तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
केरळ मध्यप्रदेश येधे तुरळक
केरळ मध्यप्रदेश येधे तुरळक ठिकाणी दुकानांची लुटालूट आणी हिंसाचार.
जनतेचा संयम संपत आला आहे?
कि हि पण कॉंग्रेस आणी लाल बावातावाल्यांची चाल आहे?
चिकमंगळूर (कर्नाटक) येथे २०००
चिकमंगळूर (कर्नाटक) येथे २००० रु. ची बनावट नोट सापडली. पोलीस या नोटेचा माग घेत आहेत. अजून नवीन नोट बघितलेली नसताना बनावट नोट आल्याने खरी कुठली आणि खोटी कुठली हे कळणार कसं ?
People have been standing in
People have been standing in the queue from 6 am. ATMs are still not working. If everything is fine, who are these people?
नरेंद्र मोदी .... शरद
नरेंद्र मोदी .... शरद पवारांच्या साखर संस्थानाच्या कार्यक्रमात पुण्यात येणार.
मोदी निवडुन आले ... चहा प्यायला पवारांकडे गेले.
नोटा बंद केल्या ... आता लंचला पवारांकडेच .!
पुढच्या निवडणुकीआधी मोदी पवारांबरोबर लास्ट सपर घेतील का ?!
श्रीकृष्ण हस्तिनापूरला जायचा
श्रीकृष्ण हस्तिनापूरला जायचा तेंव्हा जेवायला विदुराकडे जायचा म्हणे ... मोदी महाराष्टरात आले की चहा जेवायला पवारांकडे जातात
आकाशवाणीवर नव्या सरकारी
आकाशवाणीवर नव्या सरकारी जाहिराती वाजायला लागल्या. आईये मिलवाते है आपको एक ईमानदार भारतीय से
ज्यांच्याकडे ५०० /१००० च्या नोटा आहेत आणि ज्यांना त्या बँकेत जमा करायची घाई नाही कारण अपना धन सुरक्षित है, ३१ दिसंबर तर कभी भी जमा कर सकते है हा विश्वास आहे. असे लोक.
म्हणजे जे लोक बँकांसमोर रांगा लावून उभे राहिलेत ते सगळे बेईमान भारतीय?
इतके अच्छे दिन आलेत की लोकांना खर्चच करायला लागत नाहीए. कपालभाती करून पोटं भरताहेत, आजार बरे होताहेत, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताही येतंय. कोणाकडेही चालणार चलन संपल्याची समस्या नाही. ज्यांचं संपलं त्यांना चटकन नवं मिळालं.
काल आप की अदालत मध्ये आदर्णीय जेटलीजी आले होते. आता कर्तिकी एकादशीनंतर लग्नाचा मोसम सुरू असतानाच तुम्ही हा निर्णय का घेतलात? यामुळे लोकांची अडचण होणार नाही का? या प्रश्नावर ते उत्तरले -
कुठली परंपरा, रूढी सांगते की लग्नात काळा पैसाच खर्च केला पाहिजे.
मग टाळ्यांचा कडकडाट.
पुढे पाहावले नाही.
इकडेही ब्रांचमधून पैसे
इकडेही ब्रांचमधून पैसे काढायला बदलायला ३ तास लागतायत. ATM चालू आहेत पण पैसे पटकन संपत आहेत. काल दिवसा सगळीकडे पायी पायी फिरून आले ATM मधून पैसे काढण्यासाठी पण एकाही ATM मध्ये मिळाले नव्हते. कुठेही आरडाओरडा मात्र दिसला नाही. लायनी शांत होत्या. रात्री १० वाजता बाहेरून येताना घराजवळच्या ATM ला लाईन दिसताच कार्ड घेवून गेले आणि पैसे मिळाले. TV वर हरियाणामधला गोंधळ दाखवत होते, पोलिस मारताना हाकलताना दिसत होते तशी परिस्थिती इथे नाही.
कामवालीकडे १००० रुपये सुट्टे आहेत. तिच्या घरात पेशंट आहे. तिला पैसे काढता नाही आले तर गरजेपुरते देईन. (कुणी ह्यावरून किंवा वृद्धांना मदत करण्यावरून कुजकं बोललं तर सपशेल अनुल्लेख).
ज्यूपिटर हॉस्पिटलवाल्यांनी बुधवारी ५००/१००० च्या नोटा घ्यायला नकार दिल्याने टेस्ट्स करायला आलेल्यांची पंचाईत झाली होती. आता घेत आहेत की नाही माहित नाही. घराजवळचे डॉक्टर्स जुन्या नोटा घेत होते.
सुरूवातीचे काही प्रतिसाद
सुरूवातीचे काही प्रतिसाद वाचून मला असं वाटलं की धाग्यावर आपापले अनुभव लिहायचे आहेत.
म्हणून माझे नसले तरी मला खात्रीपूर्वक माहीत असलेले अनुभव लिहिले.
पेपरमध्ये रुग्णांची गैरसोय झाली तसेच एका बालकाचा मृत्यू झाल्यासंबंधीच्या बातम्या वाचल्या, ज्या खरोखरच दुर्दैवी आहेत.
आमच्याकडे स्टेट बॅंकेच्या
आमच्याकडे स्टेट बॅंकेच्या सगळ्या ब्रॅंचेस बाहेर किमान एक एक किलोमीटर रांगा आहेत. प्रायव्हेट बॅंकांमध्ये गर्दी नाहीये तितकीशी पण तिथे कॅशच नाहीये. काल येस बॅंकेत गेले होते एक डॉक्युमेंट घ्यायला ११.३० वाजता तर तिथे बिझनेस ॲज युजवल चालू होते कारण कालची कॅश अजून पोचलीच नव्हती. कधी पोचेल सांगता येणार नाही म्हणे. ३-४ जण पैसे जमा करायला आले होते फक्त.
तिथल्या समोरच्याच एचडीएफसी च्या ब्रॅंचेत आणि एटीएम समोर भरपूर लांब रांग होती. धाकटा दीर तिथे दोन तास रांगेत उभा राहून पैसे न घेताच परत आला. साडेतिन ला एचडीएफसी बंद झाली होती.
पटेलनगरच्या मेन पोस्ट ऑफिसात एक कामवाली गेली होती ११ नंतर कामं उरकून. तीन वाजता तिचा नंबर यायच्या ५ मिनीट आधी कॅश संपली. आता आज परत जाणार आहे. पण तिला एका ओळखीच्या केमिस्टनी तात्पुरते ५०० चे सुट्टे दिले काल.
स्टेट बॅंकेत आमच्या कॉलेजचे खाते आहे. आम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांची पण खाती तिथेच आहेत. कॉलेजात मुलांनी जमा केलेली ॲडमिशन फी ची कॅश तीन दिवस गर्दीमूळे जमाच होवू शकली नाही बॅंकेत. काल जमा झाली एकदाची.
दुसऱ्या एका नोयडातल्या दीराला कॅश डिपॉझीट पण करता आलं आणि २००० च्या दोन नोटा पण एक्सचेंज केल्यावर मिळाल्या.
माझ्या घरात अगदीच कमी १०० chyaa नोटा होत्या. आता एकही उरली नाहीये. ६० रुपये आहेत पर्समध्ये.आणि लेकाचा गुल्लक फोडल्यावर मिळतिल ते काही. दुध- भाजी, फळवाल्यांपैकी बरीच ठिकाणं काल बंद होती. बाकीचे म्हणाले प्लीज उधार घेवू नका. पुढचा माल आणायला कॅश नाही आहे. काल दुध २४/७ मधून टेट्रापॅकवाले आणलं. कार्डानी पेमेंट. भाजी इझी डे मधून आता आणणार.
आमच्या मार्केटातली बहूतांशी छोटी दुकाने बंद आहेत. मोठी उघडी आहेत पण दुकानात कस्टमर नाहीत. फक्त कार्डानी पेमेंट चालणाऱ्या मोठ्या ग्रोसरी स्टोअर्स मध्ये लोक आहेत.
औरंगाबादला आई- बाबा पहिल्याच दिवशी तासाभरात पैसे डिपॉझीट करणं, काढणं हे सगळं करू शकले.
इथे आजही पैसे काढता येतिल अशी स्थिती नाहीये. बुधवार- गुरुवारपर्यंत काढता येतिल कदाचीत. बाकी त्रास नाहीये तसा काही.
१. एटीएमला रांगा लावून तिष्ठत
१. एटीएमला रांगा लावून तिष्ठत बसावे लागत आहे.
२. फकत २००० रुपये एका ट्रॅन्झॅक्शनवर मिळत आहेत.
३. दोन हजारच्या नोटांसाठी एटीएम्स योग्य झालेली नाहीत.
४. पाचशेच्या नोटा अजून यायच्याच आहेत.
५. रांगेत उभा असलेला एक म्हातारा मेला. (नेमका कशाने ते नीटसे समजलेले नाही)
६. आजारी माणसे, वृद्ध, लग्नसमारंभातील माणसे ह्या सर्वांना भयंकर मनस्ताप झालेला आहे.
७. मोदी स्वतः जपानला गेले
८. राहुल गांधींसारख्यांनाही रांगेत उभे राहावे लागले.
९. सर्जिकल स्ट्राईक म्हणता म्हणता सामान्य माणसाचेच रांगेत उभे राहून कंबरडे मोडले
१०. देशभक्तीच्या नावाखाली सामान्य माणसालाच नाडवले गेले. काळा पैसावाले तसेच आहेत.
११. नेमका किती काळा पैसा जमणार ह्यातून?
१२. जो काळा पैसा जमेल तो भल्यासाठी वापरला जाईल हे कशावरून?
१३. अजून जुन्या नोटा का घेतल्या आणि दिल्या जात आहेत?
१४. ८० टक्के नागरिकांचा क्रेडिट कार्ड, ऑनलाईन पेमेंटशी सुतराम संबंध नाही. त्यांनी काय करायचे?
१५. काळा पैसावाल्यांनी आधीच सगळे सेटिंग केलेले आहे.
१६. पाचशेच्या जुन्या नोटांची मुदत ३ दिवस वाढवली म्हणजे यू टर्न घेतलाच ना?
१७. दोन आठवडे एटीम व्यवहार सुरळीत होणार नाहीत.
१८. जगातील एवढी मोठी अर्थव्यवस्था अशी अचानक एका रात्रीत खिळखिळी करून सोडणे निषेधार्ह आहे.
१९. आम्हीही देशभक्ती करू ह्या उक्तीतील जोर कमी होत आहे व नागरिकांचा संयम सुटत आहे.
ह्या व अश्या प्रकारच्या सगळ्या आक्षेपांनंतर '१३० कोटी नागरीक असलेल्या देशातील काळ्या पैश्यावर नियंत्रण यावे म्हणून सरकारने घेतलेला निर्णय' सरकारने घ्यायलाच नको होता असे म्हणणे केविलवाणेपणाची कमाल आहे.
हा निर्णय इतक्याच धाडसीपणे कोणत्याही सरकारला घेता आला असता, का घेतला नाही ह्याची कारणे उघड आहेत.
मला कणभरही त्रास न पडता काळ्या पैश्यावर नियंत्रण यावे हा मनामनांत मुरलेला फुकटेपणा उघडा पडला आहे.
बाकीच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक, सहिष्णूता-विषयक इश्यूजचे काय झाले आहे सध्या?
-'बेफिकीर'!
मला काल २.५ तास रांगेत उभे
मला काल २.५ तास रांगेत उभे राहिल्यावर १०००० रुपाये काढता आले. तेही Icici सारख्या बॅंकेत. स्टेट बॅंकेत तरी भयंकर मोठी लाईन आहे.
आज सुट्टीचा दिवस असल्याने सगळीकडे हलकल्लोळ झालाय.
अजून एक निरीक्षण ज्येष्ठ
अजून एक निरीक्षण ज्येष्ठ नागरिकांना रांग न लावता थेट आत सोडत आहेत.
₹१०० च्या नोटा खर्चायला
₹१०० च्या नोटा खर्चायला मिळाल्यावर होणारा आनंद येथे पहा
काल संध्याकाळी सोसायटी मध्ये
काल संध्याकाळी सोसायटी मध्ये आम्ही पाच सहा जाणं गप्पा मारत होतो. त्यातले दोघे अगदी तावातावाने आदरणीय मोदीजींच्या चुका दाखवत होते. त्यातला एकजण म्हणाला की साध्या चहा भज्यांचे वांधे झालेत म्हणून. मी तत्परतेने सहा चहा आणि दोन प्लेट भजी मागवली. देशभक्ती दाखवायची संधी मिळाल्यामुळे माझी छाती छप्पन इंचाची झाल्यासारखे वाटले. शंभर ची नोट गेली तरी बेहत्तर, थोडा त्रास तर सगळ्यांनाच सोसावा लागणार ना. गरीब चहावाला खुश झाला आणि त्याने मला दोन एक्ष्ट्रा भजी देऊ केली. मी बाणेदार पणे त्या गरीबाच्या परिस्थितीचा फायदा घेणे नाकारले पण आमच्यातल्या भुक्कड खांग्रेजीने ती भजी मधल्यामध्ये गटाकावली. तिकडे आपले सैनिक सीमेवर गोळ्या खात असताना यांना भजी खावीशी वाटतात याचंच आश्चर्य वाटायला हवं.
सैनिकांशिवाय इतरही करोडो लोकांना देशसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय मोदीजींचे मनापासून आभार.
नमो नमः नमो नमः
सगळ्या बॅंकान्मधले कर्मचारी
सगळ्या बॅंकान्मधले कर्मचारी बाहेर लायनीत टोकन वाटताना दिसले आत्ता स्टेशनला येताना. काल सारस्वत बॅंकेतले कर्मचारी लायनीतल्या २-२ वयस्कर माणसांना पुढे नेवून आत घेत होते.
<<मोदी विरोधहाच अजेंडा
<<मोदी विरोधहाच अजेंडा असलेल्यांचा पोटशूळ कुठेतरी बाहेर येणारच ना>> + १११
<<मग काँग्र्सने त्यांच्या काळात रेशन , बस, रेल्वे, शाळा अॅडमिशन.... सगळीकडे रांगेत रहायला लावले तर तेंव्हा न कुरकुरता रहात होता का?>> हो. कारण कुरकुर करण्याची सवय नाही आम्हाला. ज्यात त्यात कुरकुर करून काय मिळत. मनस्तापच आणि गोष्ट त्या त्या पद्धतीने व्हायची असते ती होतच असते मग कुरकुर करून काय फायदा ?
भरत जे लोक माझी गैरसोय. मला किती कटकट म्हणून बोंबा मारत आहेत त्यांच्या बदल बोलतेय मी .
<<पण तुम्हाला फक्त मी आणि माझं इतकंच पाहायची सवय असल्याने अशा लोकांचं काहीही पडलेलं नसेल हे समजू शकतो.>> काय समजलं तुम्हाला ?. जोकच आहे . आधी म्हणायचं भ्रष्टाचार रोखा आणि मग पावलं उचलली कि बोंबा मारायच्या . मला त्रास . याला त्रास त्याला त्रास किती तो त्रास.थोडक्यात असंही बोलायचं आणि तसही बोलायचं. कटकट आपली करायचीच सारखी
ओ बेफिक्रू , हे सगळे
ओ बेफिक्रू , हे सगळे रिजर्व ब्यान्क जानेवारी २०१४ ला करणार होते... त्यावेळी भाजपानेच त्याला विरोध केला होता ....
दोन तीन दिवस तुम्ही नव्हता .... आम्हाला चिंता लागून राहिली होती ... तुम्ही कुठे गेले म्हणुन...
http://m.hindustantimes.com/india-news/the-measure-is-anti-poor-when-bjp...
BJP spokesperson Meenakshi Lekhi in January 2014
• The idea is unexplainable as to why this has happened… the measure is strongly anti poor.
• The latest gimmick of finance ministry’s demonetization of currency notes before 2005 is basically an attempt to obfuscate the issue of black money that is stashed outside the country.
बाकी त्या बातमीत वाचा ..
आताच दूर झाली , फसवून रोट गेली.
मोदी जपानला अन कचर्यात नोट गेली.
तरही करा.
दोन तीन तुम्ही नव्ह्ता
दोन तीन तुम्ही नव्ह्ता म्हणजे?
दोन तीन आठवडे ते नव्हते की दोन तीन आयडींसह ते नव्हते?

टायपो एरर होता तो. दोन तीन
टायपो एरर होता तो. दोन तीन आठवडे / दोन तीन आयडींसह नव्हता.
असेही चालेल
बरं!
बरं!
८ तारखेला घरखर्चासाठी पैसे
८ तारखेला घरखर्चासाठी पैसे कढले.अर्थात ५००च्या नोटा होत्या.नवर्याने ,१० तारखेला १० मिनिटे,११ तारखेला १५ मिनिटे बँकेत घालवून एकूण२० हजार नॉर्थ कॅनरा कोऑप बँकेतून काढले.१० तारखेला अपना बजारमधे १०० आणि ५०० च्या दोन्ही नोटा घेऊन गेलो होतो.त्यांना ११ तारखेपर्यंत जुन्या नोटा स्वीकारायचे आदेश असल्यामुळे ५०० च्या नोटा ,आधी विचारुनच दिल्या.
माझ्या आईच्या बर्याच कमकम मदतनीसाने तिच्याकडे १०० च्या हजार नोटा आपणहून दिल्या.अरे आहेत माझ्याकडे म्हटले आईने. तरीही आजी ठेवा तुमच्याकडे, लागतील.म्हणून सांगितले.१२ तारखेला मी ,आईला १० हजार नेऊन दिले.
१२ तारखेला सकाळी ८ वाजता मात्र, प्रत्येक बँकेच्या पुढे मोठी रांग होती.नवर्याला २ दिवसांपूर्वीचा अनुभव चांगला असल्याने तो नोटा बदलायला ९ वाजता बँकेत गेला आणि ह्ही रांग बघून परत आला.त्या दिवशीफक्त १०००/ रू.च देत होते.
११ तारखेला चिंचवडला एका हॉस्पिटलमधे, परत द्यायला सुटे पैसे नसल्याने फुकट तपासणी झाली.(केसपेपरचे ५०रु द्यायला नव्हते) .त्या पेशंटनी आपल्या शेजारपाजार्यांना ही बातमी सांगितल्यानंतर जे रुग्ण होते तेही धावले.
फे.बु /व्व्हॉ.अॅ.वरची कथा नसून प्रत्यक्षदर्शीने जी त्यादिवशी अपाँट्मेंट असल्याने तिथे गेली होती.डॉक्टर,जाम चिडले होते.कुठून आले एवढे पेशंटस्,आता मीच रजेवर जातो असे बडबडत होते.
देवकी , मी पण फुकट
देवकी , मी पण फुकट तपासले/अॅडमिट केले काही पेशंटस.
पण न चिडता.
शेवटी इतकी आशीर्वादांची बँक खुली केली मोदीकाकांनी.
नमो नमः!
माझ्या अहोंनी तर अक्षरशः आय सी यूत अॅडमिट पेशंट त्याने काय हजार रुपये अॅडवान्स भरले होते त्यावर सोडला. (खरे बील १२००० होते.)
का , तर त्याच्याकडे सध्या पैसे नाहीत, त्याला मुले नाहीत आणि त्याची म्हातारी बायको किंवा तो इतक्यात बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकतील इतके धडधाकट नाहीत.
साती , : शेवटी
साती ,:) :
शेवटी व्यक्तीव्यक्तीतील फरक ना.
शेवटी इतकी आशीर्वादांची बँक खुली केली मोदीकाकांनी.>>>>>.. तशीही थँक्स/शुभेच्छा/आशीर्वाद, योग्य इलाज झाले की रुग्ण मनापासून देतोच की.
आमच्याकडे उलट आहे..... गरीब
आमच्याकडे उलट आहे..... गरीब पेशंट , रिक्षा बसला सुटे पैसे नाहीत ... रोजगारी सोडून ब्यान्केला रांग लावली... एकाने चार हजार आणले तरी त्यातून इतराना देता देता दवाखान्याला यायला पैसेच उरले नाहीत, अशी अवस्था आहे. तारखा उलटून गेल्यावर येणारे पेशंट सांगत आहेत.
शुकशुकाट आहे... रोजची ओपीडी ८० वरुन ४० वर... दिवाळीचा उरलेला फराळ टेबलभर मांडुन आम्ही खात बसलो आहोत. एखाद दुसरा पेशंट आलाच तर त्यानाही देत आहोत.
पण चलन सुरु झाले की ८० चे १४०
पण चलन सुरु झाले की ८० चे १४० होणारे दिवसही येतील...
देवकी, आमच्या इथे कितीही
देवकी, आमच्या इथे कितीही 'योग्य' इलाज केले तरी पेशंटचे नातेवाईक बिलासाठी बारगेन करतात.

बिल कमी केलं तरच एक्स्ट्रा आशीर्वाद देतात.
देवकी, ९ तारखेला बँका बंद
देवकी, ९ तारखेला बँका बंद होत्या ना? आणि एकावेळी किती पैसे काढता येतील यावर मर्यादा आहे ना? ४०००? की माझ्या वाघण्यात चूक झाली आहे?
एक निरीक्षण म्हणजे, सुरवातीचे
एक निरीक्षण म्हणजे,
सुरवातीचे २ दिवस रंग कमी होती,
बहुतेक नोकरदार लोक शनी रवी पैसे काढू म्हणून निवांत होते,
वीकान्ता ती सगळी लोक मोठ्या रांग लाऊन उभे आहेत.
तेच तर ... फक्त दहा हजारच
तेच तर ... फक्त दहा हजारच काढता येतात . एका आठवड्यात
जुन्या नोटा बदलून ४०००, चेक
जुन्या नोटा बदलून ४०००, चेक देऊन १०००० नी एटीएम ने २००० असे १६००० एका दिवशी काढता येतात. दुसऱ्या दिवशी परत चेक देऊन १००००. म्हणजे या आठवड्यात २६००० काढू शकता. सगळ्या रांगा वेगळ्या फक्त.
Pages