भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

Submitted by अपूर्व on 6 June, 2016 - 01:46

ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html

विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.

पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या.

आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे.

हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या.

a
#macaulayism

युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत.

नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते.

सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्‍या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्‍याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं.

या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे.

a2qq

आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे.

मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत.

https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach-...
http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-seco...
http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better-...
http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongue...
https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-phil...
http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pach...
http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-ton...
http://www.cu.edu.ph/?page_id=3290
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147
http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा विषय मांडताना मला तो अस्मिता/ अभिमान या अर्थाने अपेक्षीत नव्हता हे ही मी मागेच क्लिअर केलेले होते!
आता पुढे....

<<

एक अवांतर प्रश्न.

वेल्लाभट = अपूर्व = अभि.नव असे आहे का?

तुला किंवा तुझ्या वर्गातल्या मुलांना अनुभव आला नाही म्हणजे ते घडतच नाही अस आहे का ? वर भ्रमरने त्यांनाही ही अडचण आलीये हे नमूद केलेय.. >>>> जाई, असं होण्याची शक्यता मी फेटाळलेली नाही Happy मी पण माझा अनुभवच लिहित आहे. भ्रमरने एका बाजुचा अनुभव लिहिला आहे, तसाच वर अमितने आणि मयेकरांनी दुसर्‍या बाजूचाही अनुभव लिहिला आहे. एकूणात ह्या बाबतीत जनराईज्ड विधान करण्यात काहीच अर्थ नाही हेच आधीही मी म्हणत होतो.

हे वाक्य म्हणून फार चांगलं आहे . पण कॉर्पोरेटस मध्ये फक्त नॉलेज असून चालत नाही. इतरही अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. इंग्लिश भाषेवरच प्रभुत्व ही त्यातली एक गोष्ट. >>>> हे नुसतं चर्चेत फेकायचं वाक्य म्हणून फेकलेलं नाही. इंग्लिश भाषेवरच प्रभुत्व ही त्यातली एक गोष्ट हे जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा बाकीच्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या हे अध्यारूत आहे. फक्त इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असूनही काम भागत नाही आणि त्यामुळे तुम्ही फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलात म्हणजे तुम्हांला संभाषण कौशल्य आणि त्यावर प्रभुत्त्व येईलच असं काही नाही. सांगायचा मुद्दा एव्हडाच ज्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायचय/ पेलतय/ शक्य आहे त्यांनी जरूर जावं, फक्त त्यासाठी कॉर्पोरेटमध्ये उपयोगी पडतं म्हणून जायला हवं असा युक्तीवाद करू नये कारण विरुद्ध बाजू असणारी उदाहरणही कमी नाही. शिवाय पालकांची पार्श्वभुमी नसताना इंग्रजी माध्यमात जाणार्‍या मुलांच्या हालाबद्दल वर कोणीतरी लिहिलं आहे ते ही महत्त्वाचं आहे.

इथे शुद्धलेखनाचा मुद्दा बर्‍याचदा येतो आहे. त्याबद्दल एक उदाहरण लिहावसं वाटलं.
मी जेव्हा १२-१३ वर्षांपूर्वी कोडींग करायला सुरूवात केली, तेव्हा ज्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये कोडींग केलं जातं (आयडीई) ती आजच्या इतकी पुढारलेली नव्हती. कितीतरी वेळा आम्ही साध्या नोटपॅडमध्ये कोडींग करायचो आणि प्रोग्रॅम कंपाईल करायचो. त्यामुळे तुम्ही सिन्टॅक्स किती अचुक लिहिता ह्याला प्रचंड महत्त्व होतं! एखादी टायपिंग एरर झाली तरी प्रोग्रॅम चालत नसे आणि ते कळण्यातही बराच वेळ जात असे. तुम्ही एका फटक्यात जितकं अचूक लिहू शकाल (सिन्टॅक्टीकली आणि लॉजिकली) तितकी तुमची प्रॉडक्टीव्हिटी जास्त असा सरळ हिशोब होता. इंटरव्ह्यू, परिक्षा वगैरेंमध्ये सिन्टॅक्स चुकला तर मार्क कापले जायचे. पण आजची आयडीई प्रचंड पुढारलेली आहेत. टाईप करता करता सजेशन्स, ऑटोकरेक्शन, एरर दाखवून देणे ह्या सगळ्यामुळे कोड "लिहिण" सोपं झालय. त्यामुळे मुलाखती, परिक्षा, व्हाईटबोर्ड सेशन्स ह्यात कोणीही सिनटॅक्स बद्दल आग्रही नसतं. "साध्या भाषेत सांगा. सिनटॅक्सचं टेक्नॉलॉजी बघुन घेईल." अशी भुमिका असते. अगदीच अडलं तर गुगल करा.

स्पेलिंग आणि शुद्धलेखन ह्या बाबतीत माझ्या पहिल्या ड्राफ्टमध्ये नेहमी चुका होतात. दोन्ही भाषांमध्ये माझं कागदावर लिखाण फार म्हणजे फारच कमी होतं. इंग्रजी टाईप करताना स्पेलिंग्ज ऑटोकरेक्ट होऊन जातात, (काही बाबतीत एकाच्या जागी तसाच ऐकू येणारा दुसरा शब्द असं होतं.. पण ऑफिशियल बाबतीत ते तपासलं जातं). त्यामुळे ऑफिशियल आणि वैयक्तिक कम्युनिकेशनमध्ये त्याबाबतीत अडत नाही. मराठी लेखन मायबोली सोडून फारसं कुठे होत नाही. त्यातही काही उपक्रमासंबंघी असेल त्याचं मुशो होतच. आय एम शुअर आज ना उद्या ऑटोमेटेड मराठी शुद्धलेखन चिकित्साही आज आहे त्यापेक्षा सोपी होऊन जाईल. असं सगळं असताना आज सिन्टॅक्स जसा आधी इतका महत्त्वाचा राहिलेला नाही, तसचं शुद्धलेखनाचं होईल का? वाक्यरचना, व्याकरणाचे नियम पाळण, योग्य शब्दयोजना हे मुद्दे वेगळे. फक्त र्‍हस्व, दीर्घ, प्रत्यय जोतोडण/ तोडणे, विरामचिन्हे ह्याबाबत हे पहिल्या फटक्यात किती अचूक लिहिल आहे हे तेव्हडचं महत्त्वाचं आहे /राहिल का ? आणि त्यामुळे मुळ मुद्दे सोडून फक्त "आधी शुद्ध लिहा, मग पुढे बघू" ह्याला तरी काही अर्थ उरेल का?

आंतरजालावर शुद्धलेखनाचा आग्रह धरणार्यांचं मला नेहेमीच कौतुक वाटतं. भाषेचा पेपर वगैरे असला तर ठिक आहे, मार्क कापा, पण फोरमवर शुद्धलेखन नव्हे तर विचार/संदेश महत्वाचा असतो हे मनाशी बाळगायला काय हरकत आहे?

इंग्रजीचंच उदाहरण घ्या - सोशल नेटवर्कवर वापरली जाणारी इंग्रजी (स्पेलिंग सोडा, वाक्याची चिरफाड) पाहिली तर शेक्सपियर कंपनी थडग्यात थरथरतील अशी अवस्था असते. आणि गंमतीचा भाग म्हणजे सहसा एखादा प्युरीस्ट सोडुन कोणाचीहि तक्रार नसते...

बाकि शिक्शण मराठीतुन कि इंग्रजीतुन हा माबोचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने तो दर तीन वर्षांनी पटावर येतो; नया भिडु, नया राज या उक्तीप्रमाणे नविन खेळाडु यात हिरीरीने भाग घेतात, म्हणुन माझा पास... Happy

शिवाय पालकांची पार्श्वभुमी नसताना इंग्रजी माध्यमात जाणार्‍या मुलांच्या हालाबद्दल वर कोणीतरी लिहिलं आहे ते ही महत्त्वाचं आहे

कै च्या कै !

प्रत्येक घरात कुठल्या ना कुठल्या पिढीत कुणीतरी प्रथमच इंग्रजीत जाणार ना ?

की आज जे इंग्रजी मेडियमात सहजतेने शिकत आहेत त्यांचे पुर्वज अगदी मर्कटकाळापासुन इंग्रजी माध्यमात होते ?

त्यामुळे मुळ मुद्दे सोडून फक्त "आधी शुद्ध लिहा, मग पुढे बघू" ह्याला तरी काही अर्थ उरेल का?
<<

भविष्यात होणार्‍या प्रगत ऑटोमेटेड शुद्धलेखन चिकित्सेनंतर कदाचित अर्थ उरणार नाही. आज, नक्कीच अर्थ आहे. शिवाय, मराठी म्हणजे प्रोग्रॅमिंग सिंटॅक्स नाही. सिंटॅक्समधे एकंदरच बोली/लेखी भाषेच्या तुलनेने फारच लिमिटेड शब्दरचना व नियम असतात. बरोबर ना?

सध्याच्या चर्चेचा ओघ मुळातच मराठी आत्ता आहे तशी(च) टिकून रहावी, व तिच्या संवर्धनासाठी मराठीतून शिक्षण अशा अंगाने सरकतो आहे.

भाषा त्या-त्या काळाच्या व प्रदेशाच्या गरजेनुसार बदलते, बदलली आहे व बदलणार आहेच, हे काही लोक मान्य करायलाच तयार नाहीत.

इतिहास पाहिला तर तत्कालीन व्यवहारात यशस्वी व्यापारी व राज्यकर्त्यांची भाषा त्या-त्या काळी (सुरुवातीला मोस्टली अभिजन वर्गाकडून) स्वीकारली गेली, अन त्या त्या वेळी त्या भाषांतले शब्द आत्मसात करून मराठीही बदलली, हेही आपण पाहतोच आहोत. (त्याच वेळी बहुजनांची भाषा प्रमाण मराठी म्हणून कधीच मान्य झाली नाही. आजही 'मला पगार भेटला' म्हट्लं की नाकं मुरडून हसलं जातंच. अगदी माबोवरही, व नेहेमीच्या आयुष्यातही.) तस्मात, इंग्रजीकडे लोक वळताहेत, व त्या भाषेवर प्रभुत्व यावं म्हणून पहिली-नर्सरी-केजी पासूनच नव्हे, तर अभिमन्युला गर्भावस्थेत युद्धकला शिकवली, तसे त्या वेळेपासूनच इंग्रजी ऐकवायचा-शिकवायचा प्रयत्न करीत असतील तर नवल वाटायला नकोच.

तेव्हा भाषा आहे तशी टिकवायची इ. हिरिरीने प्रतिपादित करणार्‍यांना किमान शुद्धलेखन यावे, ही अपेक्षा बाळगणे मला तरी गैर वाटत नाही.

मूळ चर्चाविषयाबद्दलः

प्रायमरी एज्युकेशन 'मातृभाषेत' अर्थात घरात प्रामुख्याने बोलली जाते त्याच भाषेत दिले तर मुलांना ते आत्मसात करायला सोपे जाते, अशा अर्थाच्या संशोधनांचा आधार घेऊन सगळेच शिक्षण मराठीतून द्यावे, इथून सुरुवात करून, "आपली संस्कृती", तिच्यावर "परकीय भाषांचे आक्रमण" किंवा "शिक्षणाचे मॅकॉलेकरण" असले धुमारे मूळ चर्चाविषयातच फोडण्यात आलेले आहेत.

एक वेगळे निरिक्षणः

इंग्रजी माध्यमाच्या वा तत्सम "पॉप्युलर" व प्रथितयश शाळेत शिकलेला, अत्यंत हुशार मुलगा, व झेडपीच्या शाळेत शिकलेला तितकाच हुशार मुलगा, यांनी शालेय परिक्षांत, कॉलेजात सारखेच मार्क मिळवलेत, दोघेही फ्लुएंट इंग्रजी बोलते झाले, तरी बहुतेकदा, "इतर" बाबींत प्रथितयश इंग्रजी शाळेतला मुलगा बाजी मारून जगाच्या स्पर्धेत पुढे जातो, कारण त्याच्या वर्गातल्या मित्रांची एकंदरित नेटवर्किंग त्याला पुढे यायला मदत करते. अभिजन वर्गाने पसंत केलेल्या शाळेत आपल्या पाल्याला घालायच्या "मेंढरांच्या" (म्हणून लेखात हिणवलेल्या) मानसिकतेचे हे देखिल एक कारण आहे, असे म्हणता येईल.

>>
मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या.
<<
तेव्हा लिंकाबिंका वाचून काही लोक अ‍ॅडमिशनचा निर्णय घेतील असं वाटत नाही. उलट आजकाल मुन्शीपाल्ट्या अन झेडपी इंग्रजी मेडियमच्या शाळा काढताहेत. Wink शिवाय, जूनमधे प्लेग्रुप्/नर्सरी/केजीच्या अ‍ॅडमिशन होतात अशी जर धागाकर्त्यांची समजूत असेल, तर एकतर यांना अजून मुलं नाहीत, किंवा मुलांची शिक्षणं होऊन गेलीत असे दोन अर्थ निघतात. (हलके घ्या) (तिसरा अर्थ मुद्दाम लिहिलेला नाही Wink )

रच्याकने :

प्रायमरी एज्युकेशन मातृभाषेत द्यावे, अशी संशोधने जशी आहेत, तशीच, लहान मुले अनेक भाषा चट्कन शिकतात, अशीही आहेत.

तर, जोक.

एका सरदारजींनी ६ महिन्यांचा तमिळ मुलगा दत्तक घेतला. सरदारजी तमिळ-गुरुमुखी डिक्शनरी शोधत होते. लोकांनी विचारलं, हे कशाला?

सरदारजी म्हटले, "बच्चा बोलने लगेगा, तो उससे तमिल में बात करनी पडेगी ना!"

पराग , ते जनराइलज्ड विधान नसून माझ्या वर्गातल्या मुलांना आलेल्या अडचणी बघून झालेलं मत आहे. त्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत इंग्लिश शब्दाचा सराव करून घेणारे शिक्षक मिळाले तर कदाचित चित्र वेगळं असतं. पण ही डबल मेहनत आहे नाही का ? असो

मी कॉर्पोरेटच उदाहरण दिल कारण मी त्या क्षेत्रात काम करते. पण मला वाटत उत्तम इंग्रजी येणं ही सर्वच क्षेत्रांची गरज आहे. तुमच्याकडे नॉलेज आहे पण ती सादर करायची कला नाही तर ते नॉलेज येणार कस जगासमोर ? वर म्हणलं तस प्रेझेंटेशन करताना तुम्ही अडखळत असाल तर बोर्ड ऑफ डायरेक्तर समोर काय इम्प्रेशन पडेल ? तू म्हणतोस तस मराठी माध्यमात शिकूनही उत्तम इंग्रजी येतं हे मान्य करते . याच मोठं उदाहरण माझ्याच घरात आहे ते माझे काका . म्युनिसिपल शाळेत शिकूनही त्यांचं इंग्रजी अतिशय उत्तम होतं. पण त्यांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांना येत असलेल इंग्लिश हे त्यांच्या डबल मेहनतीच फळ आहे. तो comfortness यायला त्यांनी मेहनत केलीये . आणि या डबल मेहनतीलाच आक्षेप आहे. मला जर माझ्या क्षेत्रात टिकायचे असेल तर उत्तम इंग्रजी यायलाच हवं . प्रगती करण हे साध्य असेल तर इंग्रजी येणं हे त्यासाठीच साधन आहे. इंग्लिश माध्यमातून शिकायचा आग्रह त्यासाठीचा आहे . इंग्रजी माध्यमातून शिकूनही इंग्रजी कच्चे असणे वगैरे नमुनेही बघितलेत .पण त्या अपवादांच्या तुलनेत मिळत असलेल्या comfortness च पारडं अधिक जड आहे Happy

परत एकदा , इंग्रजी माध्यमात शिकून मराठीचा ऱ्हास कसा होतो हे मला आजवर समजलं नाही. किंवा मराठी माध्यमात शिकून मराठी कशी टिकेल हे ही समजलेलं नाही.

मराठीचा अभिमान, ओळख, संस्कृती हे मुद्दे बाजूला ठेवूनः

जी मुले हुशार, वरच्या काही मोजक्या ट़क्यातली (आयक्यु/हुशारीच्या) असतात त्यांना स्थानिक भाषेऐवजी इंग्रजी माध्यमात फारशी अडचण येत नाही. बोंब होते जे हुशारीच्या पट्टीवर सामान्य वा ढ असतात त्यांची. त्यांना अगदी पहिलीपासून सर्व विषय इंग्रजीत शिकवले व त्याविरुद्ध स्थानिक भाषेत शिकवले तर कुठली पद्धत अधिक उपयोगी ठरते? मूळ स्थानिक भाषेत भाषा/इतिहास/गणित/शास्त्र शिकल्यामुळे पुढे इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे सोयीचे ठरते का?
मी बघितलेल्या उदाहरणात तरी उत्तर हो असे दिसते.

इंग्रजी ही कामाची/पुढे जाण्याची भाषा आहे यात दुमत नाही. मात्र इंग्रजी माध्यमच तुम्हाला पुढे जाण्यासाठी सहाय्य करेल हे योग्य आहे का?

स्थानिक/इंग्रजी माध्यमे असे दोन भाग न पाडता, सुरुवात प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेत व माध्यमिक (५ वा ७वी) पासून इंग्रजीत हे सर्वांनाच फायद्याचे ठरेल का? म्हणुन मी आधी पण एक प्रश्न विचारला होता की इंग्रजी आमदानीत व्हफा पर्यंत सर्वांनाच स्थानिक भाषेत शिक्षण होते व नंतर सगळेच इंग्रजीत होते. त्याकाळी इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत्या का? की मोजके इंग्रज अधिकारी वगैरे सोडल्यास अगदी मिशनरी शाळासुद्धा आधी स्थानिक व पुढे माध्यमिक पासून इंग्रजी अशा होत्या?
त्याकाळी व्हफानंतर गळण्याचे प्रमाण खूप होते. ते रोखण्यासाठी पहिलीपासून बोली इंग्रजी शिकवण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय स्तुत्य होता.
आता अजून मुद्दे म्हणजे:
जे बदली होत विविध राज्यात जातात त्यांच्या मुलांनी काय करायचे? सर्वच गावात केंद्रीय विद्यालये असतील असे नाही.
आज आयटी वगैरेमुळे एका राज्यात दुसर्‍या राज्यातले लोक येतात. अनेक कुटुंबे ८-१० वर्षे महाराष्त्रात राहतील तर नंतर आन्ध्रात वा कर्नाटकात जातील. त्यांनी स्थानिक भाषेतल्या शाळेत मुलांना घातले तर काय करायचे? की फक्त प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेत ठेवले तर त्या काळात होणार्‍या बदल्यांचा मुलांवर त्यामानाने कमी परिणाम होइल?

टण्या

व्हफाचं उदाहरण दिलं ते ठीक आहे. त्या वेळी आणि नंतरही अगदी मराठी माध्यमाच्या शाळेतून गळतीचं प्रमाण चिंताजनक होतं. गळतीबद्दल अनेक चर्चा झडल्या आहेत. गळतीचं मुख्य कारण हे होतं की मुलांची मदत व्यवसाय धंद्यात हवी असणे. शाळेच्या बाबतीत प्रायॉरिटी दुय्यम तिय्यम असणे आणि एक्स्पोजर नसणे.

शिक्षणाचं महत्व माहीत असल्याने काही घरात मुलांना गोडी लावण्यात पालकांना यश आलं. शिक्षणाचे फायदे पाहून आता जागृती आलेली आहे. त्याचा संबंध माध्यमाशी अजिबात नाही. तसंच हुषार कोण ढ कोण हे ठरवण्याच्या पद्धतींबद्दलही शंका आहेत.

शिक्षणाचं माध्यम कोणतं आहे ह्यापेक्षा माझी मातृभाषा ही माझी आणि केवळ माझीच जबाबदारी आहे हे मान्य असण्याची अधिक गरज आहे. एकदा ही जबाबदारी मान्य केली की आपोआप कृती बदलेल. मला असे लोक माहिती आहेत जे संपूर्ण मराठी माध्यमात शिकून उत्तम इंग्रजी बोलू वाचू लिहू शकतात आणि असेही जे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकून उत्तम मराठी बोलू वाचू लिहू शकतात. Being bilingual is a great thing! I don't understand why so much fuss about it!
जर पालकांची मातृभाषा एक नसेल तर मुलांना दोन भाषा शिकायला मिळतील! हे म्हणजे दोन्ही कडचे आजोळ लाभल्यासारखे आहे!

जर पालकांची मातृभाषा एक नसेल तर मुलांना दोन भाषा शिकायला मिळतील! हे म्हणजे दोन्ही कडचे आजोळ लाभल्यासारखे आहे! >>> वाईट काय आहे त्यात ?

त्याकाळी व्हफानंतर गळण्याचे प्रमाण खूप होते. ते रोखण्यासाठी पहिलीपासून बोली इंग्रजी शिकवण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय स्तुत्य होता
<<

असा निर्णय कधी आला होता म्हणे?
व्हफा बंद झाल्यानंतर लगेचच्या काळी का?

अहो जख्मी चांगल्याच अर्थाने लिहिले आहे की! दोन दोन आजी आजोबा लाभणे ह्यात वाईट अर्थ कसा काय दिसू शकतो तुम्हाला? कमाल आहे __/\__

शिक्षणाचं माध्यम कोणतं आहे ह्यापेक्षा माझी मातृभाषा ही माझी आणि केवळ माझीच जबाबदारी आहे हे मान्य असण्याची अधिक गरज आहे. एकदा ही जबाबदारी मान्य केली की आपोआप कृती बदलेल. +१

Being bilingual is a great thing! I don't understand why so much fuss about it!
जर पालकांची मातृभाषा एक नसेल तर मुलांना दोन भाषा शिकायला मिळतील! हे म्हणजे दोन्ही कडचे आजोळ लाभल्यासारखे आहे!
>> या दोन वाक्यांचा इथे काय संबंध ते नाही कळाले.
इथे आधी कोणी इंग्रजी किंवा दुसरी एखादी / अनेक भाषा अजीबात शिकुच नका / इंग्रजी माध्यमात अजिबात शिकु नका असे म्हणाले होते का? कोण म्हटले असे? माझ्या नजरेतुन सुटले ते.

मातृभाषेतून शिक्षण द्यायचं झाल्यास खानदेशात वेगळी, विदर्भात वेगळी, कोकणात वेगळी आणि घाटावरची ग्रामीण मराठी वेगळी अशा वेगवेगळ्या भाषेत उदाहरण द्यावे लागेल. मुळात शाळा या प्रकाराबद्दलच तिटकारा असण्याच्या काळात पंतोजींच्या शाळेत जाऊन अगम्य मराठीत शिक्षण घेण्याने अनेक मुलं शाळा सोडत . खूप जुनी गोष्ट आहे तशीच बिगरी ते मॅट्रीक मधेही त्याचा ओझरता उल्लेख आलेला आहे.

गळतीचं प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राचा अभ्यासक्रम न स्विकारता राज्य माध्यमिक महामंडळाचा अभ्यासक्रम स्विकारलेला आहे. या विषयावर भरपूर गोंधळ झालेला आहे. अगदी ग ग गणपतीचा का, गाढवाचा का नको इथपर्यंत चर्चा झालेल्या आहेत. एक माकड तीन फूट चढते दोन फूट घसरते अशा निरुपयोगी उदाहरणांऐवजी शेतीतली उदाहरणे द्या जेणेकरून ग्रामीण भागतील मुलांना ते आपले वाटेल, त्यांना गोडी लागेल अशा मागण्या झालेल्या आहेत. अहवाल दिले गेलेले आहेत.

भाषेमुळे(च) गळती झाली हे म्हणणे त्यामुळे जरा जास्त होतेय.

तथाकथित ढ मुलांचं म्हणाल तर ती कुठल्याही माध्यमातून शिकली तरी जेमतेमच प्रगती करतील. कुठल्याहीघरात कुणी न कुणी जाणतेपणी इंग्रजी शिकल्याशिवाय त्याच्या पुढच्या पिढ्यांना इंग्रजी शिकणे कठीणच जाणार आहे. परकीय भाषा शिकायला हव्यात ही जागृती ज्यांच्यात आहे त्यांना सांगायला नको. ती जागृती देखील पंतोजीच्या शाळेने काहिंमधे लवकर आली.

स्पर्धा नसल्याने आणि पोट भरण्याचे उद्योग असल्याने शाळा शिकणे महत्वाचे नव्हते, तसेही शिक्षण घेणे परंपरेने सवयीचे नव्हते. आता तसे राहीलेले नाही. स्पर्धा प्रत्येकाला जाणवते आहे. स्पर्धेमुळे इंग्रजी शिक्षण अनिवार्य झालेले आहे. ज्यांच्या घरात आईवडिलांना शिक्षणाचा गंध नाही अशी मुलं कलेक्टर होताहेत, आयसीएसई, सिबिएसई मधे टॉप येताहेत.

या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. ज्यांनी कुणी अभ्यास अहवाल दिले त्यांची गृहीतके, त्या वेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात अंतर आहे.

मातृभाषेतून मूल विचार करतं याचा संबंध कुठल्या शिक्षणाशी जोडायचा याचा काही अभ्यास असेल तर तेव्हढाच काय तो प्रश्न आहे.

बापरे! मी मराठीतूनच लिहिले आहे का अशी शंका येतेय मला आता! अभिनव धागा पुन्हा वाचा म्हणजे सगळ्या वाक्यांचे संदर्भ लागतील. नाही लागले तर सोडून द्या!

भगुलं हा मराठी शब्द आहे. ग्रामीण मराठीतला. जी पाली भाषेतून आली आहे.

कल्पना करा या भाषेला प्रमाण मराठी मानून पंतोजींच्या शाळेत शिक्षण दिलं गेलं असतं तर ?

भगुलं म्हणजे छोटं भांडं किंवा पातेलं. मराठीच आहे हा शब्द. आणि विषयाला धरून बोला. तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील नाही. शुभरात्री!

आणि विषयाला धरून बोला. >>> मी काही तांबट आळीत ठोकठोक न करता भांडी कशी घडवायची यावर तुम्हाला प्रतिसाद दिलेत कि काय ? Lol

__/\__ कमाल आहे. तुमचा प्रतिसाद येईपर्यंत कुठल्या विषयावर चालली होती चर्चा ?

तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील नाही. >>> या धाग्यावरचा हा सर्वात इंटरेस्टिंग प्रतिसाद आहे. Lol

परत एकदा , इंग्रजी माध्यमात शिकून मराठीचा ऱ्हास कसा होतो हे मला आजवर समजलं नाही. किंवा मराठी माध्यमात शिकून मराठी कशी टिकेल हे ही समजलेलं नाही.

+१००० जाई!

भगुणं की भगुलं ? >>>>> तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील नाही. :फिदी::हाहा:

सहोदर्गल, प्रतिसाद आवडला. 'भगुणं/लं'चा उल्लेख विशेष आवडला. आपल्या देशी/प्राकृत भाषेत अनेक चपखल शब्द आहेत जे सध्याच्या यंत्रसंस्कृतीशी जुळणारे असे करून घेता आले असते. माझं तर वैयक्तिक मत असं आहे की यादवकाळानंतर हळूहळू प्राकृताशी नातं तुटत गेलं आणि संस्कृताचा प्रभाव मराठीवर वाढला. कारणं अनेक आहेत. पण परिणाम मात्र लोकसमूहापासून तथाकथित 'शुद्ध मराठी' दूर जाण्यात झाला. आणि मराठी फार मोठ्या शब्दस्रोतांना मुकली. असं झालं नसतं तर ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आज आपण थोडीफार तरी समजू शकलो असतो. आणि आजची प्रमाणभाषा ही मराठवाड्यासारख्या फार मोठ्या भूभागातल्या ग्रामीण मराठीशी मिळतीजुळती असती, नाळ जोडून असती. पण ह्या जर तरला काही अर्थ नाही, कारण आधी म्हटल्याप्रमाणे भाषा ही जिओ-सोशिओ-पुलिटिकल घडामोडींचा परिपाक असतो. आज जाहिरातींतून 'शौच-समापन' या व अश्या अनेक 'नव्या' शब्दांचा भडिमार होत असताना भाषेचा प्रवाहीपणा कसा संपवला जाऊ शकतो त्याची तीव्र जाणीव होते.

शालेय शिक्षण आणि सरकारी मराठीचं ग्राम्य (प्राकृत) मराठीवर झालेलं अतिक्रमण हे मुख्य कारण आहे. याच कारणासाठी सध्या संस्कृत मराठीचा अभिमान धरा वगैरे चळवळ चालवली जाते. इंग्रजीचे अतिक्रमणची भीती संस्कृत बेस्ड मराठीसाठी आहे. प्राकृतातून आलेली महाराष्ट्री बेस्ड मराठी नष्ट होण्याचं दु:ख कुणालाच नाही. मराठी वर्णमालेतून ञ हे अक्षरही अलिकडेच काढून टाकलं गेलं. पाली भाषेत या अक्षराचा भरपूर वापर आहे.

वर एका विदुषींनी म्हटल्याप्रमाणे मातृभाषेचा अभिमान टिकवणे, परंपरा टिकवणे हे वाचून त्यासाठीच गंमत वाटली.

भगुलं हाच शब्द आहे. पालीत तो तसाचआहे. भगुणं हा त्यावरून आलेला आहे.
उलीसं, वंगाळ असे आणखी बरेच शब्द आहेत ते अन्य एका बाफावर दिलेले आहेत.

हीरा तुमचे प्रतिसाद विषयाशी संबंधितच आहेत. पण काही आयडीज सर्टिफाईड सेन्सीबल आयडी मधे मोडत नाहीत. सर्टिफिकेट मिळण्याची काही ठिकाणे आहेत. एकदा ते मिळाले की मग चिंता नाही, अन्यथा तुमचे प्रतिसाद हे फाऊल किंवा पिळू धरले जातात. आता इथेच पहा ना , विषय व्ह. फा. वरून निघाला आहे म्हणून गाडी इकडे वळालेली आहे, पण सरीफिकेशन एजन्सीला त्याच्याशी काही घेणेदेणे नसते. Lol

प्राकृतातून आलेली महाराष्ट्री बेस्ड मराठी नष्ट होण्याचं दु:ख कुणालाच नाही. >> पूर्वग्रहदूषित नजरेने प्रतिसाद वाचले की मग अशी विधाने ठोकता येतात. तुम्हाला होतं ना दुःख, मलाही होतं. मग कोणालाच दुःख नाही असं कसं म्हणता? आपल्या दोघांना तरी वगळा त्या वाक्यातून.
संस्कृत बेस्ड मराठी वाल्यांनी प्राकृत बेस्ड मराठी नष्ट करण्यास हातभार लावला म्हणून आता जेव्हा इंग्रजी भाषेच्या अतिक्रमणामुळे संस्कृत बेस्ड मराठी नष्ट होते आहे तर प्राकृत बेस्ड मराठीच्या चाहत्यांना फार फार आनंद होत आहे असं काहीसं चित्र माझ्यापुढे येतंय. जे फार वेदनादायी आहे. ही अशी भुमिका घेऊन काय साध्य होणार आहे?
मला भगुलं चा अर्थ माहीती होता जो मी सांगितला (बरोबर आहे का तो?) पण अशा व्यक्तिगत प्रतिसादाची गरज नाही असे वाटले म्हणून विषयाला धरून बोला असे लिहिले तर काय चुकले?

हीरा, तुमचे प्रतिसाद नेहमी वाचनीय असतात. मला त्यातून नेहमीच शिकायला मिळते. तुम्ही अजून लिहा! वाचायला आवडेल.

जिज्ञासा
कशाला माझ्याशी चर्चा करताय ? मी तुमच्याइतका विद्वान नाहीये. मला विषय समजत नाही. विषयाशी संबंधित प्रतिसाद देता येत नाही. माझे प्रश्न तुमच्यासारख्या विदुषीचा वेळ वाया घालवतात. तेव्हां मला वगळाच आणि माझ्या प्रतिसादांवर फार विचार करू नये ही भीत भीत सूचना करतो. कारण मी कोण सुचना करणार याची जाणीव आहे. एव्हढे वाचल्याबद्दल आभार आपले.

Pages