस, मिन्स असं करतातना.
छोटारे अयशस्वी झालाच आहे.
छोटारे अयशस्वी झालाच आहे. विकी आणी पटवर्धन तपासाला लागलेल्या वेळामुळेच गेले न. काहिही दाखवतात. सस्पेंड छोटारे.
खरे तर त्या 'कडक' राणी समोर
खरे तर त्या 'कडक' राणी समोर गणेशा बाळा ला आणला तिथेच सिरीयल गंडली होती.
पण राणी साठी बघतात प्रेक्षक..
खरे तर त्या 'कडक' राणी समोर
खरे तर त्या 'कडक' राणी समोर गणेशा बाळा ला आणला तिथेच सिरीयल गंडली होती. >>> लय भारी
सिरियल मध्ये नुसतेच मुडदे
सिरियल मध्ये नुसतेच मुडदे पडतायत. अगदी शोध लागलाय काही असं न दाखवता
नै का?
तपासात प्रगती होतेय इतकं दाखवलं असतं तरिही सिरियल इतकी गंडली नसती.
खरे तर त्या 'कडक' राणी समोर
खरे तर त्या 'कडक' राणी समोर गणेशा बाळा ला आणला तिथेच सिरीयल गंडली होती.
पण राणी साठी बघतात प्रेक्षक.. >>+ १
कालचा भाग पाहिला. अजय ठाकूर
कालचा भाग पाहिला. अजय ठाकूर आवडला कालच्या भागात
विकी गेला तेंव्हा ठाकूरसाहेब
विकी गेला तेंव्हा ठाकूरसाहेब एकलेच गेल्ते
पटवर्धन गेले तवा बी. (चांगला माणूस होता.)
म्हणजे ठाकूरसायबावरच सौंशव घेणार राणी
>>पण राणी साठी बघतात
>>पण राणी साठी बघतात प्रेक्षक
आम्हा बायकांच्या नशिबी असलं नयनसुखही नाही. छोटारे मारे करारी वगैरे दिसायचा यत्न करतात पण त्यांची मान आखडली आहे असं वाटण्यापलिकडे फारसं काही साध्य होत नाही. उरता उरले ते कॉन्स्टेबल्स, तिवारी, तो नोकर, छोटारेंचे साहेब वगैरे जनता क्लास लोक्स. Not Appetizing at all.
छोटारे काल राणीला 'आमचं काम कसं करायचं ते सांगू नका' म्हणाले तेव्हा त्यांना कणा असल्याचा थोडा संशय आला. पण लगेच 'मै हू ना' असं म्हणून तेही घालवलंन.
अरे ओ सांबा, कितने डेज बाकी है रे???
>>तपासात प्रगती होतेय इतकं
>>तपासात प्रगती होतेय इतकं दाखवलं असतं तरिही सिरियल इतकी गंडली नसती
तपास मुंगीच्या पावलाने चाललाय म्हटलं तर मुंग्यांचा मोर्चा येईल दारात अशी स्थिती आहे.
तेप एकटीच सगळ्यान्च्या वाटचा
तेप एकटीच सगळ्यान्च्या वाटचा अभिनय करतेय वाटत, कथेतच काहि दम नाही आणी लेखकाने काही क्राइम स्टोरीचा अभ्यास तर सोडा पण वाचन किमान टिव्ही वर तरी बघितल्या की नाही असा सन्शय येतो,
एकतर धन्जय देसाईना पहिल्याच एपिसोड मधे राणि ने मारल्याच दाखवुन स्टोरीलाईन विक करु ठेवलिये हे न दाखवताम, सन्शयाची सुई प्र्त्येकावर फिरती ठेवता आलीअसती, इतके मवाळ पोलिस कुठल्या प्लॅनेट वर अस्तित्वात आहेत? तेजस्विनी झक्कास पेलतेय तिची भुमिका, तिची नजरेतली जरब , आतली खळबळ कुठेही चेहर्यावर न दिसु देणे वैगरे परफेक्ट.
नेहा आणि तिच्या आइची भुणभुण उगाच घूसडीलेय.
पहिल्याच एपिसोड मधे राणि ने
पहिल्याच एपिसोड मधे राणि ने मारल्याच दाखवुन स्टोरीलाईन विक करु ठेवलिये >>> छे छे! वीक कुठे! त्यांनी हिचकॉक स्टाइल वापरली आहे, !
मग पुढे इनव्हेस्टिगेशनसाठी ...... झी-स्टाईल!
एकतर धन्जय देसाईना पहिल्याच
एकतर धन्जय देसाईना पहिल्याच एपिसोड मधे राणि ने मारल्याच दाखवुन स्टोरीलाईन विक करु ठेवलिये हे न दाखवताम, सन्शयाची सुई प्र्त्येकावर फिरती ठेवता आलीअसती, >> राखेचा बघितलाव नाय काय तुमी???
परवा दे दिनवाणे शोषित
परवा दे दिनवाणे शोषित बापाच्याच भुमिकेत शोभणारे कमिश्नर म्हणाले मी तुला काढून टाकतो या केस मधुन
मला वाटल आता छोटारेंचा पत्ता कट आणि मी सांगितल्याप्रमाणे अस्मिताला आणतिल
पण कसलं काय!!!
याने देवदत्त नागे स्टाईल मी करतो म्हटलं
आणि या कमिश्नर साहेबांनी ओके टेक दिला.
मला का कोण जाणे बरी वाटतेय
मला का कोण जाणे बरी वाटतेय मालिका . अगदी तो अजय ठाकूर थंड असला तरी. आत्ता या पुढे त्याच्याकडून केस काढून घेतली जाईल का ? त्या गायकवाडांच्या सांगण्यावरून. असं वाटतंय . त्या नंतर राणी त्याला वाड्यावर बोलावेल . आत्ता त्याच्या हातात केस नसल्याने तो बंगल्यावर जाईल पण आणि मग तिच्या बोलण्यातून / संशयास्पद वर्तनावरून त्याला तिच्या गुन्हेगारीचे धागे दोरे मिळतील असं वाटतंय . पण एखादा पोलीस ऑफिसर एखाद्याच्या घरी जाऊ शकेल का ? त्या बाबतीत मात्र माहित नाही
आता अजय ठाकुर राणीच्या नादी
आता अजय ठाकुर राणीच्या नादी लागल्याचे नाटक करेल. नेहा आणी ईतर बायका मेलोड्रामा करतील. वगैरे वगैरे
राखेचा बघितलाव नाय काय
राखेचा बघितलाव नाय काय तुमी???>>> नाही! एलदुगो नतर झी मराठी आत्तच बघितेय, पण नविन वर्शापासुन बहुधा बघण होणार नाही
बड्डे होऊन किती दिवस झालेत,
बड्डे होऊन किती दिवस झालेत, अजून गिफ्ट रिटर्न केला नाही.
१०० पैकी ८० दिवस तर जेवणार का? झोप लागत नाही का? थांब मी चहा आणते, माझी सून आहेच गुणाची!! यामधेच जाणार आहेत.
ती विन्सपेक्टरची गफ्रे नोकरी नाही का करत? त्याच्या एकट्याच्या पगारात नाही जमणार सगळं तर म्हणावे ना कि मी पण नोकरी करते मग आपल्या पगारात जमवू सगळं. सतत रडत बसायचं ते!
या लोकांनी आता बोटांचे ठसे घेतलेत......विकी तर कधीच मेला...त्याचे ठसे घ्यायचे राहिले की.
बड्डे होऊन किती दिवस झालेत,
बड्डे होऊन किती दिवस झालेत, अजून गिफ्ट रिटर्न केलं नाही.
१०० पैकी ८० दिवस तर जेवणार का? झोप लागत नाही का? थांब मी चहा आणते, माझी सून आहेच गुणाची!! यामधेच जाणार आहेत.
ती विन्सपेक्टरची गफ्रे नोकरी नाही का करत? त्याच्या एकट्याच्या पगारात नाही जमणार सगळं तर म्हणावे ना कि मी पण नोकरी करते मग आपल्या पगारात जमवू सगळं. सतत रडत बसायचं ते!
या लोकांनी आता बोटांचे ठसे घेतलेत......विकी तर कधीच मेला...त्याचे ठसे घ्यायचे राहिले की.
पटवर्धन ह्यांच्या खुनाची केस
पटवर्धन ह्यांच्या खुनाची केस कोण हँडल करतंय? ती एक वेगळी केस असू शकते.
ह्या पोलिसांना लॅड्लाईन ट्रॅक करता येत नाही का? स्गळे अरेच्च्या हा तर लँड्लाईन कॉल आहे असंच म्हणात बसतात जसं काय सॅटेलाईट फोन वरुन केलाय आणि ट्रॅक करणे मुष्कील आहे वगैरे ...
पालीहिल पो. स्टे. ही एक
पालीहिल पो. स्टे. ही एक अंधश्रद्धा आहे असं वाटायला लागलंय तिथले पोलिस पाहून
>> त्या नंतर राणी त्याला
>> त्या नंतर राणी त्याला वाड्यावर बोलावेल >>
सुजा हे "बाई वाड्यावर या....." ह्या स्टाईलने वाचा :))
हो तर असेच वाचतोय
हो तर असेच वाचतोय पहिल्यापासून फक्त बाई च्या जागी बुवा

" बुवा वाड्यावर या"
छे छे! वीक कुठे! त्यांनी
छे छे! वीक कुठे! त्यांनी हिचकॉक स्टाइल वापरली आहे, !
मग पुढे इनव्हेस्टिगेशनसाठी ...... झी-स्टाईल! >>> ही भारी पोस्ट.
पोलिसांच्या कार्यशैलीचे इतके
पोलिसांच्या कार्यशैलीचे इतके वास्तवदर्शी चित्रण यापुर्वी क्वचितच पाहिले असेल. छान चालू आहे मालिका. ; )
>>> धन्जय देसाईना पहिल्याच
>>> धन्जय देसाईना पहिल्याच एपिसोड मधे राणि ने मारल्याच दाखवुन स्टोरीलाईन विक करु ठेवलिये हे न दाखवताम, सन्शयाची सुई प्र्त्येकावर फिरती ठेवता आलीअसती ... >>>>
अगदी बरोबर , चूक तिथेच झालीय... धनंजय घरातुन ऑफीसला म्हणून जातो आणि गायब होतो असे दाखवायचे पण राणी, विकी आणि तिवारी यांचा त्यात सहभाग दाखवायचा नव्हता तसेच विकीचा पण खून केला गेला असे न दाखवता (त्या ट्रक ड्रायव्हर ला पैसे देणे इ न दाखवता .) अपघात दाखवायचा. विकीचा पण खून झाला होता हे नंतर सांगता आले असते.
राणी चा अभिनय असा आहे की तिचा संशय कोणालाच आला नसता.
नंतर राणीने पुढे केलेले धनंजय चे मृत्यू पत्र बनावट आहे हे पोलिसांच्या लक्षात आले असे दाखवायचे .. हा सिरीयलचा टार्निंग पॉईंट् ठरला असता, .. त्यातच मीरा सरदेसाईचा खूनाचा फसलेला प्रयत्न दाखवता आला असता .. एक एक धागे दोरे उलगडत जाऊन छोटारे राणी पर्यंत पोहोचला असता.
किंवा छोटारेला खोटे खोटे तपासा वरून हटवून त्याच्या जागी एखादा फालतू अधिकारी आणायचा, त्यामुळे राणी जराशी निर्धास्त होऊन मोकळ्या मैदानात येऊन खुले आम चुका करायला उद्युक्त होईल पण याच वेळी बॅक ग्राऊंडला छोटारे एक एक पुरावे जोडत राहतो असे दाखवायचे..
कितीतरी पॉसीबीलिटीज आहेत ... अरे , त्या लेखकाला काही डिटेक्टीव्ह नोव्हेल्स वाचायाला द्या रे ... अॅगाथा ख्रिस्ती, हिंचकॉक राहू द्या बाजुला गेला बाजार जेम्स हेडली चेझ सुद्धा चालेल!
कितीतरी पॉसीबीलिटीज आहेत ...
कितीतरी पॉसीबीलिटीज आहेत ... अरे , त्या लेखकाला काही डिटेक्टीव्ह नोव्हेल्स वाचायाला द्या रे ... अॅगाथा ख्रिस्ती, हिंचकॉक राहू द्या बाजुला गेला बाजार जेम्स हेडली चेझ सुद्धा चालेल!
>> मला तर वाटते कि सी आय डी, ब्योमकेश बक्शी, एक शुन्य शुन्य, क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया (अगदी काही नाही तर अस्मिता सुद्धा) बघितले तरी बराच फरक पडेल.
पियू तू तर लेखकाला पार
पियू

तू तर लेखकाला पार शून्यात काढलंस
Pages