तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
Ok स्वाती२
Ok स्वाती२
स्टेट बँकेत २ मिनिटात काम
स्टेट बँकेत २ मिनिटात काम झाले. फक्त ५००च्या नोटा मिळाल्या. मी गेल्या आठवड्यात तिथून १०० च्या घेतल्या होत्या. काम झालेलं आहे. ICICI बँकेत पण गेले होते. ब्रँच बाहेर पर्यंत रांग होती कारण त्यांनी आता कॅश सबकुछ असे एकच काउंटर ठेवले आहे. तक्रार करायला योग्य channel शोधते आहे. Re-KYC ची नोटीस लावलेली आहे.
(No subject)
(No subject)
याला काय
याला काय म्हणायचे?
शेतकऱ्यांची थोडीशी गैरसोय? कि काळया पैशा विरुद्ध युद्धातील को लॅटरल डॅमेज?
8 ला नोटबंदी जाहीर झाली, जुन्या नोटा इन व्हॅलीड झाल्याने बाजार समित्या 7 दिवस बंद होत्या, जेव्हा त्या उघडल्या तेव्हा हा प्रकार
असा प्रॉब्लेम येणार हे 7 दिवस सरकारमध्ये कोणाच्याच लक्षात आले नाही यावर विश्वास बसणे कठीण आहे.
पहिल्या दिवशी जोशात चलन रद्द केले, आणि ज्या निवडक गोष्टणीसाठी चलन जिवंत ठेवले, त्यात शेतमालाचा समावेश सहज करता आला असता, अगदी त्या दिवशी नाही तर पुढच्या 7 दिवसात केव्हाही,
पण सरकार नाट्यगृहाना भाड्यापोटी जुन्या नोटा घेण्याची परवानगी देते, पण बाजारसमित्यांमध्ये लिलावा साठी नवीन नोटांचा आग्रह धरते.
पण ते शेतकरी पण मूर्ख आहेत, सरळ सुला वाइन यार्ड ला जाऊन विकायचे टोमॅटो, त्यांनी मस्त टोमॅटिना फेस्टिव्हल अरेंज केला असता,
तसेही लोकांची थोडीशीच गैरसोय होतेय, ते सगळे छान एन्जॉय करून आले असते, म्हणजे तेव्हडीच गैरसोय विसरायला मदत...
छे छे. हे शेतकरी मातलेत. इतके
छे छे.
हे शेतकरी मातलेत.
इतके टोमॅटो फेकून द्यायला परवडतात, अन आत्महत्या करतात म्हणे?
अहो, फक्त दारू, कर्ज, असल्या कारणांनी आत्महत्या करतात हे लोक. बांडगुळं हो. नुस्ती बांडगुळं आपल्यासारख्या ऑनेस्ट टॅक्सपेयर्सच्या पैशांवर पोसलेली!
एक पैसा टॅक्स भरत नाहीत बरं
एक पैसा टॅक्स भरत नाहीत बरं का शेतकरी लोक. अन् वरतून यांना कर्जं माफ करा.
आपल्या ऑनेस्ट एम्प्लॉयर/एम्प्लोयी लोकांना कुणी काँग्रेजींनी कधी माफ केलंय? अहो, बात करू नका!
बघा, मोदीजींनीच केलं. सगळ्या आपल्या एंप्लोयर्स्ना बर्का. केवळ आपल्यासारख्या पगारदारांची काळजी म्हणूनच बर्का. सर्कारी नोकरांना नाही केलं कै. तिथं ते सगळे भरलेत ना! छोटी शिडी वाले? होऽ हो!. तेच्च.
श्श्श!
खी: खी: खी:!
पण असं काही शेतकर्यांनी
पण असं काही शेतकर्यांनी पहिल्यांदाच केलंय का? याआधीसुद्धा कांदे , बटाटे इतकंच काय दूध रस्त्यावर ओतून दिलेलं आहे त्यांनी.
सामान्य माणसं आधी रेशनच्या, ट्रेन तिकिटाच्या, स्कूल अॅडमिशनच्या रांगेत मरायची. शेतकर्यांनाही बियाण्यासाठी, खतासाठी रांगा लावायला लागायच्याच. उपचाराविना याआधी लोक मरत नव्हते का?
तेव्हा तुम्ही कुठे होतात?
नोटाबंदीमुळे सरकारला खूप
नोटाबंदीमुळे सरकारला खूप फायदा होणार आहे आणि त्याचं बक्षीस टॅक्स रेट चांगलेच कमी करून आपल्याला मिळ्णार आहे असे ढोल ताशे पिपाण्या वाजू लागल्या आहेत.
म्हणजे नोटाबंदीचा ताप सहन करायचा(रांगांत उभं राहायचं, रोजगार बुडवायचा,पैसे असले तरी खर्च करायचे नाहीत इ.इ) कर भरावा न लागणार्या लोकांनी आणि त्याचं गोड फळ मिळणार टॅक्स भरणार्या १ टक्के लोकांना ज्यांना नोटाबंदीमुळे फक्त मायनर इनक्न्व्हेनियन्स झाला.
कर न भरणार्या लोकांनी <<
कर न भरणार्या लोकांनी << म्हण्जे कर बुडवणार्यांनी कि ज्यांचे उत्पन्न कर देण्याईतकही नाहिये त्यांनी?
उगाच १००० वा रेसपॉन्स :प
...............
...............
उद्या १ तारीख. खुश है जमाना
उद्या १ तारीख. खुश है जमाना आज पहली तारीख है हे गाणं वाजायचा दिवस. पण उद्या असं होईल का?
वेतन आणि निवृत्तीवतन घेणार्या लोकांची आता बँकेत झुंबड उडेल. रोकडतुटीवर उपाय म्हणून बँकांनी प्रत्येक खात्यातून किती पैसे काढता येतील त्याच्या मर्यादा ठरवल्या आहेत. आपल्या नोकरांना रोकड उचल म्हणून देणार्या सरकारने खाजगी उद्योगांना नोकरांचे पगार डिजिटल जादू वापरून खात्यांत सरळ जमा करायला सांगितले आहे
बँकांनी बड्या उद्योगांना नगदी ऐवजी प्रिपेड पेमेंट कार्ड्स(?) द्यायला सांगितले आहे.
क्याशलेस कडे वाटचाल. माझे
क्याशलेस कडे वाटचाल.
माझे एटीम कार्डकुठेतरी पडले.
मला एक सावधानतेचा इशारा
मला एक सावधानतेचा इशारा द्यायचा आहे. ह्या सर्व गडबडीत, पन्नास दहा, वीसच्या अतिजुन्या नोटा
फाटक्या नोटा खपवल्या जात आहेत. भाजी घेताना व कॅशचे इतर व्यवहार करताना हातातील परत आलेल्या नोटा नीट तपासून पाहा. मला वडापाव वाल्याने एक फाटकी पन्नासची नोट दोन तुकडे चिकटवलेली दिली आहे. पहिले शंभर देउन पन्नास हातात आले म्हणून मी खू ष होते. परत रिक्षाला द्यायला काढली तर लक्षात आले ही चालणार नाही. ह्या नोटा बँकेत बदलून मिळतात का? पूर्वी कट नोट एक्क्ष्चेंज वाले असायचे त्यांचे आता काय झाले असेल?
रांगेतील देशसेवा, स्थळ-
रांगेतील देशसेवा,
स्थळ- ताडदेव HDFC ब्रांच.
वेळ- 29 नोव्हेम्बर सकाळी 915
शेवटी घरातील थोड्या जुन्या नोटा बँकेत भराव्यात, आणि जमले तर थोड्या नवीन काढाव्यात म्हणून देशसेवा करायचे ठरवले.
915ला ब्रांच ला पोहोचलो, तसा हा भाग निम्न मध्यमवर्गीय, आणि मध्यम वर्गीय पारशी लोकांचा भाग आहे त्यामुळे शांतता असेल असा अंदाज होता,
2 वेग वेगळ्या रांगा होत्या, deposit साठी अगदीच 6-7 लोक, withdrawals साठी 30 एक लोक बँक उघडायचा आधी उभे होते,
थोड्या वेळाने बँक उघडली, मॅनेजर बाहेर आले,
अतिशय नम्र आवाजात सांगू लागले,
पैसे काढण्या साठी आम्ही टोकन देत आहोत, आमच्या कडे लिमिटेड कॅश आहे त्यामुळे आम्ही होम ब्रांच असलेल्यानाच पैसे देऊ,
जास्तीत जास्त लोकांना पैसे पुरावेत म्हणून पर इन्स्ट्रुमेंट 10k च देऊ (हि सरळ सरळ पळवाट होती, एकच माणूस 3 चेक लिहुन जास्त पैसे काढेल)
रांगेत हलचल झाली, नॉन होम ब्रांच वाले भडकले, 2 मुस्लिम तरुणी होत्या, पास बुक आणि withdrawal स्लिप घेऊन आल्या होत्या , त्या फुल्ल ऑन ऑफेंसिव्ह झाल्या,
एक पारशी बाबा इंग्लिश मध्ये फुटले, " i am warning you the fun is yet to start, on 4th you will feel the heat" wagaire सांगू लागले.
2-3 पोरांनी आप आपल्या साहेबाला फोने लावून ,फोन मॅनेजर कडे दिले,
तेवढ्यात माझा नम्बर आला मी आत गेलो, आत गेल्या गेल्या माझ्या कडे id प्रूफ मागितले, मी सांगितले माझी रक्कम 50k पेक्षा खूप कमी असल्याने त्याचे गरज नाही, थोडा वेळ झाकझाकी झाल्यावर परत मॅनेजर साहेब मध्ये पडले, त्यांनी यांचे पैसे घ्या असे सांगितले,
काउंटर वरची बाई उघड उघड नाखूष होती, स्लिप वर सही करून मला कॅशिआर कडे पाठवले.
Cashier ने परत प्रूफ मागितले, माझ्या कडे पासपोर्ट होता तो त्याला दाखवला, तेवढ्यात ती काउंटर वरची पोरगी परत आली आणि कॅशिआर ला म्हणाली, मॅनेजर ने अजून कोणी असे लोक पाठवले तर त्याला स्लिप काउंटर साइन करायला सांग, उगाच ऑडिट ऑब्जेशन मध्ये अडकू नकोस.
पैसे डिपॉझिट तर झाले ,
आता काढायची पाळी,
परत एकदा मॅनेजर,
त्याला सांगितले माझी होम ब्रांच पुणे आहे, मला पैसे हवेत स्लिप भरून घेऊ का,
तर तो चेक हवा म्हणून हटून बसला,
परत थोडी घासाघीस झाल्यावर तुझ्या रेलेशनशीप मॅनेजर ला मेल करायला सांग मग पैसे देतो असे म्हणाला,
मला ही पैशाची इतकी निकड नव्हती म्हणून मी ते काम उद्यावर ढकलून बाहेर पडलो.
बाहेर लाइन बऱ्यापैकी वाढली होती
लोकांमध्ये बऱ्यापैकी अस्वस्थता जाणवली,
बँक मॅनेजर मात्र अगदी थंड, नम्र होता, त्याने थोडासा आवाज चढवला असता, तर त्याला असंतोषाचा फटका नक्की बसला असता.
यांच्या सगळ्या पोलिसिज भयंकर individual आहेत, माझ्याच मागे एक वेडसर वाटणारी प्रौढ पारसी बाई होती, तिला फक्त 1500 रुपये भरायचे होते, id प्रूफ नाही म्हणून तिला नाही सांगितले.
ज्याला कोणाला 10 मिनिटात पैसे बदलले वगैरे अनुभव आले असतील ते येवोत बापडे, पण मेजोरीटी लोकांसाठी हा अनुभव चांगला नाही आहे.
माझ्याच मागे एक वेडसर वाटणारी
माझ्याच मागे एक वेडसर वाटणारी प्रौढ पारसी बाई होती, तिला फक्त 1500 रुपये भरायचे होते, id प्रूफ नाही म्हणून तिला नाही सांगितले.>> अगदी अगदी ह्या प्रकारामुळे जे लोक कधी बँकेत गेले नसतील ते पण लायनीत दिसत आहेत. माज्या समोर एक बाई डिपॉझिट ला उभी होती. साधारण नाइट ड्रेस असेल त्तसा ड्रेस. फ्रिल चा वरचा झबला. केस तेल लावल्यावर होतात तसे तेलकट, खाली पायजमा स्लिपर्स
एकूण झोपेतून उठून आल्यासारखा मामला. फॉर्म भरायला मदत लागत होती. बरोबर पेन नाही. लगेच रागाला येत होती. असे खूप सारे लोक आहेत. जे धड्पडून जागे झाले आहेत.
http://www.firstpost.com/spor
http://www.firstpost.com/sports/demonetisation-hits-iptl-no-roger-federe...
The 2016 season of the International Premier Tennis League (IPTL), already struggling to get star power, will not feature Roger Federer and Serena Williams this year, due to the prevailing "economic climate" in India. The economic climate to which Bhupathi refers is the government-ordered demonetisation.
Meanwhile, ESPN reported that the IPTL ticket sales have been slow, which could be a result of demonetisation as well, adding to the woes that the third season of IPTL has faced.
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/india/demonetisation-cash-crunch-gujara...
गुजरात हिरे व्यापार स्लो डाऊन
नोटबंदीचा परिणाम भारत-पाकिस्तान राजनैतिक संबंधांवरही पडला आहे. दिल्लीतल्या पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भारतीय बँकेतून डॉलरच्या स्वरुपात मिळणाऱ्या पगाराचा पेच निर्माण झाल्याने त्यांनी तो घेण्यास नकार दिला आहे. यावर पाकिस्तानने नारजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, अशी धमकी पाकने दिली आहे.
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31816&articlexml=No-...
अशीच पत्रे सुदान, इथिओपिया,कझाकिस्तान इत्यादी देशांच्या वकीलातीनी दिली आहेत
मूर्ख कुठले, कॅश वापरायची म्हणतात,
http://m.hindustantimes.com/m
http://m.hindustantimes.com/mumbai-news/rbi-needs-to-consider-issue-of-p...
शिक्षकाची थोडीशी गैरसोय, जिल्हा बँक -नवीन नोटा नाहीत- पगार नाहीत-कोर्टाने 14 पर्यंत स्टे दिला आहे, म्हणजे अर्धा महिना पगार नाही
नोटबंदीचा परिणाम
नोटबंदीचा परिणाम भारत-पाकिस्तान राजनैतिक संबंधांवरही पडला आहे. दिल्लीतल्या पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भारतीय बँकेतून डॉलरच्या स्वरुपात मिळणाऱ्या पगाराचा पेच निर्माण झाल्याने त्यांनी तो घेण्यास नकार दिला आहे. यावर पाकिस्तानने नारजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, अशी धमकी पाकने दिली आहे. ----- काय सांगता? इंटरनॅशनल क्रे. का. नाही!?नक्की जेवता येत नाहीये का खबऱ्याना आणि देश विरोधी गुप्त माहिती विकाणाऱ्याना कॅश पैसे देता येत नाहीये म्हणून वकीलातीच्या अधिकाऱयांचे kra meet होत नाहीयेत ?
शिक्षकाची थोडीशी गैरसोय,
शिक्षकाची थोडीशी गैरसोय, जिल्हा बँक -नवीन नोटा नाहीत- पगार नाहीत-कोर्टाने 14 पर्यंत स्टे दिला आहे, म्हणजे अर्धा महिना पगार नाही –----–-- DD का नाही issue करू शकत म्हणे?
तेच म्हणतो मी, आंतरराष्ट्रीय
तेच म्हणतो मी, आंतरराष्ट्रीय समुदायाने कॅशलेस वापरायचे नाही तर कोणी वापरायचे? म्हणूनच त्यांना मूर्ख म्हंटले.
DD देण्याबद्दल, बरोबर आहे तुमचं,
कल्पनाशक्ती चा अभाव हो, प्रश्न सोडवायची कळकळ नाही, शिक्षकांना पुढे घालून नोटा बदलण्याचे परमिट मागत आहेत बँका,
उठसुठ सुप्रीम कोर्टात जायचे, आणि नंदीबैल कोर्टसुद्धा डायरेक्ट RBI ला आदेश देतंय..
डी डी कुणी कुणाला दायचा ?
डी डी कुणी कुणाला दायचा ?
हातावर पोट असणार्यांची अवस्थ
हातावर पोट असणार्यांची अवस्थ वाईट!
डीडी बँकेने शिक्षकांना
डीडी बँकेने शिक्षकांना द्यायचा; शाळेतर्फे.
ह्या बातम्या गैरसोयीच्या बीबीपेक्षा नकाश्रू बीबीवर शोभतील.
हातावर पोट असणार्यांची अवस्थ वाईट----म्हणजे कोण? त्यांच्याकडे बँक खाते अद्यापि का नाही?
डीडी बँकेने शिक्षकांना
डीडी बँकेने शिक्षकांना दिल्यानंतर शिक्षकांनी त्याचे तुकडे करून काही तुकडा दुधवाल्याला, काही तुकडा किराणासामान देणार्या वाण्याला, तर काही तुकडे कामवाल्या बाईला, काही तुकडे मुलांची फी भरायला. असे वापरावे. तर त्या डीडीचे सार्थक होणार.
पैसे नाही तर डीडी वापरा ( ब्रेड नाही तर केक खा)
ब्यान्क तिसर्यातर्फे डी डी
ब्यान्क तिसर्यातर्फे डी डी कसा देईल ?
डी डी देणारा ब्यान्केत अर्ज देतो , अमुक तमुक या व्यक्तीच्या नावे डी डी द्या असा.... मग ब्यान्क डी डी द्व्त.
ब्ञान्क स्वतः अ तर्फे ब ला डीडी देत नसते.
त्यांना बँकेच्या कामासंबंधी
त्यांना बँकेच्या कामासंबंधी काही माहिती नसावी.
जरा नीट समजावून सांगा हो अचे.
समर्थन करणार्यांना साधे नियम
समर्थन करणार्यांना साधे नियम ठाऊक नसतात. नुसते आंध़ळे समर्थन दिल्याने सरकार समर्थकांचे सोशल मिडीयावर आजकाल हसे होत आहे. भाजपाची आयटीसेल ही फक्त सरकारच्या प्रत्येक मुद्द्याचे समर्थन करणे इतक्या बांडगुळावर पोसली गेली आहे. त्यांना ना नैतिकतेची चाड असते नाही परिस्थितीचे भान. नियम काय, सत्यता काय यांच्यापासून कोसो दूर असणारी ही सेल ना आगा ना पिच्छा असलेल्या पोस्टी सगळी कडे फिरवत असते. आणि समर्थन करणारे त्यावर ५% सुध्दा विचार न करता इतरांना फॉर्वर्ड करत असतात.
बातमीत पगार करणे शक्य झालेले
बातमीत पगार करणे शक्य झालेले नाहीत म्हणत आहेत demonetization मुळे, कसं शक्य आहे! मी फक्त पर्याय सुचवलाय.
ब्यान्क तिसर्यातर्फे डी डी कसा देईल----- शिक्षकांना पगार शाळा देते ना? शाळेचं बँकेत खाते नाही का शाळेकडे त्या खात्याचे चेकबुक नाही का स्वतःचे लेटरहेड नाही का शाळेला authorized signatory नाही म्हणता!
Pages