Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही मालिका गुंडाळताहेत की काय
ही मालिका गुंडाळताहेत की काय झी वाले? कारण कुठल्यातरी नव्या मालिकेची जाहिरात दिसली मध्येच. टाइम स्लॉट बघितला नाही, पण गुंडाळायची झाली तर हीच मालिका सर्वात योग्य आहे. अशक्य, अतर्क्य आणि अफाट मालिका. ती दुसरी मालिका माझ्या नवर्याची बायकोही तशीच. 'झी'ला झालंय तरी काय?
अर्थात सरळ साधेसुधे रोज घडू शकणारे प्रसंग दाखवले तर टीआर्पी कसा मिळणार म्हणा.
अरूण, मूळ कथा काय आहे पण?
अरूण, मूळ कथा काय आहे पण?
या मालिकेची ही टॅगलाइन असायला
या मालिकेची ही टॅगलाइन असायला हरकत नाही - "तू/तुम्ही काय बोलतोयस/बोलतेयस्/बोलताय मला काहीच कळत नाही"
मानसी आणि विक्रांत तर हे वाक्य असंख्य वेळा म्हणतात.
र्म्ड : मला समजली की तुला पण
र्म्ड : मला समजली की तुला पण सांगतो .............
मोनिका कशीही का असेना,
मोनिका कशीही का असेना, मानसीने तिच्या सासरी एवढी ढवळाढवळ केलेली तिने का खपवुन घ्यावी? बघावं तेव्हा काही ना काही कारण काढुन तै च्या सासरी. हॉस्पिटलमध्ये विक्रांतच्या पाठी. किती ती लुडबुड.
सध्या प्रचंड पाणी घालणे सुरु
सध्या प्रचंड पाणी घालणे सुरु आहे! पाणचट्ट होत्येय मालिका.
घाण मालिका. कुण्णी कुण्णाशी
घाण मालिका. कुण्णी कुण्णाशी स्पष्ट बोलत नाही.
ती मानसी जाम डोक्यात जाते.
ती मानसी जाम डोक्यात जाते. नंबर वन भोचक आहे. जिथे तिथे नाक खुपसत असते
मागे कुठल्याश्या भागात विक्रांत मोनिकाला नेकलेस देतो. तो घालुन बघायला ते दोघे खोलीत जातात. ही बया पण त्यांच्या मागे खोलीत 
ती मांशी इतकी चिडचिड का करतेय
ती मांशी इतकी चिडचिड का करतेय विक्रांत वर?
अग्गं.. तुम्हाला कळत नाहीये
अग्गं.. तुम्हाला कळत नाहीये का...? मानसीचं विक्रांत वर प्रेमे!

आता हे म्हणजे सांगताही येईना आणि सहनही करता येईना...त्यात तो तिचं आणि त्या संत्याचं जुळवायला निघालेला.....कसं बरं माणूस शांत राहील? पुन्हा हे म्हणजे स्वतःच्या मनाशीही कबूल नाही केलेलं तिने अजून.. ( फक्त आपल्या सारख्या (चाणाक्ष का काय ते!) प्रेक्षकांना कळलंय!)
मानसीने तिच्या सासरी एवढी
मानसीने तिच्या सासरी एवढी ढवळाढवळ केलेली तिने का खपवुन घ्यावी?>>> पण यावेळी मानसी मला भोचक नाही वाटली. खर तर मोनिका मदत करु शकली असती अर्थवला प्रोजेक्टमध्ये. तींं एमबीए आहे ना? तिच्या हुशारीचा चान्गला उपयोग झाला असता. मानसीने अर्थवला मदत केली त्यात मला काही गैर वाटत नाही.
बादवे, तो अलकाचा भाचा मोनिकाचा ओल्ड BF आणि बाळाचा बाप निघेल अस वाटत.
आधी विक्रांतला घरच्यांशी न
आधी विक्रांतला घरच्यांशी न बोलण्याची शिक्षा देऊन दोन आठवडे मालिका आणखी लांबवल्यावर त्या संतोष प्रकरणात मालिकेत भरपुर पाणी घातले. दिवाळीच्या वेळी संतोष मानसीच्या घरी काय करत होता?, तेसुध्दा विक्रांत आणि मानसी तिकडे नसताना? संतोष सारखा एकतर विक्रांतच्या घरी, क्लिनिकमध्ये, स्कुटरवर, नाहीतर मानसीच्या घरी दाखवला आहे. मग हा स्वतःच्या घरी कधी जातो? तो समोर आला कि मला त्याला एकच प्रश्न विचारावासा वाटतो. 'तु शेवटचा तुझ्या घरी कधी गेला होतास? चुकुन, बदल म्हणुन का होईना, एकदा तुझ्या घरीसुध्दा जाऊन ये.'
सारिक, अजुन एक विचार - तुला
सारिक, अजुन एक विचार - तुला नोकरी आहे म्हणे मग हापिसात केव्हा जातोस? काम कधी करतोस?
कुठल्या तरी एपिसोडात तो
कुठल्या तरी एपिसोडात तो मान्शी च्या आज्जीला सांगत होता की वर्शातले ३-४ महिने मी परदेशी असतो.
स्वप्नात का काय?
आता विक्रान्तने हे काय नविन
आता विक्रान्तने हे काय नविन काढलय? काय तर म्हणे सन्त्या हा डिप्रेस्ड माणूस आहे. त्याला प्रत्येक बाबतीत अपयशच मिळत. मला तर सनत्याच्या वागण्याकडे बघून असे वाटत नाही बुवा. उलट मला विक्रान्तच डिप्रेस्ड वाटतो.
विक्रान्तच स्वत:ची स्टोरी सान्गतोय कि पुन्हा आणखी एक खोटे बोलतोय हे तोच जाणे.
पण जर हे खरे असेल आणि मानसीने त्याला नकार दिला तर सन्त्या पुढे जाऊन "तु अगर मेरी नही हुई, तो किसी और की भी नही होने दुन्गा" असा सायको टाईप व्हायचा.
विक्रान्त मानसीला सन्त्याच्या condition बद्दल बोलता बोलता म्हणाला, " एखाद्या मुलासाठी त्याच करियर किती मह्त्तवाचे असते हे तुला माहीतीच आहे." तेव्हा मानसीने त्याला ताडकन विचारावे," आणि मुलीसाठी तिचे करियर महत्तवाचे नसते का?"
मग हा स्वतःच्या घरी कधी जातो?
मग हा स्वतःच्या घरी कधी जातो? तो समोर आला कि मला त्याला एकच प्रश्न विचारावासा वाटतो. 'तु शेवटचा तुझ्या घरी कधी गेला होतास? चुकुन, बदल म्हणुन का होईना, एकदा तुझ्या घरीसुध्दा जाऊन ये.'>>> कुठल्या तरी एपिसोडात तो मान्शी च्या आज्जीला सांगत होता की वर्शातले ३-४ महिने मी परदेशी असतो स्वप्नात का काय? >>>>.:हहगलो:
वर्शातले ३-४ महिने मी परदेशी असतो>>> आणि विक्रान्त म्हणतो की त्याचा अमेरिकेला जायचा चान्स हुकला. खखोदेजा.
आणि विक्रान्त म्हणतो की
आणि विक्रान्त म्हणतो की त्याचा अमेरिकेला जायचा चान्स हुकला >>> म्हणजे अमेरिकेतल्या नोकरीचा चान्स हुकला असं.
हिरो पोटात मुरडा धरल्यासारखा
हिरो पोटात मुरडा धरल्यासारखा वावरतो पण तो चांगला कारण तो हिरो झी म्हण्णातोय म्हणून. आणि शम्मी कपूरच्या चित्रपटातल्या राजेंद्रकुमार सारखा आगाऊपणा करत फिरणारा मित्र डीप्रेस कारण हिरो म्हणतोय म्हणून.
गोडबोलेचा नवरे चांगला झाला म्हणून त्याने तसाच मामा सादर करावा का?
सविता प्रभुणे अनेकदा त्या मागल्या शिरेलीतल्या सासूच बेअरींग घेतेय.
शर्वरी या सुखांनो या करतेय .
लोकेश गुप्तेचा तोच भाऊ पुन्हा तसाच
पिंक सारख सुंदर कथानक फुलवायची संधी आहे पण आमची हिरॉईन मान्सीच आहे त्यामुळे ....
आणि विक्रान्त म्हणतो की
आणि विक्रान्त म्हणतो की त्याचा अमेरिकेला जायचा चान्स हुकला >>> म्हणजे अमेरिकेतल्या नोकरीचा चान्स हुकला असं.>>> अमेरिकेला जायचा चान्स काय किव्वा अमेरिकेतल्या नोकरीचा चान्स काय, दोन्ही एकच ना.
आणि शम्मी कपूरच्या
आणि शम्मी कपूरच्या चित्रपटातल्या राजेंद्रकुमार सारखा आगाऊपणा करत फिरणारा मित्र डीप्रेस कारण हिरो म्हणतोय म्हणून.>>> राजेन्द्रनाथ म्हणायचे होते का तुम्हाला?
सविता प्रभुणे अनेकदा त्या मागल्या शिरेलीतल्या सासूच बेअरींग घेतेय.>>> अगदी अगदी. तो तिचा पेट्न्ट dialogue 'अस कस अस कस' परवाच्या एपिसोड मध्ये होता, फक्त तो दोनदा न म्हणता एकदा म्हटला इतकेच.:हाहा:
उ. ना पवित्र रिश्ता च्या मोड मध्ये जातात कधीकधी.
पिंक सारख सुंदर कथानक फुलवायची संधी आहे पण आमची हिरॉईन मान्सीच आहे त्यामुळे ....>>> पिंक आणि ह्या सिरियलचा सम्बध काय?:अओ:
सूलू_८२ घोर अपराध झाला
सूलू_८२
घोर अपराध झाला राजेन्द्रनाथ चा राजेंद्रकुमार केला. राजेन्द्रनाथ अस्ता तर माझ्यावर केस केली असती त्याने.
पिन्क मध्ये त्यानी ती केस जशी हाताळालेय. स्त्रीयांचा हक्क वगैरे त्याप्रमाणे हे करू शकतात.
उदा: अभिज्ञा म्हणते की झाली चुक. माझा फायदा घेतला गेला नाही समजल.... किंवा अशीच काही स्त्रीवादी भुमिका मांडू शकतात. (प्रत्यक्षात ती काय म्हणालेय मला माहीत नाही)
पण तिला ओढून ताणून खलनायिका करतायत.
असही झी पहील्यापासूनच फार पुरूषप्रधान आहे. त्या आभाळमायात सगळे मनोज जोशीला पाठिशी घालत होते आणि सुकन्या कुलकर्णीला दोष द्यायचे.
फाल्तुगिरी चाल्लेय :रागः
फाल्तुगिरी चाल्लेय :रागः
घोर अपराध झाला राजेन्द्रनाथ
घोर अपराध झाला राजेन्द्रनाथ चा राजेंद्रकुमार केला. राजेन्द्रनाथ अस्ता तर माझ्यावर केस केली असती त्याने.:हाहा:
उदा: अभिज्ञा म्हणते की झाली चुक. माझा फायदा घेतला गेला नाही समजल.... किंवा अशीच काही स्त्रीवादी भुमिका मांडू शकतात. (प्रत्यक्षात ती काय म्हणालेय मला माहीत नाही) >>> सहमत किव्वा असेही दाखवले असते तर चाल्ले असते कि स्त्रियान्ना जोडिदार निवडीचा आणि नकाराचा हक्क आहे. मानसीने जसा सन्त्याला नकार दिला तसा.
असही झी पहील्यापासूनच फार पुरूषप्रधान आहे.>>> हो ना, तुझे माझे जमेना, एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या सिरियलीमध्ये तरी काय वेगळे दाखवलेय? सध्या मानबा.
काल मजा आली. उषा नाडकर्णींची
काल मजा आली. उषा नाडकर्णींची संवादफेक, मुद्राभिनय, डोळे. सगऴं भारी.मोनिका आणि सविता प्रभुणेही छान.
मोनिकाला अचानक मोठं पोट आणि सगळे त्रास व्हायला लागलेत. काल तिने फिजिकल आणि मेंटल पेन्स दोन्ही छान दाखवल्या.
मोनिका केवळ त्या एका चुकीमुळेच निगेटिव्ह दाखवलेली नाही. तिचं कॅरॅक्टरच स्वार्थी, आपमतलबी, त्यासाठी दुसर्याला वापरायला तयार असलेलं दाखवलंय. त्यात ती एक चूक हाही भागच आहे.
नवरा तर तिने स्वतः पसंत केला होता. चूक झाली म्हणून घाईघाईत मिळेल त्याच्याशी लग्न करायला, मुळात तिला आपण प्रेग्नंट आहोत हेच माहीत नव्हतं. म्हणजे ती लग्नाआधीपासून प्रेग्नंट नसती, तरीही अशीच वागली असती. आताही आपल्या एवढ्या मोठ्या चुकीचं खापर तिने विक्रान्तच्या डोक्यावर फोडलंय.
काल तर कहर केला मालिकेनं या.
काल तर कहर केला मालिकेनं या.

काय तो त्या मोनिकाच्या मैत्रिणींचा डान्स?
त्यात ती सविता प्रभुणे अग्गं बाई करत नुसतं इकडे तिकडे फिरते. आणि तोंड उघडून विक्रांत ला सांगू शकत नाही? की तिच्या मैत्रिणी आल्यात म्हणून?
काल तर कहर केला मालिकेनं या.
काल तर कहर केला मालिकेनं या. अरेरे>+1
तोंड उघडून विक्रांत ला सांगू
तोंड उघडून विक्रांत ला सांगू शकत नाही? की तिच्या मैत्रिणी आल्यात म्हणून?>> अगदी अगदी.
एवढं काय मोठं संकट होतं सांगायच. साध्या गोष्टी पण सांगायला यांच तोंड उचकटत नाही. गंभीर काय सांगणार.
यात एक मॉनिकाची चूक आहे व ती
यात एक मॉनिकाची चूक आहे व ती खलपात्र आहे म्हणून ठीके, पण अदरवाईज, सुनेच्या मैत्रिणी (अगदी जरी काल दाखवल्या तश्शा असल्या तरी!) घरी येऊ शकत नाहीत काय? आणि त्या रुममधेच जाणं स्वाभाविक नाही का? व डान्स ही करणं ठीके.......त्यांची ती खूप दिवसांनी भेटल्यावर एंजॉय करायची पद्धत असू शकते ना?
तशाही मैत्रिणी घरातल्या (नानू मामा सारख्या) लोकांना नावं ठेवतातच!
आंबटगोड +1. मी ही सीरीयल बघतच
आंबटगोड +1.
मी ही सीरीयल बघतच नाही. कालच पाहिली.
नानूमामा तर माझ्याही डोक्यात गेला. संस्कृती बुडवल्यासारखा थयथयाट चालला होता त्याचा.
विक्रांत नक्की कोणासाठी हे
विक्रांत नक्की कोणासाठी हे लग्न निभवतो आहे ?
Pages