मोबाईल वॉलेट/ इवॉलेट अनुभव, शंका निरसन

Submitted by अश्विनीमामी on 22 November, 2016 - 23:32

पेटिएम, स्टेट बँक बडी, पे झॅप आणि इतर मोबाईल कॅश वॅलेट उपलब्ध आहेत. आता हातात कॅश नाही पण रोजचे व्यवहार तर चालवायचे आहेत. आपण कोणी ही अ‍ॅप्स वापरता का? काय अनुभव तसेच नवीन वापर कर्त्यांचे शंका निरसन व्हावे ह्या साठी धागा प्रपंच.

मी अजून एक ही अ‍ॅप डाउ न लोड केलेले नाही. बिग बास्केट, व उबर आहे. त्याला हे चालते असे ऐकले
ओला मनी

सिट्रस वॅलेट , मोबि क्विक, एअर्टेल मनी, पेयू मनी, चिल्लर, ऑक्सिजन, वॉलेट हे पर्याय अ‍ॅड केले.

बिल पे हा पर्याय वापरून नेट बँकिन्ग द्वारा खालील बिले भरता येतील.
१) प्री व पोस्ट पेड टेलिफोन बिल्ल्स.
२) डीटीएच चा रीचार्ज
३) वीज बिले
४) इतर बँकांची क्रेडिट कार्ड ची पेमेंट
५ ) विम्याचे हप्ते.

अ‍ॅपस ची नावे धाग्यात मुद्दाम लिहीलेली नाहीत कारण एका दुसृया ब्रँडचे प्रमोशन नाही आहे. तर एकूण संकल्पनाच नवी आहे. खूप लोक्स धडपड करत आहेत त्यांना माहिती मिळावी. सिनीअर सिटिझन्स ना पण ह्याचा उपयोग होईल. कृपया आपल्या आईबाबांना ही कल्पना समजावून सांगा. व स्मार्ट फोन वर अ‍ॅप डाउनलोड करून द्या. त्यांचे रांगेत उभे राहणे वाचेल.
कमीत कमी १० रु. पासून तुम्ही हे इ पाकीट लोड करू शकता. व आपल्या घरच्यांना मित्र मैत्रिणींना पण ही सुविधा उपलब्ध करून देउ शकता. ( अ‍ॅड ऑन कार्ड सारखे. ) आधीच लोड केलेले प्री लोडेड असल्याने इथे तुम्ही लिमिट मध्ये असाल तर ट्रांझॅक्षन नाकारले जात नाही. सद्य परिस्थितीत आर बी आय ने इपाकिटाची लिमीट २०००० रु. केली आहे. व केवाय सी नोंदी करून हीच लिमिट एक लाख रुपये आहे. ह्यातून फार मोठ्या पर्चेसेस अभिप्रेत नाहीत तर रोजच्या जीवनातील ट्रँझाक्षन्स सोपी करणे हा उद्देश आहे.
तुम्ही म्हणजे ग्राहक २०००० रु लोड करू शकता. दुसृया बाजूला जो व्हेंडर आहे तो ५०. ००० रु. बँकेत भरू शकतो. छोट्या व्यापार्‍याला हे फायद्याचे आहे. ही परि स्थिती अजून सुधारण्यासाठी छोट्या व्यापारी वर्गाचे, सर्विस प्रोवायडरचे मत बदलणे गरजेचे आहे. नथिंग लाइक कोल्ड कॅश. ही सुरक्षिततेची भावना आमच्या पिढीत तरी होती पण आता पैसे बँकेत. व्यवहार मोबाईल वरून. खिसा रिक्कामा ही परिस्थिती कॉमन होत जाईल.

http://gadgets.ndtv.com/apps/news/demonetisation-rbi-doubles-monthly-lim...

http://economictimes.indiatimes.com/wealth/spend/facing-cash-crunch-afte...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबू, तुमची पूर्ण पोस्ट पटली. कोणाला कशाचा काय फायदा वाटेल म्हणून मला एखादा फायदा जाणवला कि सांगितलं. Laundry वाला ४०रु e-wallet वर घ्यायला तयार आहे. फुलवाल्याला विचारायचे आहे.

मी आज Axis Pay download केलं... तुमच्या माहिती करता FAQsची link.

पहिली पायरी स्वतःची नोंदणी करा आणि ती verify करुन घ्या.
दुसरी पायरी इच्छित व्यक्तीचा UPI (Unified Payments Interface) add करा...
तिसरी पायरी रकमेची देवाण घेवाण करा.

फायदे :
इतर Bankच्या VPA codeद्वारे रकमेची देवाण घेवाण करता येते.. म्हणजे माझ्या कडे Axis VPA आहे आणि समोरच्या कडे ICICI VPA असेल तरीही transcation करता येते ते ही विन्यामुल्य... या सगळ्यात आपला account no. फक्त आपल्या खेरीज कोणालाही दिसत नाही.

लिंब्या,

माझ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विंगची ओपीडी ट्रँजॅक्शन्स दिवसाला किमान ७०-९० हजार रुपयांत असतात. इनडोअर/आयसीयू ३-४ लाख रोज. ही कॅश करंट अकाउंटला बँकेतच जाते. पण कार्डं वापरून त्यावर ०.८% जरी एक्स्ट्रा विनाकारण ब्यांकेस द्यावे लागले, तर माझे किती पैसे फुकट जातात? घालून पहा बरं बोटें?

खिशातल्या नोटांना पिल्लं अन चौकातल्या भिकार्‍याला भीक, हे बोल्ड करून लिहिणे ठीक आहे. लै वेळ तुणतुणं वाचतोय इथे. दिवसाची ट्रँजॅक्शन्स ७० रुपये असतील, तर फार वाईट वाटत नाही, पण तेही तुमच्या टोटल कमाईचा किती हिस्सा खातं, ते जरा हिशोब करून पाहिलं, तर मारूतीची बेंबी किती गार लागली, ते आपोआप समजेल.

रच्याकने. भिकार्‍याला पेटीएमने भीक देतो का भौ?

With card usage at 0.8% for 90k 720 in. For icu 400000 3200 per day x 31 days. 121520.00 can you not set off service tax against this?apps and cards don't seem suitable for your use. Do you have the pressure to be customer friendly ? Or simply turn away those with cards and apps. I will check what my local hospitals are doing we have one local hospital and one fourtis. Jupiter in thane. Read this people. Keep cash handy to admit elders kids and yourself. Do not depend on apps

What to do I case your service provider does not support apps and cards.

Do you have medical insurance? I think that should help with primary admission to the hospital. I guess you can take a demand draft from your account favouring hospital if personal cheque is not acceptable.

Where owner is involved and keeping an eye on / control over cashbox, for such businesses card / app transactions are costly due to charges involved . But where cashbox is outsourced to hired help in such places the charges towards e transactions are acceptable compared to its cons, I guess.

Where owner is involved and keeping an eye on / control over cashbox, for such businesses card / app transactions are costly due to charges involved . But where cashbox is outsourced to hired help in such places the charges towards e transactions are acceptable compared to its cons, I guess.
<<

कीप गेसिंग. मला कॅशबॉक्स पहावीच लागते.

कार्डं वापरणारी जास्त गिर्‍हाइकं पकडून माझा धंदा वाढेल अशा धंद्यात मी नाही.

असे असंख्य धंदे आहेत. मध्यम व छोट्या व्यावसायिकांचा जीव घेण्याचा प्लॅन आहे हा. कुणीही २-३ हजाराच्या भांडवलावर आंत्रप्युनर बनून वर येऊच शकणार नाही अशीच असते "कॅशलेस" इकॉनॉमी.

त्यासाठी कॅशच लागते. अन हे फिक्स पगार घेऊन भक्ती-गाणी गाणार्‍यांना समजणार नाही. नो चान्स.

तेव्हा पाणीपुरीवाले अन चहावाले पेटीएम वापरायला लागलेत अशा पोस्टी टाकणार्‍या माझ्या सर्व मित्रांना विनंती, की त्या छोट्या धंदेवाल्यासाठी हे 'व्हाएबल' नाही, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.

हे सगळ्यांना उमजे पर्यंत किती लोक जिवंत राहतील, हा खरा प्रश्न आहे.

अजेंडा क्या है भाई? मोठे सुपरमार्केट्स फक्त टिकायला हवेत का? नवी वर्णव्यवस्था?

या देशाच्या इतिहासात माणसाने स्वकष्टाच्या व बुद्धीमत्तेच्या बळावर स्वतःच्या उत्थानाचा प्रयत्न करणेच संपायला हवे आहे का पुन्हा एकदा?

आपण जेव्हा क्रेडीट कार्ड वापरतो आणि ते जेव्हा हॅक होते तेव्हा क्रेडिट लिमिट पर्यन्त चोरी होउ शकते. डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकींग मध्ये बॅकेतले पुर्ण पैसे जाउ शकतात. >> ( साहिल शहा यांच्या प्रतिक्रियेवरून ) एक प्रश्न कदाचित बाळबोध वाटू शकेल . माझ्या कडे क्रेडिट कार्ड नाहीये . .डेबिट कार्ड आहे पण वापर एकदम कमी . इंटरनेट ब्यांकीक ची सुविधा ( पैसे ट्रान्सफर करण्याकरता )मी घरच्या कॉम्पुटर वरून वापरते. त्यात हॅक वगैरे होण्याचा धोका नाही ना ?

इंटरनेट ब्यांकीक ची सुविधा ( पैसे ट्रान्सफर करण्याकरता )मी घरच्या कॉम्पुटर वरून वापरते. त्यात हॅक वगैरे होण्याचा धोका नाही ना ?------- बहुतेक पीसी security वापरणे गरजेचे आहे. बाकी तज्ञ मंडळी मदत करतील.

त्या छोट्या धंदेवाल्यासाठी हे 'व्हाएबल' नाही, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा----बरोबर. त्यासाठी १०० पर्यंत वेगवेगळ्या लहान denominations च्या नोटा उपलब्ध आहेत.

एखादा एखादी गोष्ट रोज सातत्याने करत असेल तर रोज लहान रकमेचे रोख व्यवहार करण्यापेक्षा रतीब सुरु करायचा पर्याय आहे. उदा. माझ्या वडिलांचा न्हाव्याकडे आणि धोब्याकडे रतीब होता.

एक चहावाला.

चार दिवस खुश होता 'पेटीएम अच्छा है' म्हणे. पाचव्या दिवशी म्हटलं,
किधर है पेटीएम?
नही साब आज छुट्टा देदो।
नही है।
फिर कल दो।
अरे पर वो पेटी..
अरे साहब जाने दो ना, आप तो हमेशा आते हो।
पर तुम कल तो जोर शोर में थें फिर आज क्या हुआ?
अब साहब साडेतीन-चार का गल्ला है दिनभर का। सब छुट छाट के एक-देड बचता है। लडका पढा लिखा है। उसी ने दिया था ये पेटीएम. अब केहता है एक के उपर होगा माहिनेका तो देड-दुई तो वो ससुरा पेटीएम खायेगा। बाकी सरकार को पता चले तो टेक्स अलग से होगा ना? यहा देड-दुई बचने के लिए घर पैदल जाता हूं।

(हा खरा चहावाला नाही, गोष्टही खरी नाही, आकडेवारीही)

सुजा
१) तुमचा पासवर्ड , लॉगिन इन्मॉरमेशन कोणाशीही शेअर करु नका.
२) तुम्हाला आले इमेल ऑथेंटिक ईमेल अ‍ॅड्रेस वरुन आले का हे नेहमी चेक करा.
३) कुठल्याही लिंकवर क्लिक करण्यापुर्वी दोनदा विचार करा , बँका शक्यतो अशा लिंक्स देत नसतात.
४) कुठलेही अनॉथोराईज्ड सॉफ्टवेअर , प्रोग्राम काँप्युटरवर इंस्टाल करु नका.
५) अँ टी व्हायरस नेहमी अपडेटेड ठेवा.
ह्या अशा आणि अजुन बर्‍याच प्रिकॉशनन्स घेतल्या तर हॅक होण्याचे चान्सेस फारच कमी होतात.

पेटीएम सारखी वॅलेट अ‍ॅप्स सुद्धा आता मागे पडतील अशी शक्यता युनीफाईड पेमेण्ट इण्टरफेस आल्यामुळे निर्माण झाली आहे. एप्रील २०१६ मधे याची सुरुवात झाली आहे http://navbharattimes.indiatimes.com/photomazza/business-career/know-all... या स्लाईड शो मधे याबद्द्ल माहीती आहे

विकी वरील https://en.wikipedia.org/wiki/Unified_Payments_Interface इथल्या माहीती नुसार सध्या वीस बँका याच्याशी संल्ग्न झाल्या आहेत. म्हणजेच या वीस बँका सध्या आपल यूपीआय अ‍ॅप तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात.
फक्त पन्नास पैसे प्रति ट्रान्झेक्शन लागतील असे नॅशनल पेमेण्ट्स कॉर्पोरेशन ऑफ ईण्डियाने सूचित केलेआहे अस मी एका संकेतस्थळावर वाचल पण याबद्दल मी साशंक आहे. वेगवेगळ्या बँकांचे जे यूपीआय अ‍ॅप असेल त्यात नेमेके कसे अन किती चार्जेस / सवलती आहे व फाईन प्रिण्ट मधे काय अटी आहेत हे पाहूनच या बद्दल मत व्यक्त करता येइल आणि पेटीएम सारख्या वॅलेट् अ‍ॅप शी स्पर्धा करून यूपीआय अ‍ॅप्स यशस्वी होतील वा नाही हे कळू शकेल.

पुण्यात रिक्षा चालू झाल्या तेव्हा टांगेवाल्यांनी अशीच बोंब मारली असे जुने लोक सांगतात. परंतु जे काळासोबत राहिले त्यांनी रिक्षा शिकून घेतल्या व आपला धंदा रिक्षावर शिफ्ट केला. सध्या कॅशलेस कडे जाताना असेच होणार आहे.

पुण्यात रिक्षा चालू झाल्या तेव्हा टांगेवाल्यांनी अशीच बोंब मारली असे जुने लोक सांगतात. परंतु जे काळासोबत राहिले त्यांनी रिक्षा शिकून घेतल्या व आपला धंदा रिक्षावर शिफ्ट केला. सध्या कॅशलेस कडे जाताना असेच होणार आहे.>+१

>>> पुण्यात रिक्षा चालू झाल्या तेव्हा टांगेवाल्यांनी अशीच बोंब मारली असे जुने लोक सांगतात. परंतु जे काळासोबत राहिले त्यांनी रिक्षा शिकून घेतल्या व आपला धंदा रिक्षावर शिफ्ट केला. सध्या कॅशलेस कडे जाताना असेच होणार आहे. <<< अगदी अगदी... Happy अचूक उदाहरण

झाडु, बाबारे,
सर्वसामान्य जन्तेकरताचे पर्श्न, त्यांच्या अडचणी वगैरे घेऊन आंदोलने करणे घाटतय, त्या सर्वसामान्य जन्तेचे उत्पन्न रोज चार लाख अस्ते काय? Wink
जन्तेला उपयोगी काहि आहे असे सांगितले की लगेच चारलाख रोज उत्पन्नाचे उदाहरण तोंडावर फेकायला जातय काय?
अन इतकी रोख जमा होत असते, तर ब्यान्केत भरा की, कोण बंदी घातलीये का? अडचण काये ब्यान्केमार्फत चेकने रिसिट पेमेंटचे व्यवहार करायला? त्यावर आहेत का कसले चार्जेस? कार्ड वापरायला सांगतय कोण? अन कुणि कार्डाने पेमेंट करत असेल तर २.५% चार्जेस सरसकट जास्तीचे लावतातच सगळीकडे, तसे करा!
शेवटी "धंदा" करायला बसला आहात तर "अस्सल धंदेवाईकाप्रमाणे" वागा... उगाच मधेच लाल्या रडगाण्यात सामिल नका होऊ ! Happy
भारतातील आख्खी मन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आरटीजीएस्/एनईएफटीने पेमेंट देत्ये घेत्य, त्यांच्या क्रोर क्रोर्सच्या रक्कमांना नाही अडचण, अन तुम्हालाच कशी काय?
बरे तर बरे, यामार्फत पेमेंट करताना बँकिंग चार्जेस लागणे ही आजची गोष्ट नाहीये, ते काँगी काळातच इम्प्लिमेंट झालय, नव नाहीये, अन नोटांबंदीशी त्याचा संबंधच नाहीये, बरे नोटा बंद केल्या नसुन आधीच्या रद्द केल्यात, नविन येताहेत. मग इतकी रड कशाकरता?
(आत्ताच तपासले, आरटीजीएस्/एनईएफटी/चेक्/डीडीद्वारे पैशे घेताना चार्जेस दिसले नाहीयेत.... चु.भु.द्या .घ्या, म्हणजे तुमचा प्रश्न आलेल्या पैशातुन पेंमेंट करतानाचा आहे, बरोबर का? तेव्हा चार्जेस का सहन करावेत हा मुद्दा असेल, तर जगभरात कुठेही गेलात तरी हे चार्जेस लागणारच आहेत, कोणतीही सेवा, तुम्ही फुक्कट देत नाही, तुम्हालाही मिळणार नाहीये, मग उगा रड का? )

की शिक्षण सम्राटांसारखेच हॉस्पिटस्लचेही अस्ते? क्यापिटेशन फीया /डोनेशन्/बिल्डींग खर्च वगैरे, ऑन पेपर एक आकडा, अंडर टेबल एक आकडा , जो रोखीतच ठेवावा लागतो, तसे काही अस्ते का हॉस्पिटलच्या बीलिंग बाबत देखिल? ? Wink

माझ्या सीए दोस्तांना विचारुन घ्यावेच म्हणतो, हॉस्पिटलचे व्यवहार समजुन घेतो आता ...

हॉस्पिटल चेकने पैसे स्वीकार करत नाहीत, काय कारण असावे? रुग्णाचे नातेवाईक लाखोची रोकड कशी उभी करणार असा विचार सुध्दा होत नाही. बरे हॉस्पिटल चा वित्त विभाग Doctor हाताळत नाहीत, पण सुचना मात्र देतात की सगळे पैसे रोख रकमेत जमा करा, ते सुध्दा डेबिट / क्रेडीट कार्ड सुविधा असताना. सरकार ने इशारा दिल्यावर देखिल चेक ने पैसे घेत नाही.

कसे आहे, प्रत्येक व्यवसाय करणारा त्याच्या व्यवसायात रोख कशी अत्यावश्यक आहे हे ठसवु पाह्तो कारण कर चोरी करता येते. जसे की, आपला तो बाब्या आणि ...............................

हे पा, मी बाहेरून नेट बँकिंगने ५०००० रु माझ्या नसलेल्या बँकेच्या बायकोच्या खात्यात ट्रन्स्फर करतो त्याचा स्टेट बँक ४ रु चार्ज लावते. अन्यथा त्या खात्यात भरायला किती यातायात करावी लागली असती. पूर्वी ऑफिसमध्ये गेल्याव्र बँकेतून पैसे काढायचे विसरल्याने कित्येकदा वेळेत बिले भरल्याचे राहून गेल्याने वीज आणि फोन, मोबाईल सेवा खंडीत होत . त्या पुन्हा सुरु करायला किती त्रास. आता नेटबॅम्किंग ने काही अडचण येत नाही. एम एस इ बी तर २००० रु पर्यन्त चक्क तीसेक रुपये डिस्काऊंट देते.माझ्या कुठल्याही बिलावर चार्जेस कापले जात नाही. दुकानदारांकडून कार्ड स्वाईपिंगवर दोन टक्के चार्ज बँके कडून आकारला जातो. काही दुकानदार कार्ड वापरण्यापूर्वी अधिक दोन टक्क्याची कल्पना देतात. काही नफा मार्जिन कमी करून तो सोसतात. तूर्त तरी डिसेम्बरपर्यन्त तो माफ केला आहे. पुढेही कॅशलेस धोरणाचा भाग म्हणून त्यात नियंत्रण येईलच. बँकाना तर माफच करावा लागेल असे दिसते. प्रश्न वॉलेटचा . वॉलेट वाले धंदा वाढणार असल्याने तो स्पर्धेमुळे कमी करतीलच. पण शेवटी ती खाजगी सेवा असल्याने त्यांना काहीनी काही आकारणे भाग आहे. पण त्यामुळे जी सुकरता येणार आहे त्याने थोडे पैसे द्यायला ( टेक्स भरून राहिलेले) हरकत नाही. नाहीतरी पूर्वी बिले भरायला रजा काढावी लागे. नतर नाक्यावरच्या बिले भरणार्‍या एजन्सीज शुल्क आकारून सोय करू लागले. आता वॉलेट वाले करतील . शेवटी सेवेचेही मूल्य आहेच ना...

याची दुसरी बाजू म्हणजे सगळे अकाउंट व्हाइट होतील जो व्यापार्‍यांना तोटा वाटू शकतो

ते तर इथेच दिसते आहे ना?

>>> हॉस्पिटल चेकने पैसे स्वीकार करत नाहीत, काय कारण असावे? रुग्णाचे नातेवाईक लाखोची रोकड कशी उभी करणार असा विचार सुध्दा होत नाही. <<<<<
नरेन, आख्ख्या पोस्टशी सहमत.
जितके निवडक राजकारणी व त्यांना सामिल प्रशासन भ्रष्ट कारभाराकरता दोषी आहे, तितकेच किंबहुना त्याहुनही अधिक दोषी हॉस्पिटल्स वाले आहेत, अन ते निलाजरे आहेत. माझ्या अल्प माहितीप्रमाणे ज्याचे त्याचे "टक्केवारि" पोहोचवायला रोख बरी पडते, न की चेक्/बँक..... बँकेमार्फत व्यवहार केल्यास उत्पन्न दिसु लागते, कुणाकुणाला का वाटले याचेही वेळेस उत्तर द्यावे लागु शकते, हे सर्वच टाळण्याकरता, व एकंदरीतच, काही मोजके टक्के निवडकांच्या कडे पोहोचवायला देखिल रोखीचा व्यवहार बरा पडतो, म्हणूनच अगदी मरणाच्या दारात उभ्या रुग्णाच्या चिंताग्रस्त नातेवाईकांना लाखोंच्या "रोख रकमा " उभ्या करायला लावण्याचा निर्दयी पणा वैद्यकीय पेशात बिनदिक्कत घडतोय.
त्याशिवाय अजुन एक अप्रत्य्क्ष फायदा म्हणजे, रुग्णाचे जवळचे नातेवाईक रोखीच्या चणचणीत गुंतलेले असताना, रुग्णालय काय काय बिलिंग (चे झोल) करते ते तपासण्याचीही शुद्ध त्यांच्यात रहात नाही.

याव्यतिरिक्त इंश्युरन्सचा पर्याय असतो बरेचदा उपलब्ध, पण तिथेही किमान रक्कम रोख भरायलाच लावतात, शिवाय एकदा का कळले की इंश्युरन्स आहे, की रुग्णाचा मुक्काम किती काळ हॉस्पिटल मधे राहील हे एकतर तो ब्रह्मदेव, हॉस्पिटलचे प्रशासन अन इंश्युरन्स कंपनीचा साटेलोटेवाला एजंटच सांगु शकतो.
अतिशय कटु असले तरी हे वास्तव प्रत्यही अनुभवता येते.
हॉस्पिटलवाल्यांना चेकने/कार्डने पेमेंट नको, रोखच हवे, यातच ग्यानबाची अजुन एका प्रकारच्या काळ्या पैशाची मेख दडलेली आहे.

बडी मी डालो केलेलं आहे. पण वापरलं नसल्याने चार्जेस बद्दल माहीती इल्ले.
आयडिया, एयरटेल मनी पण वापरता येत ना ? ते बहुतेक फ्री आहे आणि कॅश बॅक पण असते त्यावर.

Today I paid current bill through. It really does not take more than 3 minutes. Which is a big plus for me. Reason. 1) do not have to stand in line. 2)it is quick. Easy transaction. 3) I have to spend 40 rs for auto to go to the electricity board counter. Payment will reflect in next month bill. I can check stock that time and close the loop. A good enough option for working older people.

जिओ आहे की फ्री! आणि डिजिटल इंडियाची पुढची पायरी म्हणून फ्री हॅण्डसेट्सचा जुमला करता येईल की. हाकानाका! Wink

Pages