पेटिएम, स्टेट बँक बडी, पे झॅप आणि इतर मोबाईल कॅश वॅलेट उपलब्ध आहेत. आता हातात कॅश नाही पण रोजचे व्यवहार तर चालवायचे आहेत. आपण कोणी ही अॅप्स वापरता का? काय अनुभव तसेच नवीन वापर कर्त्यांचे शंका निरसन व्हावे ह्या साठी धागा प्रपंच.
मी अजून एक ही अॅप डाउ न लोड केलेले नाही. बिग बास्केट, व उबर आहे. त्याला हे चालते असे ऐकले
ओला मनी
सिट्रस वॅलेट , मोबि क्विक, एअर्टेल मनी, पेयू मनी, चिल्लर, ऑक्सिजन, वॉलेट हे पर्याय अॅड केले.
बिल पे हा पर्याय वापरून नेट बँकिन्ग द्वारा खालील बिले भरता येतील.
१) प्री व पोस्ट पेड टेलिफोन बिल्ल्स.
२) डीटीएच चा रीचार्ज
३) वीज बिले
४) इतर बँकांची क्रेडिट कार्ड ची पेमेंट
५ ) विम्याचे हप्ते.
अॅपस ची नावे धाग्यात मुद्दाम लिहीलेली नाहीत कारण एका दुसृया ब्रँडचे प्रमोशन नाही आहे. तर एकूण संकल्पनाच नवी आहे. खूप लोक्स धडपड करत आहेत त्यांना माहिती मिळावी. सिनीअर सिटिझन्स ना पण ह्याचा उपयोग होईल. कृपया आपल्या आईबाबांना ही कल्पना समजावून सांगा. व स्मार्ट फोन वर अॅप डाउनलोड करून द्या. त्यांचे रांगेत उभे राहणे वाचेल.
कमीत कमी १० रु. पासून तुम्ही हे इ पाकीट लोड करू शकता. व आपल्या घरच्यांना मित्र मैत्रिणींना पण ही सुविधा उपलब्ध करून देउ शकता. ( अॅड ऑन कार्ड सारखे. ) आधीच लोड केलेले प्री लोडेड असल्याने इथे तुम्ही लिमिट मध्ये असाल तर ट्रांझॅक्षन नाकारले जात नाही. सद्य परिस्थितीत आर बी आय ने इपाकिटाची लिमीट २०००० रु. केली आहे. व केवाय सी नोंदी करून हीच लिमिट एक लाख रुपये आहे. ह्यातून फार मोठ्या पर्चेसेस अभिप्रेत नाहीत तर रोजच्या जीवनातील ट्रँझाक्षन्स सोपी करणे हा उद्देश आहे.
तुम्ही म्हणजे ग्राहक २०००० रु लोड करू शकता. दुसृया बाजूला जो व्हेंडर आहे तो ५०. ००० रु. बँकेत भरू शकतो. छोट्या व्यापार्याला हे फायद्याचे आहे. ही परि स्थिती अजून सुधारण्यासाठी छोट्या व्यापारी वर्गाचे, सर्विस प्रोवायडरचे मत बदलणे गरजेचे आहे. नथिंग लाइक कोल्ड कॅश. ही सुरक्षिततेची भावना आमच्या पिढीत तरी होती पण आता पैसे बँकेत. व्यवहार मोबाईल वरून. खिसा रिक्कामा ही परिस्थिती कॉमन होत जाईल.
http://gadgets.ndtv.com/apps/news/demonetisation-rbi-doubles-monthly-lim...
http://economictimes.indiatimes.com/wealth/spend/facing-cash-crunch-afte...
नाही साती, तू फक्त पैश्याचा
नाही साती, तू फक्त पैश्याचा तोटा बघते आहेस. त्या ३५ रुपयांच्या (१२२-८७) बदल्यात आपले किती कष्ट, वेळ, प्रवासखर्च इत्यादी वाचला हे ग्राहक बघणारच.
बाफचा विषय ईवॉलेटची उपयुक्तता आहे, त्यामुळे त्यावरच चर्चा करूया.
मी अजून काहीही वापरलेलं नाहीये. त्यामुळे इथली केवळ विषयाशी संबंधीत चर्चा वाचायला आवडेल.
म्हणजे ई-वॉलेट वापरलं नाहीये. वीज बिल, मोबाईल बिल, महानगर गॅस बिल इत्यादी सर्व बिलं माझ्या बँकेच्या वेबसाईटवरून युटिलिटी बिल पेमेंट पर्याय वापरून करते. ड्यू डेट लक्शात ठेवावी लागत नाही आणि केवळ एका क्लिकवर काम होतं. सोसायटीचा मेंटेनन्स आणि शाळेची फी एवढ्या दोनच गोष्टींसाठी हल्ली चेकबूक वापरलं जातं.
बराच वाचतो वेळ..
बराच वाचतो वेळ.. इलेक्ट्रिसिटी बिल, महानगर गॅस चं बिल वेळ काढुन भरुन येण्यापेक्षा इथुन भरलं तर बराच वेळ वाचतो शिवाय खेपहि वाचते तसचं बुकिंग चहि..
फक्त पैश्याचा तोटा बघते आहेस.
फक्त पैश्याचा तोटा बघते आहेस. त्या ३५ रुपयांच्या (१२२-८७) बदल्यात आपले किती कष्ट, वेळ, प्रवासखर्च इत्यादी वाचला हे ग्राहक बघणारच. >> मी क्रेडीट कार्ड वापरतो. सध्या BSNL/IDEA/MSEB या सगळ्याला. त्यावर जो सरजार्ज लागतो तो मला बँक परत करते. LIC Insurance Premium चे हप्ते पण बँकेत रजिस्टर केल्याने जात आहेत. या सर्व रांगेत उभे रहाणे व त्या ऑफीसला जाणे या करता लागणारे पेट्रोल याचा हिशोब केला तर थोडा चार्ज लागला तरी परवडते. PayTM अजुन वापरले नाही, वेळ आली नाही अजुनतरी.
मी त्यांच्या वोलेटमध्ये पैसे
मी त्यांच्या वोलेटमध्ये पैसे लोड केलेले नाहीत. खूप पटकन काम झालं.
आमच्या घरून एअरपोर्ट ला जायला १२५० खर्च येतो मेरुचा, फ्रीचार्जवर ४५० रुपयात परवा काम झाले.
नेहमी ज्या रेस्टॉरंट मधून ऑर्डर करतो तिथून घरातली emergency cash संपवायची नव्हती म्हणून फ्रीचार्जवर पैसे भरले . कॅशबॅक मुळे ६०रु कमी लागले आणि उरलेल्या रकमेवर त्यांनी अजून कॅशबॅक दिलाय तो पुढच्या वेळे वापारींन. आता जो कोण मला जास्त कॅशबॅक देणार, ज्याच्या ऑफर्स चांगल्या असतील तेच वापारींन. ज्या गोष्टी cash on delivery घेत होते त्यासाठीच फक्त हे वालेट्स वापरनार. आता फोन बिल, वीज पण बघू ट्राय करून बरेच कॅशबक्स आहेत.
कॅश बॅक किंवा इ वॉलेट बिग
कॅश बॅक किंवा इ वॉलेट बिग बास्केट मध्ये पण आहे. तुम्ही क्रे डिट कार्ड मध्ये पेमेंट केले व चार वस्तू नसल्या तर ते ऑर्डर मधून काढतात व तितकी रक्कम तुमच्या वॉलेट मध्ये साइट वरच जमा होते. जी पुढील ऑर्डर देताना वापरू शकतात.
टास्क बॉब पण चांगली सुविधा देतात. क्रेडिट कार्ड ने पेमेंट करायचे व घर फ्रिज कार सोफा काहेही साफ करोन देतात. आधी अपाइट मेंट घेउन येतात. दोन तासात बाहेर. टिप मागत नाहीत. नोट बंदी झाल्यावर ह्यांचे पण पेटीएम घेउ असे मेसेज आले होते.
मेक माय ट्रिप पण इवॉलेट सुविधा देते अॅप डाउनलोड केल्याबद्दलच ५०० रु की १५०० रु जमा करतात.
मुद्दा हा की जसे १-४ % फी जाते तसे वापरू लागल्यावर कॅश बॅक्स, कूपने व्गैरे येतातच. इट इस अ न्यू वे ऑफ वर्किन्ग.
मला आत्तापर्यंत काहीही फी
मला आत्तापर्यंत काहीही फी लागलेली / लागणार नाही कारण मी पेटीम / फ्रीचार्ज च्या वॉलेटमध्ये पैसे लोड-पे करत नाही. बिग-बास्केटचे वॉलेट माझ्या credit cardने via पेटीम लोड केले तर काही न करता मला पेटीममध्ये कॅशबॅक मिळतो (ऑफर असेल तर). सुट्ट्यांच्या प्रॉब्लेम व्हायचा म्हणून ओला मनी वापरायचे पण आता उबर खूपच स्वस्त म्हणून उबर; त्याला credit card जोडलेले आहे.
Netbanking, debit card किंवा credit card अनोळखी लहान विक्रेत्यांना access देण्याऐवजी, app thru केले की त्यातल्यात्यात सुरक्षित, असा माझा समज आहे.
चांगली माहिती मिळतिये....
चांगली माहिती मिळतिये....
थॅन्क्स.
>>>> इंटरनेट बँकींग हा जास्त चांगला पर्याय नाहीये का पेटीएम पेक्षा? <<<<

अहो कुठल्या विश्वात वावरता आहात? भारतातच आहात ना? इकडे लोकांना/फुडार्यांना पडलीये तळागाळातल्या अडाणी मजदूर अन मजबूर लोकांचि ज्यांच्याकडे नेट काय, मोबाईलही नाहीये... त्यांनी काय करायचे? काही उपयोग नाही त्यांना या पेटीएम फेटीएमचा... हा सगळा गोंधळ त्या XXXX चा, अन भक्त तरी गुणगान गाताहेत, त्यांचे गुणगान पुरले नै तर आता या पेटीएमचे गाताहेत...
तुम्ही असा गफलतीमध्ये "पार्टीबदल करू नका बोवा"...
Netbanking, debit card किंवा
Netbanking, debit card किंवा credit card अनोळखी लहान विक्रेत्यांना access देण्याऐवजी, app thru केले की त्यातल्यात्यात सुरक्षित, असा माझा समज आहे.
>> सुरक्षितता हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. हेडर मध्ये अपलोड केला तर चालेल का?
मी उबरसाठी म्हणून पेटीएमला
मी उबरसाठी म्हणून पेटीएमला खातं उघडलं. उबरसाठीच शक्यतो वापरलं जातं. एकदा का दोनदा मोबाईल टॉप अप करण्यासाठी वापरलं आहे. बाकी महिन्याची बिलं ईसीएस किंवा क्रे.का मार्फत दिली जातात. आपण स्वत: उठून जायचं, रांगेत उभं राहून पैसे जमा करायचे यात जो पैसा, वेळ इ. जातो त्या बदल्यात थोडाफार चार्ज ऑनलाईन पेमेन्ट्ससाठी दिलेला कधीही सोयीचा पडतो (निदान मला). ऑनलाईन खरेदी काही ठराविक गोष्टींची होते ती क्रे का ने किंवा सी ओ डी ने घेते. क्रे का ला चार्ज लावत असले तरी मुळात बहुतेक वेळा घेतलेली गोष्ट बाजारभावापेक्षा कमी किंमतीत मिळालेली असते. माफक डिलिवरी चार्जेस मधे किंवा फुकटच घरपोच मिळते... ज्यांच्या कडे मनुष्यबळ नाही, वेळ कमी आहे त्यांच्यासाठी नथिंग लाईक इट...
मी पेटीएमचं अॅप अजूनही डालो
मी पेटीएमचं अॅप अजूनही डालो केलं नाहीये. लॅपटॉपवरूनच खातं उघडलं होतं, तिथूनच व्यवहार करते. उबरच्या अॅपमधे पेटीएममधे पैसे भरायला थेट लिंक आहे त्यामुळे त्या अॅपवरून किंवा माझ्या पीसीवरूनच अजूनपर्यंत पेटीएम वापरलं आहे.
दर महिन्याला त्यांचं स्टेटमेन्ट येतं. अधूनमधून कॅशबॅक मिळते.
सुरक्षितता हा खूपच महत्वाचा
सुरक्षितता हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. हेडर मध्ये अपलोड केला तर चालेल का?}}}}}}}------ हो
अमा, समयोचित धागा,
अमा, समयोचित धागा, धाग्यामागचा उद्देश आवडला.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/demonetiza...
मी केऑस मंकी नावाचे एक
मी केऑस मंकी नावाचे एक पुस्तक वाचत आहे सिलिकॉन व्हॅलीतील स्तार्टप कल्चर वर आधारित आहे. त्यात लेखक एक महत्वाचा पॉइन्ट मांडतो जेव्हा इ सिस्टीम नव्या होत्या तेव्हा कंप्युटर्स व सॉफ्ट्वेअर ही दोन माणसा तल्या ट्रांजॅक्षन मधली लिंक असे. व अशी साखळी बनत असे. आता तंत्रज्ञान इतके सुधारले आहे कि माणसे हीच दोन सिस्टिम्स मधली लिंक आहे. उदः पेटीएम व उबर चे सॉफ्टवेअर एकमेकांशी बोलते व डील करते. उबरचा वाहन चालक व कस्टमर हे दोनच ह्युमन आहेत.
बाकी सर्व टेक्नॉलोजी. रोड व कार वेगलॅ ठेवा सध्यापुरते. हा एक महत्त्वाचा बदल झालेला आहे. २० वर्शात. आपल्या नजरे समोर.
नेट बँकिंग अथवा कार्ड पेमेंट
नेट बँकिंग अथवा कार्ड पेमेंट पेक्षा हे सोईचे का व कसे?
>>> नेट बँकिंग अथवा कार्ड
>>> नेट बँकिंग अथवा कार्ड पेमेंट पेक्षा हे सोईचे का व कसे? <<<
किस्ना, शेअरइट वापरुन इमेजेस/फाईल्स एकमेकांकडे हस्तांतरीत करण्याइतकेच सोप्पे आहे हे म्हणून सोईचे....
फ्रॉड घडलाच, तर वॉलेट मधिल शेपाचशे हजारभर रुपयाइतकाच, नेटबँकिग/कार्ड सारखा आख्खा खात्याचा ब्यालन्स/क्रेडिटलिमिट पणाला लागत नाही. तेव्हडी रिस्क कमी होते.
बाकी इतर जण साम्गतीलच.
तेव्हडी रिस्क कमी होते.>>>
तेव्हडी रिस्क कमी होते.>>>
आणि ह्या इ व्हॉलेटात किंवा इतरात पैसे कसे भरणार? नेट बँकिंग द्वारेच ना? मग आपले पैसे फक्त केवळ हाताळायची दलाली ह्यांना का द्यायची ते?
कृष्णा, नेट बँकिंगपेक्षा
कृष्णा, नेट बँकिंगपेक्षा वेगळे नाही. एका अकाऊंटमधून दुसर्या अकाउंटमधे पैसे ट्रान्स्फर होतात.
कार्डपेमेंटपेक्षा वेगळे आहे कारण कार्ड स्वाईप करावं लागत नाही
ही एक सोय आहे. उपयुक्त वाटली तर वापरा. असे अनेक सेवादाते आहेत, भविष्यात नवीन निर्माण होतील. चॉईस तुमचा आहे.
अ व्यक्तीकडे व्हॉट्सअॅप आहे, अ च्या बायकोकडे व्हॉट्सअॅप आहे. दोघेही प्रत्यक्षात एकमेकांना भेटत असूनही काही निरोपांची देवाणघेवाण व्हॉट्सअॅपवर करतात. कॉलिंगचा पर्याय असूनही व्हॉट्सअॅप वापरतात. एसेमेस, जिओ चॅट, अजून काही चाट प्रकार असतील, हे सर्व उपलब्ध असूनही व्हॉट्सअॅपच वापरतात कारण त्यांना ते सोयीचे वाटते.
हे तसंच काहीसं आहे. अ कडे पेटीएम आहे, त्याच्या भाजीवाल्याकडे पेटीएम आहे. सुट्टे पैसे खिश्यात उपलब्ध असणं आणि त्यांची देवाण घेवाण करणं दोघांनाही गैरसोयीचं वाटत असेल तर ते पेटीएम वापरण्याचा पर्याय स्वीकारू शकतात.
कृष्णा, नेट बँकिंगपेक्षा
कृष्णा, नेट बँकिंगपेक्षा वेगळे नाही. एका अकाऊंटमधून दुसर्या अकाउंटमधे पैसे ट्रान्स्फर होतात.>>>
मग मी नेट बँकिंग वापरेन ना! पेटीम किंवा, इ-व्हॉलेट कश्याला! ज्यांना पैसे द्यायचे ते थेट ट्रान्सफर करेन आजही अनेक पेमेंटस मी तसेच करतो! अगदी मोबाईल रेचार्ज देखिल ऑन-लाईन होते! केवळ भाजी, दूध व फुटकळ किराणा सोडल्यास सगळे व्यवहार ओएल होतात तर अश्याची आवश्यकता नाही भासत!
केवळ आपल्या हातातून ज्याला द्यायचे आहेत पैसे त्याला देण्यासाठी ह्या लोकांना आपण व्यवहाराच्या १-४ % पैसे द्यायचे हे नाही पटत..
ते घर भाड्याने मिळवून देणारे किंवा जुने घर विकत घेतानाचे मधले दलाल जी आपल्याला किमान घरे दाखविण्याची तसदी तरी घेतात! त्यांना आपण चार्जेस देतो.
हे काय करतात?
केवळ आपल्या हातातून ज्याला
केवळ आपल्या हातातून ज्याला द्यायचे आहेत पैसे त्याला देण्यासाठी ह्या लोकांना आपण व्यवहाराच्या १-४ % पैसे द्यायचे हे नाही पटत..>> १-४% पैसे द्यावे लागतात हे कुठे पक्कं ठाऊक आहे तुम्हाला?
१-४% पैसे द्यावे लागतात हे
१-४% पैसे द्यावे लागतात हे कुठे पक्कं ठाऊक आहे तुम्हाला?>>>
मंजुडी, आमचे ज्ञान तोकडे आहे हो! इकडचे तिकडचे वाचून जी माहिती मिळते त्यामुळे वाटते!
पण योग्य माहिती करुन घेण्यासाठी हा धागा उपयुक्त ठरेल...
क्रेडिट कार्डांच्या
क्रेडिट कार्डांच्या सुरूवातीच्या काळात क्रेका वापरणार्याकडून कार्ड हँडलिंग फी/ अॅन्युअल फी वगैरे घेतली जायची. तरीही लोकं क्रेका वापरून व्यवहार करत होती, कारण त्यांना खिश्यात तेवढे पैसे बाळगून फिरण्यापेक्षा एक कार्ड घेऊन फिरणं सोयीचं वाटत होतं.
आता जवळपास सगळ्याच क्रेका कंपन्या अशी फी फक्त विक्रेत्यांकडून घेतात, ग्राहकांकडून घेत नाहीत. विक्रेता विचार करतो, खिश्यात पैसे नाहीत म्हणून माझा ग्राहक परत जाण्यापेक्षा मला दोन रुपये नफा कमी मिळाला तरी चालेल पण ग्राहक परत नाही गेला पाहिजे.
इथे वाचा
इथे वाचा :
https://paytm.com/terms
SEMI CLOSED WALLET
४ - Wallet Charges & Validity
Wallet to Bank transfer - KYC customer - 1%
Wallet to Bank transfer - Basic Customer - 4%
In netbanking you have to add
In netbanking you have to add the payee, need ifsc code, bank and branch name, legal name etc and wait for its authorization. Also your bank account details are exposed. If you don't load app wallet and directly use your CC or netbanking to pay to third party using their gateway then there will not be any charges or its transaction fees. Unless you are getting any benefits, there is no point in using these wallets. Ideally look for the ways where you don't have to incur any fees or charges.
If you are already using other electronic means for making your regular payments there is no need to change your payment methods unless there are monetary benefits to you. You can try using these wallets where you were paying cash earlier but now want to shift because of offers on the apps.
सध्या ३०-३१ डिसेंबर पर्यंत हे
सध्या ३०-३१ डिसेंबर पर्यंत हे चार्जेर्स रद्द केल्याचं वाचण्यात आलं.
सोनू., ते चार्जेस वॉलेट टू
सोनू., ते चार्जेस वॉलेट टू बँक ट्रान्स्फर, म्हणजे विक्रेत्यांसाठी आहेत का?
मी लॉगिन केलं नाहीये पेटीएमवर, त्यामुळे तू दिलेली लिंक मला दिसत नाहीये.
Loading money into wallet -
Loading money into wallet - no charges
Purchase at merchant site - no charges
Wallet to wallet transfer. - no charges
Basically as long as money is moving around / in electronic form, no charges involved. As sooन as you change it into liquid -on demand form there are charges.
चार्जेस वॉलेट टू बँक
चार्जेस वॉलेट टू बँक ट्रान्स्फर, म्हणजे विक्रेत्यांसाठी आहेत का? >>> नाही, कोणीही त्याच्या पेटीएम वॉलेटमधुन पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करणार असेल तर त्याला १% वा ४% चार्ज द्यावा लागेल.
ओके गिरीकंद! राजसी करेक्ट!
ओके गिरीकंद!
राजसी करेक्ट!
दुसऱ्याचा बँक अकाउंट नंबर
दुसऱ्याचा बँक अकाउंट नंबर माहित असेल तर पेटीम वापरायची गरजच नाही. NEFT, IMPS, cheque इ. सोयी पण वापरता येतात.
Pages