सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
सिंहगडावर कारवी मन भरून फुलली
सिंहगडावर कारवी मन भरून फुलली आहे.

हे काही फोटोज
कारवी (Strobilanthes callosus)
तेरडा कुर्डु सोनकुसुम सो
तेरडा
कुर्डु
सोनकुसुम


ह्याचे नाव काय?

सोनकी
ह्याचे नाव काय? >>> बहुतेक
ह्याचे नाव काय? >>> बहुतेक हे...
https://www.google.com/search?site=&tbm=isch&source=hp&biw=1340&bih=590&...
़कारवी मुंबईच्या जवळात जवळ सहज रस्त्यावरुन जाताना किवा गाडीतून जाताना कुठे दिसेल. नॅशनल पार्क मधे आहे म्हणे पण तिकडे सुट्टीच्या दिवशी खुपच गर्दी असते.
अहाहा............सुंदर
अहाहा............सुंदर फुलं.... काय एकेक कलर आहे..
कारवी मुंबईच्या जवळात जवळ सहज
कारवी मुंबईच्या जवळात जवळ सहज रस्त्यावरुन जाताना किवा गाडीतून जाताना कुठे दिसेल. >> महाराष्ट्र नेचर पार्क, धारावी येथे दिसेल.
या कारवीत, निळ्या रंगाच्याही
या कारवीत, निळ्या रंगाच्याही वेगळ्या छटा बघितल्या आहेत मी. आंबा घाटात एक वेगळी छटा दिसली होती आणि तिथल्या झाडंचा शेपही जरा वेगळा होता.
वा जिप्सी!! कधी पासून ऐकतेय
वा जिप्सी!! कधी पासून ऐकतेय की सह्याद्रीमध्ये कारवी फुललीये...फार उत्सुकता वाटत होती. आज बघायला मिळाली
मोठं झाड असतं का हे?
योगेश काय सुरेख फुलं आहेत
योगेश काय सुरेख फुलं आहेत व्व!!
@जिप्सी...फ़ुलांचे फ़ोटो आणि
@जिप्सी...फ़ुलांचे फ़ोटो आणि फ़ोटोतील फ़ुले...सुंदर!
कारवी मुंबईच्या जवळात जवळ सहज
कारवी मुंबईच्या जवळात जवळ सहज रस्त्यावरुन जाताना किवा गाडीतून जाताना कुठे दिसेल. >> महाराष्ट्र नेचर पार्क, धारावी येथे दिसेल. >>> धन्यवाद इंद्रधनुष्य! जाऊन बघायला पाहिजे.
गणपतीला गावाहून परतताना करुळे घाटात दिसलेली.
पण हल्ली फेसबुक वर युवराज गुर्जर यांनी टाकलेला फोटो आणि करुळे घाटातली किवा मी गेल्या वर्षी लोणावळ्यात पाहिलेली प्रजाती वेगळी असावी. गुर्जरांच्या फोटोत सर्रास जांभळे तुरे दिसत होते, तर मी बघितलेल्या झाडाची उंची जास्त होती आणि पानांचा हिरवा आणि फुलांचा जांभळा ह्याचे प्रमाण ७५-२५ असे होते.
इर्रिटेट होऊ शकतो पण परत एक
इर्रिटेट होऊ शकतो पण परत एक प्रश्न विचारते ज्यावर चर्चा झाली असेल कदाचित..
मी जागु ने दिलेल्या डिरेक्शन प्रमाणे पिकासा वरुन फोटो अपलोड केलेत इथं जे बर्याच लोकांना दिसत नाही.. सो तुम्ही लोक्स कशावरुन फोटो अपलोड करता इथं ?
जिप्सी फुलं सुरेख. नवरात्र
जिप्सी फुलं सुरेख.
नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा.
अहाहा जिप्सी! नयनसुख ते हेच
अहाहा जिप्सी! नयनसुख ते हेच
ती शेवटची अगदीच इवलुशी गवतफुलं असतात, आमच्या सोसायटी गेटजवळ खूप फुलली आहेत
टीना, मी फ्लीकर वरुन करतो पण
टीना, मी फ्लीकर वरुन करतो पण ते पण कधी कधी, कुणाला कुणाला दिसत नाहीत. कुणाला कधी दिसतात तर कुणाला कधी दिसत नाहीत, कुणाला आधी दिसत नाहीत नंतर दिसतात, कुणाला आधी दिसतात नंतर दिसत नाहीत, कुणाला आय ई व दिसतात तर कुणाला क्रोम वर दिसतात, कुणाला लॅपी वर दिसताना तर कुणाला फोन वरच दिसतात ...
समजलं ?
तर मग मला समजाव !!!
टीना मी गूगल ड्राईव्हवरून
टीना मी गूगल ड्राईव्हवरून फोटो टाकते. त्याची प्रक्रिया खालील पानावर दिलीय. पण किचकट काम आहे आणि गूगल ड्राईव्ह खूप स्लो आहे.
http://www.maayboli.com/node/1556?page=4
खूप काळाने आले इथे. बरं वाटलं
खूप काळाने आले इथे. बरं वाटलं परत एकदा मस्त रंगीबेरंगी धागा विथ भरपूर माहिती बघून..
जिप्सी, कारवीचे क्लोज अप्स
जिप्सी, कारवीचे क्लोज अप्स असतील तर किंवा वरच्या फोटोतूनच क्रॉप करुन टाकता आले तर बघ ना प्लीज.
कारवीला फळे पण लागत असतील ना ? त्याचे फोटो कधी बघितलेच नाहीत मी. कारवीची मुद्दाम लागवड केल्याचेही ऐकले नाही कधी. योग्य त्या जागा असतील, उदा. सायनचा किल्ला, धारावीचा डोंगर तर तिथे बिया टाकता आल्या असत्या. बिया बघितल्या तर प्रसार कसा होत असेल त्याचा अंदाज येईल.
मस्त फोटो! कारवीचा बहर किती
मस्त फोटो! कारवीचा बहर किती दिवस टिकतो? ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यात बघायला मिळेल का कारवी?
माझे एक छोटेसे ऑपरेशन झाले
माझे एक छोटेसे ऑपरेशन झाले आणि बँडेज काढल्याबरोबर मी सुसाट सुटलो..
मुंबई ते पुणे आणि तिथून ब्राम्हणी ( राहुरी ) ला मित्राच्या घरी कांदेपोहे कार्यक्रम करून मग पुण्यात बावधन, सहकार नगर आणि सिंहगड रोड असे थांबे केले ( एकाच दिवशी चार सुगरणींच्या हातचे जेवण जेवलो ) मग विमानाने बँगलोर ला तिथून सहा तासाचा प्रवास करून कुर्ग ला गेलो... तिथल्या एका घरात घरचाच होऊन राहिलो.
त्या माऊलीच्या हातचे, विविधपदार्थ खाल्ले ( जंगली मश्रुम, जंगली आंबे, नीर डोसा, रानातली कारली नी काय काय )
त्यांच्याच कॉफीच्या बागेत भटकलो. झाडावरचे पेरु, संत्री, केळी तोडून खाल्ली . कुर्गच्या खेड्यातून भल्या पहाटे पायी पायी भटकलो. तिथली खास ठिकाणे बघितली . भरपूर फोटो काढले. मनसोक्त मसाले, चंदन, सिल्क खरेदी केली. ( मराटी मुग्गा नावाचा एक नवाच मसाल्याचा प्रकार पण आणला )
मग परत ६ तासांचा प्रवास करून बँगलोर ला आणि तिथून विमानाने मुंबईला..... हे सगळे ४ दिवसांत !
आता हप्त्या हप्त्याने टाकतो फोटो इथे !
नैरोबीत एके ठिकाणी ही वेल
नैरोबीत एके ठिकाणी ही वेल बघितली. हि खरी आहे यावर माझा विश्वासच बसेना, पण नैरोबीत नैसर्गिक रित्याच इतकी फुले फुलतात कि कुणी खोटी फुले ठेवेल, याची शक्यताच कमी आहे.
खुप झूम करून हे फोटो काढलेत आणि ती खरी आहे याची खात्री करून घेतली. हि वेल खाजगी जागेत होती, म्हणून फार जवळ जाऊन फोटो काढता आले नाहीत.
कुर्ग चे हे दोन प्रातिनिधिक
कुर्ग चे हे दोन प्रातिनिधिक फोटो
मस्तच दा... पहिला फोटो
मस्तच दा... पहिला फोटो राजासीटचा
जिप्सी, दिनेश मस्त फोटो
जिप्सी, दिनेश
मस्त फोटो आहेत
फुलं भारीच
जवळ जवळ सगळी फुलं एकदम
जवळ जवळ सगळी फुलं एकदम उमलली
मोबाईल वरून फोटो अपलोड करायचा पहिलाच प्रयत्न
दसऱ्याच्या हार्दिक
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
मस्त सोनटक्का. माझा यंदा आला नाही कुंडीतला.
दिनेशदा फोटो मस्तच.
सर्वांना विजयादशमीच्या
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नमस्ते निसर्ग प्रेमी यंदा
नमस्ते निसर्ग प्रेमी
यंदा आम्ही लावलेली बाग म्हंजे टॉट्ल फ्लॉप. माळी म्हणाला नाय(ट्रोजन) नाय
असो त्यानिमित्ताने कुठलं काम बाहेर द्यायचं हे तरी कळलं.
जिप्सी, कारवीचे फोटो अप्रतिम. जो_एस, सोनटक्का असा घोसाप्रमाणे लगडतो हे प्रथमच कळले. आभार्स
विजयादशमीच्या हार्दिक
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मस्त फोटो!
दिनेशदा तुमची कमालच!! कुर्ग खुप सुन्दर आहे. राजाजी सिटवर बसून निवांत सुर्यास्त बघायसारखे सुख नाही. आफ्रिकन फुलांची रंगसंगती छान आहे.
सोनटक्का असापण फुलतो? माझी बहिण कुंडीमधे एक दोन येतत त्यावर कित्ती खुश होते!
वेका , तुमच्या काउंटी
वेका , तुमच्या काउंटी एक्स्टेंशन ऑफिसमधे सॉइल टेस्टिंग ची सोय असेल. तिथून एकदा मातीचं अॅनलिसिस करुन घ्या. तुम्हाला काय लागवड करायची आहे, किती जागा आहे त्यावरुन नक्की काय काय ( आणि किती) अमेंडमेंट करावी लागेल त्याचा रीपोर्ट मिळेल.
ओह खरंच की मेधातै. म्हंजे घर
ओह खरंच की मेधातै. म्हंजे घर बांधून झाल्यावर बिल्डरने बाहेर चुना मारला आम्हाला लिटरली
असो तुम्ही जाताय का यंदा डेलावेअर वॉटर गॅपला ?
आभार
Pages