सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
वा सायु सो लकी. टीनाचे फोटो
वा सायु सो लकी.
टीनाचे फोटो मला हल्ली दिसतंच नाही.
निरु, लेकीचे चित्र सुरेखच
निरु, लेकीचे चित्र सुरेखच आहे.
सायु,देखणा अनंत.एकाचवेळी ३ फुले उमललेली पाहून कसले भारी वाटत असेल ना? रच्याकने, याला कोकणात चटकचांदणी म्हणतात.
या धाग्यावर वाचत
या धाग्यावर वाचत असते...लिहीलं फार जात नाही....मस्त मस्त फोटो असतात एकेक.
निरू, ते तुमच्या मुलीने काढलेलं पेंटिंग आहे???
अप्रतिम! शब्दच नाहीत... किती मोठी आहे मुलगी?
सर्वांना धन्यवाद.... @ vt220
सर्वांना धन्यवाद....
@ vt220 : ते वाॅटर कलर पेंटिंग आहे..
@ रायगड : ती 1st Year B. Arch ला आहे...
निरु, कार्ड मिळालं बरं का !
निरु, कार्ड मिळालं बरं का ! मस्तच आहे पेंटींग.. अगदी प्रसन्न वाटतंय बघून.
सर्व फोटो भारी! निरु,
सर्व फोटो भारी! निरु, पेन्टिंग मस्तच!
हा मी केलेला नारळाच्या पानांचा आकाशकंदिल
पानांच्या मधल्या शिरा ठेवायला हव्या होत्या. त्या न ठेवल्याने आकार जरा गंडलाय. मधल्या शिरा असत्या तर गोल झाला असता.
अदीजो... कंदिल बढिया
अदीजो... कंदिल बढिया है|
निरु, लेकीचे चित्र सुरेखच आहे. >> +१
नमस्कार सर्व निगकर्सना!! ह्या
नमस्कार सर्व निगकर्सना!!
ह्या दिवाळीत माझी मस्त भटकन्ति चालु आहे, गेले चार दिवस बेंगलौर आणि आजपासून तीन दिवस कुर्ग ला आहे.
चटक चांदणी नाव छानच
चटक चांदणी नाव छानच !!!
आकाशकंदिल मस्तच!!
1000वी पोस्ट !
1000वी पोस्ट !
आता सर्व आधीच्या पोस्ट
आता सर्व आधीच्या पोस्ट वाचल्या! आदिजो , टीना, कसले भारी आहे आकाशकंदिल केलेत!
नीरू, पेंटिंग मस्त !!
गुलाब आणि इतर सर्व फोटो मस्त आहेत
अदीजो आकाशकंदिल मस्तच.
अदीजो आकाशकंदिल मस्तच.
टीनाचे फोटो बघायला क्रोमला शरण जायला लागेल बहुतेक.
१००३!
१००३!
आजपासून तीन दिवस कुर्ग ला
आजपासून तीन दिवस कुर्ग ला आहे.>>>>>>>>>>>छान! आणि आम्हाला पत्ताच नाही.

अदीजो नारळाच्या पानांचा कंदील
अदीजो नारळाच्या पानांचा कंदील मस्त. हॅन्डमेड गोष्टींचा एक वेगळाच चार्म असतो नै? बरं झालं गोल नाही केलात ते. तसा ऑर्डिनरी वाटला असता. हा एकदम हटके आहे
झेंडूच्या फुलांनी जरा अजून सजलंत तरी छान दिसेल.
धन्यवाद सर्वांना! या दिवाळीत
धन्यवाद सर्वांना!
या दिवाळीत अंधारबन-हिर्डी-भिरा ट्रेक केला. त्यात अक्षरश: थव्याने फुलपाखरे बघितली.
त्यातली काही:
ब्ल्यु ओकलीफ
(बहुदा) ग्लासी टायगर
अदीजो मस्त फोटो
अदीजो मस्त फोटो
अदीजो... कंदिल बढिया
अदीजो... कंदिल बढिया है|>>>>>+१
अन्जू, हो मी क्रोमच
अन्जू, हो मी क्रोमच वापरते..
अदिजो आकाशकंदिल बहोतच मस्त...
खालचे फोटो सुद्धा भारीच..
ऑर्कीड प्लँट कसे जगवावे कुणी
ऑर्कीड प्लँट कसे जगवावे कुणी सांगेल का? मी नॉर्थ अमेरिकेत असते. ऑर्कीड माझे आवड्ते फुल आहे. आत्तापर्यंत ४/५ प्लँट्स आणुन पाहिले पण पहिलि फुले गेल्यावर नवीन आली नाहित. आणी पानेही हळुहळु मरुन गेली. काही स्पेशल टिप्स आहेत का? मी दुकानातली माहिती वाचुन त्याप्रमाणे पाणी, हवा मिळेल असे बघते. अजुन काय करु?
माझ्या एका मोठ्ठ्या कुंडीत
माझ्या एका मोठ्ठ्या कुंडीत कर्ली ग्रब्ज झाले आहेत, असंख्य प्रमाणात आहेत. अळ्या अजूनही कोषात आहेत पण काय उपाय करता येईल? मी काल बरेच काढून टाकले पण अजून्ही असावेत. हे बग्ज रोपट्यांचे अख्खं मूळ खाऊन टाकतात. मला बाजारातलं औषध शक्यतो टाळायचं आहे पण अगदीच उपाय नसेल तर तेच करावं लागेल, कुंडी खुप मोठी आहे त्यामुळे उपसता पण येणार नाही.
ऑर्किड प्लांट ला घरात भरपूर
ऑर्किड प्लांट ला घरात भरपूर उजेड मिळेल, ड्राफ्ट लागणार नाही अशा जागी ठेवा. २-३ दिवसातून एकदा थोडे पाणी घाला. झाडाला धक्का लागणार नाही , मुलांच्या , पेट्स्च्या दंगामस्तीपासून दूर राहील अशा ठिकाणी ठेवा . ह्युमिडिटी थोडी जास्त असेल असे ठिकाण बेस्ट - किचन मधे सिंक च्या जवळ खिडकीत, बाथरुम मधे उजेड व्यवस्थित येत असेल तर तिथे ठेवता येईल
अदीजो छान फोटो. टीना गेले
अदीजो छान फोटो.
टीना गेले ब्वा शरण तुझ्यासाठी गुगल क्रोमला, दिसले एकदाचे फोटो. सुपर्ब आहेत. आकाशकंदील मस्त टांगलाय.
ऑर्किड प्लांट ला घरात भरपूर
ऑर्किड प्लांट ला घरात भरपूर उजेड मिळेल, ड्राफ्ट लागणार नाही अशा जागी ठेवा.--
ड्राफ्ट म्हणजे काय? मी ऑफिसात आणुन ठेवलाय. प्रकाश खुप आहे पण ह्युमिडिटी नाही
मारुती चितमपल्लींच्या लेखनात
मारुती चितमपल्लींच्या लेखनात वाचले होते कि महारुख च्या झाडावर कुठलाही पक्षी घरटे करत नाही. पण गेल्या नगरभेटीत मी आष्टी गावाजवळ एका झाडावर घरटे बघितले... बहुतेक त्यांच्यामधे पण अनिस ( अंधश्रद्धा निर्मूलन समिती ) निघाली असणार !!
महारुखच्या झाडावर मलासुद्धा
महारुखच्या झाडावर मलासुद्धा एकदा घरट बघीतल्याच पुसटसं आठवतयं..
त्या झाडावर चेट्कीण भुते असतात अशी भिती भरवली होती आम्हा लहान पोरांच्या मनात..
महारुख = महावृक्ष (चा अपभ्रंश)
टीना, ही महारुखची झाडे मुंबईत
टीना, ही महारुखची झाडे मुंबईत बघितली नाहीत.. ती पुणे, नगर भागातच बघितली आहेत मी.
आता ऑस्ट्रेलियन बाभूळ वर पण पक्षी घरटी बांधतात का ते बघायला हवे.
नमस्कार मी या धाग्याला
नमस्कार
मी या धाग्याला केन्व्हापासुन शोधत होतो
सर्वाना खुप खुप धन्यवाद
Blue Oakleaf Sundar... Ya
Blue Oakleaf Sundar...
Ya varshi khup pahili Yeoorla.
Marathi type karaychi savay kartoy
नमस्कार ऋतूराज... इथे स्वागत
नमस्कार ऋतूराज... इथे स्वागत !
Pages