तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर  असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
 Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला  तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी  सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
 
 
ATM चे कॅलीब्रेशन हा फारच
ATM चे कॅलीब्रेशन हा फारच फालतू मुद्दा आहे
एका मशीन ला कॅलिब्रेत वयाला किती वेळ लागतो? कंपनीप्रमाणे/ मोडेल प्रमाणे हा नोन पारामीटर आहे,
कॅश भरणाऱ्या कंपन्यांची शक्ती हा नोन parameter आहे.
हे factor स्र्प्राएइज़ म्हणून यायला खरच नको होते
हे सगळे factor consider करून प्लानिंग करता येत नसेल तर या सरकार चे कठीण आहे
यांच्या कडे मकांझी सारख्या कॉन्सुल्तांत कंपन्या आहेत तरी यांना प्रोजेक्ट प्लानिंग जमू नये?
मी बहुतांशी प्रतिसाद वाचले
मी बहुतांशी प्रतिसाद वाचले नाहीत.
माझा अनुभव - गेले तीन दिवस जपून व अत्यावश्यक गोष्टीसाठी पैसे खर्च केले. नेहमीच्या वाण्याने चक्क सुट्ट्याचा वांधा म्हणून १८४ रू चे सामान उधारीवर दिले. आज २००० ची नोट देऊन त्याचेकडून इतर किरकोळ खरेदी करून उधारी चुकती केली. त्याने उरलेले पैसे परत केले.
दिवाळीत भेट / भाऊबीज म्हणून आलेली पाकिटे उपसली. त्यात काही रक्कम हाती लागली. जुन्या पर्सेस उचकटून आणखी काही. असे करत थोडीफार रक्कम गोळा झालीच.
मेडिकलवाल्याने ५००/ १००० च्या नोटा घेतल्या परंतु पूर्ण रकमेची खरेदी करावी लागली.
कामवाल्या बाईंकडे डबे, कपाट, पिशव्यांतून दोन तीन हजार रूपये ( १०० च्या नोटा) निघाले. दिवाळी बोनस, भाऊबीज व साठवलेले दहा हजार रूपये ५००च्या नोटांत होते. त्यांनी एका कामावरील काका बँकेत कामाला आहेत त्यांच्याकडून ४००० बदलून घेतले. उरलेल्या पैशांसाठी आज व उद्या बँकेच्या लायनीत कोणाकोणाकरवी नंबर लावले व लावणार आहेत.
त्यांच्या जावेने (तीही धुणीभंडी करते) ५०० व १००० च्या तिने साठवलेल्या नोटा ५५,००० रूपयांची चांदीची भांडी घेऊन त्यात खपवल्या.
घरात येणाऱ्या केअर गिव्हर्सकडेही दिवाळीत भरलेले वाणसामान, भेट किंवा भाऊबीज म्हणून आलेली कॅश , नुकतेच झालेले पगार यांमुळे जास्त प्रश्न आले नाहीत. तसेच एखादी गोष्ट घरी नसेल व शेजारी असेल तर त्या सरळ उधार आणतात व शेजारीही तसेच करतात. इन फॅक्ट एक केअर गिव्हर तर आज मस्तपैकी गावच्या उरूसाला जाऊन आली. कॅशचा काही प्रॉब्लेमच आला नाही म्हणाली.
भाजीवाले तुम्ही पुढे कराल तेवढ्या नोटेची भाजी घ्यायला लावत आहेत. काल व आज जी बिले घरी आली ते ते लोक आणखी ४-६ दिवस थांबायला तयार आहेत.
बँकेतून थोडी थोडी कॅश प्रयत्नांती मिळत आहे.
मी सध्या आसामच्या दुर्गम
मी सध्या आसामच्या दुर्गम भागात आहे. माझे पैशाचा व्यवहार नाहीयेत सो मला काही त्रास झाला नाही. इथे ही कोणी पैनिक नव्हतं. इथे गरीबी खूप आहे त्यामुळे त्यांना त्रास झाला नाही. काल एका इथल्या मैत्रीणीने पैसे बदलून आणले फार वेळ लागला नाही. आज गुवाहाटीला आहे. बँकेत रांगा होत्या पण शिस्त होती. आज मदतनीस (मला मोलकरीण म्हणायला आवडत नाही ) उर्मिलाला फोन केला होता दिला दोन वर्षापूर्वी बैंकेत खातंं उघडून दिलं होतं. काल दोन तास लाईनीत उभं राहून पैसे बदलून आणले. उरलेले जमा करुन आली. बँक कर्मचार्यांनी मदत केली. अजून ज्यांच्याकडे ती काम करते त्यांनी सुटे पैसे दिल्यामुळे काही अडचण आली नाही.
आजच जेट्लींचा एक इंटरव्हू
आजच जेट्लींचा एक इंटरव्हू पाहिला. ते म्हणाले की या अभियानामधली सिक्रसी पाळणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे सव्वा लाख बँकांकडे पैसे आधी पाठवणे, एटीम मशीन भरणे, ती साइजप्रमाणे कॅलिब्रेट करणे वगैरे गोष्टी आधी करता आल्या नाहीत. तेव्हा थोडासा गोंधळ होणं अपरिहार्य होतं.
शेतात काम करताना तोंडावर किडा
शेतात काम करताना तोंडावर किडा रगडला गेला. उभरलं. अॅलर्जिक रॅश. हिने मजुरीची रक्कम आज ५००ची एक नोट व १००च्या २ त्यातली एक दोन तुकडे जोडलेली, अशी घेतली अन शहरात आली.
फ्री कन्सल्टेशन अन औषधे देऊन परत पाठवलं. अन समजवून सांगितलं, की आता ५०० च्या नोटा घेऊ नका.
The choice words she used about the person responsible for her plight are not possible to type here
*
एका कंपाउंडरचा साला म्हशी विकायचा व्यवसाय करतो. एक म्हैस १ लाखाला अशा १३ म्हशी आणल्या होत्या विकत, हरियाणातून. त्या अॅवरेज १.३० ने विकल्या गेल्या होत्या. ८ तारखेलाच दुपारी. हा संपूर्ण व्यवहार कधीही चेकने होत नाही. पूर्ण कॅशने होतो, कारण पुढची खरेदी करताना म्हशी विकणारे शेतकरी चेकबिक कार्डबिर्ड ओळखत नाहीत, त्यांना नोटाच द्याव्या लागतात. (बादवे, ३० हजार प्रति म्हैस कमाई नसते. रस्त्यातल्या म्हैशासुर व गोराक्षसांना खंडणी वाटत यावं लागतं. फार कमाईचा धंदा असता, तर कंपाउंडर जावाई करेल का तो?)
सासरा राहिला असता तर अॅटॅकने खपलाच असता, असं मला स्टोरी सांगणारा सांगत होता. या पैशाचं काय करायचं? अन कसं?
*
२०-३०% घेऊन व्हाईट करून देतो हे सांगणारे एजंट्स फोफावलेत. अन ते फक्त या वरच्यासारख्या गरीबांची लूट करताहेत, हे प्लीज समजून घ्या.
*
मार्केट ठप्प नाही असे म्हणणार्यांनी कृउबा समित्यांतून सडणार्या संत्र्यांच्या ढिगांचे किंवा भाज्या, धान्याचे ढिगरे न्यूज च्यानेलांवर पाहिलेच नाहियेत का?
*
दारावर हातगाडीवर भाजी विकणारा नेहेमीचा माणूस माझ्याकडून ५०० रुपये (१००च्या नोटांत) उधार मागून घेउन गेला. सर प्लीज, विक्री होत नाही, अन भांडवलही वसूल होत नाहीये म्हणून. त्यात जितके दिवस होईल तितकी भाजी देतो म्हणून गेलाय
*
लै किस्से आहेत, पण जौद्या.
या किस्सेवाल्यांकडे व्हॉट्सॅप परवडेल असे फोन किंवा नेटपॅक नाहियेत, अन आपल्या देशात अजूनही न उघडलेली भाऊबीजेची पाकीटं वाल्या "कामवाल्या"/"केअरगिव्हर्स" आहेत.
नको नमो!
तेव्हा थोडासा गोंधळ होणं
तेव्हा थोडासा गोंधळ होणं अपरिहार्य होतं.
<<
"थोडासा"
या किस्सेवाल्यांकडे व्हॉट्सॅप
या किस्सेवाल्यांकडे व्हॉट्सॅप परवडेल असे फोन किंवा नेटपॅक नाहियेत,>>
चं काका, तुम्ही ना उगाच मोदी बॅशिंग करता.
किती सिस्टीमॅटिक प्लान आहे मोदीकाकांचा.
पहिले जिओचे कार्ड आणले, फुकटात डाटा कार्ड दिला, सस्त्यात मोबाईल दिला.
म....ग हे काम केले.
तुमच्यासारख्यांनी व्हॉटसॅप परवडेल असा नेटपॅक नाही म्हणू नये म्हणूनच!
केवढी दूरदृष्टी आहे.
(No subject)
आणि ऑनलाईन खर्चाला पेटीएम पण!
आणि ऑनलाईन खर्चाला पेटीएम पण!
-
-
बँकेतून थोडी थोडी कॅश
बँकेतून थोडी थोडी कॅश प्रयत्नांती मिळत आहे.
<<
वॉव! किती मिळाली अन कशी? कोणत्या बँकेत? किती मिन्टात? च्याय्ला अमक्या बँकेचा प्रिफर्ड अन तमक्याचा रॉयल कस्टमर स्टेटस आहे मला. तरी प्रयत्नांती मिळत नाहिये फारसं काही. सुट्टे द्यायला पैसे नाहीत ही स्टोरी आहेच.
सोनू चीटिंग १०० करायला २ दा
सोनू चीटिंग
१०० करायला २ दा प्रतिसाद
मुन्शीपाल्ट्या अन
मुन्शीपाल्ट्या अन म्हान्गर्पालिका अॅडव्हान्स ट्याक्स घ्यायल्यात ५००-१०००च्या नोटांत. रात्री १२ - १२ पर्यंत गोळा करताहेत. त्यात भरपूर पैसे कटताहेत.
पेटीएम चायनीज जिओ चायनीज मेक
पेटीएम चायनीज जिओ चायनीज
मेक इन इंडिया
पेट्रोल पंप वाल्यांना अजून ३
पेट्रोल पंप वाल्यांना अजून ३ दिवस करंट अकाउंटात व्हाईट करून ३०% एक्स्ट्रा कमाईची संधी!
हा धागा गुजरात ग्रूपात आहे
हा धागा गुजरात ग्रूपात आहे का?
:d
आज बहुधा माझा गैरसोय होण्याचा
आज बहुधा माझा गैरसोय होण्याचा शेवटचा दिवस (कदाचित?) असावा.
आज माझ्याकडच्या ५००-हजारच्या नोटा माझ्या गर्लफ्रेंडनेच सुट्टे शंभर पन्नास दहा चिल्लर मध्ये बदली करून आणून दिल्या. तिच्या एका मैत्रीणीचे बाबा बँकेत मोठ्या हुद्द्यावर आहेत. नाव नका विचारू. पण शेवटी प्रेमाचेच नाते कामाला येते हे खरे
बाकी आज शनिवार असल्याने बरेच
बाकी आज शनिवार असल्याने बरेच लोकं रांगेत उभे असलेले दिसले. यापेक्षा मोठी रांग आजवर फक्त लालबागच्या राजालाच पाहिली होती. मी घरातून बाहेर पडताना शनिवारी ऑफिसला जावे लागत असल्याने कुरबुरत होतो, पण त्या उन्हात उभ्या लोकांकडे बघून मला माझे एसी ऑफिसमध्ये बसून काम करणे खूप आरामदायी वाटू लागले
आज बहुधा माझा गैरसोय होण्याचा
आज बहुधा माझा गैरसोय होण्याचा शेवटचा दिवस (कदाचित?) असावा.
आज माझ्याकडच्या ५००-हजारच्या नोटा माझ्या गर्लफ्रेंडनेच सुट्टे शंभर पन्नास दहा चिल्लर मध्ये बदली करून आणून दिल्या. तिच्या एका मैत्रीणीचे बाबा बँकेत मोठ्या हुद्द्यावर आहेत. नाव नका विचारू. पण शेवटी प्रेमाचेच नाते कामाला येते हे खरे >>
सटल सार्कॅजममध्ये ऋबाळाइतकं एक्सपर्ट कुणी नाही माबोवर हे पुन्हा एकदा सिद्ध!
टाळ्या!
ऋ तुला कुठे ठेऊ आणि कुठे नको!

जरुर
जरुर बघा!
https://www.youtube.com/watch?v=2yCm462AXbA&t=6s
शुगोल, अर्थक्रांती आणी
शुगोल, अर्थक्रांती आणी बोकीलान्बद्दल थोडे गूगल केलेत तर बर्याच नवीन गोष्टी कळतील
एल क्लू म्हणून सांगतोय " क्वोरा + बोकील+ अर्थक्रांती" अबोलीश इन्कम tax + अर्थक्रांती वगैरे कि वर्डस tryकरा
ऋ तुला कुठे ठेऊ आणि कुठे नको!
ऋ तुला कुठे ठेऊ आणि कुठे नको! >>> दुर्मिळ प्राणी म्हणुन झु मध्ये ठेऊ नका म्हणजे मिळवली
हा धागा गुजरात ग्रूपात आहे
हा धागा गुजरात ग्रूपात आहे का?>>
सगळ्याचं मूळ गुजरातेत आहे
सिम्बा, मला बोकीलांची
सिम्बा, मला बोकीलांची "उर्वरित" माहिती काढ्ण्यात काहीही रस नाही. हा निर्णय बोकील आणि मोदी यांचं जॉईंट व्हेंचर नाही. अनेक अर्थतज्ञ, रिझर्व बँकेचे चेअरमन, अर्थमंत्री अशा अनेको लोकांच्या विचारमंथनातून झालेला निर्णय असणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे.
मोदी विरोधहाच अजेंडा असलेल्यांचा पोटशूळ कुठेतरी बाहेर येणारच ना! असे कितीतरी इंटरव्ह्यू यू ट्यूबवर आहेत. शिवाय काळे पैसेवालेही आहेतच ! तेव्हा Let us agree to disagree.
BTW,
मगाशी नेटवर्कनी पूर्ण मुलाखत टाकली नव्हती. आता टाकली आहे. ही लिकं :
https://www.youtube.com/watch?v=EING4oGqsaA
मी सध्या भारतात रहात नाही पण
मी सध्या भारतात रहात नाही पण ऐकलेले अनुभव.
माझ्या भावाचा स्वतःचा व्यवसाय आहे. नोटांची घोषण झाली त्याच दिवशी सकाळी त्याने त्याच्याकडे काम करणार्या लोकांना पगार दिला होता. हे लोकं कनिष्ठ किंवा कनिष्ठ-मध्यम वर्गीय ह्या आर्थिक स्तरांमधले आहेत. त्यांच्यापैकी कोणीही दुसर्या दिवशी तक्रार घेऊन आलं नाही. एक-दोन जणं कामाच्या वेळांमध्ये नोटा बदलायला बँकेत जातो आहे असं सांगून गेले पण तासा-दोन तासात नोटा बदलून परतलेही.
आई स्वतः बँकेत जाऊन नोटा बदलून आली. तिला १५ मिनीटे वेळ लागला.
घरी काम करणार्या दोन्ही बायांना दोन तीन वर्षांपूर्वी आईने आणि कॉलनीतल्या एका काकूंनी मागे लागून बँक अकाऊंट काढायला लावलं होतं. त्यामुळे त्याही बँकेत जाऊन नोटा बदलून आलया. एक दोन दिवसांपुरते पैसे आहेत म्हणाल्या.
आमच्याकडे पाचशेच्या दोन-तीन नोटा आहेत, त्या आम्ही येऊ तेव्हा बदलून घेऊ. (इथल्या ओळखीतल्या एका कुटूंबाकडे ८० हजार कॅश आहे असं ऐकलं ! त्यांचं मात्र धाबं दणाणलं आहे.)
घरातल्या कोणाही इतरांकडून गैरसोय झाल्याचं ऐकलं नाही. एक दोन जणांकडे कॅश नव्हतीच, त्यांनी मित्र मैत्रिणींकडून दोन तीन दिवसांपुरती उधार घेतली.
अनिल बोकील सरांची मुलाखत
अनिल बोकील सरांची मुलाखत आवडली. बरेचसे मुद्दे आवडले. पटले.
फक्त सगळा पैसा ब्यांकेत असता तरी शेतक-यांच्या आत्महत्या कशा काय थांबल्या असत्या किंवा भिका-याकडे या नोटा कशा आल्या असत्या हे कळाले नाही. व्हाईट चलनात नोटा राहिल्याने गरिबी दूर होते हे लॉजिक समजले नाही. बाकी मुद्दे मस्तच. समजावण्याची पद्धत पण सुंदर.
मी सध्या महाराष्ट्रात रहात
मी सध्या महाराष्ट्रात रहात नाही.
पण मायबोलीवर वाचलेले अनुभव.
कुणालाही त्रास झाला नाही.
सगळ्यांकडे, सगळ्यांच्या मदतनीस बायांकडे पुरेशी कॅश कमी किंमतींच्या नोटांमध्ये होती. सगळ्यांच्या मदतनीसांसह सगळ्यांकडे बँक अकाऊंटस आहेत.
कुणालाही कसलाही त्रास झाला नाही.
हॉस्पिटलायझेशन/ अचानक उद्भवलेले प्रसंग यांत शेजारी- पाजार्यांनी मदत केली.
मायबोलीवरचे जे महाराष्ट्रीय लोक देशाच्या कुठल्याही भागात सध्या आहेत्/फिरताहेत त्यांना कुठलाही क्रॅश क्रंच स्वतःला किंवा आजुबाजुच्या लोकांना झालेला दिसत नाही.
अड्ड्यावरचे काही लोक आणि कट्ट्यावरचे महेश यांव्यतिरिक्त एकूण माबोकरांपैकी कुणालाही स्वतःला त्रास झाला नाही किंवा दुसर्यांना होताना दिसला नाही.
जय महाराष्ट्र!
बँकेत जाऊन नोटा बदलून आली.
बँकेत जाऊन नोटा बदलून आली. तिला १५ मिनीटे वेळ लागला. >> कुठली बँक ?
इथे टीव्हीवर रांगा दाखवताहेत. मी स्वतः पुण्यातल्या रांगा पाहून आलेय. चार ते पाच तासापेक्षा कमी वेळात पहिल्या दिवशी कुठेच पैसे मिळत नव्हते. असो.
सगळे टीव्ही आणि पेपरवाले
सगळे टीव्ही आणि पेपरवाले कुठून बातम्या आणि चित्रं आणताहेत रांगांच्या आणि कॅश संपल्याने लोकांना लागोपाठ तीन दिवस रांगेत उभं राहावं लागण्याच्या? तेही सकाळी बँक उघडायच्या आधीपासून ते कॅश संपेपर्यंत. बँकांजवळ पोलिस बंदोबस्त का वाढवला गेलाय?
आमच्या भागातल्या बँकासमोर लांब रांगा आहेत म्हणजे हे सगळे लोक नवी नोट दिसते कशी ते बघायलाच आले असतील का?
दस्तुरखुद्द अर्थमंत्रीच का म्हणताहेत आणखी कळ काढा?
एकूण ८५% मूल्याचं चलन रद्द होऊनही आपल्या आजूबाजूला कोणालाच त्रास होताना दिसत नाही. तर नक्कीच कॅशलेस इकॉनॉमी आणायला हरकत नाही. करून टाका अर्थक्रांती.
कुणालाच त्रास नाही असे
कुणालाच त्रास नाही असे म्हणणे पण टोकाचेच आहे. १०० च्या नोटांचा तुटवडा आहेच, नवीन पाचशेची नोट मिळाल्यावर चेंज मिळत नाही. ज्या बँकेकडे पैसे होते तिथे काल रात्रीपर्यंत रांगा होत्या. दुपारीच पैसे संपल्याचे बोर्ड अनेक ठिकाणी लागताहेत. एटीम अजून चालू नाहीत. आयसीआयसीआय च्या एटीम बाहेर रांगा होत्या.
पाच मिनिटात पैसे मिळत असतील तर वृद्धांसाठी एखाद्या ठिकाणी स्पेशल व्यवस्था असावी असे वाटतेय.
Pages