मोबाईल वॉलेट/ इवॉलेट अनुभव, शंका निरसन

Submitted by अश्विनीमामी on 22 November, 2016 - 23:32

पेटिएम, स्टेट बँक बडी, पे झॅप आणि इतर मोबाईल कॅश वॅलेट उपलब्ध आहेत. आता हातात कॅश नाही पण रोजचे व्यवहार तर चालवायचे आहेत. आपण कोणी ही अ‍ॅप्स वापरता का? काय अनुभव तसेच नवीन वापर कर्त्यांचे शंका निरसन व्हावे ह्या साठी धागा प्रपंच.

मी अजून एक ही अ‍ॅप डाउ न लोड केलेले नाही. बिग बास्केट, व उबर आहे. त्याला हे चालते असे ऐकले
ओला मनी

सिट्रस वॅलेट , मोबि क्विक, एअर्टेल मनी, पेयू मनी, चिल्लर, ऑक्सिजन, वॉलेट हे पर्याय अ‍ॅड केले.

बिल पे हा पर्याय वापरून नेट बँकिन्ग द्वारा खालील बिले भरता येतील.
१) प्री व पोस्ट पेड टेलिफोन बिल्ल्स.
२) डीटीएच चा रीचार्ज
३) वीज बिले
४) इतर बँकांची क्रेडिट कार्ड ची पेमेंट
५ ) विम्याचे हप्ते.

अ‍ॅपस ची नावे धाग्यात मुद्दाम लिहीलेली नाहीत कारण एका दुसृया ब्रँडचे प्रमोशन नाही आहे. तर एकूण संकल्पनाच नवी आहे. खूप लोक्स धडपड करत आहेत त्यांना माहिती मिळावी. सिनीअर सिटिझन्स ना पण ह्याचा उपयोग होईल. कृपया आपल्या आईबाबांना ही कल्पना समजावून सांगा. व स्मार्ट फोन वर अ‍ॅप डाउनलोड करून द्या. त्यांचे रांगेत उभे राहणे वाचेल.
कमीत कमी १० रु. पासून तुम्ही हे इ पाकीट लोड करू शकता. व आपल्या घरच्यांना मित्र मैत्रिणींना पण ही सुविधा उपलब्ध करून देउ शकता. ( अ‍ॅड ऑन कार्ड सारखे. ) आधीच लोड केलेले प्री लोडेड असल्याने इथे तुम्ही लिमिट मध्ये असाल तर ट्रांझॅक्षन नाकारले जात नाही. सद्य परिस्थितीत आर बी आय ने इपाकिटाची लिमीट २०००० रु. केली आहे. व केवाय सी नोंदी करून हीच लिमिट एक लाख रुपये आहे. ह्यातून फार मोठ्या पर्चेसेस अभिप्रेत नाहीत तर रोजच्या जीवनातील ट्रँझाक्षन्स सोपी करणे हा उद्देश आहे.
तुम्ही म्हणजे ग्राहक २०००० रु लोड करू शकता. दुसृया बाजूला जो व्हेंडर आहे तो ५०. ००० रु. बँकेत भरू शकतो. छोट्या व्यापार्‍याला हे फायद्याचे आहे. ही परि स्थिती अजून सुधारण्यासाठी छोट्या व्यापारी वर्गाचे, सर्विस प्रोवायडरचे मत बदलणे गरजेचे आहे. नथिंग लाइक कोल्ड कॅश. ही सुरक्षिततेची भावना आमच्या पिढीत तरी होती पण आता पैसे बँकेत. व्यवहार मोबाईल वरून. खिसा रिक्कामा ही परिस्थिती कॉमन होत जाईल.

http://gadgets.ndtv.com/apps/news/demonetisation-rbi-doubles-monthly-lim...

http://economictimes.indiatimes.com/wealth/spend/facing-cash-crunch-afte...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता १ तारीख आली, की मज्जा येणारे.

आय मीन, पगार कसे करायचे!

मी चेक देईन. पण जेव्हा हे लोक आपल्या अकाउंटमधून रोजच्या खर्चाचे पैसे काढू पाहतील तेव्हा तितकी कॅश बँकांत आहे का?

सरकारी नोकरांना कॅश मधे बरीच अमाउंट मिळणारे म्हणे? त्यांच्याकडे मोबाईल वॉलेट नाहियेत का?

मायग्रंट लेबरने काय करायचं?

म्हणजे मजूर म्हणून (उदा. बांधकाम : मराठवाड्यातून मुंबई. ऊसतोडणी: खानदेशातून गुजरातेत) दुसरीकडे आलेल्यांनी तिथल्या बँकेत खाती कशी उघडायची?

कारण वॉलेट म्हटलं तरी आपलं नेट-बँकिंग वा कार्ड याच्याशी जोडावं लागतं ना?

अजूनही जुजबी मराठीही लिहितावाचता येत नाही अशी बरीच मोठी लोकसंख्या आहे. आपण बँकेत गेल्यावर कागद भरून मागणारे अशिक्षित लोक आपल्याला भेटलेलेच नाहीत असेही नाही.

अशा लोकांना वापरता येतील अशी अ‍ॅप्स आहेत का?

की अशा लोकांनी रिक्षा आल्यावर टांगेवाले नष्ट झाले, तसं नष्ट व्हायचंय?

बरं, या गरीबांना सरकारने जनधन अकाउंट्स काढून दिली आहेत, रुपे कार्ड्स दिले आहेत वगैरे भक्तीसंगीत गाणार्‍यांच्या माहितीसाठी :

"अचानक" ट्रँजॅक्शन्स करणार्‍या (म्हणजे आपला पगार चेकने अकाउंटला भरणार्‍या, किंवा घरातले अडीनडीसाठी जमवलेले पाच पंचवीस हजार बँकेत भरणार्‍या) लोकांची जनधन अकाउंट्स फ्रीझ व रुपे कार्ड्स बंद केलीत/ करण्यात येणार अशी बातमी नुकतीच वाचली.

अमर्त्य सेन म्हणलेत, तसं या सरकारने अचानक सगळ्या भारतवासियांना "काळा पैसावाले आहात" असं डिक्लेयर करून टाकलंय. तुम्ही टॅक्स भरत असलात तरीही तुमची लिक्विडिटी चोरून नेलीये.

"तळतळाट लागतात" असं म्हणतात.

बघू..

आज आईशी बोलले. घरी रु. २००० ची नवी नोट आली. मग ती मोडण्यासाठी गरज नसताना १५०० चा किराणा भरला. दोन -तीन बँकात खाती आहेत. प्रत्येक ठिकाणी एक हजार असे एकूण रु. ३००० हे १०० च्या नोटात मिळाले. मात्र सिनीयर सिटीझन म्हणून रांगेत उभे न रहाता काम झाले. या सगळ्या गोंधळात बँक कर्मचारी मात्र खूप आस्थेने वागले.

स्वाती२,

माणूस माणसाशी चांगलंच वागतो हो.. बँक कर्मचारी आहेत ते. "त्या" दंग्यांच्या काळातही माणूसकी दाखवणारी लोकं होतीच की!

पण मुळात यांना बँकेत स्वतः जायला भाग का पाडले गेले, गरज नसताना १५०० चा किराणा विकत घ्यायला का लागला? याचा विचार कोण करणार?

मज्जाय!

मला काल जांभळी नाका मार्केटला २५० रुपयांच्या खरेदीसाठी २००० ची नोट दिल्यावर बाकीचे १७५० रुपये सुट्टे मिळाले होते. आता ATM मध्ये ५०० च्या नोटाही मिळत आहेत. मला काल कोटक महिंद्रा ATM, टेंभी नाका येथे मिळाल्या. ज्यांना ATM वापरायचा confidence नाही पण पैसे तर काढायचे आहेत, ते मागच्या व्यक्तीला आत घेवून शिकून घेतायत.

बडी डालो केलं आहे पण वापरायची वेळ आली नाही. Debit card वर काम होतंय. Ola money डालो करून पैसे घालून ठेवले आहेत कधी कधी Ola cabs वापरत असल्याने.

आज 'सकाळ' मधील ' चालावी डिजीटलची वाट ' या लेखात शेवटी Cityfi या app बद्दल आलं आहे. आपल्या शहरात मोबाईल wallets ने कुठे कुठे पैसे स्विकारले जातात ही माहीती ईथे मिळेल असं लिहीलय. पण तसं कुठलं app सापडलं नाही प्लेस्टोअर वर.

Try citify

जवळ जवळ सर्व बँका नी आपले इ वॉलेट सुविधा ऑफर केलेल्या आहेत. पेटीएम ने आपणहूनच ३००० रु. स्वतःत भरून घेतले. म्हणून मी जरा संभ्रमात आहे.

yes!!!! just successfully paid grahak sangh bill through SBI Pay (UPI by SBI). This is best! It took only half minute Happy

Payee कडे UPI असलंच पाहिजे असं नाही. फक्त अकाऊंट नंबर आणि IFSC असला तरी बास.

paytm just merged with its payments bank.

slowly everyone else would follow suit. All major mobile carriers , bazars, big vendors will have their own payment banks and wallets attached with them.

पेटीएम ने आपणहूनच ३००० रु. स्वतःत भरून घेतले. म्हणून मी जरा संभ्रमात आहे. >> तुम्ही पहील्यांदा पेटीएम मधे पैसे ट्रांसफर केलेत तेव्हा - Remember Me - असा चेक्बॉक्स चेक केलेला होता का आधीपासून ?

(मी अजून पेटीएम वापरलं नाहीये, जस्ट अंदाज )

ओलामनी मधे ऑटो रीचर्ज होतं जे मी ऑफ केलं, मला हवं तेव्हाचं मी टाकेन. उगाचं का आधीपासून पैसे अडकवून ठेवू ?

मी युनियन बँकेचं मोबाइल अ‍ॅप वापरते. IMPS वापरून पैसे transfer केले आहेत ब्र्याच वेळा. You need ac no and IFS code of branch. Transfer is immediate. I have not tried other options like transfer to mobile no or merchant payments.

धन्यवाद प्राजक्ता शिरीन चेक करते.
सचिन काळे फेक व्हॉट्सॅप फॉरवर्ड असा बाफ आहे तिथे कृपया तुमची वरील पोस्ट चिकटवा. खरी व अनुभवाची माहितीच इथे लिहा, धन्यवाद कृपया.

जिज्ञासा, दोन्ही वेगळं आहे. SBI Pay वर आपण दुसरी एखादी बॅंकही लिंक करू शकतो. मी pnb लिंक केली. multiple banks सुद्धा लिंक करू शकतो.

HDFC PayZapp कोणिच वापरत नाहिये का? मी जवळ-जवळ वर्षभरापासुन वापरतोय.
१. PayZapp च्या स्वतःच्या ऑफर्स असतात (around 25% cashback on Mobile/DTH recharges, etc. सुरुवातीला हे ५०% होते.)
2. HDFC debit card with PayZapp वापरले तर ५% additional cashback on card
3. HDFC credit card with payzapp वापरले तर ५X reward points on card

सेक्युरिटी चे म्हणाल तर डेटा फोन वर सेव्ह होत नाही.
हे अ‍ॅप HDFC बँकेचे आहे.

---
कानडा

UPI/USSD बद्दल ऐकतोय. पद्धत छान, सेफ आहे पण चार्जेस नाही म्हणे..
एवढे उदार?

कुणाला काही ठाऊक?

खरं तर आता बाजारात एवढे पर्याय आलेत, कि आपण कुठे पैसे ठेवलेत तेच लक्षात ठेवणे कठीण आहे. जिथे असतिल तिथून कुठेही वापरता यायला पाहिजे.

या बिझिनेस मधे नक्कीच फायदा आहे ( त्याशिवाय का इतक्या जाहीराती येतात ) म्हणून काहिही फ्री वगैरे असेल, असे वाटत नाही. माझ्या खिश्यातून नाहीतर विक्रेत्याच्या खिश्यातून ते चार्जेस घेतले जात असणारच !

UPI is free. You can trf one rupee only, too. Payer and payee both should have mobile banking activated. No need of account no., IFSC code etc. It's just like email id - e.g. Admin@maayboli is UPI id. Admin is your upi name which you can choose and maayboli is bank name.

शक्यतोवर एखाद दोनच वोलेट वापरायचे. उगीचच वोलेट मध्ये पैसे भरून ठेवायची गरज नाही. Preferred method /way of loading money could be attached to the wallet. ऐनवेळेस तितक्याच रकमेचे लोड करायचे.आता एवढ्या बँका आहेत म्हणून आपण सगळीकडे खाती उघडतो का!

बँक खाते/ क्रेडिट कार्ड असल्याशिवाय कोणतेही वॉलेट वापरणे अशक्य आहे कारण पैसे लोड किंवा एनकॅश कसे करणार. आता जर एवीतेवी बँक अकाउंट / कार्ड आहे आणि वापरावे लागणार आहे तर जिथे शक्य तिथे कार्ड नाहीतर upi वापरणे जास्त सोयीस्कर आहे. कंझुमरला cashback / discounts असे फायदे आहेत वॉलेट वापरण्यात पण वेन्डरला जर नुकसान असेल तर आपणच त्यांना upi चे उपयोग पटवून दिले तर वॉलेटची गरजच नाही. (पश्चिम बंगाल मधली ती ४००-५०० खेडी वगळता)

मी पेटिएम डाऊनलोड करुन त्यात पैसे भरण्याचा खुप प्रयत्न केला.
पण माझ्या बँकेतुन माझ्या पेटिएम वॉलेट मध्ये पैसे भरतांना काहितरी एरर येतोय.
त्यांना स्क्रीन्शॉटसकट वै. मेल करुन करुन दमलेय. पण नो रिप्लाय.
कस्टमर केअरला पण फोन करुन दमले. पण तिथे रेकॉर्डेड टेप वाजते "मेल ऑन <त्यांचा कस्टमर केअरचा मेल आयडी>" म्हणून. (फ्रॉड सेक्शनमध्ये गेलो तरी हिच टेप वाजवतात म्हणजे आश्चर्य आहे).

असे वाटते कि आताच (अजुन पहिले ट्रान्झॅक्शनही झालेले नसतांना) यांचा रिप्लाय एवढा थंड असेल तर पैसे भरल्यावर काहि फ्रॉड वगैरे झाला तर यांच्या को-ऑप्रेशनचा स्पीड हाच असणार आहे का? :वैताग:

इतर फ्रीचार्ज, ओला मनी, सिट्रस वगैरे डाऊनलोड करणे शक्य आहे. पण भाजीवाले, डॉक्टर्स, पेपरवाले यांच्याकडे पेटिएमच फेमस/ अवेलेबल असते असे ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे इतर अ‍ॅप्सचा मला मला विशेष उपयोग होणार नाहीये.

* हे पेटिएम विषयी आहे पर्टिक्युलरली.. मोबाईल वॉलेट हि चांगली सुविधा आहे यात वादच नाही.

पियू क्रेडिट कार्ड मधून ट्रान्सफर होते आहे का ते बघा. अगदी दोन मिनिटात होते. टेक्निकल एरर असेल तर इमोशनल होउन चालत नाही ना. फ्रॉड झालेला नाही ना? मग तसे सोचू नका. ट्राय अनदर वे. पूर्ण पेटीएम अन इन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करून बघा.

पियू क्रेडिट कार्ड मधून ट्रान्सफर होते आहे का ते बघा.
>> डेबिट/ क्रेडिट कुठल्याच कार्डमधून होत नाहीये. नेट बँकिंगनेही होत नाहीये.

टेक्निकल एरर असेल तर इमोशनल होउन चालत नाही ना.
>> अर्थात. पण तो एरर सॉर्ट ऑट करण्याची सुविधा जर वारंवार रिमाईंड करुन काम करत नसेल तर राग येण्याला इमोशनल होणे कसे म्हणता येईल अमा?

फ्रॉड झालेला नाही ना? मग तसे सोचू नका.
>> "शीतावरुन भाताची परीक्षा" हि म्हण ऐकली आहे ना तुम्ही अमा? कंपनीची कस्टमर केअर सुविधा पुरेशी स्पीडी / को-ऑपरेटिव्ह नाहीये हे लक्षात यायला फ्रॉडच व्हायला हवा का? कस्टमेअर केअरचा जो नंबर दिला आहे त्यावर कोणताही पर्याय सिलेक्ट केला तरी रेकॉर्डेड व्हॉईसशिवाय कोणताही ह्युमन बिईंग उपलब्ध नाही. तो रेकॉर्डेड व्हॉईस त्यांच्या मेल आयडीला मेल करा असे सांगुन आपोआप कट करतो फोन. म्हणजे जर तुम्ही (म्हणजे कंपनी, तुम्ही नाही) २४ X ७ अवेलेबल नाही आहात किंवा टेलिफोनिक सपोर्ट उपलब्ध नाहीये.. तर तशी जाहिरात करुन ग्राहकांची दिशाभूल का करताय?

ट्राय अनदर वे. पूर्ण पेटीएम अन इन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करून बघा.
>> हे करुन झाले अनेकदा. इतकेच कश्याला? पूर्ण पेटीएम प्रोफाईल डिलीट करुन सुद्धा पुन्हा रजिस्टर करायची माझी तयारी आहे. पण प्रोफाईल डिलीट करायला सुद्धा त्यांनाच मेल करुन रीक्वेस्ट करावी लागते आहे जी करून झाली आहे पण त्याचेही काही उत्तर नाही.

याखेरीज अजुन एक अनदर वे म्हणून पीसीवरून (ओटीपी वगैरे वापरून) पेटिएम लॉगिन करुन करण्याचाही प्रयत्न केला आहे. परंतु, तिथेही सेम प्रॉब्लेम येतो आहे म्हणून त्याचेही स्क्रीनशॉट काढून परत पाठवले आहेत. त्यालाही काही उत्तर आलेले नाही.

Pages