Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जंगलबुक पाहिला,,विशेष म्हणजे
जंगलबुक पाहिला,,विशेष म्हणजे छोट्या पिलुसोबत पाहिला.त्यानेही न घाबरता,ओरडता पुर्ण वेळ पाहु दिला..हुश्श...
फार फार बरं वाटल.लहानपणीचे मोगली कार्टुन पाहताना चे दिवस आठवले.प्रियांका चा आवाज एक नंबर आहे.इरफान चा पंजाबी अॅक्सेंट नाही आवडला.
रिमा लागू व मोहन जोशी
रिमा लागू व मोहन जोशी ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला सैल नावाचा सिनेमा काल पाहिला.
दोघे प्रेमात पडून लग्न करतात हा वकील असतो व ती आदर्श्वादी पुस्तकी स्त्री असते. तो मुले जन्मल्यावर त्यांच्यासाठी म्हणून भ्रष्टाचारात गुंतत जातो. व त्या मतभेदातून त्यांचा घट्स्फोट होतो. तो सर्व सोडून लेक्क्षरर होतो व कायदा शिकवू लागतो.
ही पुढे जाऊन वडिलांच्या आधाराने राजकारणात फार पुढे जाते. व फार गुंतते. चित्रपट सुरू होतो तेव्हा मोजोची गाडी पावसात बंद पडते व तो एका बंगल्या त आसरा मागतो. तर ती तिथे पार्टीच्या लोकांपासून लपून बसलेली असते. जिवाला धोका आहे म्हणून. मग एक रिवर्स इजाजत टाइप दोघे एकमेकांची खबर बात घेतात. तू काळ्जी घे तुम्ही वयस्कर झालात वगैरे आपुलकीचे चार शब्द एकमेकांना म्हणतात.
मुलगी तिच्याकडे व मुलगा ह्याच्याकडे अशी विभागणी झालेली असते पण मुलगा मोठेपणी हाय खाउन मरतो व मुलगी पण चारित्र्य हनन झाल्याने अमेरिकेत जाऊन मनमानी राहात असते. एकूण मुले प्रकरणी
निराशाच. मग रात्रभर पाउस, गप्पा रडारड वगैरे झाल्यावर ते सेपरेट होतात. ती म्हणते मी सर्व सोडून येते तुझ्याकडॅ तोच पारटीचे लोक येउन तिला वाजत गाजत घेउन जातात. ती पण हे सर्व मनापासून एंजॉय
करते आहे हे त्याला समजते. व तो निघून जातो. ह्यात मध्ये तो तांबडॅ बाबाकी जय वाला आदमी संशयास्पद रीतीने तिच्यावर गार्ड कम लक्ष देउन असतो. पावसात रात्री त्याची गाय व्यायलेली असते तिला मोजो मुलीचे नाव दे असे सांगतो. ( मितवा) मध्ये लताचे एक लांबडे बोअरिंग गाणे आहे.
मोजो चे काम चांगले आहे. ही मात्र सलमानची आईच वाट्टॅ. मुलगा वारल्याचेही तिला माहीत नाही हे काही पटत नाही. मध्यमवयात एकून आप्ण हा आटापीटा का केला असे प्रश्न पडतात तसे काहीसे आहे. एकूण सैल मांडणी. मुलगा वारल्याचे सांगणारा मोजोचा सीन छान आहे. पण कोणी मी हंबरडा फोड ला असे सांगत नाही. स्वतः रडतातच फक्त. ही संवादात गफलत आहे.
तो बंगला छान आहे. उत्तम लोकेशन.
३डी साठी जेवढे तिकीट्स तेवढेच
३डी साठी जेवढे तिकीट्स तेवढेच गॉगल्स असा नियम आहे का? ३ वर्षांखालच्या मुलांना तिकीट्स नसते तर त्यांना गॉगल मिळतो का?
आम्हांला जे सुरुवातीला गॉगल
आम्हांला जे सुरुवातीला गॉगल मिळाले,,,त्यातले दोन नवर्याने बदलुन आणले.सेंकड हाफ मधे अजुन दोन घेऊन आला.४ लोकांसाठी ६ गॉगल मिळाले.तिकिटावर देतात.पण नीट दिसत नसल्याने बदलुन दिले होते जास्तीचे.
'नील बटे सन्नाटा' पाहिला.
'नील बटे सन्नाटा' पाहिला. अतिशय सुंदर चित्रपट ! चित्रपट संपल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी प्रेक्षकांनी उस्फूर्त टाळ्या वाजवल्या.
ह्या आठवड्यातही चित्रपटगृहात आहे. लवकरात लवकर बघा. मुलांना ( विशेषतः दहा पासून पुढची मुलं, ज्यांना हा विषय कळू शकेल ) नक्की घेऊन जा.
चित्रपटाचा विषय मला आपल्या आयुष्याशी फार 'रिलेट' होणारा वाटला. आपल्याकडे घरकामाला येणार्या बायकांपैकी बहुतेक सर्वांनाच आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, त्यांना आपल्यासारखी मोलाची कामं करायला लागू नये असं वाटत असतं. त्यासाठी मुलांना क्लासला पाठवण्याची, त्या फी साठी जास्त कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. त्याचवेळी त्यांच्या मुलांना मात्र अभ्यासाची आवड बहुतेकदा नसते ( ह्याची निश्चितच वेगवेगळी कारणं आहेत. पण आवड नसते हे खरं ! ) परिघाबाहेरुन पाहणार्या आपल्याला हे सगळं दिसत असतं. एकीकडे त्यांना मदत करण्याची इच्छा असते, एकीकडे आपण कुणाकुणाला आणि किती पुरणार असा ( प्रॅक्टिकल ) विचारही आपल्या मनात असतो.
चित्रपटातील घरकाम आणि इतर पूरक मोलाची कामं करणार्या चंदाचंही हेच स्वप्न आहे की मुलीने खूप शिकावं पण मुलीला तर मोठं होऊन 'मेड' च बनायचं आहे. मुलीचं मन वळवण्यात ती यशस्वी होते का आणि कशा पद्धतीने हे पडद्यावरच पाहण्यात मजा आहे. चंदा, तिची मुलगी अप्पू ( अपेक्षा ), चंदाची व्यवसायाने डॉक्टर असलेली मालकीण, शाळेचे मुख्याध्यापक, सहविद्यार्थी आणि इतर काही पात्रं ह्या सगळ्यांचेच अभिनय सहजसुंदर !
आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या घटकांना कुणीतरी मदत केली तरच आपण आपलं आयुष्य घडवू शकतो असा चुकीचा संदेश जाणार नाही आणि त्याचवेळी जे ह्या घटकांसाठी काही करु शकतात त्यांना हलकेच चिमटा बसेल अशी दुहेरी कसरत लेखक-दिग्दर्शकाने पेलली आहे हे उल्लेखनीय !
अगो, लिंक वरुन ट्रेलर बघितला.
अगो, लिंक वरुन ट्रेलर बघितला. छानच आहे. रत्ना पाठक इतकी वर्षे चित्रपटापासून का दूर राहिली ते कळत नाही.
अगो, थँक्स इथे रिव्ह्यू
अगो, थँक्स इथे रिव्ह्यू लिहील्याबद्दल. या पिक्चरबद्दल खूप उत्सुकता होती. आता नक्कीच पाहणार.
दिनेश दा. अभिमान बघितला ना
दिनेश दा.
अभिमान बघितला ना
अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर
अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर आलेला वारणेचा वाघ या सिनेमाबद्दलची डॉक्युमेंटरी.
http://fullmobilemovie.com/download/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3...
फकिरा ही कादंबरी वाचली होती. सिनेमा पाहतोय असे दृश्य इफेक्ट्स आहेत. जबरदस्त शैली आहे अण्णाभाऊंची.
मायबाप, मला वाटते ती नाटकातून
मायबाप, मला वाटते ती नाटकातून कामे करत होतीच.. पहिल्यांदा तिला चित्रपटात मी बघितली ती नासिरच्याच.. यू होता तो अश्या काहीतरी नावाच्या चित्रपटात.
दिनेश. , हो, ट्रेलर कॅची आहे.
दिनेश. , हो, ट्रेलर कॅची आहे. ट्रेलर पाहिला तेव्हाच ठरवलं होतं की हा चित्रपट पाहायचाच.
रमड, नक्की बघ.
रत्ना पाठक इतकी वर्षे
रत्ना पाठक इतकी वर्षे चित्रपटापासून का दूर राहिली ते कळत नाही.>> दिनेश तुम्ही सध्याचे चित्रपट पाहत नाहीत का? कारण ती कॅरेक्टर रोल मधे गेल्या काही वर्शात मला तरी (प्र्त्येकवर्शी एकातरी चित्र्पटात) दिसलिय, जाने तु या जाने ना, खुबसुरत,गोलमाल३ ही काही ठळक उदाहरण...
रत्ना पाठक शाह यांचा एक नवा
रत्ना पाठक शाह यांचा एक नवा चित्रपट - https://www.youtube.com/watch?v=xHwHPlUZuOU
बरेच वर्षानी परत एकदा Escape
बरेच वर्षानी परत एकदा Escape from Sobibor पाहिला. ते नागवं मूल आणि त्याच्यावर सोडलेला हिंस्र कुत्रा हे चित्र काळजावर कायमचं कोरलं गेलंय.
चित्रपट पहाताना ' माणुसकी इतकी खाली जाऊ शकते?' असा प्रश्न परत परत पडतो.
https://en.wikipedia.org/wiki/Escape_from_Sobibor
मी Escape from Sobibor ही
मी Escape from Sobibor ही कादंबरी वाचलीय फार पूर्वी (मराठी अनुवाद).
अगो , परिक्षण आवडलं ! चित्रपट
अगो , परिक्षण आवडलं ! चित्रपट बघावासा वाटतोय
प्राजक्ता, हल्लीचे नाही
प्राजक्ता, हल्लीचे नाही बघितले मी. मला ती इधर उधर सिरीयल पासूनच आवडते.
एस्केप फ्रॉम सॉबीबार.. मी परत नाही बघू शकत. अंगावर येतात त्यातले प्रसंग.
अंकूर अरोरा मर्डर केस बद्दल
अंकूर अरोरा मर्डर केस बद्दल ऋन्मेष ने जानेवारीत लिहिले होते. तो मी यू ट्यूबवर बघितला. सकस अभिनय असला तरी काही चूका आहेत त्यात. एवढा हलगर्जीपणा डॉक्टर करत नाहीत सहसा. आणि भूलत्ज्ञ पण सर्जरीच्या वेळी गळ्यात ताईत वगैरे नाही ठेवू देत. बाकी ट्रीटमेंट लाईन वगैरे गोष्टी बरोबर असल्या तरी, सरकार त्यावेळी ओ टी मधे हजर असलेल्या इतर दोघांना का साक्षीदार म्हणून बोलावत नाही, ते कळत नाही. अर्थात अभिनयासाठी जरुर पहावा. मेनन पेक्षा मला अंकूरच्या आईच्या भुमिकेतील कलाकाराचा अभिनय जास्त आवडला.
जंगल बुक २०१६ सीजीआय, ३-डी
जंगल बुक २०१६ सीजीआय, ३-डी वगैरे जबरदस्त आहे. पण जुन्या चित्रपटाचा क्यूटनेस, स्मार्ट ह्यूमर, गाण्यांची मजा जाणवली नाही. निदान पहिल्यांदा पाहताना तरी. बघीरा, बलू, का, किंग लुई यांच्या व्यक्तिरेखा उभ्याच राहिल्या नाहीत. जुन्या मधला बलू दोन मिनीटात तुम्हाला खिशात टाकतो. 'का' चे हिप्नॉटिझम एस्टॅब्किश करायला त्याला आधी स्वतंत्र सीन आहे जुन्यात. इथे एकदाच ती येउन गेली. सर्वात मिसिंग म्हणजे 'कर्नल हाथी'. जुन्यातले ते ब्रिटिश नॅरेटिव्ह मूळच्या भारतीय जंगलातील इंग्लिश लेखकाच्या कथेला अस्सलपणा देते. इथे ते एवढे प्रभावी वाटले नाही. शेरखान इथे जास्त क्रूर दिसतो, पण जुन्यात तो ज्या Dignified रीतीने कायम वावरताना दाखवलाय त्याला तोड नाही. किंग लुईचा क्रेझीपणा त्या जुन्यातील गाण्यात जी धमाल उडवतो त्यामानाने इथे हळूच ते उरकून टाकले आहे.
पिक्चर नक्कीच बघण्यासारखा आहे. पण सतत जुना आठवत राहतो.
हलका आहार... नि जड आहार...
हलका आहार... नि जड आहार... सैराट पचायला थोडा जड गेला... जवळ-जवळ चार-एक दिवस गेले.
दो दो शक़्लें दिखती हैं इस बहके से आईने में
मेरे साथ चला आया है आपका इक सौदाई भी
ख़ामोशी का हासिल भी इक लम्बी सी ख़ामोशी है
उन की बात सुनी भी हमने अपनी बात सुनाई भी...
हे नागराजंच १४ एप्रिलचं पोस्ट... हेच सैराट सिनेमात उतरलं आहे.
नागराज ने पिटातल्या प्रेक्षकांचही ऐकलंय आणि स्व:तचही सांगितलं आहे.
सिनेमा बनविण्याची व पाहण्याची कला ढोबळ पध्दतीने दोन प्रकारात विभागला गेली, कर्मशिअल आणि आर्ट. नंतर बर्याच कालावधी पर्यंत प्रेक्षकही ह्या अलिखित पध्दतित विभागले गेले. सैराट ने सर्व बांध मोडीत काढत कर्मशिअल आणि आर्ट एकत्र आणलय बघुया सर्वांना आवडतय का... जर हे खरचं सैराट चाललं तर येणार्या दिवसांत सिनेमा आणखी सशक्त होईल.
फर्स्ट हाफ... एव्हडा सुंदर आहे कि विचारता सोय नाही. हिन्दी सिनेमावाले निर्सगाचं मनोवेधक रुप शोधायला पार स्विजरलैंडला जायचे... पण सैराट तर हॉलिवूडवाली दृष्य मराठीत आणि ते ही महाराष्ट्रातील गाव-खेड्यांतील वेडं लावणारी दृष्य आपल्यासमोर घेऊन येतो. एकाच सिनेमात किती सुंदर गोष्टींचा मिलाफ व्हावा... सुंदर सिनेमॅटोग्राफी... सुंदर वेश-भूषा... तितकाच सुंदर आभिनय तोही अगदी सर्वांचा... प्रेमाच्या सुंदर कल्पना... हे सारं बघताना रममाण झालेला प्रेक्षक सेंकड हाफ मध्ये भानावर येतो... वास्तवाच्या झळा मनाला दाह देऊ लगतात... शेवट धारदार नि टोकदार अगदी भाल्यासारखा...
पिक्च्र्र संपल्यावर पहिला विचार मनात आला होता खरंच गरज होती का असा शेवट दाखविण्याची... पण आता वाटतयं शेवट त्या पद्धतीने होणं गरजेचं असावं त्यामुळे का होईना बर्याच लव्ह्स्टोरीज् अंधारातून लख्ख प्रकाशात आल्या.
हे पोस्ट चुकीच्या ठिकाणि
हे पोस्ट चुकीच्या ठिकाणि असेल, पण मी एक मराठी चित्रपटाचं नाव शोधतेय. प्लिज मदत करा,
अशोक सराफ, वर्षा उसगावकर,लक्ष्मिकांत बेर्डे
अशोक सराफ चा एक सीन आठवतोय , तो त्याच्या ऑफिस मधे असतो, त्याची सेक्रेटरी सरखा सारखा
पदर पाडुन त्याच्या समोर उभि असते , तर तो वैतागुन शेवटि स्टेपलर ने लावुन टकतो पदर
"शेजारी-शेजारी "असावा
"शेजारी-शेजारी "असावा
नाही गं, हा सीन नाहीये त्यात.
नाही गं, हा सीन नाहीये त्यात.
ही ३ नाव वाचुन हा एकच पटकन
ही ३ नाव वाचुन हा एकच पटकन आठवला...
मी गुगल वर पण चेक केलं, पण
मी गुगल वर पण चेक केलं, पण नाही मिळालं,
हेच खात्रीशीर ठिकाण आहे जिथे मिळु शकेल,
प्लीज शोधा , दोन दिवस डोक्याचा भुगा
झालाय आठवुन.
मलाही आठवत नाही, पण सीन वरून
मलाही आठवत नाही, पण सीन वरून जुन्या हीरो मधल्या संजीव कुमार चा 'पल्लू उपर करो' सीन आठवला
नाईन टू फाईव्ह या इंग्रजी
नाईन टू फाईव्ह या इंग्रजी चित्रपटावर आधारीत मराठी सिनेमा आला होता, अशोक सराफ होता पण त्यात वर्षा नव्हती बहुतेक. असला सीन होता का ते आठवत नाही.
संदीप आहेर
संदीप आहेर +१
धनुडी,
https://en.wikipedia.org/wiki/Shubh_Mangal_Savdhan
Shubh Mangal Savdhan हा
Shubh Mangal Savdhan हा पिक्चर आहे तो
आव्हान ( मराठी ), अंकुर अरोरा
आव्हान ( मराठी ), अंकुर अरोरा मर्डर केस आणि डेडलाईन सिर्फ २४ घंटे.. असे मेडीकल प्रोफेशनला टार्गेट करणारे ३ सिनेमा, एका पाठोपाठ बघण्यात आले. पहिले दोन ठिक होते पण डेडलाईन मला अजिबातच पटला नाही.
इरफान, कोकंणा आणि रंजित कपूर आहेत. अभिनय उत्तम आहे. पण एक डॉक्टर त्याची फि मिळाल्याशिवाय ऑपरेशन करायला नकार देतो म्ह्णून त्याच्या आजारी मुलीला किडनॅप करणे, बायकोला ओलिस धरणे आणि डॉक्टरला पैश्यासाठी छळत राहणे, मला व्यक्तीशा: पटले नाही.
मूळात तूम्ही एखाद्या उत्तम हॉस्पिटलमधे जाता, आणि निष्णात सर्जन कडून उपचाराची अपेक्षा ठेवता तेव्हा त्याचा मोबदला द्यायची तयारी हवीच. किमान त्याची चौकशी तरी करायला हवी. आणि कमी खर्चात किंवा मोफत उपचार
करणारी सरकारी रुग्णालये बहुतेक शहरात आहेतच कि.
Pages