तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
मोदीजींनी निर्णय घेतला म्हणून
मोदीजींनी निर्णय घेतला म्हणून त्रास होतो म्हणणारे पण एककल्लीच आहेत आणि राष्ट्रभक्तीच्या आडून झोडण्याची संधी साधणारे वाटताहेत. त्यांचे लिखाण काही तटस्थ बिटस्थ अजिबात वाटत नाहीये. त्रास खरोखर होतोय आणि तो लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. अमेरिकेत चारशे डॉलरवर महिना काढता येऊ शकेल पण जर प्लास्टिक कार्ड्स बंद झाली तर याचा विचार करा की.
हे जेटलीजी पण काय म्हणत होते ते तारखा काढून फिरवलं जातंय. हे पण दुसरं टोक. अर्थात तारीख बदलली की जेटलीजींची मतं १८० च्या कोनात बदलतात हे पण विचित्रच.
http://blogs.timesofindia.indiatimes.com/sanjeev-singh-blog/how-bjp-had-...
सडन लिक्विडिटि क्रंचमुळे ठप्प
सडन लिक्विडिटि क्रंचमुळे ठप्प झालेले व्यवसाय (उदाहरण : सिनेमा थेटरे रिकामी असणे) यामुळे जीडीपीवर किती परिणाम होईल , तोही तराजूच्या एका पारड्यात घालायला हवा. >>
आता तुम्ही एकदम दुसराच मुद्दा घेत आहात. त्याला ऑपॉर्च्यूनिटी कॉस्ट म्हणतात. ती सगळ्या गोष्टीत येते. अगदी अमेरिकेत राहू की भारतात राहून काम करू ह्या मध्येही. पण ह्या मुद्द्याचा (ऑपच्युनिटी कॉस्टचा ) ब्लॅक मनी कमी करणे / होणे आणि लिगल टेन्डर करंसी डुप्लिकेशन करणे ह्याच्याशी काहीही संबंध नाही.
शिवाय हातावर पोट घेऊन जगणारे ५०० ची नोट घेऊन मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन सिनेमा पाहतात का? ह्याचापण विचार करावा लागेलच ना? आणि शहरात सिनेमा थीएटर प्लास्टिक मनी घेते, त्यामुळे तसाही ह्या व अश्या मुद्द्यात अर्थ राहत नाही.
उद्या कोणीतरी ५००ची डुप्लिकेट नोट घेऊन येऊन म्हणले, माझे ५०० आहेत, मला काय माहित की ही डुप्लिकेट नोट आहे. भावनिक दॄष्ट्या बरोबर असले तरी अगदी मनमोहन सरकारच्या काळातही बँका ते ५०० जप्तच करत होते, तो माणूस गरीब असो वा श्रीमंत. अगदी तसे आहे हे. ह्यात त्या ५०० मध्ये तो गरिब / मध्यमवर्गिय / श्रींंमत काय करेल ह्याचा विचार बँक करत नव्हती.
गोल्ड - बरोबर., अनेकांनी सोने घेतले, पण तिथेही पॅन कार्ड द्यावे लागतेच. त्यांच्या त्या खरेदीसाठी, सोने विक्रेते जबाबदार राहणार आहेत. त्यामुळे IT ला तिथे पोचणे सोपे आहे. अर्थात सगळे १००% होईल असे नाही, पण इच्छा तिथे मार्ग आहे.
राहिला प्रश्न तज्ञांचा. ते दोन्ही कडून बोलातात. सध्या तरी त्यांनी आकडेवारी पाहावी. काही दिवस जाउ द्यावेत . (मजेतच लिहायचे झाले तर - मोदी येणारच नाहीत, भाजपाला २५० पार करणे अवघड आहे, असेही तज्ञ लोकंच सांगत होते.)
------------------
माझ्यामते ५००, २००० चा नोटा यायला नको होत्या. कारण अजून १० वर्षांनंतर २००० च्या नोटांमध्ये देशात फिरणारा ब्लॅक मनी साठवला जाईल. प्लास्टिक मनीचा प्रसार आणि प्रचार करणे जरूरी आहे.
Whats App सकाळी सकाळी एक
Whats App
सकाळी सकाळी एक पेशंट कुरकुर करत होता . 'डॉक्टर तुमच्याकडे काही च तयारी नव्हती तर मला ऑपरेशन टेबलावर घेतलेच कशाला ? किती त्रास झाला . भुल चढली नाही ; ऑक्सिजन मध्येच संपला ; वेदनाशामक दिले नाही; गाठ पिशवीला होती तुम्ही चांगली किडनीही कापली . आणि ऑपरेशन झाल्यावर तुम्ही ढुंकुन पहायला ही आला नाहीत सरल फॉरेनला निघुन गेलात . ' माझ्या कंपॉउंडरने त्याला चांगलेच सुनावले ; ' तिकडे सैनिक छातीवर गोळ्या झेलत आहेत आणि तुम्हाला थोडा त्रास सहन होत नाही?' पेशंट चे तब्येज जास्तच ढासळली म्हणुन काय झाले ? देशद्रोही कुठले !
आजच्या वर्तमानपत्रात
आजच्या वर्तमानपत्रात जनधनयोजनेच्या खात्यांविषयी बातमी आहे. अनेक खात्यांत आतापर्यंत एक दोन रुपये बॅलन्स असायचा तो एकदम ४९००० दिसू लागला आहे. या लोकांना हाताशी धरून काळ्या नोटा पांढर्या करण्याचा व्यवसाय तेजीत आहे. आणि हे खूप मोठ्या प्रमाणात चालले आहे. काही दिवसांनी हे पैसे अधिकृत चलनात काढून घेतले जातील. बँकांकडे प्रचंड लिक्विडिटी आली आहे आणि यामुळे बँका व्याजदर कमी करतील असे मत व्यक्त झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्समध्ये आर के लक्ष्मण यांचे मोरारजीभाईंनी नोटा रद्द केल्या त्या वेळचे एक सद्यस्थितीला अगदी चपखल बसणारे व्यंगचित्र आले आहे. जमल्यास कोणीतरी लिंक द्या. मला देता येत नाहीय. काळापैसारूपी एका मोठ्या बलदंड वाघासाठी एक छोटासा खेळण्यातला पिंजरा -उंदिर पकडण्याचा चाप असतो तसा-लावलाय. त्यात त्या वाघाच्या शेपटीचे टोकही मावत नाहीय आणि समस्त नेतेमंडळी झाडामागे लपून मांडे खाताहेत की कसं पकडलंय बेट्याला किंवा आता अडकवलं की नाही तुला, आता कसा पळून जाशील वगैरे. वाघाच्या आणि नेतेगणांच्या चेहर्यावरील भाव तंतोतंत पकडले आहेत. वाघाची गुर्मी आणि नेतेगणांचा हवेतला विजयोन्माद. ज्याला शक्य होईल त्याने नक्की पाहावे हे व्यंगचित्र.
हातावर पोट घेऊन राहणारे
हातावर पोट घेऊन राहणारे मल्टिप्लेक्सात सिनेमा बघायला जातात का? या प्रश्नावरून त्या फेमस राणीची आठवण झाली. सिनेमा थेटरं ओस पडणं हे एक उदाहरण दिलं, व्यवसायावर परिणाम होण्याचं, पुढलं दुसरं उदाहरण एस टीचं दिलंय. एक फेसबुक पोस्ट आहे भाजीवाल्या बायांची.
<पण ह्या मुद्द्याचा (ऑपच्युनिटी कॉस्टचा ) ब्लॅक मनी कमी करणे / होणे आणि लिगल टेन्डर करंसी डुप्लिकेशन करणे ह्याच्याशी काहीही संबंध नाही.> अर्थव्य्वस्थेशी तर संबंध आहे ना? एक दिवसाच्या भारत बंदने जीडीपीवर परिणाम होतो की नाही? तसाच? आणि जीडीपी हे काही फक्त आकडे नाहीत. त्याचा माणसांच्या जगण्याशी संबंध आहे. बंदचा फटका जसा रस्त्यावरच्या माणसाला सग़ळ्यात जास्त बसतोम तसाच नोटा बंदचाही. आता तो माणूस तुमच्या जीडीपीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा नसेल कारण तो अदानी अंबानी किंवा बाबा रामदेव नाही. पण त्याच्याजागी त्याचं होणारं नुकसान आहेच. आणि अशा लोकांची संख्या किती? त्यांने भोगलेल्या सफरिंगच्या तुलनेत इप्सित फळ मिळण्याचा फायदा किती? हा हिशोब आतातरी उपलब्ध नाही. पण तो 'थोडीशी गैरसोय' या लेबलात मावेल इतका नसावा.
गोल्ड - बरोबर., अनेकांनी सोने
गोल्ड - बरोबर., अनेकांनी सोने घेतले, पण तिथेही पॅन कार्ड द्यावे लागतेच. >>> काही पण. तुम्हाला काहीच माहिती नाही असं दिसतंय. ३१००० भाव असताना ४१००० घेऊन व्यवहार झाले आहेत मागच्या तारखेने. सोन्याला मागणी आल्याने ते ३४००० रु, झाले. म्हणून आता ४५००० रु द्यावे लागतात. सोनारांची पद्धत माहीत करून घ्या. त्यांना रोखीने व्यवहार करण्याची गरज नसते. ८ ला बंदी घातली तरी ते १९ तारखेपर्यंत व्यवहार करू शकतात.
शिवाय सहा महिन्यांचा पगार आगाऊ देईन अडीच लाख रक्कम बँकेत जमा करायला सांगितली गेली आहे. याशिवाय फक्त २०% देऊन महीन्यात ब्लॅकचे व्हाईट करून देतो म्हणणारे आहेत. ते किती सेफ माहीत नाही. पण बहुतेक जनधन योजनेची झिरो बॅलन्स अकाउंट्स असावीत.
शासनाकडे ज्या नोटा जमा झाल्या आहेत त्या बँकेत जमा करायला अवधी आहे. त्यामुळं त्यातल्या नव्या किंवा शंभराच्या नोटा परस्पर बदलल्या गेल्या तर ? हेच अनेक ठिकाणी कॅशियर मंडळी करू शकतात. म्हणजे लूप होल्स तसेच ठेवले आहेत. त्याची माहिती सामान्यांना नाही.
https://www.scoopwhoop.com/RK
https://www.scoopwhoop.com/RK-Laxmans-Cartoon-From-1978-When-Large-Curre...
ते कार्टुन
हीरा, <<< आजच्या
हीरा,
<<< आजच्या वर्तमानपत्रात जनधनयोजनेच्या खात्यांविषयी बातमी आहे. अनेक खात्यांत आतापर्यंत एक दोन रुपये बॅलन्स असायचा तो एकदम ४९००० दिसू लागला आहे. या लोकांना हाताशी धरून काळ्या नोटा पांढर्या करण्याचा व्यवसाय तेजीत आहे. आणि हे खूप मोठ्या प्रमाणात चालले आहे. >>>>>
बँकेत रु ३०,००० च्या वर जमा करताना पॅन कार्ड नंबर द्यावा लागतो, न देता जर लोकांच्या खात्यात पैसे जमा केले व नंतर जबरदस्तीने काढुन घेणार अस जर हे खर असेल तर आपल्या सिश्टीम मध्ये करप्शन किती खोल वर आहे ह्याचा विचार करा !!
मिडीयात आलेल्या माहीती
मिडीयात आलेल्या माहीती प्रमाणे बँकेतल्या सिसिटिव्ही कॅमेरा वर सुद्धा आयकर विभाग लक्ष ठेवुन आहे !!
बँकेतल्या सिसिटिव्ही कॅमेरा
बँकेतल्या सिसिटिव्ही कॅमेरा वर सुद्धा आयकर विभाग लक्ष ठेवुन आहे !! >>
किती स्ट्रेंन्ग्थ आहे आयकर विभागाची ?
अहो जाधव, ती मर्यादा ५०,०००
अहो जाधव, ती मर्यादा ५०,००० रुपये पन्नास हजार अक्षरी. म्हणूनच ४९,००० वर थांबले लोक.
रॉ, सीबीआय आणि तिन्ही
रॉ, सीबीआय आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही आहेत ना लक्ष ठेवून?
हातावर पोट घेऊन राहणारे
हातावर पोट घेऊन राहणारे मल्टिप्लेक्सात सिनेमा बघायला जातात का?
अरेरे काय पण दुखणी आहेत एकेकाची !!!
धन्यवाद अनिलचेंबुर. आर केंचं
धन्यवाद अनिलचेंबुर.
आर केंचं एक उत्कृष्ट कार्टून. प्रत्येकाने त्यातल्या उपहासासाठी जरूर पाहावं.
काही पण. तुम्हाला काहीच
काही पण. तुम्हाला काहीच माहिती नाही असं दिसतंय. >>
सोनारांची पद्धत माहीत करून घ्या >>
हो शक्य आहे. मला काही माहिती नाही, किंवा सोन्याबद्दल कळतही नसावे. तुम्ही माहिती द्या. नक्कीच वाचेन. अन माहिती करून घेईन.
पण पोस्ट मध्ये उधारीवरचे व्यवहार आणायचे नव्हते. मग ते अनएन्डिंग अन ओपन टू इंटरप्रिटेशन राहते. उदाहरणार्थ - हातावर पोट असलेल्या अन सीग्नलवर चायनिज वस्तू विकणार्या माणसाचा धंदाही उधारीवरच चालतो. असे य धंदे मी पण लिहू शकतो.
पण फायदा काय? म्हणूनच आकडेवारी दिली. ती देखील तूम्ही खोडून काढू शकता. खोडली तरी चालेल. कारण ती माझी नाही तर RBI ची आकडेवारी आहे. त्यांच्या साईटवर मिळेल. मी डेट त्यामुळेच दिली.
अर्थव्य्वस्थेशी तर संबंध आहे ना? >> सगळ्या गोष्टींचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोच. पण व्यवहार ठप्प झाले असे नाहीये. पण तुम्हाला ह्या सगळ्याचा परिणाम होतो पण ब्लॅक मनीचा नाही असे म्हणायचे आहे का?
शिअर अमाउंट ऑफ मनी चेंजड आणि सोने विक्री पाहिली तर ब्लॅक मनीच्या प्यारलल अर्थव्यवस्था दिसते आहे. तिला थांबवणे / थोडा लगाम घालणे जरूरी नाही?
ते गोलगोल गोलगोल लिहिणे नको हे त्यामुळेच लिहिले. मला नक्कीच पुढेही चर्चा करायला आवडेल, पण काही तरी सांखीकिय असले तर बरे. जनरली अर्थविषय्क पोस्ट मी आकड्यात लिहितो. त्या सगळ्या चुकीच्या दाखवल्या तर ते मान्य करायला त्रास होणार नाही.
सपना,
सपना,
http://www.incometaxindia.gov.in/Pages/about-us/manpower.aspx
मोदीजींनी दोन वर्षांपूर्वी
मोदीजींनी दोन वर्षांपूर्वी पाच हजार आणि दहा हजाराचे चलन आणले असते तर आत्ता पर्यंत ५०० आणि हजाराचे चलन या नोटांमधे कन्व्हर्ट झाले असते आणि सगळे काळे धंदेवाले जाळ्यात अलगद सापडले असते. पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द न झाल्याने सामान्यांना अजिबात त्रास झाला नसता.
मोरारजी देससिंणि एक, पाच आणि दहा हजाराच्या नोटा रद्द केल्या तेव्हां एक हजारची नोट खूओअप मोठ्या रकमेची होती. ती कुणीच वापरत नव्हते त्यामुळे कुणाला त्रास झाला नाही असं वाचलं. ते खरं असेल.
हो शक्य आहे. मला काही माहिती
हो शक्य आहे. मला काही माहिती नाही, किंवा सोन्याबद्दल कळतही नसावे. तुम्ही माहिती द्या. नक्कीच वाचेन. अन माहिती करून घेईन. >>> कालपासून ते तीन धाग्यांवर लिहीलेले आहे. वेळ मिळाला की शोधून वाचून घ्या. इतकं रागवायला नको कै लगेच..
आता कामं आहेत. निदान पाच सहा तास तरी येणं होणार नाही मायबोलीवर. भेटू नंतर.
तुम्ही दिलेल्या आकड्यांपैकी
तुम्ही दिलेल्या आकड्यांपैकी चलनांत असलेल्या नोटा आणि त्यताल्या ५००/१००० च्या किती याच फॅक्ट आहेत. बाकी अंदाज आहेत.
ब्लॅक मनीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत नाही असं मी कुठे म्हटलं? दोन पारडी म्हटलीत ना?
<पण पोस्ट मध्ये उधारीवरचे व्यवहार आणायचे नव्हते. मग ते अनएन्डिंग अन ओपन टू इंटरप्रिटेशन राहते. उदाहरणार्थ - हातावर पोट असलेल्या अन सीग्नलवर चायनिज वस्तू विकणार्या माणसाचा धंदाही उधारीवरच चालतो. असे य धंदे मी पण लिहू शकतो.>
तो उधारीवर घेतो. पण विकतोही उधारीवरच का? त्याची विक्री बंद पडलीय. तो उधारी कशी फेडणार? जे नाशवंत माल विकतात ते काय करतील?
हा धागा "थोडीशी गैरसोय" बद्दल आहे. त्यामुळे त्यावरच माझा फोकस आहे.
जेव्हा आकडेवारी येईल (जी किती विश्वसनीय आहे हाही प्रश्नच आहे - सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड - जीडीपीपासून धान्य- उत्पादनाच्या आकडेवारीपर्यंत लोकांना= तज्ज्ञांना शंका आहेत) तेव्हा त्यावर बोलू,
जनधन योजनेतल्या खात्यात ४९०००
जनधन योजनेतल्या खात्यात ४९००० रु प्रत्येकी टाकुन नंतर सोईस्कर रित्या काढुन घेणार हे बँकेतल्या करप्ट
लोकांच्या सहकार्या शिवाय होणार नाहीच त्यामुळे त्या काळ्यापैश्याला हातभार लावणार्या लोकांवरही कारवाई केली पाहीजे !!
बाकी अंदाज आहेत. >> त्यातील
बाकी अंदाज आहेत. >> त्यातील २० टक्के हाच अंदाज आहे. RBI आणि SBI तसेच कॅनरा बँकेच्या रकमा फॅक्ट आहेत. मी २० टक्के अंदाज कमी म्हणून ठेवला आहे. खरेतर त्यापेक्षा जास्त ब्लॅक मनी आहे.
व्हा आकडेवारी येईल (जी किती विश्वसनीय आहे हाही प्रश्नच आहे - सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड - जीडीपीपासून धान्य- उत्पादनाच्या आकडेवारीपर्यंत लोकांना= तज्ज्ञांना शंका आहेत) तेव्हा त्यावर बोलू, >>
ओके ठिक. आकडेवारी सरकार नाही, बँका प्रसिद्ध करतेय.
या धाग्यावर अर्थशास्त्रीय
या धाग्यावर अर्थशास्त्रीय प्रतिसाद अपेक्षित आहेत की लोकांची किती गैरसोय झाली किंवा नाही याचे अनुभव सिंबा?
या धाग्यावर अर्थशास्त्रीय
या धाग्यावर अर्थशास्त्रीय प्रतिसाद अपेक्षित आहेत की लोकांची किती गैरसोय झाली किंवा नाही याचे अनुभव सिंबा?>>>> +११११११
साती, काल तुम्ही लिहिलेलंत की
साती, काल तुम्ही लिहिलेलंत की तुमच्याकडच्या पेशंटसची संख्या खूप रोडावलीय. लोक आजारपणं अंगावर काढताहेत. ही कसली अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणायची?
माझी काडीमात्र गैरसोय झाली
माझी काडीमात्र गैरसोय झाली नाही.
बातमी आली तेव्हा मी मैसूरला होते आणि शंभराच्या काहीच नोटा माझ्याकडे होत्या.
एका छोट्या दुकानात पाळणा घ्यायला गेलो.
दुकानदाराला तोपर्यंत कल्पना नसल्याने १५०० रु चा पाळणा ५००च्या तीन नोटा देऊन घेतला.
मग दुसर्या दिवशी बारशाकरिता सजावटीचं सामान/गजरे/फुलांच्या माळा आणायच्या होत्या तर तसले विकणार्या लोकांनी आवर्जून शंभर आणि कमी मूल्याच्या नोटाच घेतल्या.
फुले विकणार्या तर जख्खड आजीबाई होत्या तरिही त्यांना ५००/१००० च्य नोटा घ्यायच्या नाहीत हे माहित होते.
परतताना एअपोर्टवर खाण्यापिण्याचं सामान घ्यायला कार्ड स्वाईप केलं.
आणि हैद्राबादपासूनतर आमची गाडीच होती घरी यायला.
तेव्हा कुठेही पैसे द्यायची वेळ आली नाही.
घरी आल्यावर मात्र पेशंटांकडून जुन्या नोटा घ्यायच्या की नाही असा प्रश्न होता.
मूळात पेशंटच आले नेहमीपेक्षा १/३.
पण जुन्या नोटा घेतल्या.
कालतर इतरत्र जुन्या नोटा घेत नाहीत म्हणून आमच्या हास्पिटलात पेशंट अॅडमिट झाले किंवा मेडिकल शॉपमधून औषधे घेऊन गेले.
एक हेड इंज्युरीची पेशंट तर सकाळी ७पासून वेगवेगळ्या हास्पिटलांत ट्राय करून शेवटी दुपारीएक वाजता आमच्याकडे आली.
सीटी स्कॅनकरता कोणीही जुन्या नोटा घेत नव्हते तर आम्ही पैसे बदलून दिले स्कॅनिंग सेंटरला आणि स्कॅन करून घेतला.
तर अशाप्रकारे गावोगावच्या अडल्यानडल्यांकडून आम्हाला आशीर्वादच भरपूर मिळाले.
म्हणून नमो नमः.
बाकी हे काय आमचंच गाव आहे आणि मी वर्षभर किराणा/भाजी किंवा इतर सामानाचे पैसेही न देता आरामात राहू शकते क्रेडीटवर.

भरत, मला स्वतःला फायदाच
भरत, मला स्वतःला फायदाच झाला.

पेशंट पुरेश्या माहितीअभावी आजारपणे अंगावर काढत घरी बसलेत (हॉस्पिटलांत अजून तीन दिवस नोटा घ्या म्हणून नियम आलाय काल) किंवा वडापच्या गाड्यांनी यायलाही नोटा नाहीत लोकांकडे.
मात्र के आर टी सी वाल्यांनी (स्टेट ट्रान्सपोर्ट) अक्षरशः फुकटात आणले अडल्या नडल्या पेशंटाना आणि बँकेत यायला निघालेल्या म्हातार्या कोतार्यांना.
आज १२ तारखेला सकाळी ९ वाजता
आज १२ तारखेला सकाळी ९ वाजता मी जुनी ५०० ची नोट देऊन आवश्यक किराणा माल इथल्याच किराणा दुकानदारा कडुन घेतला. काल १००० ची नोट मोडून औषधे मिळाली .२३५ सुट्टे नव्हते दुकानदाराकडे परत द्यायला त्याने मला त्याची चिठ्ठी दिली ती नंतर केव्हाही दाखवून पैसे / औषधे घेता येतील. भाजी मंडीत ५०० नोट देऊन १०० ची पाच कुपन मिळाली ती वापरुन भाजी घेता आली. (सर्व भाजी वाल्यांनी एकत्र येऊन ही शक्क्ल काढली आहे !) मी आणि माझ्या मित्र दोघांनी मिळून ५०० चे पेट्रोल भरुन घेतले.
सगळी कडे असले जुगाड चालू आहेत. त्याहुनी काही किरकोळ अडचण झाली तर काय त्यात?
अर्थातच इकडे आपले ,
अर्थातच इकडे आपले , दुसर्यांचे सोयी/गैरसोई चे अनुभव अपेक्षित आहेत.
मात्र एखादा पोइन्त मांडण्यासाठी थोडीशी आकडेमोड झालीच तर त्याची मदतच होईल.
केदार तुम्ही आकडे दिलेच आहेत म्हणून मी मांडतो ,
जन धन चे तोतल खाती २५ करोड
RBI म्हणते २५% ते ४०% खाती फेक किंवा दुप्लीकेत आहेत. ज्याचे KYC नाही, PAN लिंक्ड नाही. थोडक्यात त्या खात्यातल्या व्यवहारासाठी कोणाला पकडायचे माहित नाही.
आणी अशी खाती नवीन उघडायला काहीही बंधन नाही.
आपण २५ % घेऊ म्हणजे खोटी खाती मिनिमम ६ करोड
यातले ५०% खाती जरी १ लाख स्वीकारून लगेच check/ NEFT करू शकत असतील तरी ३ लाख करोड काळ्याचे पांढरे करून देऊ शकतात, ते पण भारता बाहेर,
IT ला त्रीगर मिळून कारवाई होण्या अगोदर त्रीप्पिंग पूर्ण होईल, खात्याचे जीवित कार्य संपले, मग ते खते बन्केने सील केले तरी चालेल.
अर्थात हे खूप क्रूड पद्धतीत लिहिले आहे, गुन्हेगार यापेक्षा बरेच स्मारट असतात.
असो..
"सैनिक हे सुद्धा भारताचे
"सैनिक हे सुद्धा भारताचे नागरिक आहेत ते आपल्याकरता / आपल्या रक्षणाकरता सीमेवर उभे आहेत अशा परिस्थितीत सामान्य माणसांना जर त्यांचं उदाहरण दिल तर काय हरकत आहे ?" - ह्याच लॉजिक ने म्हणायचं तर सैनिक त्यांचा जॉब करताहेत आणी कुठल्याही प्रामाणिकपणे आपलं काम करणार्या माणसां चं काम तितकच तोलाचं आहे.
माझा धागा काढायचा उद्देश
माझा धागा काढायचा उद्देश सांगतो.
नोटा रद्द करायचा निर्णय चांगला/ वाईट ते येणारा काळ ठरवेल
आता तरी लोकांना हा काळ्या पैशावरच जालीम उपाय वाटतो आहे.(तसा तो खरच ठरो हि देवाकडे प्रार्थना)
आणी अजून तरी हा निर्णय चुकला असे कोणी म्हणत नाही आहे,
लोकांचा सूर योग्य निर्णय, कमी होम वर्क आणी गड्बडलेली अंमल बजावणी असाच आहे.
मात्र म्हणून आपण सुशिक्षित मध्यम वर्ग ज्याला अगदीच थोडीशी गैरसोय सहन करायला लागत आहे (थोडी म्हणजे अगदी गंमत वाटावी इतपतच ) , ज्या वर्गाची हातातोंडाची गाठ आहे त्या वर्गाने कसे वागावे हे ठरवतो आहे का?
आज ज्या ७० वर्षाच्या वृद्धाला हातात पैसे नाहीत म्हणून घेरी चूल पेटणार नाही अशी परिश्तिती आहे, तो जर नोटा बदलून मिळाव्या म्हणून २-३ तास उन्हात रांगेत उभा राहत असेल तर त्याला पण या निर्णयाबद्दल तेच वाटत असेल का जे वर उल्लेखलेल्या वर्गाला वाटतंय?
आणि असे वेगळे वाटणारा वर्ग जर ७०% असेल (since only ३०- ३५% पिपल have banbking access) तर मग आपण देशभक्ती च्या नावाखाली त्यांना खिजवत आहोत का?
(तुम्ही त्रासाबद्दल कुरकुरताय, यु आर लेस पत्रिओत)
Pages