क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल सहाच्या जागी कीपर म्हणून का?
तुर्तास तरी कठीण आहे. त्याची किपिंग बंडल आहे.
आणि तो फलंदाज म्हणूनही जागा मिळवू शकतो एवढी क्षमता आहे त्यात, त्याला या कुबड्यांची गरज नसावी.

के राहूल ने साहाच्या आणि रहाणेच्या जागेवर दावेदारी सांगितली आहे >> साहा pure wicket keeper आहे, राहुल कामचलाऊ कीपर आहे. टेस्ट मधे तरी बॅटसमन who can keep पेक्षा keeper who can bat हवा. राहाणे ला राहुल हा पर्याय होउ शकत नाही. राहाणे प्रत्येक बाबतीमधे राहुलपेक्षा उजवा बॅटसमन आहे. (ह्यात राहुलला कमी लेखण्याचा हेतू नाही. त्याने त्याला नेहमी substitute म्हणून संधी मिळाल्यावर जी जिद्द दाखवली आहे ती उल्लेखनीय आहे. पण त्याच्या शतकी innings वगळल्या कि जे स्कोर दिसतात किंवा खर्‍या सिमिंग ट्रॅक वर लंकेच्या मिडीयम पेस पुढे त्याची अवस्था झाली होती ते आठवल्यावर त्याला अजून पुढचा पल्ला गाठायचा आहे असे वाटते.)

पुजारा च्या स्थानाबद्दल थोडी कोल्हे कुई सुरू झालेली आहे. He seems like step child of Indian cricket.

<< टेस्ट मधे तरी बॅटसमन who can keep पेक्षा keeper who can bat हवा>> १००% सहमत.

<< राहाणे ला राहुल हा पर्याय होउ शकत नाही. राहाणे प्रत्येक बाबतीमधे राहुलपेक्षा उजवा बॅटसमन आहे. >> हें खरं असलं तरीही अशी स्पर्धा असणं एकंदरीतच संघाच्या फलंदाजीचा दर्जा सुधारायला कारणीभूत ठरतं, हेंही आहेच.

पुजारा हा कसोटीसाठी 'लंबे दौडका घोडा' आहे, असा मला तरी विश्वास वाटतो; त्याच्याबद्दल उगीचच परत परत शंका उपस्थित करत न बसतां, त्याला संघात स्थिरावायला देणं संघाच्या हिताचंच ठरेल.

पुजारा हा कसोटीसाठी 'लंबे दौडका घोडा' आहे, असा मला तरी विश्वास वाटतो; त्याच्याबद्दल उगीचच परत परत शंका उपस्थित करत न बसतां, त्याला संघात स्थिरावायला देणं संघाच्या हिताचंच ठरेल. >> +१. मागच्या इंग्लंड दौर्‍यानंतर रोहितला आत आणताना पुजाराला एकदम सापत्नभावाने वागावले गेले. लंकेच्य दौर्‍यावर पुजाराचे स्थान बदलते होते. त्याचा परीणाम त्याच्या बॅटींग वर होउ शकतो हे ही लक्षात घेणे जरुरी आहे.

स्पर्धा असण्याबाबत दुमत नाही पण सर्व खेळाडूंना समान संधी देणेही जरुरी आहे. लिमिटेड ओव्हरस्मधे खेळेलेला खेळाडू त्याच फॉर्म वर टेस्ट मधे घुसडला जाणे ना त्याच्या फायद्याचे आहे ना काढले गेलेल्या खेळाडूच्या. शेवटी "मागच्या सामन्यात शतक झळकवलेल्या खेळाडूला कसे काढायचे ?" हा प्रश्न उभा राहिला कि युवराज सिंग होण्याची शक्यता बळावते.

माझ्या मते राहुल, धवन, विजय हे सलामीच्या फलंदाजांचे त्रिकूट आहे हे तसेच राहू द्यावे. अपवादात्मक परिस्थिती वगळता त्यातल्या कोणाला मधल्या फळीत घुसवून दोन्ही फळ्यांमधे अस्थिरता निर्माण करणे फारसे हितावह नाही. पुजारा, कोहली, राहणे नि (झालच तर रोहित - अजून त्याच्या टेस्ट फॉर्मबद्दल मलआह्पूर्ण खात्री नाही पण सध्या तरी इतर फारसे पर्याय पटकन दिसत नाहित) हे मधल्या फळी साठी असावे. संघाच्या कंपोझिशनप्रमाणे पहिल्या तिघांमधले दोघे नि उरलेल्या चौघांमधले तिघे खेळू शकतात. ह्यात बाहेर राहिलेल्या खेळाडूवर अन्याय जरुर होतो पण तो प्रश्न योग्य तर्‍हेने rotation करून सांभाळता येउ शकतो.

२०१३ च्या द. अफ्रिका दौर्यापासून सलग ८ सिरीज मधे रहाणेची किमान एक तरी ९०+ धावांची ईनिंग आहे आणी असा रेकॉर्ड असणारा तो एकमेव खेळाडू आहे असं आत्ताच वाचलं. ज्जे बात!

रहाणे, पुजारा आणी राहूल विषयी असामी आणी भाऊंना अनुमोदन!

"खरोखर प्रश्न असेल तर हा कि साहाच्या पुढे काय ?" - ह्याचं उत्तर ईतक्यात देण्याची वेळ येऊ नये. साहा ३१ च वर्षांचा आहे. अजुन ३-४ वर्ष तरी सहज खेळू शकेल.

टेस्ट मधे तरी बॅटसमन who can keep पेक्षा keeper who can bat हवा>> सहमत पुर्ण पणे!

विकेट किपर हा परिपुर्ण विकेट किपर असावा!
एकदा अकारण किरमाणी ऐवजी भारत रेड्डी ला घेऊन इंग्लंड दौरा केलेला.. त्या नंतर असेच राहुल द्रविड वर प्रयोग केला..

<< सॅमसन हे उत्तर होईल असे वाटत नाही.>> कां ? सॅमसन तरूण आहे. कसोटी सामन्याच्या पातळीवर खेळायला त्याच्या 'कीपींग'मधे कांहीं उणीवा असतीलच तर तो त्या सहज दूर करूं शकतो. मला वाटतं त्याच्यावर आत्तांच काट मारणं न्याय्य व भारतीय संघासाठीही दूरदृष्टीचं ठरणार नाहीं.
[ व्यक्तीशः, मला किपींग व बॅटींग या दोन्हीबरोबरच त्याचा मैदानातला उत्साही वावर बघूनही सॅमसन संघात असावासा वाटतो. शिवाय, केरळमधला एखादा खेळाडू गुणवत्तेवर आपल्या राष्ट्रीय संघात आला, तर त्याचं अप्रूप आहेच ना ! पण हा झाला माझा केवळ व्यक्तीगत कल ]
तिथं भारत वे.इंडीजची धुलाई करतो आहे याच्या आनंदाला कां कुणास ठावूक दु:खाची झालर आहे; कदाचित, वे. इंडीज जेंव्हां जगभर दादागिरी करत होते, तेंव्हांही तिथल्या खेळाडूनी व प्रेक्षकानी भारतीय संघावर मात्र मैत्री व कौतुक उधळलं होतं , त्यामुळेही असेल.

मला वाटतं त्याच्यावर आत्तांच काट मारणं न्याय्य व भारतीय संघासाठीही दूरदृष्टीचं ठरणार नाहीं. >> मी आत्ताबद्दलच (एव्हढ्या भरगच्च सीझन मधे सहा जखमी झाला समजा) म्हणतो आहे भाऊ. सॅमसन चा सध्याचा खेळ (किपिंग) हा टेस्ट च्या दर्जाचा नाहि आहे. प्रामाणिकपणे मला वाटते कि तो लिमिटेड क्रिकेटमधे नक्कीच योग्य ठरेल पण टेस्ट मधे नाही. एव्हढ्या वर्षानंतर किपिंग मधल्या उणिवा दूर करता येतील ?

<< एव्हढ्या वर्षानंतर किपिंग मधल्या उणिवा दूर करता येतील ? >> खेळत खूप वर्षं असला तरीही सुधारणा न होण्याचं वय थोडंच झालंय त्याचं; २२वर्षंच तर वय आहे त्याचं !! शिवाय, त्याला आत्तां घ्यावा असं नाहीच म्हणत आहे मीं; त्याच्यावर आत्तांच काट मारणं उचित नसावं, एवढंच.

ओझाबद्दल पण तो टेस्ट लेव्हलचा किपर नाही असे वाचले होते. किंबहुना साहाला सद्य स्थितीमधे पर्याय म्हणून असलेले कोणीच टेस्ट च्या दर्जाचे किपर्स नाहित असा सूर होता. सॅमसन, ओझा, कार्थिक, पटेल हि नावे त्यात होती.

भाऊ कदाचित माझे चुकत असेल पण किपर जात्याच किपर असतो, त्याची एक शैली असते. त्यात थोडा फार बदल करता येतो पण जशी बॉलिंग अ‍ॅक्शन पूर्णपणे बदलता येते तसे करता येत नाहि असे वाचनात आले आहे. भारतीय किपर्स नि ऑस्ट्रेलिअन किपर ह्यांची शैली बघितली तर पूर्णपणे भिन्न असते. सॅमसनव्ची शैली भारतीय जातकुळीशी मिळती जुळती नाही. (ह्याचा अर्थ तो तो यशस्वी ठरू शकणार नाही असाही नाही, धोनी इतर किपर्स पेक्षा वेगळा असून कधीच खटकला नाही) पण सध्या तरी तो आहे त्या शैली मधे टेस्ट किपर च्या लेव्हल ला पोहचला नाहि असे त्याच्या रणजी कामगिरीचे मूल्यमापन वाचलेले होते. इतकी वर्षे खेळल्यावर (नि तेही मुख्यत्वे लिमिटेड क्रिकेट वर फोकस ठेवून - हा त्याच्यावर दोषारोप नाहिये) कितपत बदल होउ शकतील कोण जाणे ? ह्या क्षणी लेख कुठे होता ते आठवत नाही नंतर शोधून लिंक देतो. त्याचे बॅटींग टेंपरामेंट बघता भविष्यामधे नुसत्या बॅटींग च्या जोरावर संघात आला तरी बरे वाटेल ( कमीत कमी लिमिटेड ओव्हर्समधे तरी)

वर तुम्ही 'केरळमधला एखादा खेळाडू गुणवत्तेवर आपल्या राष्ट्रीय संघात आला' हे म्हणालात हे गम्मतीशीर वाटले. हेच केरळ कशाला कुठल्याही प्रांताला लागू व्हावे. भले पूर्ण संघ एकाच राज्यातून (खर तर प्रांतातून म्हणायला हवे) आला तरी हरकत नाही पण तो गुणवत्तेनुसार असावा. आफ्रिके ची रिझर्वेशन पॉलिसी बघता हे अधिकच जाणवतेय.

ओझाचे किपिंग बेस्ट आहे.. ऑस्ट्रेलिया इंग्लंड मधे त्याने बरीच चांगली विकेटकिपिंग केली होती.
परंतू साहा, राहूल, सॅमसंग यांच्यामुळे त्याचे नाव चर्चेत येत नाही. भारतीय ए टीम चा तो कॅप्टन पण आहे/होता

<< 'केरळमधला एखादा खेळाडू गुणवत्तेवर आपल्या राष्ट्रीय संघात आला' हे म्हणालात हे गम्मतीशीर वाटले.>> केरळमधून क्वचितच राष्ट्रीय संघात क्रिकेटर येतो , म्हणून तसं म्हटलं; गुणवत्तेचा निकष याबद्दल कधींच मतभेद असणार नाही,

असामीजी, तुम्ही लिंक दिलेला लेख वाचला. साहा, ओझा व कार्थिक तिघेही वयाची तिशी ओलांडलेले खेळाडू आहेत पण ते तंदुरुस्त असल्याने आणखी २-३ वर्षं उपयुक्त ठरूं शकतात, असं त्या लेखातच म्हटलंय. २-३ वर्षांनंतर काय व कोण ?
या संदर्भातच कॄपया माझं << मला वाटतं त्याच्यावर आत्तांच काट मारणं न्याय्य व भारतीय संघासाठीही दूरदृष्टीचं ठरणार नाहीं. >>, हें विधान पाहावं.

भाऊ आपण सर्कलमधे फिरतो आहोत. Happy मी आत्तासाठी म्हणत होतो नि आत्ता सॅमसन रेडी नाहि ह्याबद्दल दुमत नाही. नंतर रेडी होईल कि नाहि ह्याबद्दल मला खात्री नाही, तुम्हाला आशा आहे.

<< तेंव्हा क्रुपया 'जी' नका लावू. >> ह्यांत वयाचा खरं तर संबंध नाही पण तुम्हाला नाही रुचत तर नाही लावणार 'जी' !

वे. इंडीजमधे चेंडू इतका छान स्विंग होतोय म्हणजे तिथलं हवामान बदलंय कीं आपले गोलंदाज तरबेज झालेत ? Wink

विकेट कीपरचं मुख्य काम म्हणजे किपींग करणं, बॅटींग हे अ‍ॅडीशनल अ‍ॅसेट होऊ शकतं. अन्यथा काय होतं हे अकमल बंधूंनी (विशेषतः कामरान द ग्रेट!) यांनी दाखवून दिलंच आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून विकेटकीपर हा चांगला बॅट्समन असणं हा अपवादच होता. सॉन टॅलन, गॉडफ्रे इव्हान्स, बॉब टेलर, इव्हान बॅरो, किरण मोरे, सलिम युसूफ हे उत्कृष्ट कीपर होते पण बॅटींग आनंदीआनंद होता. किरमाणीही बराचसा यांच्याच पंक्तीतला. उलट लेस अ‍ॅमेस, अ‍ॅलन नॉट, इयन हिली, अँडी फ्लॉवर, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, बीजे वॉटलिंग, ब्रेंडन मॅक्क्लम, कुमार संगकारा हे निव्व्ळ बॅट्समन म्हणूनही खेळू शकले असते. इयन स्मिथ / मार्क बाऊचर / मॅट प्रायर / ब्रॅड हॅडीन हे टिपीकल कीपर-बॅट्समन. धोणीचं टेस्ट बॅट्समन म्हणून नाव घेणं हा बाकीच्यांवर अन्याय ठरेल (अगदी त्याच्या ६ सेंच्युरी असल्या तरी) पण त्याचं किपींग चांगलं होतं. टेस्ट मॅचेसमध्ये इंग्लंडनेही अ‍ॅलेक स्ट्युअर्ट असताना अनेकदा जॅक रसेलला विकेटकीपर म्हणून वापरलं आहे.

धोणीचं टेस्ट बॅट्समन म्हणून नाव घेणं हा बाकीच्यांवर अन्याय ठरेल (अगदी त्याच्या ६ सेंच्युरी असल्या तरी) पण त्याचं किपींग चांगलं होतं.
>>>

टेस्टला साजेसे टेकनिक त्याकडे नक्कीच नव्हते. पण अंडरप्रेशर खेळता येणे हा गुण त्याकडे होता, तसेच त्याच्या टेंपरामेंट बद्दलही शंका नसावी. सोबत त्याच्याकडे अ‍ॅडजस्टमेंट नावाचा एक कमालीचा प्रकार होता. अगदी ईंग्लंडच्या स्विंग वातावरणातही त्या जिवावर त्याला तग धरलेले पाहिलेय.

कोहली आणि मुरली विजयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात सामना काढलेलाच, आपण विजयाकडे जात होतो पण अचानक आपण ढेपाळलो, कोणी तगच धरला नाही, कोहलीनेही अखेर फ्रस्ट्रेशनमध्ये विकेट टाकली, त्या सामन्यात धोनी नव्हता. असता तर नक्कीच निकाल वेगळाच असता.. भले विजयाचे श्रेय कोहली-विजयला गेले असते पण तो मिळवून द्यायला धोनीने मदत केली असती.. चुटपुट लावणारा पराभव होता म्हणून सहज आठवला..

बाकी धोनीच्या टेस्ट किपिंगबद्दल बोलायचे झाल्यास जेवढा तो स्पिनर करत असताना जगात सरस आहे तसा वेगवान गोलंदाज करत असताना नाही, कारण त्याला सूर मारून झेल घेणे वगैरे जमत नाही. कसोटीला याची गरज् जास्त लागते. त्यामुळे कसोटी किपींगबाबत मी त्याला कमीच गुण देईन

पाऊस पाऊस फक्त पाऊस
सामना जिंकता आला नाही, वेळ कमी पडला, तर डिक्लेअर करायला उशीर केला का या विचाराने कोहली उद्या रात्री काही झोपणार नाही..

त्या सामन्यात धोनी नव्हता. असता तर नक्कीच निकाल वेगळाच असता. >> धोनीच्या बद्दल पहिला पॅरा लिहिला त्याला अनुमोदन पण हे झाले नसते. धोनी असता तर मूळात ह चेसच झाला नसता. He had become too defensive captain by then.

कारण त्याला सूर मारून झेल घेणे वगैरे जमत नाही >> तो आधी करत असे मग काहितरी injury झाल्यानंतर बंद झाले.

Pages