सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
धन्यवाद मित्रांनो ही फुलं पण
धन्यवाद मित्रांनो
ही फुलं पण कुंडीतलीच आहेत
छाअन
छाअन
ही फुलं पण कुंडीतलीच
ही फुलं पण कुंडीतलीच आहेत.>>>>>>> कुंडी मोठी आहे का आणि काय खत घालता?
कुंडीतली एवढी भारी फुलं.
कुंडीतली एवढी भारी फुलं. माझ्याकडेपण आली तर सात आठ येतात पण एकत्र नाही. एक दोन करत येतात. कुंडी खूप मोठी आहे का? मस्तच आणि माझ्याकडे पांढरी आहेत. हा कलर नाही.
कुंडी पसरट मध्यम आहे बरीचशी
कुंडी पसरट मध्यम आहे
बरीचशी मूळं बाहेर वाढून त्यालाच झाडं आली आहेत
पण मी कुंडीत ओला कचरा निर्माल्य टाकतो त्यावर सगळी झाडं छान वाढतात
घरातला सगळा ओला कचरा मी कुंड्यांमध्ये जिरवतो
दिनेशदा मस्त
दिनेशदा मस्त भटकन्ती.
सोनटक्का सुन्दर !!
जोएस, मोबाईलवरून फोटो कसे अपलोड करायचे सांगा ना .
धन्यवाद जो एस
धन्यवाद जो एस
जो एस,मोबाईलवरून फोटो कसे
जो एस,मोबाईलवरून फोटो कसे अपलोड केले ते सांगा ना,प्लीज!
सोनटक्का मस्तच.
वाह! सोनटक्का भारीच. हा
वाह! सोनटक्का भारीच. हा नेहमीचा शुभ्र पांढरा आहे की थोडा क्रीम कलर चा आहे खरच?
दिनेशदा ती वेल काहीच्या काही सुंदर आहे. नाव सापडलं तर प्लीज सांगा.
जिप्सी, फेसबुकवर मेसेज
जिप्सी, फेसबुकवर मेसेज पाठविला आहे.
मस्त गप्पा.. दा मस्त
मस्त गप्पा..
दा मस्त फोटो....
जो, काय मस्त सोनटक्का, तो ही कुंडीत... कशी निगा राखता ते सांगाल का? माझ्या कडे अजुन ही फुल लागली नाहीत... कुंडीतुन एका पसरट टब मधे शीफ्ट केलाय, चांगला पसरलाय पण फुल नाही आलीत अजुन...
जिप्सी, फेसबुकवर मेसेज
जिप्सी, फेसबुकवर मेसेज पाठविला आहे.>>>>>नलिनी, फेसबुकवर मेसेज नाही मिळाला.
सोनटक्का मस्तच! दिनेशदा फोटो
सोनटक्का मस्तच! दिनेशदा फोटो सुंदर!!!
परवा पोटभर कार्वी बघितली. लोणावळा - अॅम्बी व्हॅली रस्त्याच्या दुतर्फा माजली आहे अगदी! पण नेमका माझ्याजवळ कॅमेरा / फोन नव्हता, एकही फोटो काढता आला नाही
दिनेशदा... नवीन धागा मस्तच...
दिनेशदा... नवीन धागा मस्तच...
खडकवासला.. गडावर.. तगर ना
खडकवासला..
गडावर..
तगर ना ?
आम्ही गुलछडी म्हणतो..
टीनाताय एकबी फोटू दिसना.
टीनाताय एकबी फोटू दिसना.
मी काही दिवसांपुर्वी
मी काही दिवसांपुर्वी कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरच्या अंबा घाटातून प्रवास केला, तिथे मी कारवी भरभरून फुललेली बघितली. तिथल्या कारवीच्या झाडांची ठेवण मला जरा वेगळी वाटली. ते झाड जरासे पसरट होते.
घाट संपल्यावर ती झाडे दिसली नाहीत, पण मग माझ्या आजोळच्या ( मलकापूरच्या ) गावात भटकताना काही झाडे चक्क शेताच्या बांधावर बघितली. त्या लोकांनी ती मुद्दाम लावली होती का आपोआप उगवली होती, माहित नाही.
मग मी बाजीप्रभू देशपांड्यांची पावनखिंड बघायला गेलो. ती मलकापूर पासून फक्त १५ किमी वर आहे. आता तिथे बरेच बांधकाम केलेय पण ते दगडी असल्याने ऐतिहासिकच वाटते. पावनखिंडीत या दिवसात एक धबधबा असतो, आत उतरायला शिड्याही आहेत. मी अर्थातच आत उतरलो. तिथले पाणी प्यायलो. हे ठिकाण बर्यापैकी राखलेले आहे आणि तिथल्या भिंतींवर अजूनही काहिबाही लिहिलेले दिसत नाही. अनेक इतिहासप्रेमी तिथे जात असतात ( मायबोलीवर याबद्दल फार पुर्वी मीच लिहिले होते, नंतर कुणी लिहिल्याचे आठवत नाही )
त्या परीसरातही कारवीची झाडे आहेत.
टीना, मस्त फोटो. मी कुर्ग ला
टीना, मस्त फोटो.
मी कुर्ग ला तेरड्याचे वेगळे प्रकार ( रंग नाही, प्रकार ) बघितले. त्या फोटोंची उस्तवार करायची आहे सवडीने.
तगर तेरडा... लय कन्फ्युज होत
तगर तेरडा...
(विषयाबद्दल बोलतेय..कात्रज झुबद्दल नै).
लय कन्फ्युज होत बा मला... बॉटनी मधे गती नाय मला.. झु मधे भर्र्र्र्र्र्र्र्र पळते मी
आता तिथे बरेच बांधकाम केलेय
आता तिथे बरेच बांधकाम केलेय पण ते दगडी असल्याने ऐतिहासिकच वाटते. >> आम्ही गेलो होतो तेव्हा हे काम सुरू होते. त्यावेळी शांडिल्यचा काम करणार्या एका ट्रॅक्टरवर बसवून फोटो काढला आहे. त्या कामात त्याने कष्ट केल्याचा पुरावा म्हणून.
मला नाही दिसत फोटो. मी आय इ
मला नाही दिसत फोटो. मी आय इ वर आहे.
दिनेशदा छान पोस्ट. तुम्ही मागे छोटं ऑपरेशन झालं लिहीलं होतंत, आराम केलाच नाहीत का तुम्ही, लगेच धावपळ करायला सुरुवात. सलाम तुम्हाला. टेक केअर.
(No subject)
वाह जो.. मस्तच..
वाह जो.. मस्तच..
वॉव जो मस्तच. टीनातायचे फोटो
वॉव जो मस्तच.
टीनातायचे फोटो दिसण्यासाठी कोणाची आराधना करू. गुगल क्रोमवर दिसतील काय.
कोरफड फुले येतायेत, फोटो काढतेय. कसेही असले तरी टाकणार आहे. पण रोज एक फुल उमलतं, दुसऱ्या दिवशी मावळतं. लहान कुंडीत आहे.
जागुला बिलेटेड happy birthday.
अन्जू, कोरफडीत पण लाल,
अन्जू, कोरफडीत पण लाल, नारिंगी आणि पिवळा असे ३ प्रकार आहेत. कुठल्या रंगाची येताहेत फुले ?
अन्जू, टीना धन्यवाद या वेळी
अन्जू, टीना धन्यवाद
या वेळी चक्क 3 कोरफडीना फुलं आल्येत माझ्याकडे.
दोन वर्षांपूर्वी आली होती
दोन वर्षांपूर्वी आली होती कोरफडीला फुलं
http://www.maayboli.com/node/50980
साधारण क्रिम कलरची आहेत फुलं,
साधारण क्रिम कलरची आहेत फुलं, डार्क नाहीये कलर. देठाकडे किंचित केशरी मग तो लाईट होत जातो, वरती पिवळा. छान वेगळाच वाटतो कलर.
जो आणि मुग्धाने फोटो टाकलेत तोच रंग आहे पण फक्त १४ फुलं आहेत आणि लहान आहेत. उद्या-परवा टाकते फोटो. काही मी काढलेत माझ्या मोबाईलवरून, काही नवऱ्याने रात्री काढली आहेत त्याच्या मोबाईलवरून.
जो यांच्यासारखे फोटो नाही काढता येत मला. इथे सगळे दिग्गज आहेत. मला मात्र नाही जमत तंत्र आणि तेवढी नजरही नाहीये फोटो काढण्याची. बघायला आवडतात सगळ्यांचे.
जो_एस, मस्तच, तीन कोरफडीना
जो_एस, मस्तच, तीन कोरफडीना फुलं आली आहेत मग फोटो टाका की यावेळेचं पण.
.
आपल्याकडे कुंडीत लावलेली
आपल्याकडे कुंडीत लावलेली कोरफड आणि आफ्रिकेच्या जंगलात नैसर्गिक रित्या वाढणारी कोरफड किंचीत वेगळी असते. जंगलातील कोरफडीची पाने तितकी मांसल नसतात आणि ती जरा गडद रंगाची असतात.
तिथे वावरणार्या लोकांना तिचे औषधी उपयोग माहीत असतात. जरा कुठे कापले, खरचटले किंवा काटा टोचला तर लगेच ती पाने कापून त्यावर लावतात. एखादा किटक चावला तरिही ती पाने लावतात ते.
मॅन व्हर्सेस वाईल्ड मधेही असा उपयोग दाखवला होता.
Pages