काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण कुठलेही आई बाबा थोडी फार गैरसोय होईल असा विचार करुनच येतीलना मुलाकडे. इतकं काही अपटू डेट नसलं तरी ठीके. उलट क्यू वो नकचढी गोरीकी मदद ली असंच विचारेल आई !

काल पुर्ण ठाणे दर्शन झालं...
शिव च्या बाबांची व्यक्तीरेखा जे साकारत आहेत ते मोस्टली व्हिलन म्हणुन काम करतात..

आता गौरीने पुर्ण दिवस ऑफिसमधे काम केलं, असं दाखवलं तर प्रेक्षकांनाच शॉक बसेल (आणि तिच्या बॉसलाही) , ही परीस्थिती आहे गौरी आणि ऑफीसची Wink .

शिव च्या बाबांची व्यक्तीरेखा जे साकारत आहेत ते मोस्टली व्हिलन म्हणुन काम करतात..>>>> मला तो विवेक वासवानी सारखा दिसत होता. Uhoh

गौरी नोकरी करतेय की तिचंच हापिस आहे? च्यामारी सुट्ट्या/हाल्फडे डोळा मारा कधिही घेतेय.>>> आणि कधिहि जातेय, कधिहि येतेय.

शिवचे आई नी
बाबा येणार आता... आता तरी चिडु नये ही बाई>>>> हो ना, शेवटी ते तिचे भावी सासु-सासरे आहेत. After all, तिच्या सम्पुर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. Happy

पण शिवची आई जेव्हा गौरीला उद्देशुन "हां वो कामवाली" अस म्हणते तेव्हा शिव बोलत का नाही की ती आपली शेजारीण आहे कामवाली नाही किंवा तिने दार उघडल्या उघडल्या का म्हणत नाही की ही आपल्या शेजारी रहाते, हिची आजी डबे करुन देते वै. वै. मला मदत करायला म्हणुन ती इथे आली होती. ओढुन ताणुन सस्पेन्स क्रिएट केला आहे. शु. गो सुद्धा भेटायला म्हणुन जाते तेव्हा पहिल वाक्य टाकायला हव होत आम्ही तुमच्या बाजुलाच रहातो, हि माझी मुलगी गौरी. उगाचच घोळुन घोळुन बोलत बसली आणि शिवच्या आईचा समज झाला की दोघी मायलेकी मोलकरणी आहेत...

Happy
हो ना..आणि शु गो एकदमच साधी साडी व घरगुती अवतारात होती शिव च्या अम्माच्या तुलनेत!
पण शिव ची दया येते. बिचारा गोंधळून गेलाय..आणि दिसतो किती क्यूट!
एकदम जबाबदारी पडलीय ना...आई वडिल व गौरीला खुष ठेवायची!
निशा वहिनी एकदम अशी पडलेली - घसरलेली का दाखवली काल..? .माझे जरा दुर्लक्ष झाले काल त्यांच्या डायलॉग कडे... कामाच्या नादात!

मुंबईत राहणार्‍यांना हिंदी बिल्कुल बोलता येत नाही असं समजणारा लेखक आणि दिग्दर्शक डोस्क्यावर पडलेले आहेत नक्की.

काल गौरी आपल्या पिचक्या अनुनासिक आवाजात शिवला ताडताड बोलत होती पण डोळ्यात भावच नाहीत. ते वेणुचं डोळं तरी जास्त बोलकं आहे ते गवरी पेक्षा.

शिव च्या बाबांची व्यक्तीरेखा जे साकारत आहेत ते मोस्टली व्हिलन म्हणुन काम करतात..>> छे छे, ते विनोदी भूमिका साकारतात आणि टायमिंग जबरदस्त आहे त्यांचे.

शिव च्या बाबांची व्यक्तीरेखा जे साकारत आहेत ते मोस्टली व्हिलन म्हणुन काम करतात..>> छे छे, ते विनोदी भूमिका साकारतात आणि टायमिंग जबरदस्त आहे त्यांचे. >>> विठ्ठल, सावधान इंडीयाच्या काही एपिसोड्समध्ये त्यांनी व्हिलनचही काम केल होत. त्यांच विनोदी काम नाही बघितलेल मी, पण उत्तम कलाकार आहेत हे नक्की, आईचा रोल केलेली अभिनेत्री तर एकदम करेक्ट आहे सासुच्या रोलसाठी.

मुंबईत राहणार्‍यांना हिंदी बिल्कुल बोलता येत नाही असं समजणारा लेखक आणि दिग्दर्शक डोस्क्यावर पडलेले आहेत नक्की. >>>> अगदीच.

काल काय झाल? थोडक्यात सांगेल का कुणी?

शिवची आई घरात झगमगीत साड्या घालते (हिंदी शिरेलीत दाखवतात त्याप्रमाणे), गौरीच्या आई आणि आजीच्या घरच्या साड्या योग्य आहेत.

अन्जू, अगं शिवची फॅमिली एकदम उच्च खानदानी वैगेरे दाखवलीय त्यामुळे कदाचित आईच्या साड्या त्याला साजेशा आहेत. घरावरुन पण किती तणतण करते ती शिवजवळ.
आणि गौरीची फॅमिली मध्यमवर्गीय त्याप्रमाणे त्यांच्या साड्या.

(मुंबईच्या उन्हाळ्याची झळ बसली की शिवची आई पण साध्या सुती साड्या नेसू लागेल. Wink )

निशा वहिनी एकदम अशी पडलेली - घसरलेली का दाखवली काल..? .माझे जरा दुर्लक्ष झाले काल त्यांच्या डायलॉग कडे... कामाच्या नादात!>>>>> काही नाही, ते आजी ने केलेले लिठठी चोखा खाऊन निशाच्या पोटात दुखले. :हाहा:आजी ने ते शिवच्या family साठी केले होते. कोचावर बसून "आई ग, माझ्या पोटात दुखतय ते लिठठी चोखा खाऊन" असे ओरडत होती. तेव्हा तिचे डोके भिन्तीला आपटले Lol तर तिचे नवीन नाट्क सुरु झाले, " माझ्या डोक्याला लागल" म्हणून.

काल काय झाल? थोडक्यात सांगेल का कुणी?>>>> शिव तिची ओळख त्याच्या आईवडिलान्ना करुन देत नाही. आणि वरुन ति बाहेर पड्ल्यावर तिच्या नाकावर दरवाजा बन्द करतो.:हाहा: (तो हे मुद्दामहून करत नाही.) गौरी शिवला कृतघ्न म्हणते. ( चोराच्या उलट्या बोम्बा. कृतघ्नपणाचा वारसा गौरीने तिच्या वडिलान्कडून घेतला आहे. मोजो आता कुठे सुधारलाय.) म्हणते कशी, मी एवढे ह्याच्या घरचे सामान लावून दिले, मला साधे Thanks सुदधा म्हटले नाही शिवने. ( जसे पेराल तसे उगवते)

निशा नचिकेत ला म्हणते, मला शिव लबाड वाटतो, मला त्याच्या डोळ्यात उत्सुकता दिसते. घरच्यान्शी किती गोड गोड बोलतो तो वै. वै. ( हो का, विकिच्यावेळी निशा आन्धळी झाली होती वाट्त. तेव्हा बर त्याला हि " माझा भाऊ, माझा भाऊ" करत होती.) नचिकेत सुदधा बायकोचीच री ओढतो. ( बायकोचा गुलाम कुठला:राग: )

वेणु जेवताना शिव च्या आई समोर non-veg पदार्थान्चा उल्लेख करतो. तिला हे पदार्थ सुदधा भाज्या वाटतात. Rofl शिव त्याला गप्प करतो कारण त्याच्या आईला non-veg चालत नाही. पण शिवचे वडिल मात्र अन्ड्याचा उल्लेख "सफेद आलू" असा करतात. Biggrin वेणू त्याला विचारतो , "सफेद आलू" म्ह्णजे काय? शिवची आई" खाते समय कुछ भी बोलते हो" बोलून नवर्यालाच गप्प बसवते.
शिव मितु ला खर सान्गू शकत नाही, त्याच्या आई-वडिलान्ना आपली खरी ओळख सान्गत नाही, रि़क्षावाल्या कडे सुटे पैसे मागू शकत नाही, कन्ड्क्टर कडे साधे तिकिट सुदधा मागता येत नाही म्हणून गौरी त्याला "डरपोक" म्हणते. ( गौरीचा हा मुद्दा मला पटतो. पण तस बघायला गेल ती सुद्दा मोजोला घाबरतेच ना. मग ती सुद्दा त्या न्यायाने "डरपोक" झाली. Happy )

एकदम जबाबदारी पडलीय ना...आई वडिल व गौरीला खुष ठेवायची!>>>> लग्नाआधी हे हाल, मग लग्ना नन्तर काय होणार शिवचे? Sad

Pages