"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरे तर मी ईथे खबर लागल्या लागल्या धागा काढला. पण दुसर्‍या दिवशी मीच ही बातमी विसरून पाकिटात काय किती पैसे हे चेक न करताच घराबाहेर पडलो. दुर्दैवाने त्या दिवशी नेमका माझा डबा नव्हता. आणि माझा डबा नसला की मला नॉनवेजचाच खुराक लागतो. बाहेरचे वेज घासफूस मला जास्त घशाखाली उतरत नाही. पण त्या दिवशी माझी ती ऐपतच नव्हती. मी चक्क वेज सॅण्डवीच खाऊन दिवसभर तग धरला. संध्याकाळी गर्लफ्रेंड भेटली. थोडी कॉफी, थोड्या गप्पा, सोबत चिकन ग्रील सॅंडवीच. दिवसा अर्धपोटी आणि शाकाहारावर राहून जे पैसे वाचवले ते संध्याकाळी ईथे खर्च केले. बस्स, मला एवढेच सोसावे लागले.

मला अजूनतरी काही सोसावे लागले नाही. २५० रुपयांचे पतंजलीतले सामान कार्ड वापरून घेतले. सकाळचे रिक्षाचे पैसे, भाजी मिळून १००-१२५ रुपये खर्च केले. काटकसर करायला मजा येतेय. लहानपणचे दिवस आठवले. आवर्जून वेळेत निघून office bus पकडल्यामुळे जास्तीचा रिक्षाभाडे खर्च नाही. वर्षभराचा रेल्वे पास, दूध/पेपरवाला/इस्त्रीवाला/मेड/किराणा ह्यांचे रोकडे द्यावे लागणारे पैसे आधीच देवून झाले होते. ऑफिसमध्ये चहा कॉफी घेतली नाही.

घरातल्या ५००/१००० च्या नोटा बॅंकेत भरून टाकल्या. विथड्रॉ करायच्या रांगेत उभी राहिले पण माझा नंबर यायच्या आत ऑफिसातल्या बॅंक extension counter मधले पैसे संपले. हातात अजून १०००-१२०० रुपये आहेत. उद्या परवा घराजवळचे atm सुरू होईल. गर्दीही कमी होईल.

फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप वापरणार्‍यांना समाधान इत्यादी लाभत असलं तरी हातावर पोट असणार्‍यांचं, घरी आजारी माणूस असणार्‍यांचं काय? ज्यांच्याकडे क्रेडिट-डेबिट कार्डं, चेकबुकं नाहीत, त्यांचं काय? दूध-भाजी कार्डावर मिळत नाही.

पेन्शनधारकांनाही दोन हजार रुपयेच मिळत आहेत. शिवाय नव्या पाचशे- दोन हजाराच्या नोटांचाही उपयोग नाही. दुकानदार त्या स्वीकारत नाहीत, कारण परत देण्यास सुट्टे नाहीत.

माझ्या शेजारच्या आजोबांना गेल्या महिन्यात पक्षाघातामुळे इस्पितळात भरती केलं होतं. गेल्या आठवड्यात घरी आणलं. परवा परत तब्येत बिघडली. आजी-आजोबा असे दोघंच घरी असतात. नक्की काय करणं अपेक्षित आहे या दोघांनी?

अर्बन एलिटांची देशसेवा बहुसंख्यांची पोटं भरू शकत नाही. कार्डं-चेक वापरून व्यवहार करा, हा सल्ला ऐकला-वाचला की भयंकर वाईट वाटतं. शिवाय 'जरा त्रास सोसा, तिकडे सौनिक बघा लढतायेत' या उपदेशाचा सतत मारा होत असतो.

मी भारताबाहेर असल्याने माझा काही अनुभव नाही.
वडील एकटे राहतात. त्याना क्रेडीट कार्ड काढुन दिले आहे पण ते त्यानी कधीच स्वताहुन वापरले नाही . घरचा फोन, मोबाईल, वीज केबल सगळी बिले त्या कार्ड मधुन जातात. त्याची व्यवस्ठा मी भारतात असताना करुन ठेवली होती.
नोटा बंद झाल्याची आकाशवाणी झाल्यावर घरी फोन केला . त्याचाकडे ५००/१००० चे ७००० रुपये तर १०/२०/१०० चे ५००० रुपये होते. ५००० रुपये १०-२० दिवस चालतिल. वयोमानानुसार एवढा वेळ रांगेत उभे राहायची शक्ती नसल्याने रांग कमी झाल्यावर टाकतिल.
घराजवळच डी-मार्ट आहे. जिथे दुध, भाज्या , औषधे , किराणा कार्ड वर मिळते. पण त्याचा मते क्रेडीट कार्ड वापरायची वेळ नाही येणार. १०-२० दिवसात रांगा कमी झाल्या असतिल. पुढे परिस्ठिती कशी असेल ते वेळच सांगेल.

चिनुक्स अश्या माणसाना खरच मदतीची गरज आहे. नेमक्या ह्याच कारणासाठी मी क्रेडीट कार्ड काढले होते. कधीही बॅका सलग ३-४ दिवस बंद असल्यावर पण अशीच परिस्ठिती येउ शकते .

माझ्या शेजारच्या आजोबांना गेल्या महिन्यात पक्षाघातामुळे इस्पितळात भरती केलं होतं. गेल्या आठवड्यात घरी आणलं. परवा परत तब्येत बिघडली. आजी-आजोबा असे दोघंच घरी असतात. नक्की काय करणं अपेक्षित आहे या दोघांनी? >>> चिन्मय, तू केलीस ना मदत त्यांना?

अर्बन एलिटांची देशसेवा बहुसंख्यांची पोटं भरू शकत नाही. कार्डं-चेक वापरून व्यवहार करा, हा सल्ला ऐकला-वाचला की भयंकर वाईट वाटतं.>>> Uhoh

ठाण्यात कुणाचे वृद्ध आईवडील दुकटे/एकटे राहात असतील आणि ह्या कामी मदत हवी असेल तर विनासंकोच मला कळवा. उद्या परवा मला सुट्टी आहे. आणि बॅंका चालू आहेत. मी काही करू शकेन.

अंजली, यात डोळे फिरवण्यासारखं काय आहे ते कळलं नाही. भारतातली बहुसंख्य जनता कार्ड वापरत नाही. वाणसामानाच्या बहुतेक दुकानांमध्ये कार्डानं व्यवहार करता येत नाहीत. दवाखान्यांनी जुन्या नोटा स्वीकारणं बंद केलं की कार्ड / चेकबूक नसणार्‍यांनी काय करायचं?

http://www.firstpost.com/politics/rs-500-rs-1000-ban-india-may-soon-see-...

माझ्या समजुतीनुसार बहुसंख्यांसाठी ही सक्तीची 'काटकसर' मजेची नसणार.

इथे माबोवर बहुसंख्य मध्यमवर्ग आहे असे मला तरी वाटते. त्यांना केवळ रोख व्यवहार करायचे माहित आहे असे नाही. इतर अनेक पर्याय वापरून वेळ निभावून नेणारे आहेत असे तरी मी समजतो.
केवळ अशांच्याच कमेंट इथे येतील असे नाही पण त्या बहुसंख्य असतील हे खरे.

वर चिनुक्स म्हणतात तसे कित्येक असे लोक आहेत ज्यांना केवळ काल चालणारा पैसा आज चालत नाही एवढीच जाणीव झाली आहे. त्यांच्या लेखी त्याव्यतिरिक्त इतर पर्याय स्वप्नातही ठाऊक नाही. सहज रस्त्यांवरून फिरलं तरी कित्येक घटना डोळ्यांत पाणी आणतील. मीडिया तेव्हडे फुटेज देत नाही त्या कारणांत नाही पडायचं मला तरी. पण खरंच प्रश्न आहेत, बिकट आहेत. तुम्हाला जाणवत नाहीत म्हणून नाहीतच असं नाही.

चिनुक्स अश्या वेळी ज्याचा कडे चेक बुक / कार्ड असेल त्याची मदत घ्यावी लागते . भारतात ९११ ची सिस्टम नाही. आणि अशी वेळ कधीही येउ शकते.

१० वर्षा पुर्वीची गोष्ट माझ्या वडलाना सकाळी ७.३० ला ह्रुदय विकाराचा झटका आला होता. पल्स् रेट २० पर्यन्त आले होते. ५०,००० रुपये भरल्याशिवाय अन्जोप्लस्टी होणार न्हवती. अश्या वेळी शेजार्यानी त्याचे कार्ड स्वाईप केले होते आणि नंतर आम्ही पैसे त्याना परत केले होते. सकाळी ७.३० ला कुठलीच बॅक उघडी नसते. त्यानंतर त्याना कार्ड काधुन दिले आणि ते अक्टीव रहावे म्हणुन बिल त्यातुन भरली जात आहेत.

<चिनुक्स अश्या वेळी ज्याचा कडे चेक बुक / कार्ड असेल त्याची मदत घ्यावी लागते>

खेड्यापाड्यात राहणार्‍यांनी, शहरातल्या निर्वासितांनी, मजुरांनी, कामगारांनी, रोजंदारीवर काम करणार्‍यांनी कोणाची आणि कशी मदत नक्की घ्यायची? भारतात कार्डावर वाणसामान आणि भाजी मिळते? आजारी व्यक्तींचं आणि पेन्शनरांचं काय?

मनमोहन सिंगांच्या सरकारने २००५पूर्वीच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भाजपने हा निर्णय गरिबांवर अन्याय करणारा असल्याची टीका केली होती. गरिबांना नक्की कशाप्रकारे त्रास होऊ शकेल, यावर भाजपने चर्चाही घडवून आणली होती. आता सरसकट सर्वच नोटा बाद झाल्यानं हा त्रास प्रत्यक्षात अवतरला आहे.

चिन्मय, 00.18 च्या पोस्टमध्ये मला का टोमणा? इथे कुणाची काय गैरसोय झालीय हा बाफचा विषय असल्याने मी ते माझ्याबद्दल लिहिलंय. आणि अजून गैरसोय झाली नसली तरी होवू शकलीही असती माझ्याकडे थोड्या १०० च्या नोटा नसत्या तर.

माझ्या कामवालीला तिच्या गैरसोयीबद्दल काल आणि आजही विचारलं. तिचा बॅंकेत account आहे. तिच्या शिकणाऱ्या दोन मुलांसकट ५ माणसांच्या कुटुंबाकडे दिवाळी बोनसमधल्या उरलेल्या ५०० च्या १० नोटा होत्या त्या तिच्या ४थी शिकलेल्या नवऱ्याने आज बॅंकेत भरायला नेल्या. घरात १०० च्या ४ नोटा आणि काही १० च्या नोटा चिल्लर आहे म्हणाली. तिच्याकडे ATM कार्ड नाही,उगाच कशाला सांभाळायला म्हणून! उद्या परवा तिचा नवरा बॅंकेत जावून २००० रुपये काढून आणेल. तिची सासू बेडरिडन आहे. हिचं हातावरचं पोट आहे. नवऱ्याची कमाई नगण्य. तरी बाई कूल होती.

मला अजूनतरी काही सोसावे लागले नाही.>>>>>>>> मलाही.
वस्तू संपायच्या आधी नवीन भरून ठेवणे याचे ऑब्सेशन आहेच.हीच गोष्ट पैशाच्याबाबतही आहे.घरात कमी असू नये म्हणून काल बँकेतून काढले. डेंटिस्टची ट्रीट.मेंट चालू आहे,पण त्यांच्याकडे कार्डानेच देतेय.अर्थात हा पर्याय ८/११ च्या आधीपासूनच चालू आहे.

वर चिनूक्सनीं म्हटल्याप्रमाणे ज्यांचे हातावर पोट आहे किंवा अपुरे उत्पन्न आहे अशांचे वाईट वाटते.तसेच ह्या काळात ज्येष्ठ नागरिकांचेही हाल आहेत. आमच्या ज्येष्ठ नागरिक, बँकेत नोटा बदलायला जाणार होत्या.त्यांना सांगितलेय की उद्या पैसे आणून देते म्हटल्यामुळे आज परत पैसे काढले.चेकने काढले.रांग पैसे बदलायला होती.

माझी बाई,गावाला पैशांमुळे अडली,पण हॉस्पिटलमधे जाऊन पैसे सुटे करुन घेतलेही.
आज डेंटिस्टकदून येताना हॉटेले पाहिली तर भरगच्च भरलेली होती. कार्डवालेही असतील कदाचित.

माझ्या शेजारच्या आजोबांना गेल्या महिन्यात पक्षाघातामुळे इस्पितळात भरती केलं होतं. गेल्या आठवड्यात घरी आणलं. परवा परत तब्येत बिघडली. आजी-आजोबा असे दोघंच घरी असतात. नक्की काय करणं अपेक्षित आहे या दोघांनी?
<<
त्यांनी देशभक्ती करणं अपेक्षित आहे.

इथले अनेक सक्षम लोक अशा लोकांना मदत करायला समर्थ असताना तुम्ही असल्या फडतूस व मनगढंत बाबी सोशल मिडियावर कशा लिहू शकता? >> Forget it...

भिकार्‍यांचंही जनधन अका उंट मोदीजींनी काढलं आहे.

आपापल्या कामवाल्यांची नड आपल्याकडचे पैसे देवून भागवली जाते आहे.

घरात साठवून ठेवलेला भाजीपाला किराणा राष्ट्रभक्त महिला इतर गरिबांशी श्यर करताहेत. अन तुम्हाला फक्त मोदीद्वेष दिसतो? :रागः

हार्टलेस कुणीकडले.

मनमोहन सिंगांच्या सरकारने २००५पूर्वीच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भाजपने हा निर्णय गरिबांवर अन्याय करणारा असल्याची टीका केली होती. गरिबांना नक्की कशाप्रकारे त्रास होऊ शकेल, यावर भाजपने चर्चाही घडवून आणली होती. आता सरसकट सर्वच नोटा बाद झाल्यानं हा त्रास प्रत्यक्षात अवतरला आहे.
>>>>

व्हॉटसपवर हा चर्चेचा विडिओ फिरत आहे

अंजली, भारत म्हणजे फक्त मुंबई पुणे चेन्नई बेंगलूरू कलकत्ता वगैरे नाही. ईथेही बरेच जण कार्ड पेमेंटशी संबंध नसलेले सापडतील. छोट्या शहर गावखेड्यात चिक्कार. मुळात छोट्या शहरात दैनंदिन गरजा भागवायच्या दुकानांतही कार्ड स्वाईपची सोय नसते. तर मग कार्ड असूनही तो काय फायदा Happy

१९७८ साली मोरारजी देसाई सरकार ने सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. जोपर्यंत काळा पैसा निर्माण करणार्या व्यवस्थेला आणी मानसिकतेला चाप बसत नाही तोपर्यंत ह्या घटना शॉर्ट-टर्म पब्लिसिटी आणी पॅनिक निर्माण करण्याव्यतिरिक्त अधिक परिणामकारक ठरू शकतील असं मला वाटत नाही.

संपूर्ण देशाच्या बायिंग पॉवर वर आणी कॅश फ्लो वर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता जास्त वाटते.

सामान्य माणसापेक्षासुद्धा लहान - मध्यम स्वरूपाच्या व्यवसायांना जास्त त्रास होईल असं वाटतं. आणी म्हणूनच एका उजव्या विचारसरणीच्या सरकारने हा निर्णय घ्यावा ह्याचं आश्चर्य वाटतं.

बाकी व्हॉट्सअ‍ॅप - फेसबूक वरच्या फॉरवर्ड्स ना अंत नाही. आजच वाचलं की देशासाठी ईतकं केलच पाहीजे, सैनिक गोळ्या खातात वगैरे. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, हे दोनच (नोटा बदलून आणणं आणी बंदुकीच्या गोळ्या खाणं) पर्याय आहेत का? काहीही झालं की सैन्य वगैरे मधे आणायचं हा त्या सैनिकांचा सुद्धा अपमान नाहीये का?

चिनूक्स च्या मतांना अनुमोदन!

अर्थात, जो कायदा आहे तो पाळलाच पाहीजे, ह्या मताचा (पापभीरू?) मी आहेच. Happy

मी त्या दुस-या धाग्यावर माझे अनुभव लिहीले आहेत.
काल मी चर हजार रूपये काढले. रांगा होत्या. रांगेत गरीब आणि मध्यमवर्गिय जास्त होते.
गेले चार दिवस बिना पैशांचे हाल झाले. पण क्रेडीट कार्डाने निभावून नेलं. आमच्या नांंदेड सिटीतल्या मार्केटात पाच सहा भाजीची दुकाने आहेत. पण त्यांच्याकडे क्रेडीट कार्ड चालत नाही. डी मार्टातली भाजी थोडी महाग आणि तितकीशी फ्रेश नसते. पण ती घ्यावी लागली नाहीतर मुलांच्या डब्याचा प्रश्न होता. पण अशा टाऊनशिप्समधे इतर प्रश्न भेडसावत नाहीत.

नांदेड सिटीतून बाहेर पडलं की वेगळीच दुनिया आहे. बँक उघडल्यानंतर पहिल्या दिवशी नांदेड सिटीपासून आनंदनगर पर्यंत प्रत्येक बँकेच्या बाहेर रांगा होत्या. काल कल्याणीनगरला पैसे मिळाले. सासू सास-यांची औषधे कार्डावर घेऊन दिली. त्यांचेही हाल झाले. पण त्यांना जुन्या नोटांवर औषधे मिळायला हरकत नव्हती. ती सूट दिली होती. ह्यांनीच आणली नाहीत कि मेडीकल वाल्याने त्रास दिला ते नक्की नाही सांगता येणार. पेन्शनर लोकांची पेन्शन आठ तारखेनंतर दिली असती तर बरं झालं असतं. नोटा बदलण्यासाठी त्यांना त्रास झाला नसता.

फेसबुक देशभक्तीवर ">फेसबुकवरचाच उतारा. याला गरागरा डोळे फिरवून देशद्रोह म्हणता येईलच.

"तीन किस्से
किस्सा एक - स्टेट बँक ऑफ पटियाला. छोटीशी शाखा आहे. एक मध्यम हॉल तिथेच सर्व टेबल कोपऱ्यात कॅशियर केबिन .
गेल्या तीन दिवसा पासून माझ्या हातात रक्कम नाही. एकच पाचशेची नोट. आणि काही सुट्टे. आज पैसे काढायला बँकेत गेले तर आजही ATM बंद होते बरेच . एक आजी कष्टकरी वर्गातली , चिंताग्रस्त चेहरा असलेली 500 च्या नोटा घेऊन आली . सहा हजार रुपये पिशवीतल्या पिशवीत ठेवलेले . मुख्य शाखा व्यवस्थापक पेक्षा छोटा आणि इतरांपेक्षा मोठ्या हुद्याच्या अधिकाऱ्याने आजीला स्लिप भरून दिली . आजीने पैसे स्वतःच्या खात्यावर जमा केले. काउंटर सोडतांना दोन्ही हाताला हलका झटका देऊन ( गेले या अर्थाने, किंवा जाऊ दे या अर्थाने) उदास चेहऱ्याने बाकावर बसली. एसी मध्येही घाम पुसत हलके पुटपुटत .मला वाटलं काही बोलावं तिच्याशी पण पाण्याची बाटली तिच्या पुढे केली आणि गप्पच राहिले. माझ्यात हिम्मत नव्हती तिची गोष्ट ऐकायची. खात्री आहे तीचं ATM कार्ड असणार आणि ते लेकाच्या, जावयांच्या , नाहीतर नातवाच्या ताब्यात असणार नक्कीच.
किस्सा दोन- नासर्डी नदी किनारा रात्रीचे साडे आठ
झाडाखाली एक आजी भाज्या विकायला बसते. चोळवटलेल्या भाज्या आज पण. वांगे 10 ला पावकिलो 15 ला अर्धाकिलो, ढोबळी मिरची 10 ला अर्धाकिलो, डांगर 10 ला अर्धाकिलो . इतक्या कमी भावात भाजी विकत हि आज्जी कडक थंडीत अजून बसलीय . यार्डात भाज्या घ्यायला पैसे नाहीत . लोकांकडे खरेदी ला पैसे नाहीत तीन दिवसा पासूनच्या भाज्या विकतेय आजी.मालाला उठाव नाही. एरव्ही तुटवडा निर्माण झाला कि भाव चढणार आता तुडवडा आहे आणि तरीपण भाव नाही. . शेतकऱ्यांकडून यार्डात व्यापारी खरेदी करणार तिथून हे छोटे व्यावसायिक घेणार आज इथे हि परिस्थिती तर शेतकऱ्यांच काय झालं असेल ?
किस्सा तीन- नासर्डी नदी किनारा रात्रीचे पावणे नऊ
भाजी घेऊन पुढे आले तर अजून एक बाई भाजी घेऊन बसलेली . घे ग ताई घे ना वांगे 10 ला देते घे अर्धाकिलो ... स्वर इतका अजिजीचा केविलवाणा . मी काय करू पोटात तुटायला झालं . घेतले हो इतक्यात वांगे तर म्हणते ये 5 नी देते. परत पाव किलो घेतले 10 रुपये दिले. देतांना मलाच लाज वाटत होती तिला काय वाटेल या विचाराने . काही ऐकायला न थांबता झपाट्याने निघून गेले "

- श्यामला चव्हाण.

<<काहीही झालं की सैन्य वगैरे मधे आणायचं हा त्या सैनिकांचा सुद्धा अपमान नाहीये का?>> नाहीये . सैनिक हे सुद्धा भारताचे नागरिक आहेत ते आपल्याकरता / आपल्या रक्षणाकरता सीमेवर उभे आहेत अशा परिस्थितीत सामान्य माणसांना जर त्यांचं उदाहरण दिल तर काय हरकत आहे ?
त्यातून ब्यांकेत काम करणाऱ्या लोकांच पण कौतुक करा. तहान भूक विसरून ते काम करत आहेत . त्यांच पण कौतुक करा असं सांगणारे मेसेजेस व्हाट्स अप वर फिरत आहेत . त्यातही काय चूक आहे ?

लोकांच्या गैरसोयीचे एवढं काय कौतुक ? कुठलाही बदल घडताना किव्वा अंगिकारताना सुरवातीच्या काळात थोडीफार गैरसोय होतेच .म्हणून बदल घडवायचे नाहीत का ? असाही व्हाट्स अप वर मेसेज फिरतोय ( खरं खोटं माहित नाही ) ८० वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी " प्रॉब्लेम ऑफ रुपी " या त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवल आहे कि भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशाने दर दहा वर्षांनी नोटा बदलल्या पाहिजेत." आज ८० वर्षांनी देशाला बाबासाहेबांचे अर्थ शास्त्रीय विचारांचे महत्व समजू लागलं आहे . इत्यादी इत्यादी. त्याप्रमाणे दर दहा वर्षांनी तर नोटा बदलल्या गेल्या नाहीत ना ?

<<<<< आज ८० वर्षांनी देशाला बाबासाहेबांचे अर्थ शास्त्रीय विचारांचे महत्व समजू लागलं आहे . इत्यादी इत्यादी. त्याप्रमाणे दर दहा वर्षांनी तर नोटा बदलल्या गेल्या नाहीत ना ? >>>>>>

<<<< लोकांच्या गैरसोयीचे एवढं काय कौतुक ? कुठलाही बदल घडताना किव्वा अंगिकारताना सुरवातीच्या काळात थोडीफार गैरसोय होतेच .म्हणून बदल घडवायचे नाहीत का ? >>>>>>>>>

सुजा ताई,

१००००००००००००००% सहमत !!

चलनात असलेल्या एकूण नगदीच्या जवळजवळ ८५% रक्कम ही ५०० आणि १००० च्या नोटांच्या रूपात होती. म्हणजे एका क्षणात नगद व्यवहार करणार्‍यांची ८५% टक्के लिक्विडिटी नाहीशी झाली. उरलेल्या १५% टक्क्यांत कारभार चालणार. त्यातलाही काही भाग बँकांकडे असणार. नवा साठा ४८ तासांनीच उपलब्ध होणार.
आर्थिक उतरंडीत जितकं खाली उतरू तितकं नगद व्यवहाराचं प्रमाण जास्त. म्हणजे त्रास झालाच तर तो खालच्या उतरंडीवरच्या लोकांना अधिक होणार.

आता या ८५% तल्या कितीनी काळा पैसा वाल्यांना ताप दिला आणि कितींनी बाकीच्या सामान्य माणसाला ताप दिला याचा हिशोब मांडता येईल का?

नकी किती काळा पैसा बाहेर येतो किंवा व्यर्थ होतो (इश्यु झालेल्या ५००/१००० च्या नोटा उणे जमा झालेल्या नोटा) ते कळल्यावर या उपायाच्या उपयुक्ततेबद्दल बोलता येईल. पण तूर्तास जे हाल चाललेत त्याकडे डोळेझाक करायची ?

परवा रात्री हजार पाचशेच्या नोटा बंद झाल्या तेव्हा माझ्या खिशात हजाराची एक, पाचशेची एक आणि शंभराच्या चारच नोटा शिल्लक होत्या. काल संध्याकाळी कामावरून सुटल्यावर मला डेंटिस्टकडे जायचे होते. म्हणून दुपारी सौ.ना फोन केला. "तू संध्याकाळी स्टेशनवर मला भेट. आपण बाजारात जरा फिरू. आपल्याला दोन प्लास्टिक मोल्डिंगच्या खुर्च्या घ्यायच्या आहेत ना, त्या घेऊ. मस्तपैकी मिसळ खाऊ. मग जाऊ डॉक्टरकडे". ती येते म्हणाली. पुढे मला विचारलं. "पैसे आहेत ना जवळ, खुर्च्या घ्यायला?" मी म्हटलं "हो आहेत ना, दीड दोन हजार माझ्याकडे!!" आणि मला आठवून मी ओरडलो "अरे देवा!!! त्या नोटा आता काही चालायच्या नाहीत." आणि आमच्या तोंडून हास्याचे स्फोट बाहेर पडले. आता काय करायचं? मी म्हटलं, " तू ये तर खरी! दोन 'मिसळ'ला तर काय शंभर सव्वाशे लागतील. तेव्हढे तर आहेत माझ्याकडे. मस्तपैकी मिसळ खाऊ. खुर्च्यांंचं नंतर पाहू, नवीन नोटा आल्यावर" आणि आम्ही दोघं हसायला लागलो. इतरवेळी खर्च करताना भसाभस नोटा काढणारा मी, दोन मिसळचा होणारा खर्च बोटांवर मोजत होतो. हो ना! त्याच चारशेच्या रूपयांवर अजून दोन चार दिवस काढायचेत ना! Rofl

भरत, तूम्ही चांगला मुद्दा मांडला की नक्की किती काळा पैसा बाहेर येतो ?

मी थोडी आकडेमोड काही तांसापूर्वी केली होती. त्या प्रमाणे ..

२८ आक्टो २०१६ च्या RBI अहवालाप्रमाणे, जनतेजवळ असणारा पैसा हा १७०१३ बिलियन रू आहे. साधारण ८० टक्के नोटा ह्या ५००, १००० च्या आहेत. म्हणजे, १३६११ बिलियन रू.

समजा ह्या पैकी २० टक्के हा काळा पैसा आहे. ( म्हणजे प्रॉपर्टी किंवा सोन्यात नसून, पैश्यात आहे) तर तो आकडा होतो, २७२२ बिलियन रू. ( हे समजा माझे % आहे, जे चुक असू शकते, पण काळा पैसा फ्लोट हा २०% पेक्षा जास्त आहे.)

SBI च्या काल संध्याकाळच्या वृत्तानुसार त्यांच्याकडे दोन दिवसात ३८६७७ करोड रूंचे डिपॉझिट्स जमा झाले आणि कॅनरा बँकेकडे ९००० करोड. ( नेट न्यू - एक्झेंजचा आकडा वेगळा दिला आहे.)

बरं हे फक्त दोनच बँकांचे आकडे आहेत. एकुण सगळ्या बँकाकडे १.५ लाख करोड रू जमा झाल्याच्या अंदाज आहे.

आता बेनिफिट ऑफ डाउट - ह्या ४७६७७ करोड रू. पैकी काही डिपॉझिट्स हे हाउसहोल्ड मनीचे असतील. म्हणजे पांढरे पैसे, पण जे घरात होते, समजा ५, १०,१५००० असे कधी कधी घरात असू शकतात. तर तो आकडाही काही करोड असेल. थोडक्यात ह्या दोन बँकांच्याकडे जमा झालेल्या रकमेपैकी ( ४७६७७ करोड पैकी) काही हजार करोड पांढर्‍यात ह्यात गेले. तर उरलेले हे ब्लॅक होतात. ती रक्कम नक्कीच कमी असेल कारण एक्चेंज अमाउंट ही साधारण २००० करोड ( ह्या दोन बँकामधूनच) आहे. म्हणजे अनेकांनी त्यांच्या हाउसहोल्ड पैश्याला डिपॉझिट न करता बदलून घेतले. पण तरी समजा अजून २५ टक्के हे हाउसहोल्ड डिपॉझिट्स आहेत. तर से ४७६७७ - २०% = ९५०० करोड म्हणजे ते ही गेले आणि त्याला आपण अजून संपूर्ण फिगर मध्ये बदलवले तर साधारण ३८००० करोड होतात. ( दोनच बँकांमध्ये)

आणि बँकर्स १.५ लाख करोड म्हणत आहेत. त्यातील अगदी ५ लाख करोड व्हाईट मनी ( जरा जास्त झाले) पकडले तरी १ लाख करोड रू ब्लॅक मधले जमा झाले.

आता ह्या आकड्याला गंमत म्हणून, एकूण २० टक्क्यांशी भागून पाहिले तर ४०% एस्टिमेटेड रक्कम ऑलरेडी गोळा झाली असे म्हणण्यास वाव आहे.

आणि अजूनही दिड महिना बाकी आहे.

माझ्या मते ही मूव्ह चांगली होती.

-

प्रतिवाद करायचा असेल तर मोदी कसे वाईट अन मी कसा भाजपाचा आहे वगैरे विचारातून बाहेर येऊन जरा रॅशनल, आकड्यात प्रतिसाद दिला तर वाचायला ही मजा येईल. गोलगोल प्रतिसादांचा कंटाळा आला आहे. पण हे पाऊल केवळ मोदींनी उचलले म्हणून त्रास होतो आहे, तर त्याला काही पर्याय नाही. म्हणून रॅशनल प्रतिवाद असेल तर कदाचित तुमची मते मलाही मान्य होऊ शकतात. पण सध्यातरी आकडेवारी ही मोदींच्या बाजूने आहे.
-
आणि हो. असे असे झाले, काय करावे? ह्याचा पण. त्या सगळ्या घटना, संप असल्यावर, बंद असल्यावर, दहशतवादी हल्ल्या ही होतात. कम्पॅरिझन करत नाही ये. पण संप, बंद हे भारतात नविन नाहीत. कोणीही दगड कुठेही, कधीही मारतो.

एवढे लिहूनही अनेकांना त्रास झाला, हे मान्य आहे. त्यात दुमतच नाही. पण काहीच करायचे नाही, अन ब्लॅक मनी सुद्धा गोळा करायचा. असे होऊ शकत नाही. ह्यात देशभक्ती वगैरे नसून सरकारने श्रुड पाउल उचलले आहे. जे माझ्यामते चांगले आहे.

काळा पैसा बाहेर येताना मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे ते खरेच आहे.
मोदीजींमुळे त्रास होतो याला काही एक अर्थ नाही. काल व्हॉट्स अ‍ॅप वर जेटलींची एक न्यूज मिळाली. जेटलींनी चलन रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केली म्हणून पीएम वर कडकडून टीका केली असा मेसेज होता. त्यात झी न्युजची बातमी चिकटवलेली होती. नीट पाहिलं तर ती २००७ ची होती.

थोडक्यात, याला,काहीच अर्थ नाही. यांनी निर्णय घेतला की ते रडतात, त्यांनी घेतला की हे रडतात. अमेरिकेत पण असंच चालू आहे. ओबामांना सिनेट सहकार्य करत नाही वगैरे. चीनचा विकास होण्याचं कारण बहुतेक हेच असावं की निर्णय घेणा-याच्या मागे शासन शंभर टक्के असते.

नक्की किती काळा पैसा बाहेर येतो किंवा व्यर्थ जातो याबद्दलचे आकडे अजूनतरी अंदाजपंचेच आहेत..
पण तो एकूण काळ्या पैशाच्या किती प्रमाणात असेल हेही महत्त्वाचे आहे. आणि ते प्रमाण नगण्य असेल असं म्हणणारेही तज्ज्ञ आहेत. नव्हे भाजपचेही मे २०१४ पूर्वी हेच म्हणणे होते.
आताही सोन्याच्या आणि हवाल्याच्या मार्गाने काळ्या पैशाला वाटा फुटल्याच आहेत.
तर सामान्य लोकांना झालेली एकंदर गैरसोय (आता याला हाल अपेष्टा म्हणायचं की गैरसोय हे तुम्ही कुठे उभे आहात यावर ठरेल.) आणि त्या तुलनेत मिळालेला अपेक्षित रिझल्ट यांची गोळाबेरीज व्हायला हवी.

सडन लिक्विडिटि क्रंचमुळे ठप्प झालेले व्यवसाय (उदाहरण : सिनेमा थेटरे रिकामी असणे, महाराष्ट्र एस टीचं एका दिवसात ४ कोटींचं नुकसान, ही ठळक उदाहरणं) यामुळे जीडीपीवर किती परिणाम होईल , तोही तराजूच्या एका पारड्यात घालायला हवा.

याच जोडीने ज्यांचा व्यवहार प्रामुख्याने नगदीत चालतो अशा धंदेवाल्यांना सोसाव्या लागलेल्या नुकसानीची तीव्रता जास्तच असेल.ती गैरसोय या लेबलात मावेल का? मायबोलीवर लिहू शकणारे लोक नगदीशिवाय मॅनेज करू शकणार्‍या वर्गातले आहेत. तरीही आपले खर्च पुढे ढकलतीलच. ज्यांना आणि जे खर्च असे पुढे ढकलता येत नाहीत त्याचं काय?
घरात मयत झालं तर त्याचा शोक करण्याआधी अंत्यसंस्काराचा खर्च करायला नोटा कुठून आणायचा असा प्रश्न. नात्यात मयत झालं तरी प्रवासासाठी नोटा नाहीत म्हणून जाणं शक्य नाही.

देशहितासाठी एवढंसं सोसा असं म्हणणं सोपं आहे. त्यातून तो देशहिताचा कस्तुरीमृग की कांचनमृग हाती येईल तेव्हा खरं.
सध्या तरी नोटाबंदीच्या नावावर नेहमीच्याच वर्गाचे उखळ पांढरे होताना दिसतेय. चक्क मीठ टंचाईच्या अफवा?

<<<<< चलनात असलेल्या एकूण नगदीच्या जवळजवळ ८५% रक्कम ही ५०० आणि १००० च्या नोटांच्या रूपात होती. म्हणजे एका क्षणात नगद व्यवहार करणार्‍यांची ८५% टक्के लिक्विडिटी नाहीशी झाली. उरलेल्या १५% टक्क्यांत कारभार चालणार. त्यातलाही काही भाग बँकांकडे असणार. >>>>>

<<<<<२८ आक्टो २०१६ च्या RBI अहवालाप्रमाणे, जनतेजवळ असणारा पैसा हा १७०१३ बिलियन रू आहे. साधारण ८० टक्के नोटा ह्या ५००, १००- च्या आहेत. म्हणजे, १३६११ बिलियन रू. >>>>>>

जर वरचे दावे खरे असतील तर ५०० व १००० च्या किती नोटा सरकारला आता पर्यंत छापल्या असाव्यात हे
खालील आकडेमोडी ने दाखवता येईल

एकुण रुपये
१३६११ बिलियन रू. = रुपये 13611,000,000,000

जर एकुण रुपयांमध्ये ५०० रु च्या नोटा जर ७५ % आहेत अस धरल तर
13611,000,000,000 *0.75 = 10208,250,000,000

204,65,00,000 (500 Notes)
२०४६५ कोटी नोटा ५०० रु च्या

जर एकुण रुपयांमध्ये १००० रु च्या नोटा जर २५ % आहेत अस धरल तर

13611,000,000,000 *0.25 = 34027,500,000,000
340, 27,50,000 (1000 Rs Notes )
३४० कोटी नोटा १००० रु च्या

वर्ल्ड बँकेच्या डेटा नुसार ३३% भारतीय जनता शहरात रहाते, पण जर अजुनही आपला देशातले ८० ते ९०%
व्यवहार हे रोख पैश्यात होत असतील तर कठीण आहे, हेच जर बँकेच्या थ्रु तसेच पॅस्टीक , मोबाईल , पे टि एम मनीच्या थ्रु झाले तर २०८०५ कोटी नोटा ( ५०० व १००० च्या नोटा) छापण्याची गरज रहाणार नाही .

Pages