"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिम्बा, नेमकं लिहिलंत. पण आपल्याला फक्त आपल्याबद्दलच विचार करायची सवय झालीय. मला काही तोशीस पडत नाही, म्हणजे अन्य कोणालाच पडत नसेल. आणि असेल तर त्यात काय एवढं? देशहितासाठी सहन करावं की.

तुम्ही ७० वर्षांच्या वृद्धाचा उल्लेख केलाय. अशा रांगेत एका वृद्धाचा मृत्यू झालाय. देशहितासाठी त्यांचे बलिदान झाले असे म्हणायचे.

suhasg,
या व्यवहारात तुमची त्या भागात असलेलेई पत ( एका अर्थी सामाजिक उतरंडीतील वरचे स्थानच) कमी आली असे तुम्हाला वाटते का?
तुमच्या भागात नवीन असलेल्या माणसाला, किंवा अगदीच फाटक्या माणसाला केमिस्ट, वाणी यांनी हि सवलत दिली असती का?

परवा मी मुंबई मध्ये टक्सी शोधात होतो, टक्सी मिळाल्यावर त्याला बसण्य आधी सांगितले फक्त ५०० च्या नोटा आहेत , बिल ३०० पर्यंत झाले असते, त्याने सांगितले ५०-१०० ज्यादा दोगे तो ले लेता हु पुराना नोट

म्हणजे देशभक्त असणारे आपण थोडी गैरसोय सोसून नवीन काळ्या पैशाला जन्म देतो आहोत का? (काला as इन बिनकष्टाचा )

<<<<<<<<<< आपण २५ % घेऊ म्हणजे खोटी खाती मिनिमम ६ करोड
यातले ५०% खाती जरी १ लाख स्वीकारून लगेच check/ NEFT करू शकत असतील तरी ३ लाख करोड काळ्याचे पांढरे करून देऊ शकतात, ते पण भारता बाहेर,
IT ला त्रीगर मिळून कारवाई होण्या अगोदर त्रीप्पिंग पूर्ण होईल, खात्याचे जीवित कार्य संपले, मग ते खते बन्केने सील केले तरी चालेल. >>>>>>>>>>>>.

जन धन योजनेच्या बेनामी खात्यात लगेच १ लाख रुपये भरुन लगेच NEFT करुन भारता बाहेर पाठवायचे ?

ईतक सोप्प वाटल का तुम्हाला ? NEFT करुन परदेशात पैसा पाठवण ? पैसे पाठवणारा गायब होईल पण पाठवणारा बँकेचा अधिकारी ? ज्या देशात ज्या अ‍ॅकाँऊट मध्ये पैसे गेलेत ती सर्व माहीती स्विफ्ट मध्ये येणार नाही ?

कोणत्या account मध्ये पैसे गेले ते कळले कि सर्कार काय करते ते दिसतेच आहे .
BTW मल्ल्या चे किती ओवरसीज account सील झाले?
कि ती माहिती सरकार कडे नाही आहे ?

सिंबा सर,

मि ह्या दिवसात मुंबई ते कोची पुढे थिरुवअनंत पुरम पर्यंत प्रवास केलेला आहे. विमानाने कोच्ची पर्यंत व पुढे २१० किमी बाय रोड वैगेरे पण कसलाही त्रास झाला नाही !

लोक मात्र मोदीजी वर खुष आहेत, केरळातले सुद्धा !!

केदार मुद्देसुद पोस्ट आणि आकडेवारी.

सीटी स्कॅनकरता कोणीही जुन्या नोटा घेत नव्हते तर आम्ही पैसे बदलून दिले स्कॅनिंग सेंटरला आणि स्कॅन करून घेतला. >>>> साती जोरदार टाळ्या तुमच्यासाठी.

परिस्थिती बिकट आहे , लोकांना त्रास होतोय अशा वेळेस एकमेकांना मदत केली तर नक्कीच ह्यातुन निभावून जाता येईल.

सुहास ने लिहिलेली कुपन्सची आयडिया भारी वाटली.

व्हेरी गुड
विमान तिकीट ओनलाईन बुकिंग,
विमानतळ खाणे पिणे क्रेडीट कार्ड
बजेट ऐर लाईन्सअसेल आणी विमानात फूड साठी कार्ड घेतलेच नाही तर कदाचित गैर सोय झाली असेल,

पुढचा २१० किमी प्रवास कसा? taxi ने कि वोल्वो बस मधून?
एकच थांबा मोठ्या हॉटेल मध्ये जिथे कार्ड चालते?
असो.
तुमची गैरसोय झाली नाही हे ऐकून आनंद वाटला

विजय माल्ल्या वर सरकारचा निर्णय व प्रयत्न :

India asks UK to extradite 60, including Vijay Mallya
http://www.livemint.com/Politics/61Jz8N8VydgXocCui7qhDK/India-asks-UK-to...

India expects early extradition of Vijay Mallya after May-Modi talks
http://timesofindia.indiatimes.com/india/India-expects-early-extradition...

Vijay Mallya’s shares worth Rs1620 crore attached
http://www.livemint.com/Companies/QcXHcqTOlbEyP4bKohsxpM/Vijay-Mallyas-s...

मिलिंद जाधव
मी काय म्हंटले ते तुम्हाला चांगलेच कळले आहे.
मल्ल्याची फोरेन बँकेतील खाती गोठवली गेली आहेत का?
आपला विषय इकडून तिकडे पैसे ट्रान्स्फर करण्या बद्दल चालु आहे.
असो... हा विषय आपण दुसर्या धाग्यावर घेऊ शकतो.

माझी स्वतःची गैरसोय झाली नाही. घोषणा ऐकल्या ऐकल्या थोडेफार पैसे १००च्या नोटांमधे उचलले होते. महिन्याची देणी, कामवाल्या बायकांचे पगार, बिलं हे सगळं देऊन झालं होतं. कामाला येणार्‍या प्रत्येकीला विचारलं, त्यांची बॅन्केत खाती आहेत आणि हातात जी रोकड आहे त्यात त्यांचं भागेल म्हणाल्या. त्या पुढच्या आठवड्यात नोटा बॅन्केत भरणा करतील असं म्हणल्या. आसपास मदर डेअरीचे बूथ आहेत त्यामुळे लोकांनी तिथूनही पैसे सुट्टे करून घेतले. काही दुकाने, मासेवाले, भाजीवाले कालपर्यंत ५०० च्या नोटा नेहेमीच्या गिर्‍हाईकांकडून घेत होते. हो, पण मी पूर्णपणे मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय अशा शहरी भागात राहते. त्यामुळे माझी निरीक्षणे 'स्क्यूड' असणारच. बाहेर वावरताना सायकल रिक्षावाले, ऑटोरिक्षावाले, टॅक्सीवाले, बस कंडक्टर इत्यादींकडून अजून तरी मी किंवा आमच्या आसपासच्या लोकांनी फारसा तक्रारीचा सूर ऐकला नाहीये. उलट जर याने काळे पैसे जमा करून ठेवणार्‍यांचे नुकसान होणार असेल तर बरेच आहे असंच मत ऐकलं आहे. कलकत्ता बेकायदा रोकडबाजाराचं भारतातलं एक प्रमुख केंद्र आहे हे लक्षात घेता मला ही मतं रोचक वाटली. आमच्याइथे बरेचसे वृद्ध, मुलंबाळं जवळ नसलेले वगैरे राहतात. त्यांना थोडीफार आसपासच्या लोकांनी मदत केली. आम्हांला शक्य असेल त्यांना सांगून ठेवलं आहे की गरज पडली तर आम्ही शक्य ती मदत करू म्हणून.

चिनूक्सच्या अर्बन एलीट देशसेवेविषयीच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स विषयीची मते पूर्ण पटली. तरीही तसले प्रतिसाद न टाकताही, किंवा त्यांना पाठिंबा नसला तरी या निर्णयाबद्दल अनुकूल मत असणारी लोकंही बघते आहे. मी स्वतः कुंपणावर आहे कारण याची दूरगामी परिणाम आणि यासंबंधीची इतर धोरणं कशी राबवताहेत हे मला अजून नक्की लक्षात आलेलं नाही.
परत एकदा माबोवर या निर्णयाला अनुकूल असणारे हे भक्त, त्यांना इतर जनसामान्यांच्या अडचणींविषयी काही माहित नाही या गटात आणि मान्य नसणारे हे आंधळा मोदीद्वेष करणारे, देशभक्ती नसणारे, इ.इ. गटात अशी लख्ख काळीपांढरी (काळा कुठला ते आपल्या विचारसरणीवर ठरणार) विभागणी झालेली बघून मजा वाटली. सो प्रेडिक्टेबल.

आम्ही घरातल्या सगळ्यांचे 100 आणि 50 च्या नोटा एकत्र करून हिशेब केला. सुदैवाने किराणा, दूध आधीच बिलं देऊन झाली होती. टेलिफोन आणि एम्ससीबी online केलं. त्रास काहीच झाला नाही.
त्यामुळे वर खर्चाला थोडे ठेऊन बाकी कामवाल्या मावशींना दिले, बँकेच्या लायनीत अक्खा दिवस गेला असता त्यांचा.

आता 500 आणि 1000 च्या नोटा आहेत त्या भरायच्या अजून घाई केली नाही. जरा लोकांचा पॅनिक कमी होउदे मग सावकाश भरू

२३५ सुट्टे नव्हते दुकानदाराकडे परत द्यायला त्याने मला त्याची चिठ्ठी दिली ती नंतर केव्हाही दाखवून पैसे / औषधे घेता येतील. भाजी मंडीत ५०० नोट देऊन १०० ची पाच कुपन मिळाली ती वापरुन भाजी घेता आली. (सर्व भाजीवाल्यांनी एकत्र येऊन ही शक्क्ल काढली आहे !) >> हे आवडलं.

साती, तुमचा दवाखाना खूप चांगलं काम करतो आहे.पेशंट च्या दुवा नक्कीच मिळतील.
छोट्या दुकानंदारांचा धंदा ते प्लास्टिक मनी स्वीकारू शकत नसल्याने बसला हे पटतं, पण छोटे आणि मोठे दुकानदार यांना युनिटी करून यावर काही तोडगा काढता आला असता का?जसे की छोट्या दुकानदाराने माल देऊन मोठ्या दुकानात स्वाईप करून घेणे आणि थोडे नंतर सेटल करणे?

काल परवा मी मुंबई मध्ये होतो,
रस्त्यावर इन जनरल ट्राफिक कमी होता . बहुदा काही रिक्षा टक्सी ऑफ द रोड असल्याने ट्राफिक कमी असेल.
भाजी बाजार तुलनेने थंड होते

कामासाठी एका छोट्या हॉस्पिटल मध्ये जावे लागले,
डॉक्टर म्हणाले आम्ही लोकांना जुन्या नोटा घेऊन त्रित करायला तयार आहोत पण ब्लड, इतर काही टेस्ट(सोनो ग्राफ), CT) या साठी पेशंट कडे पैसे नाहीत. म्हणून प्रोब्लेम आहे

त्याच दिवशी sobo मधल्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये गेलो , त्यांचा खालती बँक काउनटर होता (हॉस्पिटल च्या आत)
तिकडे पेशंट नि पैसे बदलून भरणा करावा अशी त्यांची अपेक्षा होती, पेशंट नातेवाईक रंग लाऊन उभे होते (पण बाहेर पेक्षा परिश्तिती बरीच बरी होती, तुलनात्मक लहान लाइन, थांबायला AC कॉर्रीडोर, एकंदर सुख होते)

नंतर एका मोठ्या हॉस्पिटल च्या CEO/CFO बरोबर मीटिंग, मीटिंग चालू असताना त्यने३-४ फोन अत्तेन्द केले, नोटांच्या संदर्भात, मग वैतागुन म्हणाला, इकडे नोतांबद्दल कोणाला काही म्हंटले कि लोक थेट कलेक्टर कडे जातात. आणी CEO म्हणून कलेक्टर ओफ्फिचे मधून आम्हाला फोन येतात (काय इशू होता ते कळले नाही मात्र)

थोडीशी गैरसोय आणखी थोडे दिवस सहन करा : इति आदर्णीय अर्थमंत्री जेटली

Union Finance Minister Arun Jaitley has appealed to the people not to be in a hurry to visit banks to exchange their cash, and called for patience for the normalization of all manner of banking operations.

He said the crowd at banks over the past few days has been hundreds of times larger than the number of people who visit the banks for regular business. "There are 14 lakh crore rupees in circulation. We knew at the outset that the replacement of this much currency cannot happen overnight. There is enough cash to meet all needs now. It is a massive operation, and it has only begun," he said.

He said it could take two to three weeks for all ATMs across the country to recalibrated to be able to dispense the new Rs 2000 notes. Till then, ATMs that have not been re-calibrated will continue to dispense Rs 100 notes.

"The recalibration could not be done before the announcement, in view of the secrecy that was required till the Cabinet decision was made. If we had started the process of recalibration before, we would have risked a leak of the information, which would have rendered the whole exercise pointless," said Jaitley, in response to questions over why the ATMs could not have been prepared beforehand.

आज आमच्या गावात एकाही बँकेने दुपारपासून मनी एक्सचेंज करून दिला नाही.
विथड्रॉल दिले नाही आणि एटीएम आऊट ऑफ कॅश.

आम्ही ओळखीच्या पेशंटाना असेच सोडले डिस्चार्ज वगैरे.
उद्या परवा द्या पैसे असे सांगून.

मजा येत्येय!

मजा येत्येय!>>>>>>> कसली मज्जा,सामान्य माणसांचं जिणं हराम झालं आहे,लाईनीत थांबुन कित्येकजण हार्टॲटॅकने गेले आहेत.या सरकारवर मृत्युदंडाचा खटला का भरु नये? ब्यांकांकडे पैसे नव्ह्ते तर् आधी उपलब्ध करुन मग निर्णय घ्यायचा ना.

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/atms-will-t...

While cash logistics companies are trying to replenish the cash at these outlets on a war footing, they have been able to pull out only 73% of the defunct currency notes and they expect the pain to sustain for the customers for atleast another week.

Hamstringed by exhausted man power, complicated accounting procedures at bank’s currency desks and technical difficulties at teller machines logistics companies are finding cash replenishment a very difficult exercise.
Further because of high demand for cash ATMs are getting five times more footfalls thereby they are getting empty within 3 to 4 hours against 3 days previously, this is causing further stress on the logistics systems," said Sinha

मी तर म्हणेन सक्तीची सैनिकांची नोकरी करायला लावली पाहिजे प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला देखील निदान २१ वर्षानंतर दोन वर्ष . म्हणजे मग कोणी म्हणणार नाही हा माझा जॉब नाही आणि तो त्यांचा जॉब आहे. ज्यात त्यात कटकट करायची सवय लागलेय लोकांना . कशात समाधान मुळी नाही . सतत मी मी आणि मी . मला त्रास झाला मला कटकट झाली . यावं आणि त्याव. संपतच नाही कटकटीचा पाढा Happy

आम्ही सुद्धा आमचेच मत व्यक्त केलेय.

भाजपाच्या राज्यात भक्त बोंबलतात ... लोक रांगेत रहात नाहीत, सैन्याकडे बघा.

मग काँग्र्सने त्यांच्या काळात रेशन , बस, रेल्वे, शाळा अ‍ॅडमिशन.... सगळीकडे रांगेत रहायला लावले तर तेंव्हा न कुरकुरता रहात होता का?

सगळे सैन्यात गेल्याने कॅश क्रंच कसा कमी होईल.

जो सैनिक सैन्यात असताना हालअपेष्टा सहन करतो तो घरी आल्यावरपण रायफल हातात धरून अलर्ट पोझिशनमध्ये उभा असतो का कायम?

हे म्हणजे कुणी मेलं म्हणून कुणी रडायला लागलं की आम्ही म्हणायचं 'तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर करायला पाहिजे. आम्ही तर आठवड्याला एक दोन मृत्यु पहातो पण रडत नाही बसत!'

सुजा, इथे कोणी स्वतःला झालेल्या गैरसोयीबद्दल बोललय का? ज्यांनी लिहिलंय ते इतरांना - दुर्बलांना येणार्या अडचणींबद्दल. पण तुम्हाला फक्त मी आणि माझं इतकंच पाहायची सवय असल्याने अशा लोकांचं काहीही पडलेलं नसेल हे समजू शकतो.

बँकेसमोरच्या रांगेत मरण पावलेल्या व्रुद्धासमोर सैनिकाचा पाढा वाचाल का? त्या सैनिकांचे व्रुद्ध आईवडीलही आज चलनाअभावी अडचणीत असतील

Pages