Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(नात्याची कात्री उघडलीये खरी
(नात्याची कात्री उघडलीये खरी पण आता मिटत नाहिये ) >
नात्याची कात्री उघडलीये खरी
नात्याची कात्री उघडलीये खरी पण आता मिटत नाहिये:हहगलो:
मागल्या पानावरच विडबन आणी
मागल्या पानावरच विडबन आणी वरची कात्री यावरुन भलतच काहितरी सुचत होत पण आवरत घेतलय!
मानसीचे लग्नाबद्दलचे स्पष्ट
मानसीचे लग्नाबद्दलचे स्पष्ट विचार आवडले ( चला या channel वर निदान एक तरि स्पष्ट विचाराची नायिका आहे. आधी उर्मी होती.) पण तो विक्रान्त आडवा आला ना तिच्या plans मध्ये.:राग: त्याला आजी-आजोबान्ना समजावयला सान्गितले होते, तर ह्याने मानसीसीच शाळा घेतली.
मी जर मानसीच्या जागी असते तर सरळ त्याला सुनावल असत," मी माझ्या लग्नाचे काय करायचे ते बघुन घेईन. तुझ्या सल्ल्याची मला गरज नाही. तुला माझ्या बहीणीवर नियन्त्रण ठेवता येत नाही, मग माझ्या आयुष्याचे निर्णय तु का घेतोस? तु फसवलस मला. मी तुला आजी आजोबान्ना समजावयाला सान्गत होती,उलट तु मलाच लेक्चर देतोस. तुझ्यावर विश्वास ठेवला हिच माझी चुक झाली." पण नाही, उलट तिने विक्रान्तचा सल्ला follow केला आणि लग्नाला झटकन तयार झाली. आपल्या विचारावर ठाम नाही राहीली.
खर तर तिने ह्या बाबतीत निलिमाचा सल्ला विचारायचा होता, तिने नीट समजावल असत आजी-आजोबान्ना.
ह्यातल्या मानसीने कसली बोअर
ह्यातल्या मानसीने कसली बोअर कविता केली होती, आणि म्हणतापण नाही आली तिला, च ह ये द्या मधे.
पण डेन्टीस्ट आहे ती. फार बोअर आहे एकंदरीत.
खर तर तिने ह्या बाबतीत
खर तर तिने ह्या बाबतीत निलिमाचा सल्ला विचारायचा होता, तिने नीट समजावल असत आजी-आजोबान्ना.>>> मला निर्मला म्हणायचे होते.
तो इक्रांत चा मित्र इतका का
तो इक्रांत चा मित्र इतका का घसरलाय मान्शी ला पाहून
आवदलि मलिका
आवदलि मलिका
पिझ्झा घेऊन आलेल्या
पिझ्झा घेऊन आलेल्या नानूमामांना मोनिकाने सुनावलेली सगळी वाक्य मला खूप आवडली.
पण तिला कुठे थांबावे हे कळत नाही. सगळ्यांदेखत नानूमामांना डिवचलं.
बाकी कालच्या एपिसोडमध्ये , (सगळ्यांना इतका त्रास देऊनही) सारी दुनिया मलाच छळतेय हे एक्स्प्रेशन्स कसले ऑनेस्ट होते!
अभिनयात विक्रान्त गौरीला टफ कॉम्पिटिशन आहे. मला तरी वाटतं विक्रान्त सहज जिंकेल. ते आजोबा पडताहेत, तरी हा मख्खच. घरी आलेले पाहुणे जायला उठताहेत म्हटल्यावर यजमानही उठून उभे राहतात तेही त्याला सांगितलं नाही.
बीपी चेक करायचीही गरज नाही, त्याला नाडीवरूनच सगळं कळतं?
काल त्याला छान संवाद होते. त्यांची माती केली.
एक संवादलेखिका शर्वरी पाटणकर आहे.
ती मोनिका फार भारी अभिनय
ती मोनिका फार भारी अभिनय करते. उत्तम अभिनेत्री आहे. ती आणि ती राधिका (अनिता दाते).
या शिरेली पेक्षा cp पाहते मी
या शिरेली पेक्षा cp पाहते मी सोनी वर. ते बरं
मोनिका रिअलिस्टीक बोलते.
मोनिका रिअलिस्टीक बोलते. मानसी अगदीच artificial वाटते. विक्रान्तचा प्रचंड राग येतो. मोनिकाला असे वागवण्यापेक्षा त्याने लग्न मोडावे. नानुमामा पंण छान. बाकी सगळे अविश्वसनीय वाटतात.
हो मला पण मोनिका चा अभिनय
हो मला पण मोनिका चा अभिनय आवडतो .
रच्याकने आत्या जवळ जवळ दररोज एकच प्रिंटेड कापडाचा ब्लाउज घालते, केलं आहे का कोणी हे नोटीस ?
राया, अगदी सहमत. हो मला पण
राया, अगदी सहमत.
हो मला पण मोनिका चा अभिनय आवडतो . >> ती छान वाटते, बोलते, वागते. नॅचरल.
वरचे टायटल साँगवर असलेल्या
वरचे टायटल साँगवर असलेल्या कमेंट्स वाचल्या, अगदीच सहमत नाही. मला खुप आवडलं आहे लिरिक, आवाज आणि संगित.
वरचे टायटल साँगवर असलेल्या
वरचे टायटल साँगवर असलेल्या कमेंट्स वाचल्या, अगदीच सहमत नाही. मला खुप आवडलं आहे लिरिक, आवाज आणि संगित.>> मलापण आवडतं. पण वरच्या कमेंट्स दक्षिणाताईने गाणं चुकीच ऐकल्यामुळे आलेल्या आहेत गाण्यावर 'टीका' म्हणून नव्हे.
मोनिका रिअलिस्टीक बोलते.
मोनिका रिअलिस्टीक बोलते. मानसी अगदीच artificial वाटते. विक्रान्तचा प्रचंड राग येतो. मोनिकाला असे वागवण्यापेक्षा त्याने लग्न मोडावे.>>>+१
मालिकेत उघड उघड पाणी
मालिकेत उघड उघड पाणी घालताहेत. चांगलं बादल्या बादल्यांनी !
प्रोजेक्ट काय, तो इक्रांत चा मित्र संतोष काय, आजी आजोबांचे स्लो ड्वायलॉक काय !
आणि आत्या ला मानसी त्या मित्रा बरोबर बोलताना दिसली म्हणून एव्हढा राग आला? कमाले!
विक्रांतचा तो मित्र कसला पकाऊ
विक्रांतचा तो मित्र कसला पकाऊ आहे
त्याला काही इतर कामधंदा नाहिये का
सारखा त्या मानसीच्या मागे असतो
आणि आत्या ला मानसी त्या
आणि आत्या ला मानसी त्या मित्रा बरोबर बोलताना दिसली म्हणून एव्हढा राग आला? कमाले!>>नैतर काय.
त्याला काही इतर कामधंदा
त्याला काही इतर कामधंदा नाहिये का >>> सॉफ्ट्वेअर ईन्जिनियर आहे तो .
(आता आठवा , झी चा कोणता सॉ.ई. काम करताना दिसला होता का ?? )
कालचा एपिसोड (चुकून) पाहिला.
कालचा एपिसोड (चुकून) पाहिला. काय ते
आज्जी आणि मांशीचं लाडे लाडे बोलणं 
ती का खार खाऊन आहे मांशी वर?
नोकरी सिरीयस घे, थालीपीठ... फोन कैच्याकैच
आणि तो दिव्य मित्र
निर्मलेचं काय बिनसलंय म्हणे सध्या?
आणि आत्या ला मानसी त्या
आणि आत्या ला मानसी त्या मित्रा बरोबर बोलताना दिसली म्हणून एव्हढा राग आला? >>> तिला वाटल असेल कि मानसी सुद्दा तिच्या बहिणीसारखी निघेल.
विक्रांतचा तो मित्र कसला पकाऊ आहे राग त्याला काही इतर कामधंदा नाहिये का अ ओ, आता काय करायचं सारखा त्या मानसीच्या मागे असतो>>> नैतर काय. महाआगाऊ आहे तो. बर झाल, मानसी त्याला फसली नाही ते. पण आजी-आजोबा त्याला कसे फसले कुणास ठाऊक? त्याचा फोन नम्बर मागत होते. मोनिकाचे धडधडित उदाहरण आहे ना त्यान्च्या समोर.
नोकरी सिरीयस घे>>> छान
नोकरी सिरीयस घे>>> छान म्हणजे जेव्हा मानसी आधी मला खुप शिकायचे आहे, लग्न बिग्न नन्तर. तर हिच आजी तिच काही न ऐकता तिच्या लग्नाच्या मागे लागली होती. आणि वरुन तिला "काय तुम्हा मुलिन्च एकेक" असा टोमणा मारला. आता तिच आजी म्हणते कि नोकरी सिरियस घे.
लोकसत्ता दिवाळी अंकात झी
लोकसत्ता दिवाळी अंकात झी मराठीची जाहिरात आहे. त्यात पैलवानवाल्या आणि शनायावाल्या मालिकेचे हिरो हिरोईन आहेत. त्यात विक्रान्त आणि शिव आहेत. शिवच्या पुढ्यात मानसी तर विक्रान्तपुढे गौरी बसलीय.
मानसी अगदीच artificial वाटते.
मानसी अगदीच artificial वाटते. >>> अगदी खरं. ते प्रोमोज बघतेय २ दिवस आणि च ह ये द्या मध्ये आलेली तेव्हाही तशीच वाटली.
मानसी ही डॉक्टर कमी आणि एयर
मानसी ही डॉक्टर कमी आणि एयर होस्टेस जास्त वाटते.
त्यात विक्रान्त आणि शिव आहेत.
त्यात विक्रान्त आणि शिव आहेत. शिवच्या पुढ्यात मानसी तर विक्रान्तपुढे गौरी बसलीय.काय? :अओ::हहगलो:
मानसीला जर तो सन्त्या आवडत
मानसीला जर तो सन्त्या आवडत नसेल, तर ती त्याचा फोन का उचलते? आणि वरुन त्याला हेही सान्गते कि आजी-आजोबा काही दिवसासाठी बाहेरगावी चाललेत. म्हणजे ती एकप्रकारे त्याला हिन्टच देते की मी निदान काही दिवस घरात एकटी असेन. हे चुकीचे दाखवले आहे. मानसीसारखी responsible मुलगी अशी कशी वागू शकते?
मूळ कथेमध्ये पाणी घालून ती
मूळ कथेमध्ये पाणी घालून ती वाढवण्याचे प्रकार चालू आहेत या मालिकेमध्ये.
Pages