Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कपूर अँड सन्स.. मलातरी खुप
कपूर अँड सन्स.. मलातरी खुप आवडला..
खुप इन्व्हॉल्व होतो आपण हा चित्रपट पाहातांना..
जणू आपल्या आजूबाजूला घडतो आहे..
या विकांताला तेरा सुरूर
या विकांताला तेरा सुरूर बघितला ......का बघितला ?????
जंगल बुक मध्ये प्राणी मरतात
जंगल बुक मध्ये प्राणी मरतात वगिअरे का? तसे असेल तर मला बघवणार नाही. नसेल तर शनिवारी जाता येइल. प्राण्यांचा अब्यूज होतो वगैरे अशी कथा आहे का? हे मी माझ्या बद्दलच विचारत आहे. बीपी वाढेल. हार्ट ला त्रास होईल म्हणून.
3D मध्ये माझेहि डोके दुखते.
3D मध्ये माझेहि डोके दुखते. डोळ्यावर खुप ताण आलाय असे वाटते.
जंगल बुक पाहिला.
जंगल बुक पाहिला. तंत्रज्ञानाची कमाल आहेच. पण तरी अपूर्ण वाटतोच. शेवटी ‘जंगल जंगल बात चली है ’ गाणं जोडायला हवं होतं. मजा आली असती. पण ते प्रमोशनपुरतंच आहे. चित्रपट खूपच उरकवला आहे. नाना, ओम पुरी, इरफान सगळ्यांचे आवाज मस्त. ‘का’ तर केवळ एकाच प्रसंगात आहे. क्लायमॅक्स आणखी चांगला करता आला असता. लहान मुलांना न्यायला काहीच हरकत नाही. माझी दोन्ही मुलं मस्त एन्जॉय करत होती. संपूर्ण सिनेमात रक्ताचा अगदी थेंबही कुठे उडालेला दाखवला नाही. त्यामुळे मुलांना पहायला काहीच प्रॉब्लेम नाही.
विकांताला पोस्टर गर्ल बघितला.
विकांताला पोस्टर गर्ल बघितला. फार बाळबोध वाटला .
बर्याच लोकांचा अभिनय आवडला पण विनोद फार हसवणारे नव्हते.
लोकांचे मत परिवर्तन फारच सहज आणि वरवरचे वाटले.
सोनाली भयाण दिसते काहीकाही शॉटस मध्ये .
पोस्टर बॉईज फारच उजवा होता.
कुंग फू पांडा 3 पाहिला. एकदम
कुंग फू पांडा 3 पाहिला. एकदम एंटरटेनिंग आहे सिनेमा.. मस्त!
(ज्यांनी सिनेमा पाहिला नसेल त्यांनी पुढे वाचू नका.)
हा सिनेमा पाहताना हॅरी पॉटर कथेशी भरपूर साम्य जाणवले काही काही प्रसंगात. उदा..
ऊग्वे आणि काई हे अगदी डंबलडोर आणि ग्रिन्डेलवॉल्डसारखे .. आधी मित्र मग काई व्हिलन झाल्यावर ऊग्वेनेच त्याला हरवणे, मास्टर ऑफ ची आणि मास्टर ऑफ डेथ.. हॅरीच्या 'एक्स्पेलिआर्मस'सारखी 'पो'ची पण एक सिग्नेचर मूव्ह असणे, शेवटचा ऊग्वे आणि पो यांचा स्पिरिट वर्ल्डमधला प्रसंग पाहून 'किंग्ज क्रॉस' आठवलं.
कपूर अँड सन्स पाहिला... फवाद
कपूर अँड सन्स पाहिला... फवाद खान प्रचंड आवडत असल्याने हा चित्रपट मस्ट वॉच होताच... पण फवाद सोबतच सिद्धार्थ आणि रत्ना पाठक आणि रजत कपूरपण खूप आवडले... करण जोहरच्या इतर चित्रपटांप्रमाणे फक्त गुडी गुडी न दाखवत यात बरीचशी रिअॅलिटी उत्तमरित्या दाखवली आहे. सगळेच आपापल्या भुमिकेत परफेक्ट.
जंगल बुक पाहिला. मस्त जमलाय.
जंगल बुक पाहिला. मस्त जमलाय. दहा जणांच्या ग्रुपने (२ सिनीयर सिटिजन्स सकट) गेलो होतो, ज्यात दोनच मुलं ! एक साडेचार (मुलगा), दुसरं सात वर्षांचं (मुलगी). दोघेही काहीकाही ठिकाणी दचकून, बिचकून बसले होते, पण एकंदर सिनेमा जाम आवडला त्यांनाही. मुळात गॉगल लावून सिनेमा पहायचाय हेच त्यांच्यासाठी फार एक्सायटिंग होतं. 'I Wan'na Be like You...' हे मंकी किंग लुईचं गाणं दोघांनाही सॉलीड आवडण्यात आलं आहे.
माझ्या पिढीतल्या अनेकांच्या शालेय जीवनाच्या प्रत्येक आठ्वड्याच्या निवांत रविवारचा, 'मोगली' हा एक अविभाज्य भाग असायचा. त्यामुळे 'जंगल बुक' चे अजून कितीही वेगवेगळ्या प्रकाराने होणारं सादरीकरण, तितकंच आवडीने पाहिले जाईल.
इंग्रजी वर्जन पाहिल्याने सतत काहीतरी कमी आहे असं वाटत राहिलं. नाना पाटेकर, प्रियांका चोप्रा, इरफान, ओम पुरी यांचे आवाज असलेलं हिंदी वर्जन पहायला अजून जास्त मजा येईल.
स्पॉयलर - काही काही ठिकाणी गोष्टी, पात्रं प्रमाणापेक्षा छोटी/मोठी वाटली..... हा थ्रीडीचा इफेक्ट किंवा कसं हे समजलं नाही.
११ एप्रिलला कोणा हिंदी कवीचा
११ एप्रिलला कोणा हिंदी कवीचा जन्मदिन आहे का?
जंगल बुक पाहिला.
जंगल बुक पाहिला. तंत्रज्ञानाची कमाल आहेच. पण तरी अपूर्ण वाटतोच. शेवटी ‘जंगल जंगल बात चली है ’ गाणं जोडायला हवं होतं. मजा आली असती. पण ते प्रमोशनपुरतंच आहे. चित्रपट खूपच उरकवला आहे. नाना, ओम पुरी, इरफान सगळ्यांचे आवाज मस्त. ‘का’ तर केवळ एकाच प्रसंगात आहे. क्लायमॅक्स आणखी चांगला करता आला असता.
>> अगदी अगदी.
आणि हिंदी जंगल बुकच्या शेवटीसुद्धा इंग्रजी गाणं दाखवलं. "यू कॅन ट्र्स्ट मी (माय आईज?
).
तेसुद्धा करायचं ना हिंदी
सनम तेरी कसम हा चित्रपट (हो
सनम तेरी कसम हा चित्रपट (हो आहे असा एक पिक्चर)
ऑनलाईन पाहिला.
जब वी मेट सारखी वाटली थोडीफार स्टोरीलाईन. हिरो हिरवीणचा पहिलाच पिक्चर आहे बहुतेक. हर्षवर्धन राणे नामक मिक्स ऑफ जॉन एब्राहम, वरूण धवन आणि पिळदार शरीरयष्टीचे टॅटूने माखलेले जे जे हिरो आहेत त्यातला एक वाटला.
हिरवीण मावरा होकेन असं काहीसं विचित्र नाव असलेली पाकिस्तानी आहे. तिच्यात पण २-३ हिरवीणी मिक्स वाटल्या.
फर्स्ट हाफ चांगला आहे. हिरवीण एकदम मोठा चश्मा, वेणी मधे दाखवली तेव्हाच कळले हिचा मेकओव्हर असणार. तिची हिरोशी भेट, तिच्यामुळे तो आणि त्याच्यामुळे ती अडचणीत येणे, मग त्याने तिला मदत करणे, इथपर्यंत सगळे आवडले.


नंतर जे काही गाडी घसरली. चुंईंगम सारखा ताणतच गेला. संपायचे नावच नाही. तरी चिवटपणे पाहिला लास्टपर्यंत
एकदा बघणेबल आहे. नंतरचा ढकलत ढकलत बघितला तरी चालतंय.
सुदेश बेरी चे दर्शन सुखावह
पोलिस इंस्पेक्टर (जाने तू या जाने ना मधे आहे तोच) काही वेळा अतिच चांगला दाखवलाय.
सनम तेरी कसम म्हटले की मला
सनम तेरी कसम म्हटले की मला कमल हसन आणि रीना रॉयचाच सिनेमा आठवतो.
जंगल बुक आवडला पण वर
जंगल बुक आवडला पण वर म्हटल्याप्रमाणे काहितरी मिसिंग वाटले. नाना पाटेकर चा आवाज नाही आवडला, त्याच्या आवाजामुळे शेरखान थकलेला आणि म्हातारा वाटला. हिंदी मधे बघायचे मेन अॅट्रेक्शन नाना, इरफान , शेफाली छाया, प्रियांका चा आवज हेच होते. आता पुन्हा इंग्रजी वर्जन बघायचा आहे. Ben Kingsley चा आवाज मस्त वाटेल बघिरा साठी आणि बाकिच्यांचे ड्बिंग ऐकायची उत्सुकता आहे. निल सेठी चा मोगली एकदम ओरिजिनल वाटला. मस्त गोड मुलगा आहे.
शेरखान च्या आवाजासाठी अमरिश पुरी आणि प्राण आठवले.
हिंदी 'जंगल बुक' इकडे रिलीज
हिंदी 'जंगल बुक' इकडे रिलीज झाला नाही. त्यामुळे आवाजांची तुलना करता येणार नाही. पण इंग्रजीत बेन किंग्सले (बगीरा) आणि इद्रिस अल्बा (शेरखान) म्हणून फीट्ट वाटले. इद्रिस अल्बाच्या आवाजातून शेरखान बद्दलची दहशत, जरब सही सही व्यक्त झालीये. स्कारलेट जॉन्सन (का) चा आवाज पण एकदम त्या पात्रासाठी मंत्रमुग्ध करणारा जसा हवा, तसाच वाटला. तसाच हिंदीमधे प्रियांका चोप्राचा ही वाटला असणार याचीही खात्री आहे.
इद्रिस अल्बाच्या आवाजातून
इद्रिस अल्बाच्या आवाजातून शेरखान बद्दलची दहशत, जरब सही सही व्यक्त झालीये. स्कारलेट जॉन्सन (का) चा आवाज पण एकदम त्या पात्रासाठी मंत्रमुग्ध करणारा जसा हवा, तसाच वाटला. >>> +१
जंगल बुक पाहीला.....सुरेख
जंगल बुक पाहीला.....सुरेख अनुभव....लेकीन खुप एन्जॉय केला...मीच दचकले १-२ वेळा..पण तिने मस्त पाहिला...
नाना, ओम पुरी, ईरफान, प्रियांका सगळेच आवाज मस्त वाटले....छोटु मोगली एक नंबर....
आणि पिक्चर संपल्यावर शेवटी "जंगल जंगल बात चली है" गाणं सुद्धा दाखवलं आम्हाला....तेव्हा सगळेच खुश झाले...
आम्हीपण पाहिला जंबु खूप एंजॉय
आम्हीपण पाहिला जंबु खूप एंजॉय केला शेरखानचा आवाज म्हातारा वाटला ... आम्हाला नाही दाखवलं गाणं ... चार वर्षाची नातीला घेऊन गेलो ... हिंदी व टू डी बघितला ... घाबरली नाही ...
अंजली_१२ जबरी लिहीले आहे.
अंजली_१२
जबरी लिहीले आहे. पाहायला हवा पिक्चर. जुन्या सनम तेरी कसमचा रिमेक आहे की काय कोणास ठाउक.
अंजली_12 साष्टांग नमस्कार ...
अंजली_12 साष्टांग नमस्कार ... सनम तेरी कसम तुम्ही पूर्ण पाहिलात .... हिरो ,माझ्या नवर्याचा सक्खा पुतण्या असूनही 10 मी. वर नाही पाहू शकलो आम्ही पिक्चर
..... फार फार पीळलय
...
फारएण्ड बघाच.. चिरफाड करायला
फारएण्ड बघाच.. चिरफाड करायला फुल स्कोप आहे

विनार्च वाह! घरचाच हिरो आहे की म्हणजे
>> स्कारलेट जॉन्सन (का) चा
>> स्कारलेट जॉन्सन (का) चा आवाज पण एकदम त्या पात्रासाठी मंत्रमुग्ध करणारा जसा हवा, तसाच वाटला
आमच्या बरोबरच्या काही जणांचं म्हणणं पडलं की का चा रोल भारीच छोटा होता, जरा अजून चालला असता
>>>आमच्या बरोबरच्या काही
>>>आमच्या बरोबरच्या काही जणांचं म्हणणं पडलं की का चा रोल भारीच छोटा होता, जरा अजून चालला असता
नक्की कुटल्या पिकचर ला गेले होते तुम्ही?
आत्ता??!! तो जंगलबूक की काय
आत्ता??!! तो जंगलबूक की काय म्हनत्यात तोच की हो. पण पावणेदोन तासांत का फक्त १५ मिनीटंच ऐकायला मिळाली न्हवं? (की हिप्नटाइज होऊन मलाच झोप लागली मध्ये? :))
सशल, की आणि का वर आख्खा पिकचर
सशल, की आणि का वर आख्खा पिकचर आहे असं त्यांना म्हणावं
सांगते पण अशी वाट्टेल ती का
सांगते पण अशी वाट्टेल ती का आवडेल का?
स्कार्लेट जोहान्सन च्या जागी
स्कार्लेट जोहान्सन च्या जागी करीना कपूर म्हणजे..
....
...
...
काही नाही. एका ओव्हरहाईप्ड हीरॉइनच्या जागी दुसरी
स्कार्लेट जोहान्सन करता
स्कार्लेट जोहान्सन करता कुठल्याही प्रकारचे गॉगल्स् दिसत नाहीत फा कडे.
निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे
निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे थेटरात न बघितलेला बाजीराव-मस्तानी फुकटच्या डिव्हिडीवर बघून टाकला आणि इतिहासाचा विचार न करता बघितल्यामुळे खूपच आवडला. आलिशान श्रीमंती सेट्स, अप्रतिम cinematography, पडदयावरची रंगांची उधळण, कलाकारांचे कपडे, दागिने, गेटअप्स- सगळं डोळे दिपवणारं आहे. चित्रपटाचा पहिला हाफ वेगवान आणि अतिशय छान जमला आहे. लढाईचे सीन्स, शनिवारवाडयातील सीन्स- सगळे जबरीच जमले आहेत. गाणी जरा बोअर होतात पण ठीक आहे.
सर्व सहकलाकारही मस्त. आदित्य पंचोली, मिलिंद सोमण, तन्वी आझमी, वैभव तत्ववादी, अनुजा साठे सगळेच. छोटा समशेर फारच गोड आहे.
मस्तानी-बाजीराव प्रेमकहाणी हाच चित्रपटातील कच्चा दुवा आहे. दिग्दर्शकाने असं का केलंय कळलं नाही. पण आधी काशी-बाजीराव अगदीच आनंदात, सुखात, टेन्शनफ्री दाखवले आहेत. मस्तानीला भेटल्यावर बाजीराव फ्लर्ट बिर्ट करतो पण मस्तानीशी लाँग टर्म नातं जोडण्यात इंटरेस्टेड दाखवलेला नाही. मस्तानी मात्र बाजीरावाच्या हात धुवून मागे लागते आणि obsessed, स्वार्थी वाटते. तिच्या पुण्यातल्या आगमनानंतर बाजीराव आनंदी कमी आणि दर्दभरा, गांजलेला जास्त दिसतो आणि सगळी सहानुभूती काशीच्या भूमिकेत प्रियांकाच घेऊन जाते. दिग्दर्शकाला बाजीराव-मस्तानी दाखवायचा होता की बाजीराव-काशी हेच कळत नाही. असा कठीण पेपर काढलेला असूनही दिपिका शंभर टक्के मार्क मिळवते. तिचा वॉर्डरोबही फारच सुंदर आहे. प्रियांकाने सुंदर काम केलंय. मस्तानीच्या आगमनापूर्वीची अवखळ प्रेयसी, लाडावलेली सून आणि मस्तानी प्रकरणानंतरची दुखावलेली पत्नी पण कर्तव्यदक्ष, जबाबदार सून हे ट्रान्सफॉर्मेशन तिने छान दाखवलं आहे.
रणवीर सिंग तर बाजीराव अक्षरशः जगला आहे. त्याची अॅक्सेंट ब्राम्हणी वाटत नाही पण हु केअर्स..कारण त्याचे संवाद ऐकायला मस्तच वाटतात. नाईस मुव्ही ओव्हरऑल!
मी मात्र इतिहास डोक्यात ठेऊन
मी मात्र इतिहास डोक्यात ठेऊन बघितला बा म त्यामुळे मला अजिबात खास वाटला नाही. बॉलीवूडी धंदेवाईक दृष्टीकोन वाटला. इतिहासाची चांगलीच मोडतोड. ह्या मुविपेक्षा राऊ आणि बाजीराव मस्तानी सिरीयल कितीतरी उत्तम. अर्थात माझं वै मत.
रणवीर-प्रियांका-दीपिका आणि तन्वी काही ठिकाणी चांगले डायलॉग म्हटलेत ह्या सर्वांनी, बाकी ठीकच, नॉट ग्रेट. दीपिकाचे डोळे काही ठिकाणी आवडले.
आदित्य बरा दिसला (अभिनय नाही), वैभव ठीकच (खूप बारीक वाटला).
पेशवीणबाईंचे वस्त्रभान पूर्ण मुविभर गुंडाळून ठेवले होते. मला वाटलं फक्त पिंगा गाण्यात गुंडाळले असेल. ती आदब पेहेरावातील दिसली नाही. पिंगा गाणं बघायचा प्रयत्न केला, बघू शकले नाही. दुसरीकडे निघून गेले.
पूर्ण मुवीत मला मात्र मिसो आणि यतीन कार्येकर आवडले. उत्तम काम.
Pages