Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
म्हणूनच काल बेशुद्ध पडली होती
म्हणूनच काल बेशुद्ध पडली होती बहुतेक
लेखकालाच धड सुधरत नाहीए की मानसी व विक्रांत ची प्रेम कथा दाखवावी की नाही! मॉनिका ला घाबरत असावा बहुतेक!
मी पाहते, मस्त आहेत दोघे
मी पाहते, मस्त आहेत दोघे अंजली व राणा पण .>> +१
>>>>>लेखकालाच धड सुधरत नाहीए
>>>>>लेखकालाच धड सुधरत नाहीए की मानसी व विक्रांत ची प्रेम कथा दाखवावी की नाही! मॉनिका ला घाबरत असावा बहुतेक!--
हा हा, असंच वाटतंय. ती चुकीचं वागली आहेच पण तिचा दरारा सॉलिड आहे. तिचे आणी सविताबाईंचे सिन्स छान वाटतात. ती सासुला कन्फ्रंट करते, स्वतःचे विचार सांगते. अगबाई रडल्या की माघारही घेते.
दिवाळी अंकांत झी मराठीच्या
दिवाळी अंकांत झी मराठीच्या जाहिराती आणि त्यात मालिकांमधल्या नायकनायिकांच्या जोड्या आहेत. त्यात विक्रांतसोबत मानसी आहे.
----
आतापर्यंत मोनिका आणि नानूमामाच्या अंगात येत होतं. आता मानसीच्या आजीच्याही अंगात येऊ लागलंय.
मोनिकाच्या मैत्रिणी इतक्याही
मोनिकाच्या मैत्रिणी इतक्याही काही वाईट नव्हत्या. फक्त ती तिसरी मोहनची fan सोडल्यास. त्या दोन मैत्रिणी मोनिकाला सागन्त सुद्दा होत्या की 'स्वतची काऴजी घे ग." ती मोनिकासुद्दा मैत्रिणीन्ना त्या दिवशी स्पिकरचा आवाज कमी करायला सान्गत होती.
मोनिकाचा खोलीतून सिगारेटचा वास?
नक्की काय भानगड आहे ही?
विक्रान्त म्हणतो की तुम्ही मैत्रिणी शान्त बसून गप्पा मारु शकता ना, धान्गडधिन्गा करायची काय गरज? असा काय धान्गडधिन्गा केला मोनिका आणि तिच्या मैत्रीणीन्नी? काही पुरुष एखादया मित्राच्या घरी दारु पिऊन रात्रभर गोन्धळ घालतात तेव्हा त्यान्च्या बायकान्ना त्रास होत नाही का? ते कस चालत?
मोनिकाच्या लग्नाच्या तिसर्या दिवशी, अख्ख दळवी कुन्टुम्ब लाऊड स्पिकर मोठा करून 'झिन्गाट' गाण्यावर रात्रिचे नाचत होते. ते बर चालत ह्यान्ना?
आतापर्यंत मोनिका आणि
आतापर्यंत मोनिका आणि नानूमामाच्या अंगात येत होतं. आता मानसीच्या आजीच्याही अंगात येऊ लागलंय.>>> नैतर काय, वात आणलाय आजीने नुसता. दुसरी कुणी मुलगी असती तर घर सोडून गेली असती. मला तर वाटत, मोनिकावर सुद्दा हिने अशीच जबरदस्ती केली असेल लग्नाची. बोलत होती ना, कि सुरुवातीला मोनिका सुद्दा लग्नाला नाके मुरडत होती. इवन, मोनिका सुद्दा एकदा म्हणाली होती की, मला काही निर्णय मनाविरुद्द, जबरदस्तीने घ्यावे लागले. नन्तर तिला विक्रान्त च्या स्टेटसची भुरळ पडली आणि मग झाली लग्नाला तयार.
एके दिवशी सकाळीच मोनिकाने
एके दिवशी सकाळीच मोनिकाने कंप्लेंट केलेली की तिला स्वयंपाकधरातून येणार्या वासांचा त्रास होतोय. हॉलमधून येणार्या लोकांच्या बोलण्याच्या आवाजाचा सुद्धा त्रास होतोय.
मग लगेच मैत्रिणींना बोलवून मुजिक वाजवलं.
Yes bharat+1 how come?
Yes bharat+1 how come?
मोनिकाने कंप्लेंट केली कारण
मोनिकाने कंप्लेंट केली कारण तिला हे दाखवून द्यायचं होतं की तिला खाली शिफ्ट झाल्यामुळे त्रास होतोय.
सिगरेट तिच्या मैत्रिणीच ओढत होत्या कारण आधीच्या सीन मधे तिची मैत्रीण तसं विचारते तिला.
या सगळ्यात एक गोष्ट कधीच
या सगळ्यात एक गोष्ट कधीच दाखवली जात नाही का?
विक्रांतसारखा तरूण मनुष्य, लग्नादिवशीच बायकोबद्दल असं कळलेलं, मग त्याची physical relationship विना तळमळ होत नसेल का? बाळासाठीचा निर्णय वगैरे सारखंच चालू असतं, पण कधीतरी हा पैलूही दाखवायला नको का? मानसी आणि तो जेव्हा केव्हा प्रेमात पडतील तेव्हा केवळ सुस्वभावाच्या 5-star rating च्या जोरावरच का?
लले झीशिरेलकडुन भलत्याच
लले झीशिरेलकडुन भलत्याच अपेक्षा.. गेट वेल सुन, चेंज करा चॅनल.
त्या सगळ्या मद्दड शिरेलीपेक्षा WWF WWE बरं म्हणायची वेळ आली आता.
ललिता-प्रीति, भारतात अशा
ललिता-प्रीति, भारतात अशा गोष्टी दाखवायचं धाडस, तेही टीव्हीवर, किती निर्माते दिग्दर्शक करणार?
मला मराठीत एकच मालिका आठवतेय : सोनियाचा उंबरा. ती कन्नड मालिकेवर बेतलेली. स्मिता तांबेंनी एक कॅरॅक्टर रंगवलेलं. ज्यात थोरल्या बहिणीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याने तिच्या नवर्याशी या मुलीला विवाह करावा लागतो. ते बाळही त्या नवर्याचं नसतंच. आणि दुसरं लग्न नवर्याच्या इच्छेविरुद्ध.
आणि आजकाल तर लग्न करूनही लांब लांब रहायची ट्रेंड आहे मालिकांत.
काय दाखवावं असं अपेक्षित आहे
काय दाखवावं असं अपेक्षित आहे तुम्हाला?
हो ना.... पहा : शिव- गौरी,
हो ना....
पहा : शिव- गौरी, मल्हार-बानू, विक्रांत-मोनिका, गुरु-राधिका, स्वानंदी-नील .......कुणीच तर सोबत रहात नाहीत!
साथ निभाना साथिया, ससुराल
साथ निभाना साथिया, ससुराल गेंदा फूल, एका लग्नाची दुसरी गोष्ट
ललिता-प्रीति, भारतात अशा
ललिता-प्रीति, भारतात अशा गोष्टी दाखवायचं धाडस, तेही टीव्हीवर, किती निर्माते दिग्दर्शक करणार?
>>>
धाडस म्हणता येईल इतकं दाखवायलाच हवं असं कुठेय! Subtle संदर्भही शक्य आहेत की! संवादांमधून दर्शवता येईल.
मी `पैलू' म्हटलं, तशी शीन-शिनरी नव्हे
केपी, ही शिरेल मला रोज ऐकावी लागते ना...
लले इतकं मॅच्युरेशन यायला
लले
इतकं मॅच्युरेशन यायला जमाने लागतील.
अजुन झी १९४०-५० सालच्या सालस सुनांच्या साच्यात अडकलंय.
लले झीशिरेलकडुन भलत्याच
लले झीशिरेलकडुन भलत्याच अपेक्षा.. +१००
झीला हे आणि असं सगळं (म्हणजे सुचक सुद्धा) दाखवावं लागू नये म्हणून तर तो लांब ठेवण्याचा ट्रेंड आणलाय.
आणि शारीरीक कुचंबणा होत असेल असं त्या एरंडेल प्यायलेल्या विक्रांतच्या चेहेर्याकडे बघून मुळीच वाटत नाही. फार तर पोटात मुरडा धरल्यासारखे भाव असतात तीच काय ती कुचंबणा. त्याचीसुद्धा आणि प्रेक्षकांचीसुद्धा.
परवाच्या भागात मानसी मोनिकाला बेडरूममध्ये येऊन सुनवते (पहिल्या वेळेला मैत्रीणी येतात त्या दिवशी रात्री).. तो अख्खा एपिसोड प्रचंड खटकला. मोनिकाचा राग येण्याच्या ऐवजी त्या भागात मोनिकावर खरंच काळजीच्या नावाखाली अन्याय होतोय असे वाटत होते मला. तिच्या मैत्रीणी येण्याचा, त्यांच्या खाण्यापिण्याचा वगैरे खूप गहजब केला.. विक्रांतने सांगितले कि माझ्या घरच्यांना त्यांच्या येण्याचा त्रास झाला.. त्यांचं येणंच बंद करेन (हे वाक्य तर सरळ सरळ दडपशाही होती).. नंतर ती आगाऊ भोचक मानसी डायरेक्ट यांच्या बेडरूममध्ये घुसुन मोनिकाला अक्कल शिकवु लागली.. मी मोनिकाच्या जागी असते तर आधी मानसीच्या एक कानाखाली मारली असती. पांचट भोचक कुठची. विक्रांतला पण मानसी आवडू लागली आहे वाटतं. तसं असेल तर विक्रांततरी कुठे धुतल्या तांदळासारखा आहे? एक जोडीदार प्रामाणिक नसेल तर दुसर्या जोडीदाराला बाहेर शेण खायची परवानगी कोणता कायदा देतो?
बाकी मानसीच्या आज्जीआजोबांच्या अंगात का आलंय देवजाणे. मानसीचे शेवटचे काही महिने राहिलेत अश्या टाईपची घाई करत आहेत ते दोघे.
शारीरीक कुचंबणा होत असेल असं
शारीरीक कुचंबणा होत असेल असं त्या एरंडेल प्यायलेल्या विक्रांतच्या चेहेर्याकडे बघून मुळीच वाटत नाही. फार तर पोटात मुरडा धरल्यासारखे भाव असतात तीच काय ती कुचंबणा. त्याचीसुद्धा आणि प्रेक्षकांचीसुद्धा.....
मला तर असे वाटते की तो पोट गच्च आवळून बोलतो जसे कधीही "जावे" लागेल!
काय ते त्याच्या चेहेर्यावरचे सेम तेच ते भाव....आणि काय ती लाडे लाडे सदोष बोलणारी मानसी.. अत्त्या, तै, भैण, .. असे बोलणारी!
.
मानसीच्या आज्जीआजोबांच्या
मानसीच्या आज्जीआजोबांच्या अंगात का आलंय देवजाणे. मानसीचे शेवटचे काही महिने राहिलेत अश्या टाईपची घाई करत आहेत ते दोघे.>>> :p
मानसीच्या आज्जीआजोबांच्या
मानसीच्या आज्जीआजोबांच्या अंगात का आलंय देवजाणे. मानसीचे शेवटचे काही महिने राहिलेत अश्या टाईपची घाई करत आहेत ते दोघे. >>> हो ना. शेवटी आजीच जिन्कली. मानसीला तो form भरावाच लागला. मानसी कशी मोठया माणसान्चा आदर ठेवते, मोठया माणसान्चे ऐकते, ती कशी समजूतदार आहे, मोठया माणसान्चे मन मोडत नाही हे सगळे दाखवण्यासाठी हा सगळा खटाटोप.
बादवे, तो मानसीला पाहायला आलेला माणूस असा का विचारत होता, 'मुलीला नाचगाणे येत का?'
कुछ तो गडबड है.
विक्रांतसारखा तरूण मनुष्य,
विक्रांतसारखा तरूण मनुष्य, लग्नादिवशीच बायकोबद्दल असं कळलेलं, मग त्याची physical relationship विना तळमळ होत नसेल का? >>>> अश्या गोष्टी दाखवायला ती काय art सिरीयल आहे का?
लग्न करूनही लांब लांब रहायची ट्रेंड आहे मालिकांत.>>>> ह्या ट्रेंडची सुरुवात 'पवित्र रिश्ता' पासून सुरु झाली होती.
भारतात अशा गोष्टी दाखवायचं धाडस, तेही टीव्हीवर, किती निर्माते दिग्दर्शक करणार?>>>> हनिमून song मध्ये बोल्ड सिन्स मात्र दाखवतात. हे कसे चालते त्यान्ना?:अओ:
मोनिकाचा राग येण्याच्या ऐवजी
मोनिकाचा राग येण्याच्या ऐवजी त्या भागात मोनिकावर खरंच काळजीच्या नावाखाली अन्याय होतोय असे वाटत होते मला. तिच्या मैत्रीणी येण्याचा, त्यांच्या खाण्यापिण्याचा वगैरे खूप गहजब केला.>>> +१ गरोदर बाईला तिच्या कुटुम्बाने सदैव,प्रसन्न , आनन्दी ठेवावे हे कोणी विक्रान्तला शिकवल नाही वाटत. नुसत मला तुझ्या बाळाची काळजी आहे अस म्हटल की झाल का? खर तर अलका, गीता आणि इतर घरच्यान्नी मोनिका या दिवसात जास्तीत जास्त आनन्दी कशी राहील हे बघायला हव होत. अस जर केल असत तर मोनिकाला बाहेरच्या मैत्रिणीनीन्ची गरजच पडली नसती. मोनिकाला जर हे आवडत नसेल तर ती तिची चूक, घरच्यान्ची नाही. पण दळवी कुटुम्बाने मोनिकाचा आनन्द जपायलाच ह्वा, भलेही मोनिकाला आवडत नसेल तरिही. नुस्ती गर्भसन्सकाराची पुस्तके वाचून काय होणार आहे?
विक्रान्तचे सोल्युशन कैच्याकै आहे. मोनिका रोज hospital मध्ये दिवसभर बसून करणार तरी काय? तिला कु ठे तरी बाहेर फिरायला घेऊन जायचे ना?:अओ:
बाकी त्याचा तो passive smoking चा मुद्दा चुकीचा नव्हता. मोनिका तिच्या मैत्रिणीला नक्कीच थाम्बवु शकली असती. सो, ह्या बाबतीत चुक तिचीच आहे.
विक्रांतला पण मानसी आवडू
विक्रांतला पण मानसी आवडू लागली आहे वाटतं. तसं असेल तर विक्रांततरी कुठे धुतल्या तांदळासारखा आहे? एक जोडीदार प्रामाणिक नसेल तर दुसर्या जोडीदाराला बाहेर शेण खायची परवानगी कोणता कायदा देतो? >>>> ++++११११११
फार तर पोटात मुरडा धरल्यासारखे भाव असतात तीच काय ती कुचंबणा. त्याचीसुद्धा आणि प्रेक्षकांचीसुद्धा...:हहगलो:
>>>>>नंतर ती आगाऊ भोचक मानसी
>>>>>नंतर ती आगाऊ भोचक मानसी डायरेक्ट यांच्या बेडरूममध्ये घुसुन मोनिकाला अक्कल शिकवु लागली.. मी मोनिकाच्या जागी असते तर आधी मानसीच्या एक कानाखाली मारली असती. पांचट भोचक कुठची. ----
खरेच, भयंकर भोचक आहे. बहिणीच्या सासरी, बहिणीच्या नवर्याच्या हॉस्पिटलात, सगळीकडे मध्ये मध्ये. काय झालं तै, काय झालं विक्रांत? अरे माहिती आहे ना, काय प्रॉब्लेम आहे बहिणीत आणी नवर्यात. काही मदत त्याद्रुष्टीने तर करताना दिसत नाही. घरातल्या कुणालाच खटकत नाही का किती स्ट्रेस्फुल आहे मोनिका आणी विक्रांतचे रिलेश्न. ती प्रायोरिटीच नाही की ते रिलेशन सुधारावे. सारखं आपलं मोनिका बॅशिंग आणी मानसीपुजा.
विक्रान्त, मानसी आणि मोनिका
विक्रान्त, मानसी आणि मोनिका या तिघांच्या वाट्याचा अभिनय एकटी मोनिका करतेय.
अगदी अगदी भरत. expressions
अगदी अगदी भरत. expressions मधील सूक्षम बदलही लाजवाब.
Pages