पेट डॉग घ्यावा?

Submitted by सशल on 29 March, 2016 - 12:24

गेले काही महिने/वर्षं माझा लेक "आपण कुत्रा घेऊ या ना"! असा हट्ट करत आहे. बरेच दिवस ठामपणे "आम्हांला हे जमायचं नाही. तू मोठा झालास की तुझ्या घरी आण हवे तेव्हढे पेट्स" असं उत्तर देऊन त्याला निकालात काढला. आता आजूबाजूचे, माहितीतले, चांगल्या परिचयाचे बरेच लोक घरी कुत्रे आणत आहेत तेव्हा पीअर प्रेशर बिल्ड-अप होत आहे.

आम्ही मुंबईचे; जिकडे माणसांनांच पुरेशी जागा नाही अशा बॅकग्राउंडचे तेव्हा पपी/पेट्स नां आमच्या वैचारीक जगात महत्वाचं स्थान नाही. दोघंही आळशी आणि ही तर स्वतःला नको असलेली जबाबदारी (आर्थिक + भावनिक). तेव्हा केवळ गुड पॅरेन्टींग म्हणून ह्या फंदात पडावं की नाही ह्याचा खूप विचार करते आहे.

आज बेकरीत विषय निघाला तिकडे धनश्री ने काही माहिती दिली. अजूनही ज्यांनां ज्यांनां ह्या विचार मंथनात सहभागी व्हावेसे वाटते त्यांनीं प्लीज इकडे लिहा. मला खूप उपयोग होईल निर्णय घेण्याकरता. मी माझ्या मनातले कन्सर्न्स इकडे लिहीतेच वेळ मिळताच.

ही धनश्री ने दिलेली माहिती:

"माझी डेझी गोल्डन रिट्रीव्हर आहे. आता ती ४ महिन्यांची आहे. आम्ही तिला ७ वीकची असताना आणली. नुसता लोकरीचा गुंडा होता. स्मित पण आता छान रूळली आहे. शांत आहे. खूप माया लावते.

सध्या तिचे शॉट्स + फूड + ट्रीट्स इ. बेसिक गोष्टी साधारण महिना $१०० च्या आत होतात. पण आम्ही तिला ट्रेनर आणि डे केअर लावलं आहे सोशलायझेशन साठी. त्याचा खर्च जास्त आहे. साधारण $१०० पर अवर ट्रेनर आणि दिवसाला $२५-३० च्या रेंजमधे डे केअर. you will find tons of options for dog care/ dog sitter depending upon area. again there is diff in care takers with special training vs general someone walking a dog. We are also exploring this new world. स्मित

कमिटमेंट जोरात आहे पण. १२-१५ वर्ष बांधली जातात. मला हे पचवणं अवघड होतं. दुसरं मूल झाल्यासारखं वाटलं पण फक्त १ महिनाच. स्मित आता मी परत नॉर्मल रूटिनवर येतेय."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच दिवस ठामपणे "आम्हांला हे जमायचं नाही. तू मोठा झालास की तुझ्या घरी आण हवे तेव्हढे पेट्स" असं उत्तर देऊन त्याला निकालात काढला.>>
आम्हीही असाच निकालात काढला, त्यात मी आणी नवरा अजिबात कुत्रिप्रेमी नाही, त्यानी त्याच्या लाळेबिळेसहित चाटाचाटी केलेली तर अजिबातच जमणार नाही, हेअर श्रेड होणे वैगरे असख्य प्रॉब्लेम्च मला दिसायला लागतात... बाकी अमेरिकेत कुत्रा पाळणे आणी किड्स प्लॅन करणे यात फार फरक नाही , फक्त कुत्र्याच्या भविष्याचा,आभ्यासाचा, शाळा-कॉलेजच्या अ‍ॅड्मिशनचा त्रास नसतो( म्हणजे नसावा बहुधा)
(पहिलिच नकारात्मक पोस्ट लिहुन विरस नव्हता करायचा खरतर पण राहवले नाही)

सहसा असं दिसून येतं की वन्स अ पेट ओनर, तुम्ही अगदी कट्टर पेट लव्हर होता आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनां "तुम्हीही घ्या, मग बघा मज्जा (;))" असं सुचवत असतात. ते बघून मुलंबाळं ह्यात अडकलेली जोडपी मुलंबाळं नसलेल्या फ्री बर्ड्स ना सारखं चिडवून किंवा अन्य प्रकारे प्रेशराइज करत असतात तसं वाटतं मला. तर हे कट्टर प्रेम कसं काय निर्माण होतं ह्याबद्दल मला प्रचंड कुतूहल आहे.

खर्च झेपेल की नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण म्हंटलं तर मिनीमल खर्च पण शेवटी कुत्रा हा फॅमिली मेम्बर म्हणून आणणार आपण तर त्याला बाकीच्या फॅमिली मेम्बर प्रमाणेच ट्रीट करायला हवं ना? मग ह्युमन लेकात आणि ह्या दुसर्‍या अमानवी (?)/पाशवी (?) लेकात फरक करता येणार नाही. पण मग तरी तो प्राणी आहे हा फॅक्ट चेन्ज होणार नाही. मग असा ज्याचं स्थान आपल्यापेक्षा कायम वेगळं, कदाचित दुय्यम असू शकेल असा फॅमिली मेम्बर घरी आणावा का?

आमच्याकडे या वर्षीच्या वाढदिवसाला मांजर आणुया असा एकतर्फी प्रस्ताव मांडून झाला आणि आम्ही दोघांनी तो तात्काळ निकालातही काढला. पेट्स हँडल करायची सवय नाही हे कारण आहेच पण मुलीला स्वतःलाच पेट्सच्या केसांची अ‍ॅलर्जी आहे.
ज्यांच्याकडे कुत्रे आहेत त्यांचे डॉक्टरचे खर्चही भरपूर झालेले आहेत हे पाहिलेलं आहे. ते परवडणारं नाही त्यामुळे आमच्याकडे सध्या ह्या विषयाला स्थान नाही.

प्राजक्ता, नो वरीज् ! मी जास्त नकारात्मकच आहे. फक्त लेकाचा हट्ट हट्ट म्हणून सोडून द्यावा की आपल्या आडमुठेपणाला थोडं बाजूला ठेवावं ह्या द्विधा मनःस्थितीत आहे.

हे कट्टर प्रेम कसं काय निर्माण होतं ह्याबद्दल मला प्रचंड कुतूहल आहे. >>> पेट्सकडून मिळणार अनकन्डिशनल लव्ह हे एकच कारण आहे त्यामागे.

आमच्याकडे पण कुत्र, मांजर, फिश प्रत्येकी दोन, झालंच तर कासव आणायची डिमान्ड होत असते. मांजर आणावी असा विचार माझ्या पण मनात येतो. पण कामं वाढतील या भितीनं आणत नाही. सध्या मैत्रिण सुट्टीवर जाते तेव्हा तिच्या मांजरीला आमच्या घरी ठेवतो, तेवढ्यावर भागवलं आहे.

>>कमिटमेंट जोरात आहे पण<<

कमिटमेंटपेक्शा रिस्पाॅंसिबिलिटी जास्त आहे. मुलांना रिस्पाॅंसिबिलिटीची जाणिव व्हावी म्हणुन आई-बाबांनी पपीज घरी आणले पण शेवटी सगळी जबाबदारी त्यांच्यावरच पडली - अशी उदाहरणं पहाण्यात आहेत. थोडक्यात आई-बाबांना हौस असेल तर नक्कि विचार करावा. आफ्टरआॅल डाॅग इज मॅन्स बेस्ट फ्रेंड... (सिंगल फॅमिली होम, फेंस्ड बॅकयार्ड या मिनीमम गरजा आहेत)

>>तुम्ही अगदी कट्टर पेट लव्हर होता आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनां "तुम्हीही घ्या, मग बघा मज्जा (डोळा मारा)" असं सुचवत असतात. <<

हो, अगदि ॲम्वेवाल्यांसारखं... Happy

सॉरी, मांजराबद्दल लिहिलं. मांजरापेक्षा कुत्रा बरा वाटतो मला. पण तरीही पेट्सना सध्यातरी जागा नाही आमच्या आयुष्यात. मुलांनी मोठं होऊन आपली घरं थाटल्यावर घ्यावं जे हवं ते.

कुत्र्याला दोनवेळा फिरायला न्या, आंघोळ घाला, इतर स्वच्छता अशी बरीच कामं वाढतात आणि राज यांनी लिहिलं तसं ती पालकांच्याच गळ्यात पडतात. मांजरींच्या बाबतीत त्यांना २-३ वेळा खायला घालणे आणि ओकेजनल आंघोळ घालणे एवढंच. शिष्ट मांजर असेल तर ती घरात कुणा एकाशीच मैत्री करते आणि चाटाबिटायला तर अजिबात येत नाही Happy

पेट डॉग हा काय प्रकार असतो?
( आणि ते मराठीत जरा लिहिलं असतं तर बर न्हवतं का?).
कुत्रा घेतलयावर आणि पाळलयावरच पाळीव होतो व म्हणू शकतो. Wink

आता, मूळ प्रश्ण, पेट डॉग घ्यावा? हा खूपच खाजगी प्रश्ण आहे व म्हणूनच चुकीचा आहे. हे म्हणजे , मी लग्न करावे का? असा आहे. Wink आणि इतरांचे लग्नाचे अनुभव एकून लग्न करण्यासारखे आहे. Proud

लोकांना विचारून तुम्ही कुत्रा पाळणार की नाही ठरवणार? कमाल आहे. इथे तर आधीच तुमचे मीठ अळणी आहे... तेव्हा...

एक वेळ , कुठला कुत्रा घ्यावा हा प्रश्ण ठिक आहे. आणि तुमची आवड सांगितली(रंग, कौंटूबिक गरज) तर सुचवणे ठिक.

दोन्ही जमातीला पुर्ण मान देवून ( सुज्ञास न सांगणे), ह्यात पुर्ण आवड, प्रेम, बांधिलकी आणि त्याग सर्व येतं. हो कुत्रा हा एक कुटुंबाचा भाग असतो/होतो.

त्याला ते प्रेम,वेळ नाही दिले तर तो हिंसक होवु शकतो. बराच वेळ हि द्यावा लागतो ह्या नात्याला. (म्हणून लग्नाबरोबर तुलना आहे.) Happy

-एक भूभूमालकिण आणि प्रेमी.

ह्याआधी एकदा एका कार्निव्हल मधल्या कुठल्याशा गेम मध्ये अनपेक्षीतपणे जिंकलेला एक गोल्डफिश नामक मासा घरी आणला गेला. तेव्हा यथाशक्ती त्याचं सगळं कौतुक केलं पण आतापर्यंत ऐकीवात असलेल्या प्रत्येक स्टोरी प्रमाणे एक दिवशी तो मासा स्वर्गवासी झाला. हे असे मासे फार्शे हेल्दिली ब्रीड केलेले नसतातच वगैरे ऐकलं तरी आपल्या हातून एक जीव मारला गेला ह्याचा कायमचा सल मनात आहे कितीही नाही म्हंटलं तरी. आणि मी काय डास, माश्या, झुरळं मारली नाहीत असं नाही (अर्थात उपद्रव करणार्‍यांनां मारण्यात मला तेव्हढा गिल्ट येत नाही ) पण हा पाहुणा आम्ही स्वतः घरी आणला होता तेव्हा त्याचं खूप वाईट वाटलं.

राज, तुम्ही म्हणतात तसं ह्या मोहात पडून कुत्रा घरी येईल आणि मग तो आल्यावर घरचे दोन्हीं पुरूष (नवरा आणि लेक) स्वतःला गरज नसेल तेव्हा हात झटकून मोकळे होतील आणि सर्व जबाबदारी माझ्या गळ्यात पडेल अशी मला सार्थ किंवा अनाठायी स्त्रीवादी शंकाही आहे!

>>सर्व जबाबदारी माझ्या गळ्यात पडेल अशी मला सार्थ किंवा अनाठायी स्त्रीवादी शंकाही आहे!<<

अहो आमच्याकडे तर ३ (पुरुष) विरुद्ध १ (स्त्री) असं बहुमत असुनहि स्त्रीशक्तीने आमचा कुत्रा पाळायचा ठराव हाणुन पाडला... Happy

झंपी, तुमच्या टू सेन्ट्स बद्दल धन्यवाद!

मी एव्हिडन्स /डेटा बेस्ड डिसीजन घेण्याकरता हा थ्रेड चालू केला आहे, मला स्वतःला निर्णय घेता येत नाही म्हणून.

मराठीत लिहीताना लिंगनिरपेक्ष "कुत्रं" असं लिहावं लागतं ज्याला माझ्या मताप्रमाणे निगेटिव्ह कॉनॉटेशन आहे म्हणून डॉग लिहीलं. आणि मी तर ह्यातली पूर्णपणे अज्ञानी व्यक्ती तेव्हा ज्ञानकण मिळवण्यासाठीच ही उठाठेव.

परत एकदा तुमच्या टू सेन्ट्स करता (किंवा तुम्हाला पसंत असेल तर "दोन पैशाकरता" असं म्हणते) धन्यवाद!

कुठलीही दीर्घकालीन जबाबदारी घेण्यापूर्वी ती अल्पकाळ कबूलीवर करून बघावी. इथे ४०० लोकांनी आण पाळीव कुत्रे सांगितले तरी शेवटी ते प्रकारण तुलाच झेलाव लागणार. एखादे कुत्रे जरा दिवस "फोस्टर केयर" साठी आणून बघणे हा सर्वोत्तम मार्ग. १०० दिवस एखादी गोष्ट झेपली तरच तिला कमिट व्हावे.

सशल, तू ओळखीची मंडळी बाहेर जातील तेव्हा हवंतर दोनेक दिवसांकरता त्यांच्या कुत्र्याची जबाबदारी घेऊन बघ. असं कमीत कमी पाच सहा वेळा म्हणजे तुझ्यासकट घरच्या सगळ्यांना अंदाज येईल आणि ठरवायला सोपं जाईल.

अरे वा, सध्याचा आमच्याही घरी जोर धरलेला विषय. मीही विचार करत होते असा धागा काढावा म्हणुन.
आमच्याकडे मुले आणि त्यांचा बाप कुत्रा हवा म्हणून खूप वर्षे मागे लागली आहेत.माझीच मानसिक तयारी नाहीये !

खूप काम पडेल आणि पूर्ण लाइफ स्टाइल बदलेल असे वाटते नेट वर जेवढे वाचले त्यावरून.
पण मुलं खूप एन्जॉय करतील ,त्यांच्यावर आपण उगीच अन्याय करतोय की काय असं कधी कधी मनात येतं. इतके दिवस तर हा विषय डिस्कशन ला पण नव्हता पण हल्ली जरा थोडा ओपन माइन्ड ने विचार करावा असंही वाटत आहे.
तर जर कुत्रा आणायचा म्हटला तर फर्स्ट टाइम ओनर्स ना काही वॉर्निंग्ज , टिप्स मिळाल्या तर आवडतील वाचायला. कोणते डॉग ब्रीड आणि किती मेन्टेन्स यबद्दल. नेट वर बरीच माहिती आहे पण जरा टू मच घाबरवतात की काय असं वाटतं. ट्रेन करा, पपी ट्रेनिंग , रोज दात घासा काय, दर आठवड्याला कान साफ करा काय ? खरंच इतका मेन्टेनन्स असतो का रिअ‍ॅलिस्टिकली ?

हो, ट्रायल बेसिस वर प्रयोग करून बघणं ही सोपी, जमण्यासारखी आयडिया आहे. (त्याचा "मला" नको तसा उलटा इफेक्ट होऊ नये अशी एक स्वार्थी अपेक्षा ;))

तुम्हाला मनापासून वाटत असेल तरच कुत्रा पाळा. केवळ गुड पॅरेंटिंग म्हणून नको. मुलाचा हट्ट असेल तर सुरवातीला त्याला शेल्टरमधे वॉलेंटियर म्हणून जावू दे. तिथे मदत केल्यावर त्यालाही ही जबाबदारी आपल्याला झेपणार आहे का याचा अंदाज येइल. फॉस्टर फॅमिली म्हणून देखील जबाबदारी घेवून पहावी . तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. कुत्रा अगदी अनकंडीशनल प्रेम करतो पण त्याच बरोबर तुम्हालाही तेवढ्याच जबाबदारीने त्याचे सर्व करावे लागते.

आधी वाटायचं दुसर्‍या मुलाचा विचार केला नाही त्यामुळे त्याचा पेटबाबतीतला हट्ट ग्राह्य धरून न्याय द्यावा का. पण इकडचे (मला माहित असलेले) दोन मुलं असलेले पालकही ह्या द्विधेत अडकलेले दिसत आहेत. तेव्हा हा एका महत्वाचा डेटा पॉइण्ट मला मिळाला.

सशल, तुला बर्‍याच बाबतीत सेम पिंच Happy आमच्याकडे पण ३ विरुद्ध मी एकटी आहे. पण मोठ्या "आम्हीच्च त्याचं सगळं बघू, तू काही करू नकोस " च्या बाता मारत असले तरी कुठेतरी त्यांनाही माहित आहे की अल्टिमेट जबाबदारी माझ्याच गळ्यात येणार आहे त्यामुळे माझ्या संमतीशिवाय काहीही होणे नाही. Happy

मला घरून गोल्ड फिश आणि हॅमस्टर यशस्वीरित्या सांभाळल्याचे दाखले दिले जातात. त्यामुळे डॉग सांभाळायला हे आता रेडीच झालेत असे त्यांना वाटत आहे Happy ट्रायल घेऊन पाहणे ही बरी आयडिया आहे. व्हॉलन्टीयर पण करता येईल का बघते. काही एज रेस्ट्रिक्शन असले तरी मोठ्याला तर नक्कीच करता येईल.

>>आम्हीच्च त्याचं सगळं बघू, तू काही करू नकोस >> ह्यात फसू नका. माझ्या मैत्रिणीकडे सेम डायलॉग्ज घडून कुत्रा आलाय साडेचार वर्षांपूर्वी. आता त्याचं बरंच्सं तीच करते पण प्रेमातही आहे. आधी टोटली अगेन्स्ट होती.

>>मी एव्हिडन्स /डेटा बेस्ड डिसीजन घेण्याकरता हा थ्रेड चालू केला आहे, मला स्वतःला निर्णय घेता येत नाही म्हणून.<<

हेच तर म्हणणं आहे. हा काही शेअर बाजारातील शेअर घेणं नाही आहे डेटा बेस्ड निर्णय घ्यायला. पुन्हा घोळ घालताय. हि पुर्णपणे स्वतःची आवड आणि तयारी आहे मनाची आणि पैशाची. कुत्र्याचे खाणं, निगा, स्वच्छता, त्याचे घर, त्याचे कपडे(हो घालावे लागतात), त्याची खेळणी, त्याची आजारपणं, डॉक्टर्स भेटी सगळं येतं. त्याची अंघोळ, केस विंचरणं, वेळेत नेणं सुसुला/शीला सगळं असतं.

दोन दिवसाचे पाहुणे ठिक आहे हो .. त्यामुळे ते दुसर्‍याचे पाहुणे आणून ठरवणं आणखी धोकादायक. ....
वरती लिहिलेल्या स्पष्ट पोस्टीबद्दल गै. स. नसावा. बाकी तुमची इच्छा. Happy

लोकांचं एकून अशी कुत्रा घेवून आलेली मैत्रीणीने कुत्र्याचे अगदी हाल केलेले बघवत न्हवते. त्याला घरात ठेवून चार तास शॉपिंगला पशार, त्याच्या अंगावर झालेली खरूज(केस न साफ ठेवल्याने) वगैरे वगैरे म्हणून हि कळकळ.

तुम्हाला सगळ्यांनां कदाचित "बदलून" असं दिसेल. पण अनवधानाने हा सार्वजनिक थ्रेड "कॅलिफोर्निया" गृप मध्ये उघडला गेला होता. तो माझ्या मते योग्य अशा गृप मध्ये हलवला आहे.

सुरवातीला त्याला शेल्टरमधे वॉलेंटियर म्हणून जावू दे. >> Biggrin माझ्या एका वहिनीची आठवण झाली. तिने मुलाला स्पष्ट सांगितले - "मला दोनच लिव्हिंग बीइंग्जची काळजी जमणार आहे. तू घरात रहा नायतर कुत्र राहू दे." भाचरू बिचारं पुढे आठ वर्ष गप! आता घेतला आहे त्याने कुत्रा.

झंपी - बरोबर आहे हा मुद्दा, उगीच आपल्या अडाणीपणामुळे किंवा पूर्ण डेडिकेशन देऊ न शकल्यामुळे एखाद्या मुक्या जिवाचे हाल नको व्हायला असंही वाटतं.

झंपी, कळकळ पोचली. दुर्दैवाने हा माझ्याकरता भावनिक निर्णय नाही. फक्त आणि फक्त डोक्याने घ्यायचा निर्णय आहे जो मी केवळ "वेल-इन्फॉर्म्ड् " होऊनच घेऊ शकते.

तसंच आमच्या माणुसकीवर (प्राणीमात्र दयेवर हा योग्य शब्द?) पूर्ण विश्वास आहे. तेव्हा ट्रायल बेसिस वर जरी आणला कुत्रा तरी त्याचे नोइंगली कुठले ही हाल होणार नाहीत ही खबरदारी घेऊ असा विश्वास वाटतो.

सशल, लेकाचा हट्ट म्हणून अजिबात नको घेउस कुत्रं. तुला आणि नवर्‍याला हवा असेल तरच विचार कर.

मला स्वतःला कुत्रं प्राण्याची अतोनात भिती किंवा दहशत म्हटलं तरी चालेल अशी परिस्थिती होती भारतात असताना. पण इथे आल्यावर क्लोज फ्रेंड सर्कल मधली कुत्री पाहून त्यांच्या आसपास वावरून लळा जिव्हाळा उतपन्न झाला आणि चक्क मला पण कुत्रं हवं अशी पार्टी पण बदलली.

पण आधी मुली लहान शिवाय मी आणि नवरा दोघेही अजिबातच वर्क फ्रॉम होम करत नव्हतो त्यात आणखी आफ्टर स्कूल १७६० अ‍ॅक्टिव्हिटीज यामध्ये कुत्र्यासाठी म्हणावा तेवढा वेल नव्हता पण आता दोघी १०+ वयाच्या आहेत. आम्हाला सवड आहे म्हणून आम्ही गेल्या महिन्यात लकी नावाचा २ वर्षाचा लॅब्रेडॉर कुत्रा रेस्क्यू मधून अडॉप्ट केला.

त्याला दिवसातून २ वेळा चालायला नेते नेमाने त्यामुळे माझी लाइफस्टाइल खरच सुधारली आहे. अजून १०० दिवस नाही झाले पण ३०+ झाले Happy

मुली यार्ड साफ करतात काही कुरकुर न करता. कुत्रं जरी आम्हा दोघांना हवं होतं तरी नवर्‍आने मी त्याच्या एकाही कामाला हात लावणार नाही हे आधीच क्लियर केलं होतं.

त्यामुळे माझे २ पैसे असे की पियर प्रेशर म्हणून अजिबात नको आणू कुत्रा. खरोखर तुला मनापासून हवा असेल आणि कामाची तयारी असेल तर नक्की आण. नेट्वर अनेक क्विझ आहेत आपल्याला हवा तसा लो मेंटेन्न्स कुत्रा कोणता हे शोधायसाठी
म्हणजे जास्ती लांब केस वाला नको, हाय एनर्जी नको किंवा आणखी काय काय तुमच्या कंडीशन्स अस्तील त्याप्रमाणे शोधायला

आणि हो मी त्याला क्रेटमध्ये ठेउन ४-५ तास रोज ऑफीसला येते. क्रेट्मध्ये ठेवण्यापूर्वी त्याला सू/शी करायला बाहेर नेउन आणते.
कुत्रा आणला म्हणजे आपण अजिबात कामासाठी किंवा शॉपिंगसाठी ४-५ तास बाहेर पडू नाही हे प्रॅक्टिकल वाटत नाही अजिबात.

कामाची यादी करायची म्हटली तर रोज सकाळी उठल्यावर आधी त्याला यार्डमध्ये ने (टु टेक केयर ऑफ बिझनेस)
खायला देणे
फिरायला नेणे, तिथे वाटेत त्याने शी केली तर उचलणे
मग घरी येउन मी माझ्॑अं आवरोन निघायच्या आधी त्याला क्रेट्मध्ये टाकणे
घरी गेल्यावर परत एकदा यार्डमध्ये नेणे( मग मी काम करत असताना तो पूर्णवेळ पायाशी बसून असतो)
मग मुली आल्यावर त्याच्याशी फेच खेळतात.
मग मी त्याला परत चालायला नेते.
परत खाणे आणि आपण झोपायच्या आधी त्याला परत यार्डम्ध्ये नेणे फॉर पॉटी

पण पपी घेतलं तर हे पॉटी ट्रेनिंग वेलखाउ होइल थोडं.
ट्रेनिंग इज ऑन गोइंग प्रोसेस म्हणून त्यासाठी रोज ५-१० मिनिटं वेल काढणे.

लॅब ना जस्ती आंघ्ळ घालावी लागत नाही. साधारण महिन्यातून एकदा असं ऐकून आहे. आम्ही परवाच घातली प्रथमच. ग्रुमिंग पण खूप जास्ती नाही करावं लागत

Pages