चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्वीनमध्ये अतिशय सुरेख काम केलेय. तिच्या आजवरच्या कामाच्या अगदी उलट भूमिका तिने उत्कृष्टरित्या साकारलीय. तवेमरी पहिल्याच्या दहशतीमुळे पाहिला नाही पण त्यातही काम चांगले केले असे इथेच वाचले. दिसायला भैताड़ असेलही पण सर्वोत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस आहे ना, दिसण्याचे थोडेच?

दिसायला नाही ओ भैताड. ते कॅरेक्टर भैताड आहे. तिचा, तिच्या दिसण्याचा, उच्चारांचा काही दोष नाही.

कंगणाचे काम अतिशय सुंदर झाले होते. दोन व्यक्तींमधला फरक इतका उठून दिसत होता की दत्तो आणि तनु या खरच वेगवेगळ्या वाटू लागल्या. खास करून दत्तो मधला रांगडेपणा अवघ्या देहबोली/ डोळ्यातून उभा केलेला. दखुद्द अमिताभ यांनी सुध्दा या दोन्ही व्यक्तिरेखा दोन वेगवेगळ्या अभिनेत्रींनी साकारलेल्या आहे अशी दिलखुलास दाद दिली होती. त्यामुळे क्वीन नंतर या चित्रपटाच्या भुमिकेला अवॉर्ड मिळणे बरोबर वाटते.

संजय भंसाली आणि बाहुबली यांना मिळाल्याचे आश्चर्य आहे. मांझी बदलापुर एनएच १० दृष्यम सारखे चित्रपटांची सुध्दा थोडीफार दखल घ्यायला हवी होती जी कुठल्याच अवार्ड वाल्यांनी घेतली नाही.

कंगणाचे काम अतिशय सुंदर झाले होते. दोन व्यक्तींमधला फरक इतका उठून दिसत होता की दत्तो आणि तनु या खरच वेगवेगळ्या वाटू लागल्या. खास करून दत्तो मधला रांगडेपणा अवघ्या देहबोली/ डोळ्यातून उभा केलेला. दखुद्द अमिताभ यांनी सुध्दा या दोन्ही व्यक्तिरेखा दोन वेगवेगळ्या अभिनेत्रींनी साकारलेल्या आहे अशी दिलखुलास दाद दिली होती. त्यामुळे क्वीन नंतर या चित्रपटाच्या भुमिकेला अवॉर्ड मिळणे बरोबर वाटते>>>>>>>>>>

हो बरोबर आहे.. दत्तोच कॅरॅक्टर मस्त्च सकारल तिने..

आणि दोन्ही व्यक्तीरेखा छान साकरल्या...
तनु च कॅरॅक्टर विचित्र वाटु शकत पण दत्तो तर छानच वाटली..

दत्तोच एक वाक्य आमच्या घरात सारख येत..
मार भी पड सके से...
मूव्ही खुप्प्प्प्प आवडला अस नाही पण
तीची अ‍ॅक्टिन्ग छान होती

विक्रम गोखलेंच्या, " आघात " चित्रपटाबद्दल कुणी लिहिले होते का ? ( शोघ घेतला तर शरद यांचा एक वेगळा बीबी दिसतोय ) हा चित्रपट यू ट्यूब वर आहे. मला आवडला खुप. या कथेसंबंधात काही शंका होत्या, त्या मी निरसन करुन घेतल्या. विक्रम आणि मुक्ता यांचा अभिनय लाजबाब आहे शिवाय छोट्या छोट्या भुमिकातही नावाजलेले कलाकार आहेत.

चित्रीकरण, तांत्रिक बाजू आणि भाषाही यथायोग्य. नेहमीपेक्षा खुपच वेगळे कथानक आहे.

अनेक महिन्यांनी हिंदी सिनेमा बघितला कपूर अँड सन्स.
एक लघुकथा नाटकात रुपांतरीत केल्यासारखा मला सारखा वाटत होता. काही कामे (ऋषि कपूर, रजत कपूर, रत्ना पाठक) उत्तम तर काही कामं सपक (ते दोन नातू). अलिया भट्ट चे काम चांगले की वाईट, नसर्गिक की कृत्रिम हा गोंधळ झाला. तेव्हा ते चांगलेच असावे असे म्हणेन.
वेगळ्या विषयावरचा विषयाला धरून पुढे नेलेला सिनेमा. पुर्वी हिंदीत वेगळ्या विषयावरचे सिनेमे येतच नाहीत इंग्लिश सारखे असे जे म्हटले जाते ते चित्र बदलत असावे असे हा सिनेमा पाहून वाटले.

रॉबर्ट डी नीरो आणि अ‍ॅन हॅथवे चा 'द इन्टर्न' खूप आवडला. साधा सरळ फील गुड चित्रपट आहे, पण या दोघांच्या कामामुळे छान वाटतो. रॉबर्ट डी नीरो चे आधीचे चित्रपट व त्यातील त्याची इमेज पाहता इथे त्याला एकदम वेगळा रोल आहे व त्याने ही तो हसरा, लोकांशी सहज जुळवून घेणारा म्हातारा मस्त उभा केला आहे. अ‍ॅन हॅथवे ही अमेरिकन चित्रपटांत क्वचित दिसणार्‍या हसर्‍या चेहर्‍याच्या व चार्मिंग हीरॉइन्स पैकी आहे. तिचे ही काम येथे खूप सुरेख झाले आहे.

स्टोरी ही इंटरेस्टिंग आहे. इंटरनेट वरून कपडे विकणार्‍या व सगळे तरूण लोक भरलेल्या एका स्टार्टअप कंपनीमधे 'सीनियर' लोकांकरता काही इंटर्नशिप च्या जागा ते उपलध करतात व अशा एका जागी रॉबर्ट डी नीरो येतो. ७० वर्षांचा जुन्या ऑफिस मधे काम केलेला म्हातारा, व ही टीपिकल 'नेट' स्टार्टअप. मजेदार चित्रण आहे. ही कंपनी सध्या सॅन फ्रान्सिको मधे दिसणार्‍या कोणत्याही स्टार्टअप सारखी दिसते.

काल रात्री तीन देवीयां बघितला...पुन्हा एकदा...देव आनंदचा. सुरेख गाणी आणि एकूण मस्तच सिनेमा.

तीन देवियाँ अतिशय हलका फुलका आणि मस्त सिनेमा. खूप लहान असताना पाहिला होता मी. आता तुम्ही
आठवण काढल्यामुळे पुन्हा पहावासा वाटतोय.

फिर पुकारो मुझे फिर मेरा नाम लो
गिरता हूं फिर अपनी बाहों में थाम लो...

कपूर अ‍ॅण्ड सन्स बघितला. टण्याच्या अख्ख्या पोस्टला अनुमोदन. पण दोनपैकी सिद्धार्थ मल्होत्रा थोडा ओके वाटला.

आज The Jungle Book (Hindi)पाहिला. मज्जा आली. मुलीपेक्षा मीच excited होते आणि enjoy ही मीच जास्त केलं, nostalgic होऊन. माझा आणि मुलीचाही पहिलाच 3D experience होता. त्यामुळेही मज्जा आली. मला इरफानचा भालू खुप आवडला.

जंगल बुक पाहिला. ..खरच काय VFX आहेत एक एक आणि त्यात थ्री डी ... अप्रतिम. ..हॅट्स ऑफ.. थिएटरमध्ये मुलान सोबत पालक सुद्धा एन्जॉय करत होती. .....प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना हा चित्रपट दाखवलाच पाहिजे ...
जंगल जंगल बात चली है पता चला है की चड्डी पहेन के फुल खिला है..फुल खिला है. ..

>> पुर्वी हिंदीत वेगळ्या विषयावरचे सिनेमे येतच नाहीत इंग्लिश सारखे असे जे म्हटले जाते ते चित्र बदलत असावे असे हा सिनेमा पाहून वाटले.

फक्त हे आधी म्हणायचं राहून गेलं की चित्र बदलायला बर्‍याच आधीपासून सुरूवात झाली आहे आय थिंक.

जंगल बुक इकडे येत्या गुरुवारी येतोय. नक्की पहायचा आहे. मुलापेक्षा, त्याचे आईबाबाच पहायला जास्त उत्सुक आहेत Happy
काल 'टू ब्रदर्स' पाहिला. मागे एकदा दिनेशदांनी या सिनेमाबद्दल लिहिलं होतं. दो भाई बचपन में बिछड जाते है , बाद में समोरासमोर फायटिंग के लिए उभे रहाते है, तो जुने दिन याद आते है, असला मनमोहन देसाई फॉर्मुला आहे. तरीही सिनेमा आवडला, परत परत पहायला मिळाला तरीही पाहू शकेन. कुठेही अ‍ॅनिमेशन नाही (बहुदा). खर्‍या खुर्‍या वाघांकडून काम करुन घेतलं आहे. सिनेमात ५ वाघ दिसतात. आई-बाबा, दोन मुलं आणि सिझर (विकी सांगतंय की एकूण ३० वाघ वापरले आहेत सिनेमात). संपूर्ण सिनेमा एकदम देखणा आहे. छोट्या गोष्टींचे डिटेलिंग छान केलंय. उदा: सीन १-दोघा भावांची रिंगणात झुंज लावतात, तिकडे ते एकमेकांना ओळखून तिथून बाहेर पळून जातात. बाहेर पळताना, सर्कशीतला वाघ (कुमाल) सवयीने त्याच्या पिंजर्‍यात परत जातो. त्याचा भाऊ (सांघा) त्याला बोलवून परत घेऊन जातो. सीन २- शेवटी जंगलात त्या दोघांना घेरण्यासाठी आग लावतात, तेव्हा कुमाल सर्कशीतल्या सवयीमुळे आगीतून उडी मारुन पळून जातो, तेच सांघाला जमत नाही पाहून परत येऊन त्याला परत एकदा उडी मारुन दाखवतो, मग सांघाही त्याच्या मागे जातो.

जंगल बुक पाहिला. ..खरच काय VFX आहेत एक एक आणि त्यात थ्री डी ... अप्रतिम. ..हॅट्स ऑफ.. थिएटरमध्ये मुलान सोबत पालक सुद्धा एन्जॉय करत होती. .... >> + १०००० .
आम्ही गेलो होतो , तेन्व्हा पालकच जास्त एन्जोय करत होते . मुलांचा आवाज कमी होता.
आवडला , पण मज्जा नाही आली . सगळ काही होतं पण काहीतरी कमी होतं . काय ते नक्की नाही सांगता येणार . ओव्हरॉल इम्पॅक्ट कमी वाटला.
बल्लु आवडला पण त्याच्या पंजाबी अ‍ॅक्सेन्ट मध्ये ईरफान चा मूळचा लेडबॅक आवाज हरवला. पिचो ची का मस्त. आमच्याकडे का चे डायलॉग एक्दम फेमस झालेत Happy . नाना चा शेरखान छोट्या छोट्या हुंकारासहित मस्तच. लुईचा आवाज कोणाचा आहे .

पहिली १५-२० मि. जाम स्ट्रेस्स्फुल्ल वाटला.( विशेशतः नीलगाईची चेंगराचेंगरी आणि का ची एन्ट्री ) बल्लु आल्यावर जरा हलका फुलका होतो . परत शेवटी लुईची चेस अंगावर येते. ३-४ वर्शाच्या मुलांना घेउ जाउ नये ( हेमावैम) .

काल 'टू ब्रदर्स' पाहिला. >> हा आम्हाला फार आवडतो . ते सगळे वाघ भारी देखणे आहेत .

जंगल बुक First Day.. First Show पाहिला. एक निरिक्षण मुलांपेक्षा पालकच जास्त उत्सुक होते Happy

जंबुतल animation भन्नाट आहे आणि त्याला 3D effectने तर चार चांद लावले आहेत. नानाच्या म्हातार्‍या आवाजामुळे शेरखानही म्हातारा वाटतो. ओम पुरीचा बघिरा आणि इरफानचा बालू मस्तच. हिंदी डबिंगला खास Indian touch दिला आहे.

>>३-४ वर्शाच्या मुलांना घेउ जाउ नये ( हेमावैम) .>>
माझा मुलगा २.५ वर्शाचा आहे. त्याला सिनेमा वगैरे काही कळत नाही. फक्त प्राणि दिसतील म्हणून त्याला न्यायचा विचार करतोय. ३डी शिवायसुद्धा व्हर्जन्स रिलीज होत असावीत ना?

My observation is kids don't like ३d till age of five +. My son started watching ३d movies from last year I.e. when he turned seven. Till that time he didn't like watching three D. Same story I heard from many of his friend's parents.

अमि, बरचसं तुझ्या मुलाला काय आवडतं त्यावरही आहे. प्राणी वगैरे माझ्या ६ वर्श्याच्या लेकाला ही आवडतात. पण काहीकाही ठिकाणी तो ही घाबरला. चित्रपट मला बराचसा अंगावर येणारा वाटला, काही काही भाग तर निश्चितच . २डी वर्जन्स आहेत . कदाचित आम्हीही २डी जास्त रिलॅक्स होउन बघितलं असता.

एका वर्षाचा पिलु बसु शकेल का थिएटर मधे ???? कोणाला काही अनुभव ???>>>>>> शक्यतो टाळाच
कारण मी माझ्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन गेलो होतो(चित्रपट बाजीराव मस्तानी) तिथल्या अंधार व साउंड मुळे ती जाम घाबरत होती त्यामुळे आम्ही चित्रपट अर्धवट सोडून दिला. .....

एका वर्षाचा पिलु बसु शकेल का थिएटर मधे ???? कोणाला काही अनुभव ???

जंगल बुकला का? तो घाबरेल.
बेसिकली या मुव्हीला खूप लहान मुलांना नेऊ नका, घाबरतील असेच रिव्ह्यू वाचले आहेत.

एका वर्षाचा पिलु बसु शकेल का थिएटर मधे ???? कोणाला काही अनुभव ???

जंगल बुकला का? तो घाबरेल.
बेसिकली या मुव्हीला खूप लहान मुलांना नेऊ नका, घाबरतील असेच रिव्ह्यू वाचले आहेत.

काही सीन अंगावर येणारे आहेत हे खरयं... त्यामुळेच U/a certificate issue केलं आहे. शक्यतो ७ वर्षा वरिल मुलांना पालकांन सोबत जाण्यास हरकत नाही.

१ वर्षाच्या मुलांना नका नेऊ थिएटर मध्ये. जर तुमचे मुल ५ मिनिटे सुद्धा एका जागी थांबणारे नसेल तर मुळीच नेऊ नका. कारण समोर काय चाललय हे त्यांना कळत नाही आणि एका जागी बसणे त्यांना शक्य होत नाही. वरून कानठळ्या बसवणारा आवाज ..

१ वर्षाच्या मुलाला अजिबात घेऊन जाऊ नका. अंधाराला घाबरतात. मी ३ वर्षाच्या माझ्या मुली ला घेऊन Ice age 4 पहायला नेलं होतं, १५ व्या मिनिटाला बाहेर होतो. काल 3D पाहिला तर तिचं (६.५ वर्षे)डोकं थोडा वेळ दुखत होतं. आणि माझंही डोकं जड झालं होतं. 2D चा option या चित्रपटासाठी. लहान मुलांसाठी 2D च बरं असं वाटलं कालच्या अनुभवानंतर.

Pages