लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:23

HowToGiveImageLink.GIF

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.

आता तुमच्या मजकुरात Image tag येईल. लेखाचे अवलोकन [preview] करताना किंवा लेख साठवून ठेवल्यावर (Save केल्यावर) तुम्हाला प्रकाशचित्र दिसेल.
खाजगी जागेत साठवलेली प्रकाशचित्रे काढून टाकली तर ती ज्या लेखात टाकली आहेत तिथून दिसेनाशी होतात. यावर उपाय शोधणे चालू आहे.

खाजगी जागेत २० एम्बीपर्यंत जागा उपलब्ध आहे. २० एम्बी भरल्यावर अजून प्रकाशचित्रे चढवण्यासाठी नको असलेली प्रकाशचित्रे उडवून जागा रिकामी करणे आवश्यक आहे.

प्रकाशचित्रांचा आकार हा शक्यतोवर ४०० पिक्सेल असावा, जेणे करून फोटोंचे पान लगेच दिसेल, तसेच मायबोलीवरच्या जाहिराती दिसतील.

पिकासा लिंक कशी द्याल

पिकासामधील चित्राची लिंक येथे देण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी गुगलच्या माहिती संकलनात पहा

फ्लिकरवरून येथे लिंक देण्यासाठी फ्लिकर FAQ मध्ये पहा

फोटोंचा साईझ कमी करण्यासाठी mspaint, irfanview, acdsee ते फोटोशॉप पर्यंत अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टची पॉवरटॉय सिरीजदेखील आहे. फ्लिकरसारखी संकेतस्थळे ही सुविधा विनामूल्य देतात. आपल्याला जे सोयीचे वाटते ते आपण वापरू शकता.

सूचना: शक्यतोवर ८०० पिक्सेलच्या प्रकाशचित्रांची लिंक देऊ नका. असे प्रकाशचित्रांचे पान दिसण्यात वेळ लागतो, [डायल अप कनेक्शन असेल तर जास्तच ...] आणि मायबोलीच्या जाहिरातींवर प्रकाशचित्र पसरते.

सचिन जर अश्या रितीने विड्थ आणि हाईट दिली तर अ‍ॅस्पेक्ट रेशो राखला जातो का? >>> @vt220, होय, अ‍ॅस्पेक्ट रेशो राखला जातोय.

उदाहरणार्थ-

खालील फोटोत width="384" height="384" आहे.
images (40).jpg

त्यात मी बदल करून width="384" height="" ठेवली. तरीही वर्तुळ पूर्ण गोलाकारच दिसतेय.
images (40).jpg

पुन्हा त्यात मी बदल करून width="300" height="" ठेवली. तरीही वर्तुळ पूर्ण गोलाकारच दिसतेय.
images (40).jpg

पुन्हा त्यात मी बदल करून width="25%" height="" ठेवली. तरीही वर्तुळ पूर्ण गोलाकारच दिसतेय.
images (40).jpg

तात्पर्य: आपण आपणांस सोयीस्कर अशी width निवडावी. त्याला अनुसरून height आपोआप ऍडजस्ट होते.

गोव्यातील शांतादुर्गा मंदिर, झूम करून पहा. panorama फोटो आहे. मी काढलाय.

मला Google drive वरूनसुद्धा फोटो पोस्ट करणे जमले. मोगॅम्बो फिरसे खुश हुआ. Lol

इंद्रधनुष्य मला पण पहिल्यांदा वाटलेले तसे. पण नंतर ते फोटो दिसत आहेत. पण सुरुवातीला फोटो लोड व्हायला खुपच वेळ लागतो आणि एकुणच खुप व्याप आहेत. लिंका कॉपी पेस्ट करत बसावे लागते, उत्साह निघून जातो... Sad

पॅनोरमा साठी काय केले? मी टाकलेला फोटो ९० अंशात फिरला होता.>>> @vt220, धन्यवाद! विशेष काही नाही केलं. Original Fhoto width= 3525 आणि height= 859 होती ती लिंक देताना width=100%, height=100% दिलीय.आणि फोटो Google drive मधून चढवलाय. तुम्ही करून बघा आणि कळवा बरं!

खुपच वेळ लागतो आणि एकुणच खुप व्याप आहेत. लिंका कॉपी पेस्ट करत बसावे लागते, उत्साह निघून जातो... >> हो ना..

@vt220, इंद्रधनुष्य, कांदापोहे, किती टेन्शन घेताय राव!!! ह्याच धाग्यावर थोडं मागे पुढे वाचा, म्हणजे मार्ग सापडेल. आणि एकदा जमलं कि होणारा आनंद अवर्णनीय असेल. मीच काल तीन तास झगडलो तेव्हा मला जमलंय. आणि ते सुद्धा मोबाईलवरून. एकदाचं जमलं कि पुढचं सगळं सोप्प जातंय. आगे बढो, हम तुम्हारे साथ है!!! तुम्हां सर्वांना शुभेच्छा!!!

खालील प्रतिसाद सर्वांच्या माहितीकरिता----

Nidhii | 22 September, 2016 - 16:53
ओ तो झूऽऽऽम होऊनच दिसतोय.. आकार जरा कमी करा की.

सचिन काळे | 23 September, 2016 - 08:07
@Nidhii, तो panoramaic फोटो आहे. सर्वसाधारण फोटोत फक्त समोरच्या दिशेचा view दिसतो. जरका तुम्हाला एकाच फोटोत डावा, समोरचा आणि उजवा view एकाचवेळी दाखवायचा असेल तर डावीकडून उजवीकडे एकूण चार ते पाच फोटो घेऊन ते panorama technique मध्ये एकत्र जोडता येतात व एक सलग लांब फोटो दिसतो. जो मोठा (zoom) केला तरच त्यातील details दिसून येतात. Panoramaic technique तुमच्या स्मार्ट फोनच्या कॅमेऱ्यात सुद्धा असते. एकदा वापरून पहा. खुश व्हाल. आम्हालाही कळवायला विसरू नका बरे!!

@vt220, इंद्रधनुष्य, कांदापोहे, किती टेन्शन घेताय राव!!! ह्याच धाग्यावर थोडं मागे पुढे वाचा, म्हणजे मार्ग सापडेल. आणि एकदा जमलं कि होणारा आनंद अवर्णनीय असेल. मीच काल तीन तास झगडलो तेव्हा मला जमलंय. आणि ते सुद्धा मोबाईलवरून. एकदाचं जमलं कि पुढचं सगळं सोप्प जातंय. आगे बढो, हम तुम्हारे साथ है!!! तुम्हां सर्वांना शुभेच्छा!!! >>>

सचिन मला ही जमलय हो. पण गुगल ड्राइव्ह मधे फोटो शेअर करुन मग लिंक तात्पुरती नोट्पॅड्मधे कॉपी करुन त्यातला फक्त उपयोगी "id" कॉपी करुन परत तो गुगलच्या दुसर्या लिंकमधे पेस्ट करा असा बरच व्याप करावा लागतो. पिकासा सरळ लिंक उपलब्ध करुन द्यायचा.
फ्लिकर पण कदाचित देत असेल पण मी ते वापरत नाही. आणि मला IE ब्राउजर ची सवय आहे . गुगल ड्राइव्ह भारी हळू चालते IE मध्ये. Sad

ते panorama १००%मध्ये पेज व्यापून नाही जाणार का? त्यामुळे मी width २५% केलेली. नंतर ट्राय करीन.

@vt220, आपली अडचण लक्षात आलीय. Flickr मध्येही तसंच करावं लागतंय.

ते panorama १००%मध्ये पेज व्यापून नाही जाणार का? >>> माझं तर झालं नाही. मी सुद्धा पहिल्यांदा 50% टाकले होते तर फोटो फारच लहान दिसत होता. म्हणून 100% केले. तर झालं व्यवस्थित.

..

गुगल ड्राईव्हवरून फोटो टाकले तर मला ते इथे दिसावेत यासाठी कायमस्वरूपी ड्राईव्हवर ठेवावे लागतील का? ड्राईव्हवरून डिलीट केले तर इथेही दिसणे बंद होईल का?

ड्राईव्हवरून डिलीट केले तर इथेही दिसणे बंद होईल का?>> बहूतेक. एक करुन बघ ना पियु. दुधका दुध और पानीका पानी.

.

गुगल फोटो मधून फोटो देता येत नाही असे मागे कोणीतरी लिहिले आहे.
गुगल फोटो मधून असा फोटो देता येतो.
त्याची डेस्कटॉप/लॅपटॉप वरुन सोपी पद्धत म्हणजे... :
गुगल फोटो मधे जाऊन हवा तो फोटो सिलेक्ट करायचा...
त्याला Right Click करायचे...
जी विंडो उघडेल त्यात सर्वात खाली Inspect हा पर्याय दिसेल...
त्यावर Click करावे...
डाव्या हाताला अर्ध पान भरुन एक खिडकी उघडेल, आणि त्यात काही भाग निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर मुळातच सिलेक्ट झालेला दिसेल...
तो काॅपी करायचा....
बस.. हिच आपली Link....
ती मजकूरात Paste केली की काम झाले...
(चित्र योग्य त्या साईझ मधे आणण्यासाठी 600 साईझ देण्याबाबत मागे माहिती आधीच कुणीतरी दिलेली आहे..)

प्रचि 01.. चित्रावर Right Click (Select Inspect which is at bottom)

01 a.jpg

प्रचि 02.. Select and Copy Blue Highlighted Portion..

_IMG_000000_000000_13.jpg

ही Copy केलेली लिंक मजकुरात वापरावी..

Dhanyavad niru. Mi try karun baghte. Mala he shikaych hota.
Google photo sodun ajun kahi option ahe ka?

धन्यवाद नीरु , गुगल फोटो मधून फोटो द्यायला जमले . पद्धत सोपी करून सांगितल्याबद्दल आभार

Pages