काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घरात ते शक्य नाहिये. साबा साबु अगदी तन्मयतेने बघतात ही मालिका त्यामुळे आम्हाला काही से नसतो त्याचा वचपा आम्ही लगेच ९.३०ला तारक मेहता लावुन काढतो Wink

आणि गवरीच्या ऑफीसचं काय? आत्ताच प्रमोशन मिळालंय ना? मग काही ' हँड ओव्हर' वगैरे...?
मोजो मात्र छान दाखवताहेत त्यांची काळजी व गौरी बद्दलचं प्रेम!
पण एकूणात सासरी गेली की लेकी च्या प्रायॉरिटीज झटकन बदलतात हे मात्र नक्की!

पण मला तर मोजो जरा सायको वाटत आहेत..मुलगी सासरी गेल्यावर तिची आठवण येणे वेगळं ..
मोजो थोडं अतीच करत आहेत असं वाटत..

पण मला तर मोजो जरा सायको वाटत आहेत..मुलगी सासरी गेल्यावर तिची आठवण येणे वेगळं ..
मोजो थोडं अतीच करत आहेत असं वाटत..
हो.ना. तिच्या शी फोन वर बोलताना म्ह्ण्तात की..कसा असणार तुझ्याशिवाय? मुली लग्न करुन सासरी जात नाहीत का?

मोजो अती करत आहेत हे नक्की. तेच जाम डोक्यात गेलं काल माझ्या. ही गवरी फोन करत्ते तर मोजो तिला विचारतो तुला तिथे काही प्रॉब्लेम नाही ना? एका दिवसात प्रॉब्लेम? Uhoh
दुसरी गोष्ट जर का मोजो ला गवरी च्या लग्ना अगोदर हम्माचा कट कळला असता की आपली पोरगी कायमची बनारस ला राहणार असेल तर मोजो काय लग्न रद्द करणार होते का?

खोट्या दागिन्यांची भानगड नाही माहिती मला, पण एकूण लक्षात आला सगळा लांडा कारभार. कठिण आहे झी चे. Sad मी तर सिरियल नाहीच पहात.

एका दिवसात प्रॉब्लेम येऊ शकतो यायचा असेल तर!
आणि मोजो नी लग्न रद्द नसतं केलं तरी निदान ते हम्माशी वगैरे बोलले असते व मेंटली प्रिपेअर्ड तरी राहीले असते.

पण त्या हम्माने बनारसचे वाईल्ड कार्ड अगदी कार्यालयात यायच्या दिवशीच बाहेर काढले ना? Wink

त्यांच्यात मुलाची आई लग्नाला जात नाही का?

नचि आणि निशाबाय गायब आहेत. दागिन्यांचे कळ्ळ्यावर मुंह दिखाईमधुनच हम्मा फोन करुन झापणार सावंताना आणि नेहमीप्रमाने निशा मला हम्मानेच अस करायला सांगितल होत अस सांगणार आणि सावंत त्यावर विश्वास ठेवणार.
इकडे हम्मा पुन्हा एकदा मुंबईवाल्यांच्या नावाने खडे फोडणार. लगे रहो

मुंबईची मुलगी...
या अर्थाचं काहीतरी कंबरेवर हात ठेवून नाकात म्हणाली...ते किती बेकार व कृत्रीम वाटलं...ते प्रेक्षकच जाणे.
हा भाग तर अगदी बावळट..गौरी लहान मुलं नाटकात अभिनय करतात तसा करत होती..हसायलाच आले >>>> +1

पण मला तर मोजो जरा सायको वाटत आहेत..मुलगी सासरी गेल्यावर तिची आठवण येणे वेगळं ..
मोजो थोडं अतीच करत आहेत असं वाटत..>>>>>>>> हां त्यांची ओव्हरअ‍ॅक्टींग होतेय जरा पण काही बाबा असतात हो असे.

माझे बाबा खूप हळवे माझ्या बाबतीत. कारण मी एकुलती एक....... त्यामुळे त्यांचे वागणे म्हणाल तर थोडे असेच होते. आता बिचारे या जगात नाहीत. पण माझ्या लग्नात मी सासरी जायला निघाले तेव्हा ते एका कोपर्‍यात उभे राहून खूप रडत होते. आणि दुसर्‍या दिवशी पण फोनवर खूप रडले. आमच्याकडे पूजा होती माझ्या आईवडिलांना बोलवले नाही. या गोष्टीला आता ११ वर्ष उलटून गेली तरी हा सल मनातून जात नाही. आता खूप वाटते तेव्हा का मी विचारले नाही. सॉरी या मालिकेच्या निमित्ताने वडिल मुलीचे नाते बघून त्यांची खूप आठवण आली म्हणुन मन मोकळे केले. (अवांतराबद्दल क्षमस्व)

अंजली , पटलं .
माझ्या सक्ख्या मैत्रीणीचं लग्न नागपूरला झालं. मी तिच्या कुटुम्बियांसोबत मुंबईहून गेले होते.
तिची विदाई झाली पहाटे (उत्तर भारतियाशी लग्न केलं तिनेही ) आणि आम्ही हॉटेलरूम वर परत आलो.
तिचे वडील , तिच्या आईपेक्शा जास्त रडत होते. Sad .
मलाच गलबलून आलं त्याना हुंदके देताना बघून.

स्वस्ति Sad
मोजोंचा स्टँड पटला की ती लहान असल्यापासून मी ठरवले होते तिला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही वगैरे वगैरे हे सगळं मी अनुभवलेय म्हणून सांगू शकते. पण आई वडिलही शेवटी अ‍ॅडजस्ट करतातच मुलीचे सुख आणि कधीकधी नाईलाज म्हणून.
वर उल्लेखल्याप्रमाणे मी एकटीच असल्याने असं वाटायचं आईवडिलांना सोडून कुठे जाऊ नये पण जसं लग्न झालंय तसं मी पुण्याच्या काय देशाबाहेरच आहे कायम. माहेरपण कमीच Sad
फक्त सिरीअलीत जास्तच आकांडतांडव करतायत फसवलं फसवलं म्हणून. मनाची थोडी तरी तयारी असतेच वधुपित्याची की मुलीचे जिकडे सासर असेल तिथेच ती जास्त काळ राहणार याची.

Repeat post

ती हम्माचं काम करणारी नटी कोण आहे ? काम भारी केलेय. अगदी राग यावा इतकं
आताचा ट्रेंड असा आहे बहुतेक सिरीअलीत की मुलाची आई कारस्थानी आणि मुलाला शेवटपर्यंत पत्ता नाही.
नील-ललिता, मुन्ना - अम्मा, पिंट्या - कलाबाई

रच्याकने गौरीची ती जाऊ सरला पपेटसारखी दिसते ना? Proud

मुंबईची मुलगी सीन भारी होता! :p :-p
बिचारी गवरी किती प्रयत्न केला तरी अभिनय झेपत नाही तिला
आता शिव आणि गवरी मुंबईला काही कळवणार नाहीत; मुंबईवाले बेघर झाले तरी लेक-जावयाला काही समजू देणार नाहीत
मधल्यामधे प्रेक्षकांचे हालहाल होणार! Sad Sad

ती हम्माचं काम करणारी नटी कोण आहे ? काम भारी केलेय. अगदी राग यावा इतकं >>>>>>>>>>>>>

त्या अम्मा चा रोल करणाऱ्या नटी चं नांव माधुरी संजीव आहे .

काय योगायोग आहे ? सिरीयल च्या नायिकेचं नांव ही सायली संजीव आहे.

हारावरून इथे 'होणार सून मी' ची पुनरावृत्ती. मुलीकडच्या खलप्रवृत्तींनी हारात राडा करायचा. जावयाने ऐनवेळी विकत घेऊन दुसरा हार पेश करायचा.

सर्वोत्कृष्ट मालिका – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट कुटुंब – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट नायिका – गौरी – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट नायक – शिव – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट भावंडं – गौरी-नचिकेत – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट जोडी – शिव गौरी – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट वडील – मधुसूदन सावंत – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सासू – आजी – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सासरे – मधुसूदन सावंत – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सून – गौरी – काहे दिया परदेस
वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत लक्षवेधी चेहरा – गौरी – काहे दिया परदेस........fainting-smiley-emoticon.gif
ही यादी पाहून आश्चर्य वाटतंय ....surprise-smiley-emoticon.gifगौरी म्हणे सर्वोत्कृष्ट नायिका ,काहीही हं झी
roflmao.gif

वासरात लंगडी गाय शहाणी. पआमु, कारेदु, नांदा आणि सौभाग्यवती या ४ मालिका संपल्यामुळे आणि खुकखु नविन असल्यामुळे यावर्षी सगळे पुरस्कार याच मालिकेला मिळणार होते. जर पुढल्या वर्षी हि मालिका संपलेली असेल, तर त्यावेळी सगळे पुरस्कार खुकखुला असतील.
सगळयात कहर म्हणजे अभिनयात माठ असलेली थंडाक्का सर्वोत्कृष्ट नायिका! अरेरे, काय वेळ आली आहे झी मराठीवर!

सर्वोत्कृष्ट सून – गौरी – काहे दिया परदेस>>> गवरी आता कुठे सून झालिये आणि लगेच सर्वोत्कृष्ट Uhoh

सर्वोत्कृष्ट खलनायिका – शनाया – माझ्या नव-याची बायको >>>> निशा deserve करते हा अवार्ड>>> येस

पण सर्वोत्कृष्ट नायिका खरे तर सौभाग्यवती मधी लक्ष्मी ही होती किंवा इव्हन स्वानंदी पण छान काम करत होती की! हे पुरस्कार फक्त अ‍ॅक्टिव्ह मालिकांसाठीच असतात की काय..? ज्या नुकत्याच संपल्या पण मागच्या वर्षांत होत्या अशांना नाही का?

Pages