Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ललिता-प्रीति, भारतात अशा
ललिता-प्रीति, भारतात अशा गोष्टी दाखवायचं धाडस, तेही टीव्हीवर, किती निर्माते दिग्दर्शक करणार? >>>>> मराठी मालिकांमध्ये (नसलेल्या किंवा हव्या असलेल्या) फिजिकल रिलेशनशिपचे स्पष्ट उल्लेख याधी आलेले आहेत.
झी मराठीच्याच अवंतिकामध्ये मृकुला नवर्याचं लफड कळल्यावर ती वेगळं रहायला लागते. तेव्हा मृकुचा नवरा दारूच्या नशेत तिच्या खोलीत शिरतो. नंतर स्वतःच्या आईला हे सांगतो की माझी बायको असूनही मी तिला स्पर्श करू शकत नाही वगैरे. तो सिन बर्यापैकी चांगला आणि सटली घेतला होता. त्याच मालिकेत आदेश भावोजी आणि त्यांची बायको होते. त्या बायकोचं आदेश भावोजींशी झालेलं लग्न दुसरं लग्न असतं आणि त्यामुळे बराच काळ ते एकमेकांपासून दुर असतात. तेव्हा त्यांच्यातही त्याबद्दल अगदी सरळ शद्बांमधले संवाद आहेत.
शिवाय, आमच्या आवडत्या जुयेरेगात तर आदेने दुर रहाण्याचे दिवस वगैरे मोजलेले दाखवलेले आहेत.
त्यामुळे मराठी मालिकांना सरसकट ह्या विषयाचं वावडं असावं असं वाटत नाही.
ह्या मालिकेत मुळात विक्रांतला मोनिकाबद्दल तसं काही वाटत असेल असं (त्याच्या एरंडेल प्यायलेल्या तोंडामुळे किंवा चेहेर्यावर अजिबात नसलेल्या एक्स्प्रेशन्स वरून तरी) वाटत नाही. त्यामुळे दाखवलं नसेल.
बाकी ह्या मालिकेत मोनिका आणि संजय मोने वगळता अॅक्टींगची बोंबच वाटते. शशिकला बाईही फार काही करत नाही. उषा नाडकर्णी कधी कधी फार लाऊड होते!
काल hospital मध्ये कोणाच्या
काल hospital मध्ये कोणाच्या तरी वाढदिवसाचा केक वाटला होता. विक्रान्त म्हणत होता की केक खुपच मोठा आहे सो तो अ?ल्लक आहे. तर तो उरलेला ?केक मोनिकाला देता आला असता. तिला बटाटयाची भाजी दिली आणि केक मात्र विक्रान्त-मानसीने खाल्ला. गरोदर बायकान्साठी केक वाईट नसतो, निदान पिझ्झापेक्षा तरी नक्कीच नाही. विक्रान्त-मानसी तिच्यावर अत्याचार करतायत असेच वाटतेय. चूक झाली तिच्याकडून हे मान्य, पण म्हणुन अशी अघोरी शिक्षा दयायची का तिला?
आणि ती मोनिका, एवढी MBA शिकलेली मुलगी, hotel मध्ये मागवायच्या वस्तू hospital मध्ये का मागवते?
बाकी ह्या मालिकेत मोनिका आणि
बाकी ह्या मालिकेत मोनिका आणि संजय मोने वगळता अॅक्टींगची बोंबच वाटते. शशिकला बाईही फार काही करत नाही. उषा नाडकर्णी कधी कधी फार लाऊड होते!>>> शर्वरी लोहोकरेच काम मस्त आहे. शशीकला बाईसुद्दा छान. आधीच्या सिरियलपेक्षा इथे थोडया वेगळया वाटल्या.
ह्या मालिकेत मुळात विक्रांतला
ह्या मालिकेत मुळात विक्रांतला मोनिकाबद्दल तसं काही वाटत असेल असं (त्याच्या एरंडेल प्यायलेल्या तोंडामुळे किंवा चेहेर्यावर अजिबात नसलेल्या एक्स्प्रेशन्स वरून तरी) वाटत नाही. >>> कस वाटणार त्याला बायकोची लग्नाआधीची चूक कळल्यावर?
उषा नाडकर्णी कधी कधी फार लाऊड
उषा नाडकर्णी कधी कधी फार लाऊड होते>> कधी कधी? त्या नेहमिच लाउड असतात, पण खास्ट सासु म्हणून परफेक्ट वाटतात.
कस वाटणार त्याला बायकोची
कस वाटणार त्याला बायकोची लग्नाआधीची चूक कळल्यावर? >>>>> बरोबर आहे. त्याला वाटावं असं मी म्हणत नाहीये.
काल पण नवी रूम पाहून झालेला
काल पण नवी रूम पाहून झालेला आनंदही मोनिकाने छान दाखवला.
नवमातापित्यांचा आभारप्रदर्शनाचा सीन पार गंडलेला. त्यांना इतके इमोशनल डायलॉग दिलेले ते पोचलेच नाहीत. त्यावर विक्रान्त मानसीच्या रिअॅक्शन्स गंडलेल्या होत्या. लेखनातच. अभिनयाबद्दल बोलायला नकोच. पण आत्याबाईंचा चक्क अनुल्लेख?
एका प्रोमोत ती नर्स म्हणते की
एका प्रोमोत ती नर्स म्हणते की मानसी ताईचे नाव घेतलं की बाल किक मारताय.
आणि हे ऐकूनही मानसी मख्ख
अत्यंत वाईट अभिनय करते ती
ह्या मालिकेत मुळात विक्रांतला
ह्या मालिकेत मुळात विक्रांतला मोनिकाबद्दल तसं काही वाटत असेल असं (त्याच्या एरंडेल प्यायलेल्या तोंडामुळे किंवा चेहेर्यावर अजिबात नसलेल्या एक्स्प्रेशन्स वरून तरी) वाटत नाही----
नाहीच वाटत त्याला काही. पण तो हे सगळं कुणासाठी करतोय असा प्रश्न आहे.
मानसी अगदीच बाळबोध आणि मंद अभिनय करत्येय. बरं मोनिका एव्हढी फॅशनेबल इ इ आहे तर तिचे ड्रेसेस का गंडलेले असतात ? नेहमी तेच ते..... ब्ल्यू प्लेन टॉप व पँट स्टाईल ची फुलांची सलवार, वर भकास पांढरी ओढणी, अथवा सेम लाल रंगात..................हेअर स्टाईल्स मस्त अस्तात मात्र. ! विक्रांत भडक पिवळा शर्ट कसा काय घालू शकतो हॉस्पिटलात?
मोनिकाकडे हाताचे छाप वाली
मोनिकाकडे हाताचे छाप वाली भयानक ओढणी आहे. कॉंग्रेस चा हात सारखे हात आहेत.
एका प्रोमोत ती नर्स म्हणते की
एका प्रोमोत ती नर्स म्हणते की मानसी ताईचे नाव घेतलं की बाल किक मारताय.>>> किती महिने झाले मान्सीला येउन हॉस्पिटलमध्ये ?? बाळाला कळायला लागलं का इतक्या लवकर ?
काल पण नवी रूम पाहून झालेला
काल पण नवी रूम पाहून झालेला आनंदही मोनिकाने छान दाखवला.>>> हा सीन मीपण बघितला. फार छान केला अभिज्ञाने.
मानसी आणि विक्रान्तला अभिनय
मानसी आणि विक्रान्तला अभिनय येत नाही हा ठराव एकमताने पास झाला आहे. तो हेडरमध्ये ठळक अक्षरांत नोंदवा. म्हणजे रोज रोज लिहायला नको
एरण्डेलवाल्यालाच काय बर्याच
एरण्डेलवाल्यालाच काय बर्याच कलाकारांना प्रत्यक्षात अभिज्ञाची बाजू पटतेय इति आतली खबर.
त्या दोघांच्या (विक्रांत मानसी) ळ दर्ज्याच्या अभिनयामुळे उगाच मुळाच्या ढ भावे भाव खातायत.
जिथे मुळ अभिनयाचीच वानवा तिथे शारीरीक गरज वगैरे कुठून दाखवणार... भलतिच अपेक्षा.
होसुमी मध्ये दोनदा हनिमुन झाला काय करत होते आठवतं ना...
ढ भावे भाव खातायत. >>> नाही
ढ भावे भाव खातायत. >>> नाही तिचा अभिनय लगोरीमधे मी बघितला होता, काही एपिसोडस बघितले होते मी, चांगलं करते ती काम, त्यात व्हिलनपण नव्हती. एरवी कायम व्हिलन दाखवतात तिला.
काल मोनिकाने अओएक्षाभंग केला.
काल मोनिकाने अओएक्षाभंग केला. पोटातलं मूल लाथ मारतंय, म्हणजे आताच लाथा घालतंय, तेही मानसीचं नाव ऐकून तर पुढे बाहेर आल्यावर काय करेल म्हणून अकांडतांडव केलं नाही.
मानसीचं नाव ऐकून पोटातलं बाळं
मानसीचं नाव ऐकून पोटातलं बाळं किक मारतंय???
अरे आवरा रे प्लीजच.
मी तर याची अॅड पण बघु देत
मी तर याची अॅड पण बघु देत नाही घरी ईतका राग येतो या शिरेलचा
त्या मानसीपेक्शा , सारीका
त्या मानसीपेक्शा , सारीका चांगली अॅक्टिन्ग करते .
सुरुवातीला अत्यंत बोरिंग
सुरुवातीला अत्यंत बोरिंग वाटल्याने मी ही मालिका पाहत न्हवती , पण ह्या धाग्यावरील प्रतिसाद पाहून पाहते कधीमधी .
एक सिनेमा होता मेरे ब्रदर कि दुल्हन तसे ह्या सीरिअल चे नाव मेरे सिस्टर का दुल्हा असायला हवे .काय सुरु आहे कळतच नाही . थोड्या दिवसापूर्वी यायला लागलेली मानसी साठी पत्रे वैगेरे ...! चेहेऱ्याच्या मसल्स ला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हल्ली एक्सप्रेशन्स असे द्यायची फॅशन आहे कि काय ?:अओ:
सध्या फक्त "तुझ्यात जीव रंगला " छान सीरिअल.
गौरी ला बघितल्या वर मला मानसी
गौरी ला बघितल्या वर मला मानसी बरी वाटते..
मानसी च नाव घेत्ल्यावर बाळाने लाथ मारणे फार बाळ्बोध..
मोनिका बद्दल सहानुभुती वाटावी येवढा मानसी आणि विक्रांत मिळुन तिला त्रास देत आहेत..
प्रेग्नंट नावाखाली काहिही बंधनं घालतात.. टि.व्ही. बघाव वाटणं तर नॉर्मल्च आहे ना..
दोघ फार सद्गुणी वगैरे..
मोनिकाच्या पोटावर उशी किती
मोनिकाच्या पोटावर उशी किती वरपासून बांधली आहे. फार गंमतीशीर दिसतं ते.
बरगड्या संपल्या की तिथूनच बेबी-बम्प? 
शनिवारच्या भागात मानसी-
शनिवारच्या भागात मानसी- विक्रान्त एकमेकांना आधार देताना त्यांच्या चेहर्यांवरील भावांचा अभाव पाहून
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
हे आठवलं.
भरत...
भरत...
दोन ओंडक्यांची होते सागरांत
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट>>>>
दोन ओंडक्यांची होते सागरांत
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट >>

भरत तुम्ही तरीही आवर्जुन बघता ही सिरीयल. पेशन्सची कमाल आहे तुमच्या
एक तर बहिणीचा संसार नीट सुरु
एक तर बहिणीचा संसार नीट सुरु नसताना भावोजीला काय सतत भेटायचं, जेवणाचे डबे आनायचे...
उगाच पुर्वी लहान मेहुणीला ठेवत नसत बहिणीच्या सासरी...
नुसती फालतु सिरियल आहे.
दोन ओंडक्यांची होते सागरांत
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट >>>
दोन ओंडक्यांची होते सागरांत
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट >>>
>>>>एक तर बहिणीचा संसार नीट
>>>>एक तर बहिणीचा संसार नीट सुरु नसताना भावोजीला काय सतत भेटायचं, जेवणाचे डबे आनायचे...
अगदी हेच. किती ते बाहिणीच्या प्रत्येक गोष्टित नाक खुपसणं!
Pages