मोबाईल वॉलेट/ इवॉलेट अनुभव, शंका निरसन

Submitted by अश्विनीमामी on 22 November, 2016 - 23:32

पेटिएम, स्टेट बँक बडी, पे झॅप आणि इतर मोबाईल कॅश वॅलेट उपलब्ध आहेत. आता हातात कॅश नाही पण रोजचे व्यवहार तर चालवायचे आहेत. आपण कोणी ही अ‍ॅप्स वापरता का? काय अनुभव तसेच नवीन वापर कर्त्यांचे शंका निरसन व्हावे ह्या साठी धागा प्रपंच.

मी अजून एक ही अ‍ॅप डाउ न लोड केलेले नाही. बिग बास्केट, व उबर आहे. त्याला हे चालते असे ऐकले
ओला मनी

सिट्रस वॅलेट , मोबि क्विक, एअर्टेल मनी, पेयू मनी, चिल्लर, ऑक्सिजन, वॉलेट हे पर्याय अ‍ॅड केले.

बिल पे हा पर्याय वापरून नेट बँकिन्ग द्वारा खालील बिले भरता येतील.
१) प्री व पोस्ट पेड टेलिफोन बिल्ल्स.
२) डीटीएच चा रीचार्ज
३) वीज बिले
४) इतर बँकांची क्रेडिट कार्ड ची पेमेंट
५ ) विम्याचे हप्ते.

अ‍ॅपस ची नावे धाग्यात मुद्दाम लिहीलेली नाहीत कारण एका दुसृया ब्रँडचे प्रमोशन नाही आहे. तर एकूण संकल्पनाच नवी आहे. खूप लोक्स धडपड करत आहेत त्यांना माहिती मिळावी. सिनीअर सिटिझन्स ना पण ह्याचा उपयोग होईल. कृपया आपल्या आईबाबांना ही कल्पना समजावून सांगा. व स्मार्ट फोन वर अ‍ॅप डाउनलोड करून द्या. त्यांचे रांगेत उभे राहणे वाचेल.
कमीत कमी १० रु. पासून तुम्ही हे इ पाकीट लोड करू शकता. व आपल्या घरच्यांना मित्र मैत्रिणींना पण ही सुविधा उपलब्ध करून देउ शकता. ( अ‍ॅड ऑन कार्ड सारखे. ) आधीच लोड केलेले प्री लोडेड असल्याने इथे तुम्ही लिमिट मध्ये असाल तर ट्रांझॅक्षन नाकारले जात नाही. सद्य परिस्थितीत आर बी आय ने इपाकिटाची लिमीट २०००० रु. केली आहे. व केवाय सी नोंदी करून हीच लिमिट एक लाख रुपये आहे. ह्यातून फार मोठ्या पर्चेसेस अभिप्रेत नाहीत तर रोजच्या जीवनातील ट्रँझाक्षन्स सोपी करणे हा उद्देश आहे.
तुम्ही म्हणजे ग्राहक २०००० रु लोड करू शकता. दुसृया बाजूला जो व्हेंडर आहे तो ५०. ००० रु. बँकेत भरू शकतो. छोट्या व्यापार्‍याला हे फायद्याचे आहे. ही परि स्थिती अजून सुधारण्यासाठी छोट्या व्यापारी वर्गाचे, सर्विस प्रोवायडरचे मत बदलणे गरजेचे आहे. नथिंग लाइक कोल्ड कॅश. ही सुरक्षिततेची भावना आमच्या पिढीत तरी होती पण आता पैसे बँकेत. व्यवहार मोबाईल वरून. खिसा रिक्कामा ही परिस्थिती कॉमन होत जाईल.

http://gadgets.ndtv.com/apps/news/demonetisation-rbi-doubles-monthly-lim...

http://economictimes.indiatimes.com/wealth/spend/facing-cash-crunch-afte...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री...

पेटीएम विषयी पण कोणी लिहा राव.>>>
पेटीएम भारतातिल पेपाल आहे. principal सारखेच आहे. implementation थोडे वेगळे आहे.

आपण जेव्हा क्रेडीट कार्ड वापरतो आणि ते जेव्हा हॅक होते तेव्हा क्रेडिट लिमिट पर्यन्त चोरी होउ शकते. डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकींग मध्ये बॅकेतले पुर्ण पैसे जाउ शकतात. वॅलेट मध्ये मात्र जेवढे पैसे आहेत तेवढेच जातात (हॅक झाले तर) . वॅलेट मध्ये तुमचा क्रेडिट कार्ड/ बॅक डिटेल्स एकाच माणसाला माहिती असतात. क्रेडिट-डेबिट कार्ड मध्ये ते सगळ्याना माहिती होतात.

विक्रेत्यांना हा अधिकचा भार द्यावा लागतो. मग ते भरून काढण्यासाठी किमती वाढतात त्या खरेदीकरणारी व्यक्ती भरते.

विक्रेत्यांना हा अधिकचा भार द्यावा लागतो. मग ते भरून काढण्यासाठी किमती वाढतात त्या खरेदीकरणारी व्यक्ती भरते---- अजून तरी ऍपस्पेसिफिक किमती वाचनात आलेल्या नाहीत. जर किमती वाढवल्यातर लोक कमी किमतीचा पर्याय निवडतील. शहाणे विक्रेते किमती वाढू देणार नाहीत.

मी पण आत्तापर्यंत वीज बील, टेलीफोन बील आणि मोबाईल रिचार्ज, प्लिफकार्ट, अमझॉन साठी इंटरनेट बँकीग वापरत होतोच पण पेटीएम जास्त सुटसुटीत आहे. खासकरून छोट्या रकमांसाठी इंटरनेट बँकींगचे सगळे सोपस्कार करण्यापेक्षा पटदिशी ट्रँझॅक्शन करता येते.

परवा, एका कॉफी शॉपमध्ये गेलो होतो, मित्र मित्र. खाणेपिणे धरून १५० रु बील झाले. पेटीएम सुरु केले, तिथल्या कार्डवर मोबाईल धरला, स्कॅन केला आणि दुसऱ्या मिनिटाला दुकानदाराला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला.

इथे इंटरनेट बँकींग वापरायचा विचारही करू शकलो नसतो.

विक्रेत्यांना हा अधिकचा भार द्यावा लागतो. मग ते भरून काढण्यासाठी किमती वाढतात त्या खरेदीकरणारी व्यक्ती भरते>> हो, म्हणूनच आता पेटीएमने फेब्रुवारीपासून ती आकारणी बंद केली आहे http://economictimes.indiatimes.com/small-biz/startups/paytm-scraps-tran...

पेटीएमने बिल्स भरताना, उबर ला पैसे देताना, मोबाईल बॅलन्स टॉप अप करताना कधीही जास्तीचे पैसे द्यावे लागलेले नाहीत अजूनपर्यंत तरी. मुळात जेवढे लागतील तेवढे मोजके पैसेच पेटीएममधे मी ठेवते (सहसा उबरच्या माझ्या नेहेमीच्या दोन राईड्स इतके). कारण माझं वापरणं फारसं नसतं. उगाच बॅलन्स भरून ठेवून का बरं त्या कंपनीला पैसे वापरायला द्यायचे?

I reached home and managed to download app. Transferred 2.5k from credit card. All otp based. I just have one electrical bill to pay. Especially for people of my generation who have always stood in lines to pay bills. This feels good. The idea is to keep just enough money in the app. My bill is say 1850.inr. how much interest will they earn o the balance. Uske bachche khayenge . I don't mind.

Thus the crux of the Model is “X% commission on the total sale value given to the seller for a particular product”

This sale can happen via any channel as given and approved by PayTM listed below & For all the orders sold by PayTM for every seller on their platform PayTM will charge a percentage (%) cut on the total sale amount pre-tax.

Sale via Website
Sale via Mobile Website
Sale via Mobile App (Android or iOS or others)
Sale Via Affiliate networks (Bloggers, Coupon Websites, Review Websites etc)

The percentage of commission that PayTM charges varies on the category of product that PayTM is able to sell. It ranges anywhere between 0% to 20% of the sale value (excluding taxes and discounts). The following image will show you how the receipts of PayTM will look like once the sale is recorded in PayTM’s books of accounts:

<<

http://unicornomy.com/paytm-business-model/ इथून

(संपादन : चित्र दिसत नव्हतं ते टाकलं. आकडे बारीक असल्याने विड्थ टॅग टाकलेला नाही.)

वॉलेट मधे पैसे डेबीट कार्ड मार्फत टाकताना सेव्ह डेबिट कार्ड डिटेल चा पर्याय बाय डिफॉल्ट टिक दिसतो त्याचे काय करायचे? सेफ आहे का?

सेव्ह डेबिट कार्ड डिटेल चा पर्याय बाय डिफॉल्ट टिक दिसतो त्याचे काय करायचे? सेफ आहे का?>>>> आपल्या सेफ्टीसाठी टिक करु नका.

काका,
पर्फेक्ट. बरं झालं दिलंत ते. हेच शोधणार होते.
जर भाजीवाले / मासेवाल्यांना पेटीएम वापरायला सांगत असतील कोणी तर हा विचार केला पाहिजे.
पण इथे ग्राहकांना ते वापरणं किती सोपं नी किती त्रासदायक हा विषय आहे त्यामुळे ही माहिती इथे नको होती Wink

मी फ्रीचार्ज वापरतो. मोबाईल रिचार्जसाठी ऐनवेळी टपरी शोधण्यापेक्षा बरं पडतं.

प्रत्येक व्हेंडरच्या पहिल्या ट्रँजॅक्शनला कॅशबॅक वगैरे मिळतात, त्यानंतर फद्याचं काय मिळत नाही.

*
@ सोनू.

पण इथे ग्राहकांना ते वापरणं किती सोपं नी किती त्रासदायक हा विषय आहे त्यामुळे ही माहिती इथे नको होती
<<

मी ग्राहक नसून व्हेंडर आहे. त्यामुळे मला दोन्ही साईडचा विचार करावा लागतो. या उपद्व्यापामुळे माझी ई-सेल प्राईज कॅसप्राईजच्या तुलनेत वर जाते. कोणताच बेपारी खिशातून टॅक्सचा खर्च करीत नाही.

अश्विनीमामी,

उत्तम धागा! अभिनंदन व धन्यवाद! माहिती मिळत आहे, वाचत आहे. अजून पेटीएम वापरायची वेळ / संधी आलेली नाही. कदाचित लवकरच रजिस्टर्ड होईन.

नुसत्या 'मामी'

सोय, सुरक्षितता आणि पारदर्शकता ह्या काही सदस्यांसाठी नगण्य बाबी आहेत.

============

कोणतेही मार्केट डिमांड सप्लाय गॅप ह्या एकाच तत्वावर चालते. विशेशतः कमोडिटी मार्केट!

नोटाबंदीमुळे क्षणातच 'कॅशलेस पेमेंट्स' ही कमोडिटी झालेली आहे. ती पुरवणारे (ग्राहकांसाठी) आणि वापरणारे (व्यावसायिक) ह्यांच्या संख्येत सडनली प्रचंड वाढ झालेली आहे. ही कन्फ्युझिंग स्टेट आहे, तरीही ग्राहकाला अधिकाधिक वेठीस धरण्याची मानसिकता सुदैवाने येथे नसल्यामुळे अश्या प्रोव्हायडर्सकडून पिळवणूक न होता कपॅसिटी एन्हॅन्समेन्ट होत आहे. आनंदाने स्वागत केले जात आहे ह्या बदलाचे!

नीट बघितले तर एखादा पैसा जास्त जाईल, पण त्या बदल्यात:

१. माणसाचे इतर काही ऑपरेटिंग एक्स्पेन्सेस वाचतील.
२. प्रत्यक्षात नोटांचा वापर न झाल्याने 'डोन्ट अंडरएस्टिमेट गोलू'वाले जमीनीवर येतील.
३. फेक नोटांचा वापर करण्याचे प्रमाण घटत जाईल.
४. अकांऊंटॅबिलिटी वाढल्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल.

कोणत्याही बदलाला विरोध होतोच हे तत्व जरी प्रत्येकाला पूर्वीपासूनच माहीत असले तरीही ह्या बदलाला होणारा विरोध हा एकतर राजकीय किंवा 'सहन होत नाही, सांगता येत नाही' स्वरुपातला आहे. (विरोधक किंवा काळा पैसावाले)

आशूचँप, राजसी ह्यांनी दिलेले प्रतिसाद आवडले.

ही सुविधा सगळ्यांना उपलब्ध नाही. पण त्यामुळे येणारे प्रॉब्लेम्स हे प्रॉब्लेम्स आहेत असे म्हणण्यापेक्षा ही सुविधा सगळ्यांना उपलब्ध नाही हा प्रॉब्लेम आहे हे अ‍ॅड्रेस होण्याची ही वेळ आहे.

खूप मोठया प्रश्नाला हात घातला गेलेला आहे.

ग्राहकाला अधिकाधिक वेठीस धरण्याची मानसिकता सुदैवाने येथे नसल्यामुळे अश्या प्रोव्हायडर्सकडून पिळवणूक न होता कपॅसिटी एन्हॅन्समेन्ट होत आहे.

<<

याच्याशी असहमत. ग्राहकाला अधिकाधिक कसे फसवता वा पिळता येईल याचीच काळ्जी घेणारे जास्त दिसलेत आजपर्यंत तरी.

>>
आनंदाने स्वागत केले जात आहे ह्या बदलाचे!
<<
हे वैयक्तिक इंटरप्रिटेशन दिसते. आमचे निरिक्षण वेगळे आहे Happy

१. इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा आल्यामुळे खरेदीत वाढ होईल का? विशेषतः भारतासारख्या व्यवस्थेत.
२. इ-व्यवहारांमुळे बँकेतील रिटेल व्यवहार कमी होतील (म्हणजे काउन्टरवर जाऊन व्यवहार करणे). हे व्यवहार आधुनिक बँकिंगमध्ये मूल्य न वाढवणारे व्यवहार आहेत (नॉनवॅल्यु अ‍ॅडिंग). हा नक्कीच फायद्याचा मुद्दा आहे (बँक कर्मचारी सोडल्यास).
३. इबँकिंगमुळे व्यापारी वर्गास, जिथे सर्वात जास्त रोखीचा धंदा होतो, व्यवहार सुलभ होतील का? रोख बाळगायची व सांभाळायची गरज कमी होईल, अकाउंट ठेवणे सोपे होईल. याची दुसरी बाजू म्हणजे सगळे अकाउंट व्हाइट होतील जो व्यापार्‍यांना तोटा वाटू शकतो
४. खालच्या (रिटेल) पातळीवरची लाचखोरी कमी होईल का? - हे दिवास्वप्न असू शकते. मला स्वतःला लाचखोरी दोन कारणांमुळे आहे असे वाटते. पहिले म्हणजे संसाधनांची उपलब्धता (म्हणजे वीज, पाणी, रस्ता, जमीन) व मागणी यातील तफावत. त्यामुळे संसाधनांच्या रेग्युलेशनचे काम ज्यांच्याकडे (म्हणजे सरकारी कर्मचार्‍यांकडे) असते ते लाच मागू शकतात. दुसरे कारण भारतीय जनता जात्याच लाचखोर आहे. हे विधान कलोनियल मानसिकतेतून आले आहे असे वाटू शकते मात्र जसे जपानी कष्टी, ब्रिट मुत्सद्दी, जर्मन हाय क्वालिटी तसे भारतीय उपखंडातील लोक जात्याच लूपहोल शोधून नियम वाकवणारे आहेत का?

स्कँडिनेवियन देशातून (जी कल्याणकारी समाजवादी अर्थव्यवस्थेची आदर्श राष्ट्रे आहेत असे म्हणता येईल) आता जवळपास कागदी चलन संपल्यात जमा आहे. युरोपात नवीन पिढी जवळपास सर्व व्यवहार कार्डाने करताना दिसते, म्हातारी लोकं अज्जून सुपरमार्केटातसुद्धा चेक देतात. इथे अमेरिकेत मी तुलनेने 'रुरल' भागातूनच जास्त राहिलो आहे. मी ज्या रस्त्यांवरून कामासाठी फिरतो त्यातले अनेक गावे फारतर १०००भर वस्तीची व जवळच्या कुठल्याही शहरापासून (लोकसंख्या ५००००+) २००/२५० मैलांवर तरी आहेत अश्या सर्व ठिकाणी केवळ कार्डानेच व्यवहार केले आहेत. कित्येक महिने पाकिटात कॅश नसते. अर्थात हे घडण्यासाठी उपलब्ध इन्फ्रा इथे आहे.

मी केलेल्या सर्व व्यवहाराचे मला कॅशबॅक मिळाले. माझा जेवढा पैसा जाणार होता तेवढाच गेला आणि १८% क्रेडिट.मी तरी मला फायदा आहे तोवरच ह्या सगळ्या ऍपवर राहणार. फायदा नसेल तर कोण मगजमारी करेल. खूप सारे ऍप आहेत आणि सगळे मला डिस्काउंट द्यायला तयार आहेत, हा नाहीतर तो . पेटीएम काय माझा काका नाही का फ्रीचार्ज माझा मामा नाही Happy हे ऍपवाल्यांने चॅरिटी सुरु केलेली नाही हे मला कळते.

टण्या,

इथल्या तुलनेने रूरल भागात मी राहतो.

एक अनुभव सांगतो. ३ वर्ष जुना आहे. फ्रीज विकत घ्यायचा होता. गावातल्या प्रतिष्ठित एजन्सीकडे गेलो. सौ. सोबत होत्या. गोदरेजचा एक आवडला. खिशात कॅश ३-४ हजार होती. कार्ड होते.

काउंटरवर कार्ड स्वाईप करण्याचे मशीन होते.

म्हटलं साहेब, कार्ड स्वाईप करून टाका. नाहीतर घरी जाऊन कुणाच्यातरी हाती पैसे पाठवावे लागतील.

त्यांनी सांगितलं, "२% एक्स्ट्रा लागतील" बँक मला मशिन वापरायचे चार्जेस लावते.

हे मशिन का आणलं? असे विचारता, त्याशिवाय कंपनी एजन्सी देत नाही म्हणाले.

आता २० हजारावर २% म्हणजे कारण नसता ४०० रुपये खर्च करणे जिवावर आले. घरी जाऊन कॅश पाठवायला पेट्रोलचा खर्च ४ रुपये आला असता..

*

रेमंड्च्या रिटेल आऊटलेटमधे, लोकल मेड कपडे विकून, रेमंडच्या सॉफ्टवेअरात घोळ करून पावती त्यांच्याच कंपनीची छापून देणारा लोकल सिंधी मला ठाऊक आहे Wink अ‍ॅक्चुअली सॉफ्टवेअरमधे घोळ नाहिये. दोन काँप्युटर आहेत. सेम स्टेशनरी छापून घेतलेली आहे. Lol

जौद्या. अरेबियन नाईट्सच्या सुरसकथा भरपूर आहेत.

झाडू, तुमच्या पहिल्या अनुभवात जर हे चार्जेस कमी झाले (से ०.५%) किंवा कार्डामुळे खरेदीत वाढ होत आहे असे लक्षात आले तर व्यापारी कार्डं घेतील का?
माझ्या सख्ख्या बहिणीचे इमिटेशन दागिन्यांचे दुकान आहे. तिच्या सासरी पिढिजात धंदासुद्धा शिवणयंत्रे व होम अ‍ॅप्लायन्सची दुकाने हाच आहे. त्यात मेव्हण्याने वाढवलेल्या इतर काही एजन्सी आहेत. तुमच्यासारखेच तुलनेने रुरल / तालुकाच्या ठिकाणी आहे. आनंदाने पेटिम, इ-कार्डावर धंदा करत आहेत. ते संघिष्ट वा मोदीसर्मर्थक नाहीत. कॅश बाळगण्याचे एक मुख्य कारण सरकारी गिधाडे हेच आहे.

दुसरा अनुभव हा लबाडीचा आहे. सॉफ्टवेअर भक्कम करत जाणे आणि लबाडांनी त्यात लूपहोल काढणे हा खेळ चालूच राहणार. मात्र फक्त कॅशच्या व्यवहारापेक्षा कार्ड/इ-बँकिंग व्यवहारात लबाडी/ब्लॅक कमी होईल हे तरी पटते का?

मी नेदरलँडमध्ये असताना एका पाकिस्तानी हाटेलात जेवायला जायचो. मी राहायचो त्या भागात हे एकच भारतीय जेवणाचे हाटेल होते. त्या मालकाशी ओळख झाल्यावर तो एकदा मला म्हणाला की बिलिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करून देशील का? ही प्रवृत्ती! त्याच्या सांगण्यानुसार नेदरलँडमध्ये सर्व रिटेल आउटलेट्सना सरकारने प्रमाणित केलेले सॉफ्टवेअर वापरावे लागते व त्यात बिलिंग होत असल्याने या पठ्ठ्याला दोन नंबरचा धंदा करता येत नसे.

एक प्रचंड पैसे खाणारा सरकारी अधिकारी असतो. त्याचे वरिष्ठ कंटाळून त्याची अनेक ठिकाणी बदली करतात, अगदी रद्दड ठिकाणी सुद्धा. पण हा पैसे खाण्याचे मार्ग शोधून काढतोच. मग शेवटी त्याची बदली कोकणात एका गावात करतात व काम देतात लाटा मोजायचे. रोज लाटा मोजून त्याची नोंद ठेवायची एव्हडेच काम. हेतू हा की यात कोणाचेच काम अडत नसल्याने त्याला लाच मिळणार नाही.
हा पठ्ठ्या पहिल्या दिवशी किनार्‍यावर खुर्ची टाकून बसला. संध्याकाळी मछ्छीमार होड्या समुद्रात घालू लागले. याने जाऊन थांबवले. मछ्छीमार म्हणाले काय झालं साहेब. हा म्हणाला तुम्ही होड्या समुद्रात घालू शकत नाही. त्यामुळे लाटा फुटतात व मोजण्यात अडचण येते. म्हणजे सरकारी कामात अडचण आली.
रेस्ट इज हिस्टरी!

सो पैसे खाणे व लबाडी राहणारच. जेव्हडी व्यवहारात पारदर्शकता येईल व संसाधनांवरचा ताण कमी होइल तितकी पैसे खाणे संधी खालच्या लेवलवर कमी होत जाईल.

टण्या,

काळा पैसा, लाचखोरी यांची मलाही चीड, वैताग आहे. लाच मागत येणारे स.नो., विनाकारण मला नाही नाही त्या 'शास्त्या' लावणारे सरकारी विभाग

(मला आजच एल्बीटी वाल्यांची नोटीस आली. एल्बीटी कधीच कॅन्सल झालाय. त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही व नव्हता, कारण मी काहीच विकत घेऊन, विकत नाही. तरी शॉपॅक्ट लायसन्स असल्याने मला एल्बीटी लायसन्स काढावे लागले. त्याची २-५ हजार फी दर वर्षी ३ वर्षे भरली. "निरंक" व्यवहाराचे कागद भरून दिले. तर आजची नोटीस तुम्ही उरलेल्या ३ महिन्यांचे निरंक रिपोर्ट भरले नाहीत, त्याबद्दल ५००० रुपये "शास्ती" तुम्हाला लावलेली आहे, अशी आली आहे! हाऊ नाईस ऑफ देम?)

या कुत्र्यांशी लढण्यात माझी भरपूर एनर्जी वाया जाते.

मी इतरत्र लिहिले आहे.

या कुत्र्यांपासून मला मुक्ती मिळवून दिली, व टॅक्सेशन टॉलरेबल लिमिटमधे आणून बदल्यात मला नागरी सुविधा दिल्या, तर मला आनंदच आहे.

हे होणारे का?

की हा देखिल जुमलाच?

पेटीएमने पैसे ट्रान्सफर करायला समोरच्याकडे सुद्धा ते हवे का?
आता मी ऑफिसातून येताना बिकानेरमधून दहीवडे आणि मंच्युरीअन नूडल्स घेऊन आलो. त्याचे जे सव्वाशे रुपये झाले ते मी पेटीएमने भरायचे म्हटल्यास त्या बिकानेरवाल्याकडे सुद्धा पेटीएम असणे गरजेचे का?
आणि या व्यवहारात मला त्या सव्वाशेपेक्षा जास्त भुर्दंड पडणार का?
मग सव्वाशे रुपये रोख का देऊ नयेत?
किंवा मी माझे कार्ड का स्वाईप करू नये? खरे तर मी तेच केले आताही.

बाकी मी ऑफिसचा वेळ (ज्याचा मला पगार किंवा ओवरटाईम मिळतो) आणि ऑफिसचा ईंटरनेट, ज्याचे बिल ऑफिसच भरते, ते वापरून खालील गोष्टींची बिले भरतो,
माझे आणि गर्लफ्रेंडचे मोबाईल बिल, ईंटरनेट बिल, इन्शुरन्स प्रिमिअम, लाईट बिल, गॅस बिल, टाटा स्काय (दोन अकांऊंट) ईत्यादी..
आणि हे सारे एकाच दिवशी एकापाठोपाठ एक धनाधन भरतो. यापेक्षा सुलभ आहे का हे?

फक्त आता दोनचार दिवसांत माझा रेल्वेपास संपणार आहे, तो कसा काढायचा हे शोधायचे आहे. या मोबाईल वॉलेट पद्धतीने काढता येईल का? आणि कसा? एक्स्ट्रा पैसे जाणार असतील तर नको, तसेही पास लाईन न लावता जाताजाताच काढता येतो दोन मिनिटात. फक्त सध्या सुट्ट्यांचा (रजा नाही चिल्लर) प्रॉब्लेम आहे ईतकेच.

मिळाले तर फायदे घयायचे आणि नाही मिळाले तर त्यांना कुत्रे म्हणायचे.

अशी भूमिका असली तर 'हे होणारे का' हे विचारण्याचा नैतिक अधिकार नेमका कोणी दिला?

पेटिएमचे बॅंक ट्रांसफर करता लागणारे १% चार्जेस जास्त आहेत, माझ्या मते. भविष्यात ०% व्हायची शक्यता जास्त आहे. नाॅन-केवाय्सी चे ४% चार्जेस हा मूट पाॅइंट आहे. लोकांकडे एव्हढा तरी काॅमन (फिस्कल) सेंस असणं आवश्यक आहे... Happy

सोनू. | 23 November, 2016 - 17:35
इथे वाचा :

https://paytm.com/terms

SEMI CLOSED WALLET
४ - Wallet Charges & Validity

Wallet to Bank transfer - KYC customer - 1%
Wallet to Bank transfer - Basic Customer - 4%
>>>

याच पानावर
Terms & Conditions for KYC offer
Valid only for Delhi & Mumbai users
हे सुद्धा आहे... Uhoh

एमने भरायचे म्हटल्यास त्या बिकानेरवाल्याकडे सुद्धा पेटीएम असणे गरजेचे का----- हो

माझे आणि गर्लफ्रेंडचे मोबाईल बिल, ईंटरनेट बिल, इन्शुरन्स प्रिमिअम, लाईट बिल, गॅस बिल, टाटा स्काय (दोन अकांऊंट) ईत्यादी..
आणि हे सारे एकाच दिवशी एकापाठोपाठ एक धनाधन भरतो. यापेक्षा सुलभ आहे का हे?--- सेमच. कॅशबॅक मिळत नाही नेटबँकिंग वापरलं तर. क्रेडिट कार्ड मध्ये रिवार्ड पॉईंट जमा होतात.

माझा रेल्वेपास संपणार आहे, तो कसा काढायचा हे शोधायचे आहे. या मोबाईल वॉलेट पद्धतीने काढता येईल का? आणि कसा? एक्स्ट्रा पैसे जाणार असतील तर नको, तसेही पास लाईन न लावता जाताजाताच काढता येतो दोन मिनिटात. फक्त सध्या सुट्ट्यांचा (रजा नाही चिल्लर) प्रॉब्लेम आहे ---- पास irctc वर ऑनलाईन मिळतो ना. कोणते वालेट डील देताय बघा.

पास irctc वर ऑनलाईन मिळतो ना. > हो त्यादिवशी हे कोणतरी बोललेले खरे, ओके चेक करतो लगेच. धन्यवाद

मी पॉकेट्स ऍप डाउनलोड केले आत्ताच. It doesn't start at simple tap. Mpin सेट करायला लावतं. मला हे सिक्युरिटी measure फार आवडले. त्यांच्याकडे मी वापरते त्या वेन्डोर्स चे डिअल्स आहेत. पेटीएम आणि फ्रीचार्ज टॅप करून सुरु होतात. जर तुम्ही अकाउंट होल्डर असला तर तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड जोडायचा पर्याय आहे. २०००रु ची लिमिट आहे. पण मला नक्की कळालं नाही की for one vendor one time or how. Wallet मध्ये पैसे ठेवून व्याज घालवायची गरज नाही.

चांगली माहिती मिळालिये.. Happy

>>> Wallet मध्ये पैसे ठेवून व्याज घालवायची गरज नाही. <<<

पण वरील मुद्दा असाही बघा की एरवीही माझ्या शर्टप्यान्टीच्या पॉकेटमधे हजार दोन हजार रुपये रोख असतील तर माझे व्याज बुडतच अस्ते की.... का खिशातल्या खिशात चलन्/नोटा उबवल्या जाऊन नोटांची व्याजाची जास्तीची पिल्ले बाहेर पडतात? Proud
त्यामुळे या अतिव्यावहारिक आक्षेपाला तितकासा अर्थ नाहीये.

१% फी बाबतही तसेच.... हॉटेलमधे नियम नसतानाही १०% पर्यंत टीप आरामात देतात केवळ तिथल्या देखाव्याला/झगमगाटाला भुलुन, मग जिथे सोय झाली तर १% द्यायला काय हरकत आहे? अन व्यवहार वाढले तर हे कमिशनही कमी होईलच की...!

पण काये ना, साधे चौकातल्या भिकार्‍याला दान म्हणून काही द्यावेसे वाटले, तर स्वतःस दान देण्यापासुन, व्यावहारिक विचाराद्वारे परावृत्त करणारे, मग खिशात चिल्लर नाही इथपासुन ते तो भिकारी व त्याचे इतर चौकातिल कुटुंबिय दिवसभरात किती कमावित असतील याचा हिशेब घालित (व आपल्या पेक्षा त्याचे दैनिक्/मासिक्/वार्षिक उत्पन्न बरेच जास्त आहे असे भासले तर उगाचच उसासत Wink ) दान देऊन टाकायची त्यागाची "उबळ" आवरतात. अशांना १ % फारच आभाळकोसळू वाटला तर नवल नाहीये हो! Wink

Pages