मोबाईल वॉलेट/ इवॉलेट अनुभव, शंका निरसन

Submitted by अश्विनीमामी on 22 November, 2016 - 23:32

पेटिएम, स्टेट बँक बडी, पे झॅप आणि इतर मोबाईल कॅश वॅलेट उपलब्ध आहेत. आता हातात कॅश नाही पण रोजचे व्यवहार तर चालवायचे आहेत. आपण कोणी ही अ‍ॅप्स वापरता का? काय अनुभव तसेच नवीन वापर कर्त्यांचे शंका निरसन व्हावे ह्या साठी धागा प्रपंच.

मी अजून एक ही अ‍ॅप डाउ न लोड केलेले नाही. बिग बास्केट, व उबर आहे. त्याला हे चालते असे ऐकले
ओला मनी

सिट्रस वॅलेट , मोबि क्विक, एअर्टेल मनी, पेयू मनी, चिल्लर, ऑक्सिजन, वॉलेट हे पर्याय अ‍ॅड केले.

बिल पे हा पर्याय वापरून नेट बँकिन्ग द्वारा खालील बिले भरता येतील.
१) प्री व पोस्ट पेड टेलिफोन बिल्ल्स.
२) डीटीएच चा रीचार्ज
३) वीज बिले
४) इतर बँकांची क्रेडिट कार्ड ची पेमेंट
५ ) विम्याचे हप्ते.

अ‍ॅपस ची नावे धाग्यात मुद्दाम लिहीलेली नाहीत कारण एका दुसृया ब्रँडचे प्रमोशन नाही आहे. तर एकूण संकल्पनाच नवी आहे. खूप लोक्स धडपड करत आहेत त्यांना माहिती मिळावी. सिनीअर सिटिझन्स ना पण ह्याचा उपयोग होईल. कृपया आपल्या आईबाबांना ही कल्पना समजावून सांगा. व स्मार्ट फोन वर अ‍ॅप डाउनलोड करून द्या. त्यांचे रांगेत उभे राहणे वाचेल.
कमीत कमी १० रु. पासून तुम्ही हे इ पाकीट लोड करू शकता. व आपल्या घरच्यांना मित्र मैत्रिणींना पण ही सुविधा उपलब्ध करून देउ शकता. ( अ‍ॅड ऑन कार्ड सारखे. ) आधीच लोड केलेले प्री लोडेड असल्याने इथे तुम्ही लिमिट मध्ये असाल तर ट्रांझॅक्षन नाकारले जात नाही. सद्य परिस्थितीत आर बी आय ने इपाकिटाची लिमीट २०००० रु. केली आहे. व केवाय सी नोंदी करून हीच लिमिट एक लाख रुपये आहे. ह्यातून फार मोठ्या पर्चेसेस अभिप्रेत नाहीत तर रोजच्या जीवनातील ट्रँझाक्षन्स सोपी करणे हा उद्देश आहे.
तुम्ही म्हणजे ग्राहक २०००० रु लोड करू शकता. दुसृया बाजूला जो व्हेंडर आहे तो ५०. ००० रु. बँकेत भरू शकतो. छोट्या व्यापार्‍याला हे फायद्याचे आहे. ही परि स्थिती अजून सुधारण्यासाठी छोट्या व्यापारी वर्गाचे, सर्विस प्रोवायडरचे मत बदलणे गरजेचे आहे. नथिंग लाइक कोल्ड कॅश. ही सुरक्षिततेची भावना आमच्या पिढीत तरी होती पण आता पैसे बँकेत. व्यवहार मोबाईल वरून. खिसा रिक्कामा ही परिस्थिती कॉमन होत जाईल.

http://gadgets.ndtv.com/apps/news/demonetisation-rbi-doubles-monthly-lim...

http://economictimes.indiatimes.com/wealth/spend/facing-cash-crunch-afte...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://paytm.com/paytmwallet

https://www.wibmo.com/wdocs/downloadPayZapp/

https://www.sbi.co.in/portal/web/services/state-bank-buddy

इथे जास्त माहिती उपलब्ध आहे. पे टी एम चा पर्याय बरेच ठिकाणी चालतो. किराणा माल आटो व टॅक्सी ( काली पिली ) साठी चालतो. उबर किंवा ओला मध्ये आपण आपली पेमेंट ऑप्शन सिलेक्ट आधी करावी लागते. ती कार्ड सिलेक्ट केली तर ओटीपी देउन व्यवहार करता येतो.

ओला वापरत असाल तर ओला मनी बेस्ट आहे. ओला मनी अकाउंट मधे पैसे असतील तर राईड सुरू होताना - शेअर असेल तर - किंवा संपताना त्यातूनच पैसे कट होतात. हॅसल फ्री वाटलं मला तरी.

एकदा सिट्रस -Citrus - वापरलं होत ऑफीसमधे एका स्टॉल वर पेमेंट करण्यासाठी. अर्थात ते समोरच्याने इनिशिएट कराव लागतं आणि मग आपण आपलं डेबिट \ क्रेडिट कार्ड वापरू शकतो.

नाही रे बाबा, माझेच पैसे ४ टक्के इतका जिझीया देवून वापरावे अशी पाळी अजूनतरी माझ्यावर आली नाही.
आणि भविष्यातही न येवो.

नाही रे बाबा, माझेच पैसे ४ टक्के इतका जिझीया देवून वापरावे अशी पाळी अजूनतरी माझ्यावर आली नाही.
आणि भविष्यातही न येवो.
>> ओके. वी गेट इट. धन्यवाद.

पेटीएम टू बँक हे व्हेरिफाईड कस्टमर साठी १% आहे व नॉन व्हेरिफाईड साठी ४ टक्के आहे असे साईटवर वाचले.

१०० रू ची एक वस्तू मी विक्रेत्याकडून घेताना माझे आणि विक्रेत्याचे मिळून मिबाईल चार्जेस, पेटीएम चार्जेस आणि बँक ट्रान्सेक्शन चार्जेस असे सगळे मिळून किती पैसे खर्च होतात हे कुणी समजावून सांगेल का?

यामुळे - मला ती वस्तू काही टक्के महाग पडली
विक्रेत्याला ती काही टक्के तोट्यात पडली

हे झालेच पण आपल्याच देशाचे अधिकृत चलन अधिकृतपणे वापरण्याऐवजी आपण हे पैसे विनाठायी खर्च केल्याचे दु:ख आणि निराशा मला होईल.
म्हणजे मग चलन आणि त्याचा अधिकृतपणा यांचे मूल्य आपण आपल्या हाताने कमी करतोय.

असो.
नव्या अर्थक्रांतीसाठी सर्वांना शुभेच्छा!

डेबिट/ क्रेडीट कार्ड वापरणं की हे अ‍ॅप्स वापरणं जास्त सेफ आहे ? कोणीतरी नवा धागा काढेल का ह्या विषयावर ?

नाही रे बाबा, माझेच पैसे ४ टक्के इतका जिझीया देवून वापरावे अशी पाळी अजूनतरी माझ्यावर आली नाही.
आणि भविष्यातही न येवो.>>> सातीची ही पोस्ट मला समजली नाही. साती, संत्र सोल प्लिज!

श्री इथेच लिहा. मी पण अजून कार्ड पेमेंट टाइप पर्सनच आहे. अशी अ‍ॅप कधी वापरली नाहीत. पण आता त्याची गरज भासेल असे वाट्ते.

हे झालेच पण आपल्याच देशाचे अधिकृत चलन अधिकृतपणे वापरण्याऐवजी आपण हे पैसे विनाठायी खर्च केल्याचे दु:ख आणि निराशा मला होईल.> आपण अधिकृत चलनच वापरणार ह्या अ‍ॅप्स मध्ये. आपल्या बँकेतली कॅश खिशात कॅरी करण्या ऐवजी ती अ‍ॅप मध्ये लोड करायची. अनधिकृत चलन, खोट्या नोटांचा प्रसार ह्याला काही प्रमाणात पायबंद बसेल. शिवाय कॅश वापरायचा पर्याय आहेच. फ्रोम अ टेक्निकल
पॉइंट ऑफ व्यू हा फक्त अजून एक पर्याय आहे. क्रेडिट कार्ड मध्ये पण जास्तीची एक फी लागतेच
पर ट्रांजॅक्षन.

म्हणजे मग चलन आणि त्याचा अधिकृतपणा यांचे मूल्य आपण आपल्या हाताने कमी करतोय.>> नाही. माइंडसेट चेंज करायची गरज आहे. गोइंग फॉरवर्ड हे पर्याय जास्त वापरायला लागतील. मी स्वतः कमी कॅश. ( स्कॉलरशिप मनी) नोकरीतला पगार पाकिटातून मिळणे कॅश मध्ये, चेक मध्ये,
तसेच धंदा चालवताना रोख पैशाच्या उलाढाली, कॉर्पोरेट जीवनात पूर्ण पणे बँक ट्रानस्फर/ आर्टीजीएस,
एन ई एफ टी, कार्ड, अगदी चिल्ल रीचे व्यवहार हे सर्व प्रकार केलेले आहेत. लायनीत उभे राहोन वाट पाहून डीडीने पेमेंटे केलेली आहे. ( शाळा कॉलेजच्या फीज) ऑनलाइन पेमेंट हे त्यातलेच लॉजिकल प्रोग्रेशन आहे. त्यात भावना प्रधान होण्यासारखे काही नाही.

एक जुने उदाहरण आ मच्याकडे एक सुपारी साठी फ्लेवर घेणारा कस्टमर होता. त्याचा धंदा पानवाले व तत्सम दुकानांतस असल्याने पेमेंटे चिल्लर मध्ये मिळायची. त्यांच्या घरी अक्षरशः पोती भरून चिल्लर असे.
ती कशी डिस्पोज ऑफ करणार हा त्यांचा प्रश्न असे. साधे ६००० सात ह जार रुपयांचे पेमेंट चेक किंवा डीडी करतान त्यांना फार त्रास होई. अर्ली २०००स मधली कथा.

मंजूडी,
आपण मोबाईल रिचार करतो तेव्हा १०० रू वर १०० रू टॉकटाईम किती जण देतात?
बर्‍याचदा ११०/११५ मध्ये १०० रू टॉकटाईम मिळतो.
मी बॅकेतून १०० रु माझ्या वॅलेटात टाकले तर बँक टू वॅलेट, आणि मी टू बँक या व्यवहारातून माझ्याकडून जितका पैसा कट होईल तो सध्या ४टक्के आहे.

तसेच विकणार्‍याच्या वॅलेटात ते पैसे आले की त्याला तिथून ते बँकेत जातील तेव्हा आणि बँकेतून ते पैसे स्वतः वापरायला /इतरत्र ऑनलाईन पे करायला वापरेल तेव्हा काही रक्कम एक्स्ट्रा द्यावी लागते.

म्हणजे एकंदर मी चलनातले १०० रू बँकेत भरते तेव्हा त्या पैशातून१०० रू किंमतीची वस्तू विकत घ्यायला माझे खरेतर १०४ हून अधिक (बँक ट्रान्सेक्स्चन चार्जेस आणि मोबाईल चार्जेस(नगण्य असले तरी)) जातात.

मी एरवी माझे क्रेडीट कार्ड, भारताबाहेरून ऑन लाईन पेमेंट साठीच वापरत असे, यावेळी मात्र सटर फटर खरेदीसाठी वापरावे लागले. उलट आधी तूम्ही कार्ड ने पैसे घेता का, असे विचारूनच दुकानात शिरत असे.

ओला मनी मी वापरले. ( ते इतर काही ठिकाणीही चालते ) पण माझे ते पैसे मी भारतात परत येईपर्यंत तसेच राहणार !

ओके साती, आलं लक्षात तुला काय म्हणायचं आहे ते.

तुझ्या उदाहरणात रोख पैसे दिले तरी १०० रुपयांच्या टॉकटाईमला ११० रुपये द्यावे लागतात ना? की नाही?

अमा, ते वॉलेट कराल का प्लीज?

साती, सर्व व्यवहार रुपयांतच होणार आहेत फक्त नोटा आणि नाणी याऐवजी कार्डस किंवा इ-वॉलेट्स वापरात येतील. यात सोय, सुरक्षितता आणि पारदर्शकता असेल.

चार्जेस जसजशी स्पर्धा वाढेल तसे कमी होऊ शकतात. जसं मोबाईल कॉल्स करता सुरवातीला अवाच्या सवा पैसे भरावे लागत असत. इनकमिंग कॉलकरताही पैसे पडत. पुढे टेक्नॉलॉजी, स्पर्धा, वापरणार्‍यांची संख्या वाढल्याने चार्जेस कमी झाले. तसे.

मामी केला बदल. तुमचा प्रतिसाद हेड र मध्ये लावला तर चालेल का? पारदर्शकते बद्दलचे वाक्य?

मंजूडी,
तेच म्हणायचंय गं.
'मला १००रु त १०० रु चा टॉकटाईम नाही मिळत ११० द्यावे लागतात ' हे उदाहरण नाही; अ‍ॅनॉलॉजी आहे.

मामी बरोबर, शासनाला पारदर्शकता हवीय म्हणून किमान १० हजारापर्यंतचे व्यवहार फ्री ऑफ ट्रान्सेक्शन चार्जेस झाले आणि त्यावरच्या ट्रान्सेक्शननाही अत्यल्प चार्जेस लागले तर मी कंसिडर करेन हे ऑप्शन.

पण प्रश्न मूळात असा आहे की एकदा मी टॅक्स देऊन पैसे कमावले की नंतर मी ते कुठेकुठे खरच करत्येय याच्या पाऊलखूणा मला राहू द्यायच्या नाहीयेत.
Happy

पण जर हे उदाहरण म्हणून वापरायचं पाहिलं तर-

आयडिया वगैरेच्या १०० रू च्या रिचार्जात ८७ रू चा टॉक टाईम आहे.
हेच जर मी ऑनकाईन केले तर बँकिंग चार्जेस आणि आयडियाच्या साईटचे चार्जेस पकडून खरे १२२ रू जातात म्हणे.

म्हणजे १२२ रूत मला ८७ चा टॉक टाईम मिळतो.

आता हेच पेटीएम कडून भरायचेत तर ते तुमच्याकडून आणखी चार टक्के घेते.

आणि गंमत माहित्येय का, पेटी एम वापरायचे तर त्या वॅलेटात आपल्या बँकेतून काढून पैसे भरून ठेवावे लागतात
आपण वापरेपर्यंत ते पैसे पेटीएमचे असतात.
बँकेत ते असेपर्यंत आपल्याला व्याज मिळत होते. ते गेलेच.
पेटीएम ते आपल्याला देईपर्यंत स्वतः वापरून व्याज मिळवणार वर वॅलेट सुविधा दिल्याबद्दल आपल्यालाच चार टक्के चार्जेस लावणार.

जागो ग्राहक , जागो.

(ही माहिती बँकींग क्षेत्रातल्या एका अधिकार्‍याने दिली आहे. जल्ला कीडाच गेला ना डोचक्यात मांज्या!)

मी आत्ताच नवंनवं पेटीम आणि फ्री चार्ज एकेकदा वापरले आहे. मी माझ्या क्रेडिट कार्डानी ह्या ऍपच्या मार्फत पेमेंट केले. विक्रेते ओळखीचे नव्हते . मला दोन्ही ठिकाणी कॅशबॅक मिळाला. आता स्टेटमेंट आलं की कळेल एक्सत्रा पैसे लागले का ? आत्ता तरी transaction alert जेवढ्या किमतीची वस्तू होती तेवढ्याचाच आलाय. मी ऍपचा गेटवे वापरते अनोळखी विक्रेत्यासाठी, बघूया.

मी तरी माझी पोस्टपेड बिलं, रिलायन्स बिलं, रिचार्ज वगैरे पेटीएम ने देते.. बर्‍याच ऑफर्स असतात... पैसेहि परत येतात थोडे अकाउंट मध्ये. Happy पेटीएम वापरुन बरीच ऑनलाईन खरेदीहि केलीय.

राजसी , भावना, ओव्हरऑल अनुभव कसा आहे? सोपा? अवघड? कन्विनिअंट? वाइट? त्रासदायक?
ते लिहा.

४% फी ही १% इतकी कमी केली आहे असे कंपनीच्या ब्लॉग वर वाचले.

पेटीएम ते आपल्याला देईपर्यंत स्वतः वापरून व्याज मिळवणार वर वॅलेट सुविधा दिल्याबद्दल आपल्यालाच चार टक्के चार्जेस लावणार>> ते व्याज मिळवणार हे कोणत्या बॅक अधिकार्‍याने सांगितले? पेटीम चे कॅश फ्लो व प्रोफिट मार्जिन ची माहिती उपलब्ध नाही. ही कन्सेप्ट मोनेटाइज कशी होते त्याची मला कल्पना नाही. इंटरेस्ट इनकम असेल तर ते अदर इनकम मध्ये दाखवावे लागते बॅलन्स शीट मध्ये व त्यावर इनकम टॅक्स भरावा लागतो.

जागो ग्राहक , जागो.>> झोपा तश्याच उडालेल्या आहेत. Happy

मी वापरतोय सध्या पेटीएम. घरच्या सगळ्यांना पण शिकवले आहे. वडील पुर्वी मोबाईल वाल्या माणसाकडे जाऊन रिचार्ज करत असत, त्यांना नेटबँकिंग किचकट वाटते म्हणून, पण आता पेटीएम सोपे असल्या मुळे तुडुंब खुश आहेत.
सातींचा मुद्दा योग्य असला तरी जर घरबसल्या यूजर फ्रेंडली प्रकारे बिल भरणे, पैशाची देवघेव करणे, खरेदी करणे जर शक्य होत सरल तर लोक आनंदाने 4 टक्के द्यायला तयार होतील.
ज्यांना सोयींपेक्षा पैसे जाण्याचे जास्त दुःख आहे ते रोख वापरू शकतातच कि

>>>> आयडिया वगैरेच्या १०० रू च्या रिचार्जात ८७ रू चा टॉक टाईम आहे.
हेच जर मी ऑनकाईन केले तर बँकिंग चार्जेस आणि आयडियाच्या साईटचे चार्जेस पकडून खरे १२२ रू जातात म्हणे. <<<<
यातील "म्हणे" ला शून्य किंमत ! नेटबँकिंग सुरु झाल्यापासुन मी ऑनलाईन रिचार्ज करतोय, आयडिया अन बीएसेनेलचे, मला कधीही बँकिंग चार्जेस वगैरे धरुन १२२/- रुपये लागले नाहीयेत. उलट आयडिया अन बीएसएनेलचे फुल्ल टॉक टाईमचे रिचार्जही असतात. इतकेच नव्हे तर बीएसेनेल्सचा एक वर्षाचा डबल डाटा देखिल आत्ता घेतलाय, अतिशयच स्वःस्त पडतो. (आता "म्हणे" म्हणत यावर व्याजाचा किती तोटा होतो याची आकडेवारी देऊ नका... Proud मी "व्याजावर " जगणार्‍यातला नाहीये, मी मुद्दलावर जगतो ! Happy )

>>>> पण प्रश्न मूळात असा आहे की एकदा मी टॅक्स देऊन पैसे कमावले की नंतर मी ते कुठेकुठे खरच करत्येय याच्या पाऊलखूणा मला राहू द्यायच्या नाहीयेत. <<<< Lol
त्यात लपवण्यासारखे काय आहे? Uhoh

अन तसे करायचे तर तुम्हाला "वस्तुविनिमयाच्या " काळात जगावे लागेल.
कारण प्रत्येक व्यवहाराची नोंद व्हायलाच हवी/होतेच जर तुम्ही "पावती आवर्जुन घेतली असेल" तर, पावती घेत नसाल, तर तुम्ही "देशाचे (बीजेपी सर्कारचे नव्हे) नुकसान " करीत असता... Wink असो.

चीनमध्ये कशी व्यवस्था आहे तपासले पाहिजे, नै? Wink

[अवांतरः बा़की कोणती ही सेवा/सर्व्हीस/गोष्ट "फुक्कट्टातच हवी" ही मानसिकता भारतीयांमधे नजिकच्या पन्नास साठ वर्षातच निर्माण झाली आहे! ]

सोयींपेक्षा पैसे जाण्याचे जास्त दुःख आहे ते रोख वापरू शकतातच कि>>
मी पूर्वी जेव्हा प्रायवेट लिमिटेड कंपनी चालवत होते तेव्हा माझे तसेच होते. सर्व काही करवून घेत असे. बँकेत पैसे भरायला एम्प्लोई जात. फार मोठी कॅश असेल तर मी स्वतः भरत असे. सर्व बिले असिस्टंट नाहीतर वाहनचालक भरत असे, लंच तोच आणून देइ पेट्रोल तोच भरे. उरलेली चेंज ते परत आणून देत. खालीच वाण्याचे दुकान होते लिस्ट दिली की सामान गाडीत लोड करूनच ड्रायवर येइ. असली कामे डेलिगेटच केली जात. एकदम आरामाचे मेम साहेबी आयुष्य होते.

इथे मुंबईत सर्व अपना हाथ जगन्नाथ. व मुंबईची लाइफ स्टाइल हैद्राबाद सारखी फ्युडल नाही. नोकर लोक हाताशी नाहीत. कॅश पण इतकी लागत नाही. सर्व ऑनलाइन कारभार. काम पण असे हाय टेक आहे कि लिटरली पेन पण कमी वापरावे लागते. हाताने लिहिण्याची सवयच गेली आहे. नेफ्ट आर्टीजीएस, हे कामासाठी व कार्ड पेमेंट सर्वत्र. इतरत्र शॉपिन्ग सिनेमे प्रवास सबकुच्च. इतका १८० डिग्री चेंज मी अनुभवला आहे. आपले जीवन जसे बदलते तसे आर्थिक व्यवहार पण बदलत जातात. मला तर हे फार आवडते व सोपे वाटते. नो बॅगेज. आता ती बॅ़केत न्यायची ब्रीफकेस बंद करून कपाटात ठेवली आहे. Happy

ती जी चार % युजर फी आहे ती एक तर सुविधे साठी, त्यांचे इन्फ्रा स्ट्रकचर चालवण्या साठी व ती टेक्नॉलोजी रन करण्यासाठी असावी असे मला वाटते. आय टीतल्या लोकांनी प्रकाश पाडावा.

मुंबईत जगताना तरी टाइम इज सम टाइम्स मोअर इंपॉर्टंट दॅन मनी. तेव्हा अश्या सुविधा उपयोगी येतील. शिवाय पाकीट माराचे ही भय नाही. पर्स/फोन चोरीला गेला तरी पैसे जाणार नाहीत.

पेटीएम ची एवढी जाहिरात करताहेत म्हणजे त्यांचं इनकम असणारच. पण साती म्हणताहेत तसे वेगवेगळे चार्जेस जाणार असतील तर ही ट्रान्स्परन्सी काय कामाची?

पेटीएम ची एवढी जाहिरात करताहेत म्हणजे त्यांचं इनकम असणारच.>> अहो तो स्टा र्ट प अवस्थेतून पुढे गेलेला धंदाच आहे. इनकम असावेच लागेल. नाहीतर बुडेल. मपनी.

इंटरनेट बँकींग हा जास्त चांगला पर्याय नाहीये का पेटीएम पेक्षा?

तिथे जितक्यास तितकेच पैसे खर्च होतात असा अनुभव

अमा ओवरऑल अनुभव तर खुप चांगला आहे.. सोपं आहे अन एक्दम वापरायला. बस, एअर टिकेट वगैरे पेड करु शकतो.. माझा एक मित्र आहे त्यानेच मला हे वापरायला सांगितलं अगोदर नाहि वाटलं सोयिचं पण एकदा वापरल्यावर मला तर तिथुनच सारे व्यवहार करायला बरे वाटतात इव्हन ऑफिसमधलेहि सगळे बिलं वगैरे पेटिएम मधुनच भरु लागलेत.

Pages