लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:23

HowToGiveImageLink.GIF

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.

आता तुमच्या मजकुरात Image tag येईल. लेखाचे अवलोकन [preview] करताना किंवा लेख साठवून ठेवल्यावर (Save केल्यावर) तुम्हाला प्रकाशचित्र दिसेल.
खाजगी जागेत साठवलेली प्रकाशचित्रे काढून टाकली तर ती ज्या लेखात टाकली आहेत तिथून दिसेनाशी होतात. यावर उपाय शोधणे चालू आहे.

खाजगी जागेत २० एम्बीपर्यंत जागा उपलब्ध आहे. २० एम्बी भरल्यावर अजून प्रकाशचित्रे चढवण्यासाठी नको असलेली प्रकाशचित्रे उडवून जागा रिकामी करणे आवश्यक आहे.

प्रकाशचित्रांचा आकार हा शक्यतोवर ४०० पिक्सेल असावा, जेणे करून फोटोंचे पान लगेच दिसेल, तसेच मायबोलीवरच्या जाहिराती दिसतील.

पिकासा लिंक कशी द्याल

पिकासामधील चित्राची लिंक येथे देण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी गुगलच्या माहिती संकलनात पहा

फ्लिकरवरून येथे लिंक देण्यासाठी फ्लिकर FAQ मध्ये पहा

फोटोंचा साईझ कमी करण्यासाठी mspaint, irfanview, acdsee ते फोटोशॉप पर्यंत अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टची पॉवरटॉय सिरीजदेखील आहे. फ्लिकरसारखी संकेतस्थळे ही सुविधा विनामूल्य देतात. आपल्याला जे सोयीचे वाटते ते आपण वापरू शकता.

सूचना: शक्यतोवर ८०० पिक्सेलच्या प्रकाशचित्रांची लिंक देऊ नका. असे प्रकाशचित्रांचे पान दिसण्यात वेळ लागतो, [डायल अप कनेक्शन असेल तर जास्तच ...] आणि मायबोलीच्या जाहिरातींवर प्रकाशचित्र पसरते.

< img src="/files/u62671/IMG-20160908-WA0003.jpg" width="899" height="1200" alt="IMG-20160908-WA0003.jpg" />

आता परत एकदा वरची लिंक कॉपी करुन < आणि img मधला स्पेस काढून पोस्ट करा.
मी तुमच्या फाईलचं नाव IMG-20160908-WA0003.jpg ऐवजी MG-20160908-WA0003.jpg असं टाकलं होतं आधी म्हणुन नाही आला फोटो.

< img src="/files/u62671/IMG-20160908-WA0003.jpg" width="600" height="800" alt="IMG-20160908-WA0003.jpg" />

आता वरच्या लिंक मध्ये साईझ कमी केलाय. ती वापरुन बघा आधी प्रमाणेच.
not sure, पण बघा ट्राय करुन कसा येतो फोटो.

Thanks मानव आता तुमची दिलेली लिंक सेव करुन ठेवेल. असेच मायबोली मास्टर शेफ मधे पण हेच चालेल ना.धन्यवाद भरपुर

मंडळी आता पिकासा बंद झाले आहे. गुगल फोटो किंवा गुगल ड्राईव्हवरुन फोटो कसे देता येतील हे कुणी screeshot सह देईल का?

गुगल फोटो किंवा गुगल ड्राईव्हवरुन फोटो कसे देता येतील हे कुणी screeshot सह देईल का? >>>>तसेच Flickr वरूनसुद्धा!!!
Flickr वर फोटो उघडून copy link केल्यावर त्यामध्ये कोणतेही extention ( .jpg .jepg वगैरे) येत नाहीए. पण लिंक कोठेही पेस्ट केल्यावर, टिचकी मारल्यावर फोटो बरोबर उघडल्या जातोय.

मला An illegal choice has been detected. Please contact the site administrator.

हा error येतोय

गुगल फोटोवर त्यांनी उघडपणे म्हटले आहे कि तिथले फोटो वेबसाईटवर शेअर नाही करता येणार. त्यासाठी गुगल ड्राईव्ह हाच पर्याय आहे.

गुगल ड्राईव्ह वरुन शेअर करण्याचे प्रात्यक्षिक इथल्या चित्रात दिल्याप्रमाणे आहे...

"On public web site" ऑप्शन सेलेक्ट करुन "Save" बटन दाबा.

इथली लिंक कॉपी करा

आणि ह्या इथे पेस्ट करा

गुगलच्या ज्या लिंकमधे कॉपी करायचे ती लिंक ह्याप्रमाणे आहे.

img src="http://drive.google.com/uc?export=view&id= 0B0ttljhbkaD8dEZ6VHc3NHBLWkE" width="75%" height="75%"

The width and height can be managed by giving percent value, so that original photo's aspect ratio is maintained.

मी आत्ता गुगलड्राइव्हवरून फोटो कसे अपलोड करायचे हाच प्रश्न विचारायला आले होते.
वरची प्रोसेस ट्राय करून पहाते.
धन्यवाद.

नो लक. नाहीच होत आहे वर्क.
आता तर मला तुम्ही टाकलेले प्रोसेस चे फोटोज पण दिसत नाहीयेत.

vt220, धन्यवाद. हे वर्क झालं.

एक करेक्शन आहे.
img src="http://drive.google.com/uc?export=view&id= 0B0ttljhbkaD8dEZ6VHc3NHBLWkE" width="75%" height="75%"
या लिंकमधे id= आणि अ‍ॅक्चुअल नंबर यात एक स्पेस आहे. ती काढली तर फोटो व्यवस्थित दिसतोय.

@रार, तो जो नंबर आहे तिथे तुझ्या शेअर्ड फोटोचा नंबर घाल.

धन्यवाद!!!

img src="----" width="600" height="" alt="" /

Instagram वर असलेली .JPG किंवा .JPEG extention असलेली फोटोची copy link कॉपी करून वर दिलेल्या वाक्यात "----" ह्या मध्ये पेस्ट करा आणि सम्पूर्ण वाक्य <> ह्याच्या मध्ये घालून, कुठेही स्पेस न ठेवता send करा.

उदाहरणार्थ,
वरच्या फोटोचे वाक्य खालील प्रमाणे आहे.
img src="https://farm8.staticflickr.com/7259/6955194030_43e2dd2017_o.jpg" width="600" height="" alt="" /

हे वाक्य <> ह्यात घालून send केले तर खालील प्रमाणे फोटो दिसेल.

या लिंकमधे id= आणि अ‍ॅक्चुअल नंबर यात एक स्पेस आहे. ती काढली तर फोटो व्यवस्थित दिसतोय. >>> धन्यवाद rmd!
मी बाहेर जाण्याच्या गडबडीत स्पेसची गंमत सांगायला विसरले. मागे कधीतरी त्या स्पेस शिवाय लिन्क टाकल्यावर काहीतरी चुकीचे छापले गेलेले म्हणुन ते वाक्य दिसावे म्हणुन मी उगिचच स्पेस टाकलेली.
एनिवे आता सगळ्यांना समजले बरे झाले...

img src="----" width="600" height="" alt="" / >>> सचिन जर अश्या रितीने विड्थ आणि हाईट दिली तर अ‍ॅस्पेक्ट रेशो राखला जातो का?

Pages