चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झिरो डार्क थिर्टीन

सत्यघटनेवर आधारीत उत्कृष्ट चित्रपट कसा असावा याचे मुर्तिमंत उदाहरण. अतिशय संयत चित्रण केलेला, छोट्या छोट्या गोष्टींमधून नायिकेची परिस्थिती उलगडली आहे. तिचा एकटेपणा, आक्रमकता, अचानक हळवे होणे, याचा अगदी फाफटपसारा न करता थोडक्यात अवघ्या २-३ मिनिटांच्या दृश्यांमधे परिणामकारक दाखवला आहे. टिपिकल एफबीआय आणि सीएसआय वरिष्ठ एजंट यांचा इगो सुध्दा असाच दाखवला गेला. अतिरंजितपणा होण्याचे पुरेपुर मटेरियल या चित्रपटात होते पण त्यावर कंट्रोल ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहे. बरेच बोलके प्रसंग चित्रपटांमधे आहे ज्यातून व्यक्तिरेखा स्पष्ट होण्यात मदत मिळते

हाच जर चित्रपट बॉलिवूड मधे तयार झाला असता तर भुतो न भविष्य वाट लावली गेली असती.
नायिकेचा जुना ब्रेकअप दाखवून तिला सतत फ्लॅशबॅक मधे जाऊन तडप तडप टाईप गाणे म्हणायला लावले असते, कामाच्या ठिकाणी एक नविन हिरो दाखवून दोघांमधे प्रेमप्रकरण चालू केले असते, परत तिथे एक गाणे घुसडले असते ऑपरेशनच्या वेळी देशभक्ती टाईप डायलॉग्स देऊन नायिका कसे ऑपरेशन करणार्‍यांना भाषण देते मग सगळ्यांमधे एकदम स्पुर्ती संचारते इथे ही एक गाणे बनु शकते. चवताळलेला हिरो हातात तिरंगा घेऊन बिन लादेनला ठार करतो. वगैरे वगैरे. इथे नायिका हे दृष्य बघून त्याच्यावर फुल्ल फिदा होते. हेलीकॉप्टर खाली उतरल्यावर ती धावत जाऊन मिठी वगैरे मारते.

बर आहे हॉलिवूड मधे बनला. जे होते चांगल्यासाठी होते.

मध्यंतरी भातुकली (अजिंक्य देव, सुनील बर्वे, शिल्पा तुळसकर, स्मिता तळवलकर, किरण करमरकर) नावाचा सिनेमा पाहीला. मला आवडला. कहानी मे ट्विस्ट मस्त आहे. शेवटपर्यंत अंदाज (मला तरी) नाही आला.

"Mohan gokhale aani vikram gokhale bhaau aahet kaa?" -
छे! काहीही काय!

शेवटाला आख्खा चित्रपट डिइफाइन होत असला तरी प्लॉट फसलेला वाटतो. ... मधे मधे प्र्चन्ड रटाळ होतो.मला नाही आवडला ... अजिन्क्य अजुनही तितकाच हॅण्ड्सम दिसतो॑.

आपलीमराठी वर पाहिला आत्ता भातुकली. छान आहे आवडला. ट्वीस्ट भारी आहे खरंच. मलाही नाही आला अंदाज. अजिंक्य देव कसला हँडसम दिसतो.

भगवती नाही ग. मोहन गोखले यांचे वडील पत्रकार होते. रमेश का रमाकांत नाव होतं त्याचं. मोहन गोखले यांच्यानंतर ते गेले. तेव्हा म टा मधे बातमी छापून आली होती. कझिन्स असतील तर माहिती नाही पण सख्खे नव्हते भाऊ.

अंजिक्य देव सॉलीड हँडसम अजुनही.

फेरफटका हो, नक्की बघेन. त्या दिवशी संध्याकाळी पण तो चित्रपट होता पण मी D3 concert बघत बसले, आणि उगाच बघितली असं झालं.

लहानमुलांबरोबर बघु नका
हा सुपर हिरो लहानांसाठी नाही तर मोठ्यांसाठी आहे Happy

तुफ्फान हाणामारी आहे.

काल नसीर व नवाजउद्दीन चा फिराक पाहीला गुजरात दंगली नंतर तेथील जनजीवनावर झालेला परिणाम व नंतरचा जगण्याचा संघर्ष जो ह्या चित्रपटात नंदिता दासने जबरदस्त उभ केल. जबरदस्त स्टार कास्टिंग, दिग्दर्शन . ....एकदा अवश्यच पहा.
HD लिंक
https://youtu.be/vaX43EeCkxg

हा सुपर हिरो लहानांसाठी नाही तर मोठ्यांसाठी आहे - आमच्या मोठ्या मुलांनी सांगितल कि आई तुला बघण्यासारखा नाही. Wink Wink Wink

नवाजुद्देन, नसिर ही नावे. गुजरात दंगल ची पार्श्वभूमी हे सगळे पाहता चित्रपटात कोणाची तळी उचललेली असेल आणि कुणाला 'ठोकले 'असेल हे सांगायलाच नको. प्रचारी फिल्म असणार ती. दिग्दर्क कोण तिस्ता सेटलवाड की काय?

रविवारी सहज च्यानलं इकडेतिकडे करताना `शॉशँक रिडेंप्शन' नुकताच सुरू झालेला दिसला. चिरंजीवांकडून 'हायली रेकमेंडेड' होता. म्हणून आख्खा पाहिला.
आवडला. स्टोरीतले काही योगायोग अगदी टिपिकल बॉलिवूडी आहेत. पण एकूण सिनेमा गुंतवून ठेवणारा आहे. वातावरणनिर्मिती, सर्वांची कामं छान आहेत. टीव्हीवर सतत मॉन्स्टर नाहीतर सायफाय इंग्रजी सिनेमेच सुरू असतात, त्या तुलनेत हा चांगला वाटला.

Shawshank's redemption is the highest imdb rated movie of all time! And very aptly so!

Shawshank's redemption is the highest imdb rated movie of all time! And very aptly so!
>> सहमत

Shawshank's redemption is the highest imdb rated movie of all time! And very aptly so! >>> +१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

Shawshank Redemption एक अफलातून सिनेमा आहे. अनेक वेळा पारायणं केली आहेत त्या सिनेमाची. अभिनय, कथा, सादरीकरण, सगळ्याच स्तरांवर खूप भावला होता.

नागेश कुक्कुनूर ने एक हिंदी सिनेमा त्या धर्तीवर बनवला होता. नाव आठवत नाही, पण जुही चावला, नसिरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ वगैरे होते त्यात.

Pages