Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोनवर बोलता येत नाही /
फोनवर बोलता येत नाही / कुणीतरी ऐकेल असं वाटतं... अरे, मग मेसेज करा ना!) >> अरे मग ते आपल्याला दिसणार नाही ना. त्यासाठी पुन्हा जोरात बोलुनच टाईप करावे लागणार मेसेज मग तेव्हा ऐकणार कुणितरी >>> सौभाग्यवती किव्वा असे हे कन्यादान का आणखी कुठल्यातरी मालिकेत छान प्रयोग केला होता. त्यात एखादयाने टाईप केलेला मेसेज स्क्रीनवर दाखवायचे.
तिकडे शिव-गौरीचंही तसंच. फोन उचलत नाही / फोनवर बोलता येत नाही / कुणीतरी ऐकेल असं वाटतं... अरे, मग मेसेज करा ना!>>> लग्नाआधी तर शिव-गौरी करायचे की मेसेज एकमेकान्ना. मग आताच असे का हे वागताहेत?
आता विक्रांत या भागात
आता विक्रांत या भागात मोनिकाला सांगून सावरून माहेरी पाठवतोय आणि पुढच्या भागात डिव्होर्स ची नोटीस पाठवेल. कदाचित तू तुझ्या इच्छेने माहेरी गेलेली आहेस आता या घरात येऊ नकोस असंही नोटीस मध्ये लिहिलं असेल बाकी इतर कारणही असतीलच . डिव्होर्स नवरे मंडळींना पाहिजे असतो तेव्हा हि ठरलेली ट्रिक असते
डिव्होर्स नवरे मंडळींना
डिव्होर्स नवरे मंडळींना पाहिजे असतो तेव्हा हि ठरलेली ट्रिक असते>>
ती लग्नाआधीच भलत्याच पुरुषापासून प्रेग्नंट आहे आणि हे तिला आधी माहित असतानाही तिने केवळ पैशासाठी विक्रांतशी लग्न केलं नि त्याची फसवणूक केली. .. हे कारण पुरेसं आणि योग्य नाहिये असं म्हणणं आहे का?? की विक्रांत उगाचच बिचार्या मोनिकाला डिव्होर्स देतोय.. असं म्हणणं आहे??
विक्रांतचा पेशन्स फायनली
विक्रांतचा पेशन्स फायनली संपला असेल. शिवाय ती त्याचा वापर करून घेतेय म्हटल्यावर तो हताश झाला असणार.
पण हे मुल त्याचच आहे, हे जे
पण हे मुल त्याचच आहे, हे जे त्याने कबुल केलय त्याचं काय करणारे तो?
निधी या मालिकेत जे दाखवलंय
निधी या मालिकेत जे दाखवलंय त्या बाबतीत विक्रांतला सहानभूती आहेच . फक्त त्याने हा निर्णय घ्यायला चिक्कार वेळ लावला आणि मी ट्रिक च्या बाबतीत जनरल बोलतेय. मालिकेच्या संधर्भात नाही. मालिकावाल्यांनी फ्यामिली डिव्होर्स केस बाबतीत चांगला अभ्यास केलाय
ती त्याचा वापर करून घेतेय
ती त्याचा वापर करून घेतेय म्हटल्यावर तो हताश झाला असणार.>>
विक्रांतने आता डिवोर्सचा निर्णय घेण्यामागे हेच कारण दाखवलंय. आधी ती निरागसपणे प्रेग्नंट असल्याबद्दल अनभिज्ञ असल्याच सांगते. पार्टीत दारुच्या नशेत असताना बाॅयफ्रेंडने फायदा घेतला असावा वगैरे सांगते त्यावर विश्वास ठेऊन तो तिला आणि बाळाला स्विकारायचे ठरवतो.. पण तीने सगळं माहित असताना फक्त पैशासाठी त्याचा वापर करुन घेतेय हे कळल्यावर तो नातं तोडण्याचा शेवटचा आणि अपेक्षित पर्याय स्वीकारतो.
टी डिव्होर्सची नोटीस पाहून
टी डिव्होर्सची नोटीस पाहून आजोबांना बहुदा हार्टअॅटॅक येणार मग मानसी विक्रांतला गळ घालणार. मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
विक्रांत काय घडाघडा घरच्यांना सांगणार नाही की कसे मोनिका मला फसवत होती, पैश्यासाठी माझ्याशी लग्न केलं वगैरे.
हे पहिल्यांदाच फेरे घेतानाच
हे पहिल्यांदाच फेरे घेतानाच करायला हवे होते. झीरो टॉलरन्स.
पण हे मुल त्याचच आहे, हे जे
पण हे मुल त्याचच आहे, हे जे त्याने कबुल केलय त्याचं काय करणारे तो?
>>> काही नाही पुढच्या ५० एपिसोडची सोय
हो. पुढल्या ५० एपिसोडात असह्य
हो. पुढल्या ५० एपिसोडात असह्य घुसमट होणारे. विक्रांतची आणि प्रेक्षकांचीही.
बायकोने जर विश्वासघात केला की
बायकोने जर विश्वासघात केला की तिला तडक माहेरी पाठवून डिवोर्सची नोटीस दिली जाते (हि सिरियल आणि कादिप), पण जर नवरा जर विश्वासघातकी निघाला तर मात्र ती बायको माझा नवरा, माझा सन्सार करत रडत बसते ( माझ्या नवर्याची बायको) खरच, पुरुषप्रधान आहे हे channel.
चॅनल पुरुष प्रधान कारण समाज
चॅनल पुरुष प्रधान कारण समाज पुरुष प्रधान वर्षानुवर्षं . चालायचंच. त्यातनं बाईलाही बदलायचं नाहीच ना. ती राधिका शनायाला धडा शिकवणार म्हणते पण नवऱ्याचं काय ? तो आहेच ना शनायाच्या पाठी ?
या मालिकेच्या संधर्भात बोलायचं म्हटलं तर असं समजूया एखाद्या नवऱ्याने विवाह बाह्य संबंध ठेवले आणि त्यातून बाईला दिवस राहिले ती जर का न्याय मागायला आली तरी त्या पुरुषाची बायको काय म्हणणार? कशावरून माझ्या नवर्यापासूनच तू प्रेग्नन्ट आहेस ? पुरावा काय ? चूक दोघांचीही असते पण बाईला च भोगावं लागत . असो
गंमत आहे!. मोनिका फसवते आहे
गंमत आहे!. मोनिका फसवते आहे हे अगदी स्पष्ट दाखवलेलं असुनही इथे महिला मुक्तीवादी गळे काढत आहेत.
अमा, तुम्ही(च ना?) मागे बेगडी स्त्रीमुक्तीवादावर लेख लिहिला होतात, त्यात घाला ही उदाहरणं.
सुजाताई, मालिकेच्या धाग्यावर
सुजाताई, मालिकेच्या धाग्यावर मालिकेबद्दल बोललात तर बरं होईल.
मनू आणि मोनूंच्या
मनू आणि मोनूंच्या आजोबांच्र्या जान्हवीच्या वडिलांचे गुढघे आठवले.
आज्जीच्या वरताण सगळे आता
आज्जीच्या वरताण सगळे आता मोनिकाला घाबरतात. बाकी काही असो. मोनिका हे कॅरॅक्टर खतरनाक आहे आणी ती अभिनेत्री मस्तं न्याय देतेय भुमिकेला.
ह्याच नाव "खुलता कळी खुलेना"
ह्याच नाव "खुलता कळी खुलेना" अस का आहे..?
कारण या सिरिअलमध्ये कुणीच
कारण या सिरिअलमध्ये कुणीच खुललेले नाही. सगळे कायम तणावग्रस्त दिसतात. अपवाद गीताकाकी आणि तिचा नवरा (ते कधितती बरे दिसतात).
विक्रान्त ने पाठवलेली नोटिस
विक्रान्त ने पाठवलेली नोटिस मानसी ने अडवून धरली आहे मधल्या मध्ये.
असला आगाऊपणा होणार याची मला जणू खात्रीच होती.
प. कुमार गंधर्वाचे आजुनही
प. कुमार गंधर्वाचे आजुनही रुसुन आहे , खुलता कळी खुलेना ह्या गाण्यावरुन नाव घेतले आहे.
पण मी मान्शी का म्हणुन लवपतेय
पण मी मान्शी का म्हणुन लवपतेय नोटीस?? च्यामारी हिची कळी कधी खुलायची मग?
च्यामारी हिची कळी कधी खुलायची
च्यामारी हिची कळी कधी खुलायची मग?....
तिला आजोबा-आजींना नोटीस वाचून
तिला आजोबा-आजींना नोटीस वाचून काय होईल ह्याची भीती आहे म्हणून ती दडवून ठेवत्ये. होप आज विक्रांत काय ते क्लीअर करेल.
नाही नाही...विक्रांत आज एकदम
नाही नाही...विक्रांत आज एकदम शेवटी येईल बेल वाजवून ..... आणि ते आजोबांची तब्येत पहायलाच येणं होईल.......!! तो मुख दुर्बळ काहीही बोलणार नाही...!!फॉर शुअर!
निधी ताई तेच बोलतेय मी. वाचलं
निधी ताई तेच बोलतेय मी. वाचलं नाहीत कि काय ?
पण जर नवरा जर विश्वासघातकी निघाला तर मात्र ती बायको माझा नवरा, माझा सन्सार करत रडत बसते ( माझ्या नवर्याची बायको) खरच, पुरुषप्रधान आहे हे >> या सुलु ताईंच्या लिहिण्यावर माझ्या कॉमेंट मध्ये टिप्पण्णी होती माझी
जरूर नाहीये फक्त मालिकेबद्दलच बोलावं अशी. त्याच संदर्भात इतर संलग्न गोष्टीही कॉमेंट मध्ये टाकाव्यात .
हि काय परीक्षा आहे का ?. नेमकं तेवढ तेच उत्तर लिहायला
भले ही बाकी कोणाला न सांगो,
भले ही बाकी कोणाला न सांगो, पण तै ला तर सांगावं
मोनिकापेक्षा जास्त घोळ
मोनिकापेक्षा जास्त घोळ विक्रांतने घातलेत
आणि त्याच्यापेक्षा जास्त घोळ
आणि त्याच्यापेक्षा जास्त घोळ मान्शी घालणारे
मान्शी आता विक्रांत च्या
मान्शी आता विक्रांत च्या पाया पडून नोटिस वगैरे धाडू नको, डिलिव्हरीत तिच्या जिवाला धोका निर्माण होईल/ किंवा आत्ताच आहे असं वगैरे सांगून इमोशनली ब्लेक मेल करेल छ्ह्य
Pages