Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पेईंग घोस्ट काल स्टार
पेईंग घोस्ट काल स्टार प्रवाहवर होता पियु, दुपारी आणि संध्या. दोन्ही वेळा. मला बघायचा होता पण राहीलंच. झी सिनेगौरव बघत बसले संध्याकाळी.
कलर्सवर मिरची म्युझिक अवॉर्डस होती काल.
Eye in the sky - नव्या
Eye in the sky - नव्या जमान्यातल्या युद्धाची कथा! दुर्दैवाने नव्या जमान्यातले युद्ध युद्धभूमीवर न लढता निवासी क्षेत्रात लढले जाते. शेवटी युद्धाचा सैनिकी अधिकारी म्हणतो...
You don't tell a soldier, what is cost of war!
बाहेर पडल्यावर मॉलमधे फिरणे अगदी मिथ्या वाटले!
कपूर अँड सन्स पहिल्या दिवशी
कपूर अँड सन्स पहिल्या दिवशी दुसर्या लायनीत बसून पाहिला :फिदी:. फवाद आणि सिद्धार्थ दोघेही आवडतात त्यामुळे मेनली त्यांच्याकरता पहायला गेले, पण फवाद, सिद्धार्थ बरोबरच ऋषी कपूर, रत्ना पाठक, रजत कपूर, अलिया भट सगळेच आपापल्या भुमिकेत परफेक्ट. ऋषी कपूर फार गोड आजोबा!!!
घनचक्कर सुद्धा आवडला.
घनचक्कर सुद्धा आवडला. घनचक्करचा शेवट बघुन खुप वाईट वाटले होते तेव्हा. 'अल्लाह मेहेरबान.. तो दिल गुलेगुल गुलिस्तान' अजुनही फेवरेट आहे. >>> अगदी अगदी ! ईम्रान हाश्मी ईतकेच आपणपण गोन्धळत जातो . कोण खर बोलतयं , काय खर बोलतयं .. काही कळत नाही. आणि शेवटी वाईटही वाटत.
काही काही सिचुएशनल कॉमेडी सीन्स मस्त आहेत . फ्राईड राईस मध्ये मीठ कमी असतं तो सीन .. खत्रा आहे एक्दम .
६३व्या राष्ट्रीय चित्रपट
६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:
सर्वोत्कृष्ट चित्रपट- बाहुबली -द बिगिनिंग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (पिकू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कंगना राणावत ( तनू वेडस मनू रिटर्न्स)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- दम लगा के हैशा
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री- तन्वी आझमी (बाजीराव-मस्तानी)
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- रिंगण सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- रेमो डिसोझा ( दिवानी मस्तानी- बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – महेश काळे ( कट्यार काळजात घुसली)
विशेष दखल : वॉइस ओव्हर आर्टिस्ट – हरिष भीमानी (मला लाज वाटते)
विशेष दखल : रिंकू राजगुरू (सैराट)
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म – अमोल देशमुख – औषध (मराठी)
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट- पायवाट (मराठी)
सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट – दारवठा (मराठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) – कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ)
सर्वोत्कृष्ट गीतकार – वरुण ग्रोवर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट गायिका – मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट पटकथा-संवाद – पीकू आणि तनू वेड्स मनू (विभागून)
सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) – विशाल भारद्वाज (तलवार)
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) – जुही चतुर्वेदी (पीकू)
सर्वोत्कृष्ट सेट डिझाईन – बाजीराव मस्तानी -
See more at: http://www.loksatta.com/manoranjan-news/baahubali-wins-best-film-in-nati...
काही काही विजेत्यांची नावे
काही काही विजेत्यांची नावे वाचून आश्चर्य वाटत आहे ..
हॅप्प्पी फॉर महेश काळे ,
हॅप्प्पी फॉर महेश काळे
, राहुल देशपांडेला विभागून नाही मिळालं अॅवॉर्ड ?
फक्त महेश काळेचं नाव आलेलं
फक्त महेश काळेचं नाव आलेलं पटलं नाही. राहुल देशपांडेलासुद्धा मिळायला हवं होतं.
अमिताभ बच्चन, बाहुबली, रिंगण, संजय लीला भन्साली ही नावंही जरा खटकली.
हलाल, सैराट, हायवे हे रिंगणपेक्षा उजवे आहेत.
मला ही आधी राहुल देशपांडे
मला ही आधी राहुल देशपांडे बद्दल प्रश्न पडला .. पण I wonder if encouring talent is one of their priority while making the selections .. Rahul Deshpande is comparatively "established"?
Another thought was that if he would be always overshadowed because of his grandfather's talent?
प्रोत्साहन देणं वगैरे काही
प्रोत्साहन देणं वगैरे काही राष्ट्रीय पुरस्कारांचा हेतू नाही. अन्यथा ऋतुपर्ण घोष, गौतम घोष, मोहनलाल, शोभना इत्यादींना असंख्य वेळा तो मिळालाच नसता.
राष्ट्रीय पुरस्कार गाण्यासाठी मिळतो. चित्रपटासाठी नव्हे. त्यामुळे राहुलनं गायलेल्या गाण्याला न मिळता तो फक्त महेश काळेनं गायलेल्या गाण्याला मिळाला आहे.
सैराट यावर्षी होती?
सैराट यावर्षी होती?
यादी इंटरेस्टींग आहे ..
यादी इंटरेस्टींग आहे .. ह्म्म्म्म्म !
हो, रिंकू राजगुरूला स्पेशल
हो, रिंकू राजगुरूला स्पेशल मेन्शन आहे.
चिनूक्स मग त्या न्यायाने शंकर
चिनूक्स मग त्या न्यायाने शंकर महादेवन ही हवा की चर्चेत, why only Rahul Deshpande ?
हो, पण मला राहुलचं गाणं
हो, पण मला राहुलचं गाणं सगळ्यांत जास्त आवडलं
LOL! ok ..
LOL! ok ..
शंकरची गाणी ओरिजनली त्याची
शंकरची गाणी ओरिजनली त्याची नाहीयेत ना पण ( सूर निरागस सोडून)?
असो, शंकर महादेवन फिल्मी गायक आहे शेवटी, राहुल- महेश हे महफिली गाजवणारे क्लासिकली ट्रेन्ड गायक असल्यानी वेगळ्याच लेव्हलचे वाटतात.. सिनेमात आणि लाइव्ह गाताना कितीतरी पटींनी उजवे वाटले
शंकर पेक्षा ( माझं मत.)
बच्चनचं ॲवाॅर्ड का खटकलं
बच्चनचं ॲवाॅर्ड का खटकलं बुवा? विक्शिप्त म्हातारा तंतोतंत साकारणं, ते सुद्धा मध्यावर्ति कॅरेक्टर नसताना इज नाॅट ए पीस आॅफ केक...
सूर निरागस आणि ते दुसरं
सूर निरागस आणि ते दुसरं काजव्यांचं ..
तसं तर पिक्चरच ओरिजीनल नाही मग .. So I am not on board with originality theory .. who liked what better would always be subjective
मला तर दिल की तपीश मधले
मला तर दिल की तपीश मधले सचिनचे हातवारे सुद्धा आवडले होते. आता ते खरे शास्त्रीय वाटत नाहीत हे इथे काहींनी सांगितल्याने कळले
ओह यस सशल, मनमंदिरा आवडलं
ओह यस सशल, मनमंदिरा आवडलं होतं फार !
फा
अनुमोदन, सचिनचा परफॉरनन्स राहुल देशपांडे इतकाच आवडला !
बाकी पीकु बद्दल बच्चन्चं
बाकी पीकु बद्दल बच्चन्चं अॅवॉर्ड ज्यांना खटकलं त्याचं खरच नवल वाटलं
मला बाहुबली अॅवॉर्ड जाम खटकलं , ज्याची कथा अजुन पूर्ण झाली नाही त्याला बेस्ट फिल्म ??
लोकप्रिय कॅटॅगरीत दिलं असतं तर चाललं असतं !
मनमंदिरा मला धाकट्या
मनमंदिरा मला धाकट्या महादेवनचं जास्त आवडतं आजकाल
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कंगना राणावत ( तनू वेडस मनू रिटर्न्स) >>>
त्यापेक्षा दिपीका पडुकोणला पीकुसाठी द्यायचं होतं.
बच्चनसाहेबांनी मस्त काम केलं आहे मात्र याआधी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचं पारितोषिक मिळालेले अभिनेते आणि त्यांनी केलेले रोल्स बघता फारच उथळ निवड वाटली.
बरं यानिमित्तानं महेश काळे नाकातून गातात हे मी पुन्हा एकदा सांगून घेतेय. आणि हो, देशपांडेंना मिळायलाच हवं होतं.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये एक
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये एक लोकप्रिय असा विभाग असतो ना? त्यात मिळालेल्या पुरस्कारांची यादी आहे का ही? कारण एरवी बरेच माहिती नसलेले प्रादेशिक चित्रपट रा. पु. च्या निमित्ताने माहिती होतात. का ह्या वेळी मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत?
मला अमिताभ बच्चनचं नाव खटकलं
मला अमिताभ बच्चनचं नाव खटकलं कारण त्यापेक्षा अधिक चांगला अभिनय यावर्षी काही चित्रपटांमध्ये होता. उदाहरणार्थ, 'आय'साठी विक्रम, 'तितली'साठी रणवीर शौरी, 'मांझी' आणि 'बदलापूर'साठी नवाझुद्दीन सिद्दिकी किंवा 'मसान'साठी विकी कौशल.
पुरस्कारांच्या यादीत 'रेडीओपेट्टी', 'नाटकेर मोतो', 'सिनेमावाला' अशा उत्तम प्रादेशिक चित्रपटांचं नाव नाही. 'तिथी'ला फक्त सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचं पारितोषिक आहे. नीना गुप्ता, सयानी गुप्ता यांचीही नावं नाहीत.
हो, नवाझुद्दीन सिद्दीकीचा
हो, नवाझुद्दीन सिद्दीकीचा अभिनय उच्च होता , पण बहुदा बदलापुर मधे त्याला लिड अॅक्टर कॅटॅगरीत धरलं नसावं !
कंगनाची निवड आवडली मला
बरं यानिमित्तानं महेश काळे
बरं यानिमित्तानं महेश काळे नाकातून गातात हे मी पुन्हा एकदा सांगून घेतेय>>शु!!.... कुठ बोलु नका उगा त्या हिमेस रेस्मियाने एकल तर चकली -चिवड्यासाठी मागेल तो अॅवार्ड!
तंत्रज्ञांना पुरस्कार नाहीत
तंत्रज्ञांना पुरस्कार नाहीत का हि यादी अपूर्ण आहे ( ते पान पण उघडून बघितलं )
आय'साठी विक्रम,<<<< आय या
आय'साठी विक्रम,<<<< आय या वर्षी होता? मागच्या वर्षी रीलीज झालाय ना?
मला बाहुबली चित्रपट आवडला, पण एवॉर्ड मिळण्याइतका ग्रेट नक्कीच नव्हता.
Best Actress: Kangana Ranaut,
Best Actress: Kangana Ranaut, Tanu Weds Manu Returns
Best Actor: Amitabh Bachchan, Piku
Best Supporting Actress: Tanvi Azmi, Bajirao Mastani
Best Supporting Actor: Samuthirakani, Visaaranai
Best Director: Sanjay Leela Bhansali, Bajirao Mastani
Best Debut Director: Neeraj Ghaywan, Masaan
Best Feature Film: Baahubali
Best Wholesome Family Entertainer: Bajrangi Bhaijaan
Special Jury Award: Kalki Koechlin, Margarita, With A Straw
Best Film on National Integration: Nanak Shah Fakir
Best Film on Social Issue: Nirnnayakam
Best Film on Environment Conservation/Preservation: Valiya Chirakulla Pakshikal
Best Choreographer: Remo D' Souza, Bajirao Mastani
Best Cinematography: Sudeep Chaterjee, Bajirao Mastani
Best Production Design: Bajirao Mastani
Best Special Effects: Baahubali
Best Editing: Late Kishore T E, Visaaranai
Best Costume Designer and Best Make-Up Artist: Payal Saluja, Nanak Shah Fakir
Best Original Screenplay and Dialogue: Juhi Chaturvedi and Himanshu Sharma, Piku and Tanu Weds Manu Returns
Best Adapted Screenplay: Vishal Bhardwaj, Talvar
Best Playback Singer (Female): Monali Thakur, Moh Moh Ke Dhage
Best Playback Singer (Male): Mahesh Kale, Katyar Kaljat Ghusili
Best Lyricist: Varun Grover, Moh Moh Ke Dhaage
Best Music Director: M Jayachandran, Ennu Ninte Moideen
Best Music Direction, Background Score: Ilaiyaraaja, Tharai Thappattai
Best Audiography, Location Sound Recordist: Sanjay Kurian, Talvar
Best Audiography, Sound Designer: Biswadeep Chatterjee, Bajirao Mastani
Best Audiography, Re-recordist of the Final Mixed Track: Justin Jose, Bajirao Mastani
Most Film-Friendly State: Gujarat
Best Children's Film: Duronto
Best Hindi Film: Dum Laga Ke Haisha
Best Tamil Film: Visaaranai
Best Malayalam Film: Pathemari
Best Sanskrit Film: Priyamanasam
Best Kannada Film: Thithi
Best Marathi Film: Ringan
Best Maithili Film: Mithila Makhaan
Best Punjabi Film: Chauthi Koot
Best Bengali Film: Sankhachil
Best Konkani Film: Enemy
Best Assamese Film: Kothanodi
Best Haryanvi Film: Satrangi
Best Wancho Film: The Head Hunter
Best Khasi Film: Onaatah
Best Manipuri Film: Eibusu Yaohanbiyu
Best Mizo Film: Kima's Lode Beyond the Class
Best Bodo Film: Dau Huduni Methai
Best Odiya Film: Pahada Ra Luha
Special Mentions: Ritika Singh for Irudhi Suttru, Jayasurya for Su Su Sudhi Vathmeekam and Lukka Chuppi, Rinku Rajguru for Sairat
Best Non Feature Film: Amdavad Ma Famous (Gujarati)
Best Art Cultural Film: A Far Afternoon - A Painted Saga
Best Biographical: Life in a Metaphor
Best Short Fiction Film: Aushad (Marathi)
Best Animation Award: Fisherwoman and Tuktuk
Best Social Film Award: Autodriver
Best Music (Non feature): A Far Afternoon
--------- पुर्ण लिस्ट
Pages