खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याचं उत्तर मानसीने मोनिकाला आधीच दिलंय. तिला प्रेग्नंसी लपवायची होती तेव्हा तिनेच मानसीला बोलवलेलं. आता तंबूत शिरलेला उंट कआढता येतो का?
आता तर आजीआजोबापण येतील राहायला.

मानसीने मोनिका आणी विक्रांतच्या समेटाचे प्रयत्न करावेत ना (बहिण म्हणुन). मोनिकाने लग्नाआधी जे काही झाले आहे ते विक्रांतला खरे खरे सांगणे. विक्रांतने त्याची भुमिका मांडणे हे सर्व कधी होणार. नुस्ताच प्रेग्ननंसीवर फोकस आहे. पुढचं काय? सगळे डोळ्यावर पट्टी बांधुन का फिरताहेत?

झाले की तिचे प्रयत्न करून! तिचा मोनिकाने इनफ अपमान केलेला आहे आतापावेतो. मोनिका म्हणजे कामापुरता मामा टाइप्स दाखवली आहे अगदी. तर मानसीने तरी स्वतःला हवं तसं का वागू नये? Happy

मला तर आजकाल मॉनिका ला सगळे त्रास देत आहेत असे वाटतेय ... अर्थात ती ही काही कमी नाहीये Happy
विक्रांत थोडं बरं काम करतो पण मानसी अभिनयात ढ आहे.

मला तर आजकाल मॉनिका ला सगळे त्रास देत आहेत असे वाटतेय >>> ती हॉस्पिटलच्या कामात ढवळाढवळ करते तेव्हा असं अजिबात नाही वाटलं. आणि ते पटलं ही नाही.

र्म्ड, हॉस्पिटल चं मला माहिती नाही पण एकंदरीत तिला जे काही करावंसं वाटतंय ते करुच देत नाहीत.. जो उठतो तो डोस्स पाजायला सुरुवात करतो आणि ती तशी रीअ‍ॅक्ट व्हायला सुरुवात करते...
थोड्क्यात इतर मंडळी पण जरा अतीच करत आहेत.. Happy

मानसी पत्राद्वारे डॉक्टरकी शिकली, हे काल कन्फर्म झालं. तिच्याकडे मेडिकल कॅलेजातल्या आयुष्याबद्दल बोलायला काहीच नव्हतं.

लोकांनी मोनिकाची काळजी घेतली तरी तिला त्याचा त्रास होतो. अर्थात तिचा त्रागा अगदी जेन्युइन वाटतो.

विक्रान्तचे वडील रात्री बेरात्री बिनधास्त बेल वाजवतात? मग आजीच्या धाकाचं काय झालं? नानूमामाही कुठे असतात तेव्हा? आता त्यांनी 'अगं बाई! आता?'ला गुपचूप दार उघडायला सांगणं अशक्यच. पण निदान आपल्या भावाला तरी सांगायचं.

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट >>>>> Lol

विक्रांतचे बाबा रात्री जातात कुठे नक्की ?
मोनिका एकंदरीत बिंडोक वाटते. नवरा तिच्याकडे ढुंकूनही बघत नसताता त्याने यावं मला सॉरी म्हणावं माझ्याशी गप्पा माराव्या वगैरे अपेक्षा तिच्या!

मोनिका उठता-बसता (भलत्या जागी वाढवलेल्या) पोटावर हात ठेवून चेहरा वेडावाकडा करते. Uhoh
तिला जर प्रेग्नन्सीचा, हालचालीचा इतका त्रास होत असेल तर घरच्या डॉक्टरचं तिच्याकडे लक्ष नाहीये असं म्हणायला पाहिजे.
तो प्रेग्नन्सीचा अभिनय असेल तर दिग्दर्शकाला दिग्दर्शनाच्या बेसिक लेक्चर्सना बसण्याची नितांत आवश्यकता आहे.

मानसी पत्राद्वारे डॉक्टरकी शिकली, हे काल कन्फर्म झालं >>> Biggrin

कालची मानसीची शिट्टी वाजवण्याची style बघून, कपाळावर हात मारायची वेळ आली
का घेतला असेल मानसीला lead रोल साठी एवढच विचार आला??/

घेतला असेल मानसीला lead रोल साठी एवढच विचार आला??>> प्रेक्षकांना अभिनय म्हणजे काय असतो ते कळण्यसाठी.

'अगं बाई! आता?'ला गुपचूप दार उघडायला >> सविता प्रभुणे चे अगं बाई १० शब्दांच्या वाक्यात ८ वेळा असते.

इक्रांत इतका खुललाय कशामुळे?
त्याचं हसण किती ऑकवर्ड वाटतं? मोकळा अभिनय नाही करत तो!

>>>>इक्रांत इतका खुललाय कशामुळे?
त्याचं हसण किती ऑकवर्ड वाटतं? मोकळा अभिनय नाही करत तो!--

हल्ली जरा सुधार्लेली वाटते अ‍ॅक्टिंग.

ती मोनिका काल मैत्रिणीन्ना भेटायला जाताना अन्ग झाकणारा कुर्ता घालुन गेली होती, तरीही तिच्याकडे अलका आणि गीता एवढे मानसिक धक्का बसल्यासारखे का बघत होते?:अओ:

काल विक्रान्तने मानसीशी बोलताना डिट्टो 'आईना' चा dialogue मारला. आपण दोघ भान्डलो तर आपली समजूत कोण काढणार अस काहीतरी.

मराठी मुव्हि डबलसीट मधे हा विक्रान्त सॅन्पल फ्लॅट दाखवणार्‍या असोसिएट च्या बारिकशा रोल मधे आहे , तिथे बर काम केलय यापेक्षा! निदान कॉन्स्टिपेट झाल्यासारखा तरी बोलत नाही.

>>>>.तिच्याकडे अलका आणि गीता एवढे मानसिक धक्का बसल्यासारखे का बघत होते?अ ओ, आता काय करायचं---

स्वतःच्या डोक्याने काही करायची सवय नसलेल्यांना दुसर्यांकडे पाहुन असेच रिअ‍ॅक्ट होणे साहजिकच आहे. मला मोनिका नुड्ल्स मागते तो सीन जाम आवडला. पण आजेसासु कसली खेकसली त्यावर!

काल पण मोनिकाचा अभिनय क्लास. म्हणजे दोन नग सोडले तर सगळ्यांचाच अभिनय चोख असतो.
पण मोनिका नवी आहे म्हणून तिचं कौतुक. चेहर्‍यावर सगळे भाव मस्त उमटतात. संवादफेक, उच्चार हेही छान.
ती इतकी हुशार, स्वच्छ बोलणारी दाखवलीय, तर तिच्या मैत्रिणी इतक्या उथळ, रिकामटेकड्या का दाखवल्यात? सारखं आपलं गाणी लावून नाचायचं, सिग्रेट फुंकायची आणि प्यायचं? वेस्टर्न क्लोथ घालणार्‍या बाया वाईट हे मनोजकुमारच्या पूरब पश्चिमचं समीकरण अजून ओढतात लोक.

हा संघर्ष कॉम्प्लेक्स करायची किती छान संधी होती निर्मात्याकडे. पण यांना सगळं सोपं करून दाखवायचं असतं. बहुसंख्य प्रेक्षकांनाही फरक पडत नसेल.

आता विक्रान्तच्या अभिनयाबद्दल. त्याला आतापर्यंत एकच एक एक्स्प्रेशन्स दिले होते. आता जरा रंग बदलतोय किंवा कळी खुलतेय म्हणा.जरासं आधीही मोनिकाबाबत स्टर्न स्टँड घेताना दाखवला तो. पण आधीच्या विक्रान्तची सवय झाल्याने, म्हणून की काय; तो आता जे करताना दाखवतोय त्यातही तो अवघडलेला वाटतोय. पण त्याच्यातला बदल ओव्हरनाइट दाखवलाय. अर्थात मालिकांकडून आणखी सूक्ष्मतेची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. त्यांचा टार्गेट ऑडियन्स खुष असेल यावर.

सारख्या कुठे गाणी लावुन नाचतात, सिग्रेटी फुकतात आणि पितात? त्यांची आपापली काही कामं असतीलच. मग मैत्रिणी एकत्र आल्या की हे बाकीचं करत असतील.

वेस्टर्न क्लोथ घालणार्‍या बाया वाईट हे मनोजकुमारच्या पूरब पश्चिमचं समीकरण अजून ओढतात लोक.>+१

वेस्टर्न क्लोथ घालणार्‍या बाया वाईट हे मनोजकुमारच्या पूरब पश्चिमचं समीकरण अजून ओढतात लोक.>>> परवा मानबा मध्येही असेच दाखवले होते- नानीजी राधिकाला शुभान्गीबद्दल सान्गते की तिचे आई-वडील Australia ला असतात. हि मुलगी रात्री उशिरा घरी येते. शेवटी नानीजी म्हणते कशी, हल्लीच्या मुलीन्ना कसलाच ताळतन्त्र राहीलेला नाहिये. म्हणजे रात्री उशिरा घरी येणार्या मुली वाईट चालीच्या असतात का? मुले नाही? मुलीन्नी रात्री उशिरा घरी येण वाईट? असच जर असेल तर मग हाच नियम भक्तीमिस किव्वा रेवतीला लागू व्हायला हवा कारण त्याही कधी कधी रात्री उशिराच येतात ना घरी?

अरे तुमच भाण्डण आहे म्हणुन काय सोसायटीतल्या सगळ्यानी मॅनर्स सोडुन वागायच? त्या इशाने तिला घर लॉक असताना घरी नेल तर ती वाईट? काहीही! बालिश प्रकार चाललाय सगळा.शुभान्गी कोण?

Pages