क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अँडरसन आल्या आल्या आश्विन गेव्ह हिम अ माऊथफुल! पिचच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत गेला त्याच्याबरोबर!

भा यादवच्या बॉलिंग्बद्दल मी परदेशात उपयुक्त ठरण्याबद्दल लिहिले आहे. ह्या टेस्ट्मधे तो थोडा गोंधळलेला वाटला तरी मागच्या टेस्टमधे तसे नव्हते. तो टिपिकल ऑफस्पिनर असल्यामूळे (म्हणजे राँग वन टाअकून विकेट घेण्यापेक्षा ट्रेडीशनल ऑफस्पिअसल) बाहेर अधिक उपयुक्त ठरेल.

अ‍ॅण्डरसनचे वक्तव्य म्हणजे अगदीच अस्थानी होते. चुकीचे होते कि नाही हे पुढचा इंग्लंड दौरा ठरवेल. पण जाता जाता यादव नि शमी जिथे रीव्ह्रस स्विंग करत होते तिथे इंग्लंडचे बॉलर्स करू शकले नाहीत हे थोडे आश्चर्याचे वाटलेले.

फारसे आश्चर्य नसावे. रिव्हर्स स्विंग भारतीय उपखंडातील गोलंदाजच जास्त चांगले करतात. आणि ईंग्लण्डपेक्षा जगाच्या या भागातच तो जास्त ईफेक्टीव्ह ठरतो. त्यामुळे कंबरेच्या खाली उसळणारा रिव्हर्स स्विंग खेळण्याचे टेकनिकही आपले चांगले वाटते. याऊपर ईंग्लंडमध्ये कोणी खतरनाक पेस असलेला स्टेन कॅटेगरीतील बॉलरही नाही.

पाकिस्तान तर रिव्हर्स स्विंगचा जनक म्हणायला हवे. भारतीयांमध्येही हल्ली बरेच जण यावर भर देतात. अन्यथा आधी बरेचदा मदार झहीरवरच असायची. मला तर आजच्या तारखेला भारतीय खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांसाठी नव्या बॉलपेक्षा रिव्हर्स स्विंग मिळायला सुरुवात होणे हेच बरेचदा प्रभावी हत्यार वाटते. आणि समोर ईंग्लंड असेल तर ते आपल्याला एडवांटेज वाटते.

अ‍ॅडरसन, ब्रोड नि स्टोक्स हे अतिशय झक्कस रिव्हर्स स्विंग करतात. अँडी फ्लॉवर कोच असताना त्यावर विशेष लक्ष देऊन प्रावीण्य मिळवले होते. डाऊन अंडर च्या मॅचेस पाहिल्या असशील तर लक्षात आले असते.

काल विजयोत्सव बघून पुण्याहून मुंबईला आलों. म्हणून, प्रथम एका सर्वांगसुंदर विजयासाठी भारतीय संघाचं मनःपूर्वक अभिनंदन. There should be no even an iota of doubt that yesterday England was defeated squarely and purely on high class merit by India !

http://www.telegraph.co.uk/sport/cricket/international/england/9740604/I...

२०१२च्या आपण हरलेल्या सिरीजमध्ये अँडरसनने सुंदर रिव्हर्स स्विंग बॉलिंग केली होती. कोलकाता टेस्टमध्ये त्याची बॉलिंग बघून अक्रमला पाकिस्तानी बॉलर्सची आठवण झाली होती.

'The way they bowled tells me England will only get better in this series because they have the knowledge of reverse swing and, crucially, an idea of how to use it,” Wasim said. “To me it looked like the Pakistan team were playing out there, it really did."

“The skill is phenomenal. James Anderson has got the knack of reverse swing and will only get better." '

<< रिव्हर्स स्विंग भारतीय उपखंडातील गोलंदाजच जास्त चांगले करतात. आणि ईंग्लण्डपेक्षा जगाच्या या भागातच तो जास्त ईफेक्टीव्ह ठरतो. >> मलाही हें पटतं. कारण, इतरत्र हवामानाचा व हिरवळीच्या मैदानांचा रिव्हर्स स्विंगसाठी अधिक उपयोग होत असावा. इंग्लंडमधील मैदानांवर चेंडूची चकाकी एका बाजूने बरीच व बराच वेळ टिकवून ठेवणं शक्य असावं पण उपखंडात चेंडूच्या दोन्ही बाजू लवकर खराब होतात. त्यामुळे , रिव्हर्स स्विंगसाठी उपखंडात अधिक कसब लागत असावं. [ अर्थात, ऐकीव माहितीच्या आधारावरचा हा एक अंदाज आहे; साफ चूकीचाही असूं शकतो ]

भाऊ मी नि भा ने त्या विधानावर आक्षेप घेतलेला नसून अँडरसन इत्यादींना ते का जमले नाही ह्या सिरीजमधे ह्याबद्दल ऋन्मेश्ने दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल आहे. होल्डींगच्या मुलाखतीमधे त्याने रिव्हर्स स्विंग चे कसब जी टीं बॉलची एक बाजू नीट मेंटेन करू शकते ती अधिक प्रभावी ठरते - ग्राऊंड फॅ़टरपेक्षा असे म्हटल्याचे आठवतेय. त्यानुषंगाने अँडी फ्लॉवर कोच असताना इंग्लंडचे काही खेळाडबाबॉल मेंटेन करण्याचे काम करत असत. फ्लिंटऑफ , जोन्स, हार्मीसन नि अँडरसन पासून इंग्लिश रिव्ह्रस स्विंग मेन स्ट्रीम झाला. कदाचित फ्लोवर च्या जागी बेलिस आल्यावर हे ग्रांटेड धरले गेले असावे नि हे कसब कमी झाले असावे. अँडरसनचा कमी झालेला पेस हे पण एक कारण असू शकते.

असामीजी, मी फक्त एक शक्यता व्यक्त केली. खरं तर हा खूप तांत्रिक मुद्दा आहे व त्यावर कांहींशा अधिकारवाणीने बोलण्याइतकाही माझा अभ्यास, अनुभव नाही.

भाऊ हा लेख वाचण्यासारखा आहे ह्याबद्दल. इंग्लंड ने रिव्हर्स स्विंग वर मास्टरी मिळवण्याबद्दल. कशी हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
http://www.hawleycc.org/reverseswing.htm

असामीजी, लेखाबद्दल मनापासून धन्यवाद.
'रिव्हर्स स्विंग' हा शब्द वापरून वापरून इतका गुळगुळीत झालाय कीं त्यावर वसिम अक्रमही 'रिव्हर्स स्विंग 'करूं शकणार नाही.! पण खरंच चेंडू 'रिव्हर्स स्विंग ' कां व कसा होतो हें किती जणाना [ यांत कांहीं प्रत्यक्ष असा स्विंग ज्यांचा होतो असे गोलंदाजही असतील ]पक्कं माहित असेल याबद्दल मात्र शंका आहेच. Wink

"चला स्विंग समजावून घेऊ" धागा काढायला हवा. त्यात क्लिप्स टाकू जबरी स्विंग असलेल्या.

पण ढोबळ मानाने नॉर्मल स्विंग चकाकी असलेल्या बाजूच्या विरूद्ध दिशेने होतो व रिव्हर्स स्विंग हा चकाकीच्या दिशेने.

इंग्लंडचे वातावरण लहरी आहे. आता १० मिनिटांपुर्वी उन असेल तर थोड्यावेळेत पावसाच्या सरी पडू लागतात. अशा वातावरणात चेंडू स्विंग जास्त होतो. त्यामुळे फलंदाजांना चेंडूचा अंदाज न आल्याने ते जास्तीत जास्त चेंडू हे सोडून देतात. अशा मुळे चेंडूला बॅटीचा मार कमी बसतो. त्यापेक्षा भारतीय उपखंडात चेंडूला बॅटीचा मार फार जास्त बसतो. बॅट चेंडूला सतत लागल्याने त्याच्या दोन्ही बाजूंची लकाकी लवकर निघते.
तुमच्या संघात एक स्पिनर असेल आणि बाकीचे जलदगती गोलंदाज असतील तर चेंडूची लकाकी कायम राखण्याचा प्रयत्न करतात. चेंडूच्या एकाच बाजूवर ट्प्पा पडेल याची ती काळजी घेतात. त्यामुळे दुसरी बाजू चकाचक राहते. हाच नियम पाकिस्तानी गोलंदाज आधी पासून वापरत आहे. म्हणून त्यांचे चेंडू नंतर रिवर्स स्विंग होतात. अगदी नवखा गोलंदाज सुध्दा रिव्हर्स स्विंग करू लागतो. कारण त्याला "काळजी घेतलेला चेंडू" मिळतो.
आपल्याकडे सगळॅच स्पिनर मध्यमगती आधी असल्याने रिव्हर्स स्विंग साठी लकाकी ठेवणे हा नियमच पाळला जात नव्हता.

http://www.wikihow.com/Reverse-Swing-a-Cricket-Ball

"चला स्विंग समजावून घेऊ" धागा काढायला हवा.
>>>>
काढ की मग. वाटल्यास हेडरमध्ये जास्त काही लिहू नकोस. प्रतिसादांत जो तो भर टाकेन. स्विंग, स्पिन, गूगली, फ्लिपर, कॅरम बॉल.. एकेक करत सगळे घ्या त्यात. तसेही माझ्यासारखे मुद्दाम कुठे वाचायला जात नाहीत. माहीत प्रत्येकाबद्दल थोडेफार आहे पण पुर्णच माहीत आहे असे काही नाही, कारण जे सामने लाईव्ह बघतो तीच आपली ज्ञानाची शिदोरी.
सर्व तांत्रिक माहीती एकत्र राहील. आणि काही नाही तर आयत्या क्लिप बघायल मिळतील छान छान Happy

बर्याच धाग्यांवर बर्याच गोष्टींचं स्तोम माजलं आहे. ते जाऊ दे. शेवटची टेस्ट सुरू होतीये. भुवनेश च्या जागी ईशांत खेळणार का फायनली कोहली दोन सलग सामने एकाच संघानिशी खेळणार?

खर तर उमेश च्या जागी इशांत नि अश्विनच्या जागी मिश्राला घेऊन त्या दोघांनाही विश्रांती द्यायला हवी. परत लिमिटेड ओव्हर्स आहेतच. वरदा येइन गेल्यामूळे बॉल स्विंग वगैरे होईल बहुधा एक दोन दिवस तेंव्हा भुवी असलेला बरा.

लिमिटेड ओव्हर्स च्या आधी २५ दिवसाचा ब्रेक आहे. मला वाटत तरी नाही की अश्विन ला अशा परपल पॅच मधे असताना विश्रांती घ्यायला आवडेल / तसं करतील. उमेश चं ही थोड्या फार फरकानं तसच आहे. बहुदा मुंबई ला खेळलेलीच टीम परत खेळेल. बघू काय होतं ते.

आधी २५ दिवसाचा ब्रेक आहे >> हो का ? मी धरले कि लागोपाठ असेल नवीन वर्ष सुरू झाले कि. BCCI चे डोके ठिकाणावर आहे ना ? Happy

समोर ईंग्लंडचे नवीन वर्ष आहे म्हणून हा ब्रेक असणार. ते मायदेशात मजा करून येतील परत.

आश्विनला विश्रांती म्हणजे ईंग्लंडच्या संघाला लढायचा आत्मविश्वास देणे. मागे म्हटल्याप्रमाणे परदेशात त्याला खेळपट्टीचा नूर आणि त्याचा फॉर्म पाहता जिथे त्याची युटीलिटी कमी तिथेच विश्रांती देणे उत्तम. अर्थात देणे गरजेचे असल्यासच.

<< ते मायदेशात मजा करून येतील परत.>> ३१ डिसेंबर नंतर भारतात 'रिव्हर्स स्विंग' निश्चित होणार आहे, असं मोदीजीनी ठामपणे सांगितलंय; इंग्लंडला व आपल्या निवडसमितीलाही हें लक्षांत घ्यावंच लागेल ! Wink
<< BCCI चे डोके ठिकाणावर आहे ना ? >> 'लोधा कमिशन'चा बाउन्सर डोक्यावर आदळल्याने सर्व टेस्ट [ कसोटी सामने नव्हेत ] झाल्यावरच या प्रश्नाचं उत्तर मिळेल. Wink
कोहली मुंबई टेस्ट्च्या संघात कांहीं बदल करेल असं वाटत नाही; घरच्या मालिकांमधे 'क्लीन 'स्विप' करण्याची हल्लींची परंपरा आपल्या नेतृत्वाखालींही कायम ठेवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करणारच !

मला वाटतं जयंत यादववर 'कायमस्वरुपी' हें शिक्कामोर्तब झालंय व अश्विनला विश्रांति दिली तर तो महत्वाचा गोलंदाज ठरणार आहे. त्यावेळीं फिरकीत वैविध्य व अनुभव असावा म्हणून मिश्राला आतां संधी दिली जात असावी.

काल कोहली ने असामी आणी माझ्या सुचनेचा मान राखत मिश्रा आणी इशांत, दोघांनाही संधी दिली. इशांत खेळेल हे अपेक्षित होतं लो आणी स्लो विकेट आणी स्विंग चा अभाव बघता भुवनेश चा निभाव लागणं कठीण होतं. मिश्रा ला संधी जयंत यादव च्या दुखापतीमुळे मिळाली. अश्विन होमपीच वर पूर्ण दिवस विकेटलेस गेला ही कमाल आहे. मजबूत बॅटींग करावी लागणार आहे. लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजेस जर लागू पडलं, तर कोहली, विजय आणी थोडासा पुजारा वगळता, बाकी राहूल, करूण नायर, पार्थिव पटेल ह्यांना बॅटींग चा भार वहावा लागेल.

एखाद्याला शून्यावर जीवदान देऊन त्याच्याकडून सेंच्यूरी करून घ्यायची परंपरा आपण परत एकदा संभाळलीये. राहूल ला फिल्डींग वर बरेच कष्ट घ्यायला हवे आहेत.

Pages