निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, टिना, त्या झाडाचं नावच 'महारूख' आहे की काय? इंग्रजी नाव सांगा की. feeling curious now.

राया: ऑर्किड ला प्रकाश हवा, पण तो थेट नको. म्हणजे ज्या खिडकीत ऊन येतं तिला window blind किंवा नेटचा पडदा आणि त्या आड ऑर्किडचं प्लँट असलं पाहिजे. किंवा त्या खिडकीच्या कडेच्य ४५ अंश कोनामध्ये ठेवा.

मुळं जास्त वेळ पाण्यात भिजून गेलीत असं व्हायला नको. म्हणजेच, पाणी तेव्हाच घाला जेव्हा त्याची माती कोरडी दिसायला लागेल. तेही मोजकं. जिथून आणलं तिथे स्पेशल ऑर्किड फूड ची छूटिशी बाटली मिळेल. दर वेळेस पाणी घालतांना २-३ थेंब ते पाण्यात मिक्स करून मग घाला

अजून एक. मार्केट मधून आणल्यावर दुसर्‍या कुंडीत शिफ्ट तर नाही केलं ना? ते ज्या पॉट मध्ये विकतात तेच ऑर्किड साठी योग्य असतं. माती बदलू वगैरे सुद्ध नका.
एकूणात काय, जास्त लाड करूच नका त्या बाळाचे Happy

मनी, ते किडे लय दुष्ट असत्यात. माती फेकून द्या आणि कुंडी साबण पाण्याने स्वच्छ धूवून घ्या. मी तेच केलं होतं. Sad

ओह हा का...धन्यवाद...बघितल्यासारखा वाटतोय. कडूनिंबा पेक्षा पानं थोडीशी मोठी असतात ना.

दिनेशदा, टिना, त्या झाडाचं नावच 'महारूख' आहे की काय? इंग्रजी नाव सांगा की. feeling curious now.>>
Ailanthus excelsa

अरे.. वर अदिजोने सांगितल वाटत..

हो कडूनिंबापेक्षा पाने मोठी असतात..
वृक्ष सुद्धा बराच मोठा असतो कडूनिंबाच्या मानाने.. निंबासारखा म्हणून महानिंब असेही म्हणतात..
याचा वास खुप तीव्र असतो.
याची पाने आणि सालाचा औषधी उपयोग होतो.

आणि हो सुलक्षणा... त्या झाडाचं नावचं 'महारुख' असेच आहे.. Happy
त्याला common english मधे 'Tree of Heaven' असे म्हणतात..
आणखीही बरीच संबोधने आहेत पैकी मराठीअन् हिंदीमधे मरुख, महारुख, महानिंब ही कॉमन नावे आहेत.

आणि हे झाड आकाशाच्या background वर खूप छान नक्षीदार दिसतं , बरोबर ना! येस्स्स मी ओळखते याला Happy

धन्यवाद सुलक्षणा. हो ब्लाईंड्स्च्या आतच आहे. आणते फुड्ची बाटली आणी चालु करते खुराक. मला हे प्लांट तरी टिकवायचे आहे.

होय हि महारुखाची झाडे रस्त्यालगत बरीचशी असतात. सातारा कोल्हापूर रस्त्यावर आहेत बहुधा. सुंदर वृक्ष.

माहारुखाचे एक मोठे झाड पुण्याला साधु वासवानी चौकात बघितले होते, त्याला फुलोरा पण आला होता असे आठवतेय. पुणे नगर रस्त्यावर पण दिसतात हि झाडे.

ड्राफ्ट म्हणजे काय? >>
हीटिंग किंवा ए सी व्हेंट मधून येणारा झोत . हा झोत थेट झाडावर लागू नये अशा ठिकाणी ठेवा. बहुतेक घरांमधे व्हेंट घराच्या पेरिमीटर पाशी असतात अन खिडक्या / फ्रेंच डोअर्स पण पेरिमीटर पाशीच असतात म्हणून Happy

मेधा आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी पाणी भरलेल्या ट्रे मध्ये ते पॉट ठेवायचं असतं असं पण काहीतरी आहे ना?

घरी वरचा मजला चढवणार आहे..
म्हणे कि आंब्याच झाड तोडून टाकुया.. मी आणि पप्पा विरोधात आहो एकदम..
घर ओकबोकं वाटणार त्याला कापल्यावर Sad घरचं मोठ्ठ रॉयल पामचं झाडसुद्धा काढून टाकणार होते पण मी शेवटपर्यंत किल्ला लढवला अन शेवटी ते झाड असताना जी चारचाकी जाईल तिच घेऊ इथवर त्यांना आणुन सोडलं.. आता आंब्याच्या झाडाबद्दल खुप काळजी लागुन रहिलीए मला Sad ...
त्यांना गॅलरी ठेवा, तिथे बसुन आंब्याच्या सावलीत बसायला खुप छान वाटेल, आपल्या घरच्या विहिरीतल पाणि टिकवण्यासाठी हि मोठी झाडं कित्ती कित्ती मदत करतात हे सार समजावुन झालयं.. बघु.. क्रॉस माय हार्ट...

वर जाणार्‍या जिन्यालगत एक मोठ्ठी फ्रेंच विंडो करुया अस सांगितलय मी प्लॅन करताना..पण त्याला बाहेरुन मोठ्ठी ग्रिल लावणार म्हणजे विचका.. कधी कधी अस वाटत कि काश मी अमेरिका, लंडन वगैरे मधे जन्म घेतला असता Sad श्या..

टीना, झाड आहे तिथेच राहील, असे डीझाईन आर्किटेक्ट सहज करून देईल.
सुरक्षिततेच्या दृष्टीने नुसती काच असलेली मोठी खिडकी भारतात शक्य नाही, पण ग्रीलचे दार उघडबंद करण्याजोगे
करता येईल कि...

माझ्या नायजेरीयातल्या घराला छताला मोठी काच होती, तिथे आकाश निरभ्र असायचे तेव्हा त्या खिडकीखाली
झोपायला खुप मजा यायची... पण एकदा ( मी घरात नसताना ) चोराने ती काच फोडली Happy

ते झाडं काढायच आहे कि तसच राहु द्यायच आहे हाच तर निर्णय घरच्यांना द्यायचा आहे ना...
आणि रेटा लावणारी मी अन पप्पा... त्यातही मी जास्त खुंखार असल्याने माझ म्हणनं ऐकतील दादा आणि आई Lol
पप्पा बस जनहित बघतात..मीच काय ती स्वार्थी...

ग्रिल लावुनही मग तिला लॉक लावायची झंझट आली अन ते घरी राहणार्‍यांना जीवावर येत म्हणुन हि कचकच.. तरी होईल. सार निट होईल... यांनी त्या झाडाला जरा जरी हात लावला तरी मी कंपाऊंड बाहेर मोठ्ठाली झाडे लावुन यांना जंगलातच ठेवणार हे नक्की...

<<<<टीना, झाड आहे तिथेच राहील, असे डीझाईन आर्किटेक्ट सहज करून देईल.>>>
चांगला आर्किटेक्ट निवडा.... Wink

Pages