पेट डॉग घ्यावा?

Submitted by सशल on 29 March, 2016 - 12:24

गेले काही महिने/वर्षं माझा लेक "आपण कुत्रा घेऊ या ना"! असा हट्ट करत आहे. बरेच दिवस ठामपणे "आम्हांला हे जमायचं नाही. तू मोठा झालास की तुझ्या घरी आण हवे तेव्हढे पेट्स" असं उत्तर देऊन त्याला निकालात काढला. आता आजूबाजूचे, माहितीतले, चांगल्या परिचयाचे बरेच लोक घरी कुत्रे आणत आहेत तेव्हा पीअर प्रेशर बिल्ड-अप होत आहे.

आम्ही मुंबईचे; जिकडे माणसांनांच पुरेशी जागा नाही अशा बॅकग्राउंडचे तेव्हा पपी/पेट्स नां आमच्या वैचारीक जगात महत्वाचं स्थान नाही. दोघंही आळशी आणि ही तर स्वतःला नको असलेली जबाबदारी (आर्थिक + भावनिक). तेव्हा केवळ गुड पॅरेन्टींग म्हणून ह्या फंदात पडावं की नाही ह्याचा खूप विचार करते आहे.

आज बेकरीत विषय निघाला तिकडे धनश्री ने काही माहिती दिली. अजूनही ज्यांनां ज्यांनां ह्या विचार मंथनात सहभागी व्हावेसे वाटते त्यांनीं प्लीज इकडे लिहा. मला खूप उपयोग होईल निर्णय घेण्याकरता. मी माझ्या मनातले कन्सर्न्स इकडे लिहीतेच वेळ मिळताच.

ही धनश्री ने दिलेली माहिती:

"माझी डेझी गोल्डन रिट्रीव्हर आहे. आता ती ४ महिन्यांची आहे. आम्ही तिला ७ वीकची असताना आणली. नुसता लोकरीचा गुंडा होता. स्मित पण आता छान रूळली आहे. शांत आहे. खूप माया लावते.

सध्या तिचे शॉट्स + फूड + ट्रीट्स इ. बेसिक गोष्टी साधारण महिना $१०० च्या आत होतात. पण आम्ही तिला ट्रेनर आणि डे केअर लावलं आहे सोशलायझेशन साठी. त्याचा खर्च जास्त आहे. साधारण $१०० पर अवर ट्रेनर आणि दिवसाला $२५-३० च्या रेंजमधे डे केअर. you will find tons of options for dog care/ dog sitter depending upon area. again there is diff in care takers with special training vs general someone walking a dog. We are also exploring this new world. स्मित

कमिटमेंट जोरात आहे पण. १२-१५ वर्ष बांधली जातात. मला हे पचवणं अवघड होतं. दुसरं मूल झाल्यासारखं वाटलं पण फक्त १ महिनाच. स्मित आता मी परत नॉर्मल रूटिनवर येतेय."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉलेजमधे असताना मी एक कुत्रा आणला होता.आईवेगळे पोर म्हणून माझ्या आईने बराच लाडवून ठेवला.होताही तिरसट(ही हिस्ट्री नंतर कळली).आई-पपांना सोडून घरातल्या सर्वजणांना चावायचा.त्यावेळी त्याचे ट्रेनिंग वगैरे लक्षात आले नाही.थोड्याच दिवसात तो आईच्या गळ्यात पडला.तो ज्यावेळी मेला त्यावेळी आमची ताकद नव्हतीत्याला खुर्चीखालून काढायची.

कुत्रा पाळायची हौसच मरून गेली होती.पण माझ्या भावाने नंतर एक कुत्री पाळली.इतकी गरीब आहे की दादा, तिचे तोंड उघडून ड्रॉप्स वगैरे घालायचा.आधीच्या कुत्र्याबाबत असं करायला गेला असता तर चांगलाच फाफसला गेला असता.त्या कुत्रीमुळे (तो तिला आपली मुलगी म्हणूनच ट्रीट करायचा)

पण कुत्रा पाळायचा असेल तर पूर्ण त्याची काळजी ,जबाबदारी घेत असेल तरच घ्यावा.मामाच्या कुत्रीचा लाडिकपणा पाहून माझा मुलगा, कुत्रं पाळूया म्हणून पाठी लागला होता.त्यावेळी मी म्हटलं की तुला पाळला तितका बस झाले.त्यावेळी केलेली चूक होती ,पण बंद घरात कुत्रा घाबरतो.रडतो त्यामुळे आणि इतरही काही गोष्टींमुळे ते शक्य झाले नाही.

मैत्रेयीने डे केअर बद्दल विचारले होते. आम्ही दोघे दिवसभर बाहेर, घरून काम केलं तरी मिटिंग्स असतात. मुलगी ३-३:३० पर्यंत शाळेत. दिवसा डॉग बरोबर खेळण्यासाठी आम्हाला खूप वेळ नाही मिळत. डॉग पण केवळ आपल्या बरोबर बोअर होऊ शकतात. डिपेंडिग ऑन ब्रीड त्यांची व्यायामाची गरज पण वेगळी असते. डे केअर मधे त्यांच्या बरोबरीने पळापळ करणारं, वस्तू शेअर करणारं कुणीतरी भेटतं. अगदी रोज नाही तरी २ दिवस का होईना ही इंटरअ‍ॅक्शन असावी असा विचार करून आम्ही सुरू केलं. डेझीला भयंकर आवडतं तिचं स्कुल.

आम्ही जेव्हा ट्रिपला जाऊ तेव्हा याच ठिकाणी ती बोर्ड करेल, त्यामुळे तिथल्या माणसांची, परिसराची तिला चांगली ओळख झाली आहे. आम्ही पण ट्रिपला निश्चिंत जाऊ.

>> आम्ही जेव्हा ट्रिपला जाऊ तेव्हा याच ठिकाणी ती बोर्ड करेल, त्यामुळे तिथल्या माणसांची, परिसराची तिला चांगली ओळख झाली आहे. आम्ही पण ट्रिपला निश्चिंत जाऊ.

ह्याबाबतीत मला अजून एक कन्सर्न आहे.

बाकी बर्‍याचशा बाबतीत "कुत्रा आमचा फॅमिली मेम्बर, कुत्रा माझा भाऊ/बहिण , माझा/झी लेक पण अर्थातच हा फॅक्ट कधीच बदलणार नाही की कुत्रा शेवटी एक प्राणी आहे आणि माणसांच्या जगात त्याचे स्थान दुय्यम्/लिमीटेड आहे. मग ह्युमन फॅमिली मेम्बर्स ना ट्रिप्स / व्हेकेशन आणि या मुक्या, अ‍ॅनिमल फॅमिली मेंबर ला तेव्हढ्यापुरतं दुसर्‍यांकडे सोपवणं खटकत नाही का?

ह्याचं सोपं उत्तर मला कळतं की these are facts of life. काही गोष्टींत जसं आपण मुलांनां, आपल्या वृद्ध आई-बाबांनां इन्क्ल्युड नाही करत, तसंच हे, वगैरे! पण मला ही तफावत विचित्र वाटते.

किंवा मग मी आमच्या एका फॅमिली फ्रेण्ड कडे बघितलं तसं ते शक्यतो पेटफ्रेण्डली डेस्टिनेशन्स च सिलेक्ट करतात व्हेकेशन करता. आणि आता इन्डियाला जाताना मात्र दुसरीकडे सोय करतील.

सशल, ड्राइव्ह करून व्हेकेशनला गेलात तर नेता येतं की कुत्र्याला. विमानप्रवास त्यांच्यासाठी भयंकर टॉर्चर असतो त्यापेक्षा धनश्रीनं सुचवलेला त्यांना ओळखीच्या डे-केयरमध्ये ठेवायचा पर्याय चांगला आहे.

रच्याकने, पेट्स रोजच व्हेकेशनवर असल्यासारखे राहातात की. त्यांना कुठे पाट्या टाकाव्या लागतात?

सशल - हा थोडा कंडिशनिंगचा भाग आहे असं मला वाटतं. हो कुत्र्याला फॅमिली मेंबर प्रमाणे वाढवावं पण तो एक प्राणी आहे हे विसरून चालणार नाही. काही दिवसांसाठी असं सोडून जाणं हे आपल्याला जड जातंच. पण कुत्र्यांसाठी देखील अचानक फॅमिलीपासून लांब राहणं अवघड असतं. त्यामुळे ग्रॅज्युअली सवय करणं गरजेचं आहे. भारतवारी च्या आधी काही दिवस डे केअर, मग एक रात्र, मग ३-४ रात्री असं करत महिन्याभराचं बोर्डिंग करावं.

बाकीच्या ठिकाणचं मला माहित नाही पण अमेरिकेत माझ्या गावी मी जी जी डॉग बोर्डिंग ठिकाणं पाहीली आहेत तिथे कुत्र्यांची उत्तम सोय असते. त्यांच्या शारिरीक, मानसिक गरजा, व्यायाम, औषधे इ. कडे नीट लक्ष असते. सांभाळ करणारे देखील आवड आणि त्याबाबत शिक्षण घेऊन यात पडलेले असतात.
लहान मुलांच्या बाबत, तान्हे असताना दिवसभर डे केअरला सोडणं जसं इमोशनली अवघड असतं तसंच हे पण आहे. पण इम्पॉसिबल नाही.

सध्या आम्ही पण ह्याच बोटीत. लेक तर मागे लागलीच आहे. आम्हाला पण आवडत पण सध्या अजुन जबाबदारी घेण्याची हिम्मत नाहिये. विचार सुरु आहे पण १ वर्ष तरी जाईल निर्णय घ्यायला.

माझ्या लेकीला पण हवा होतं कुत्रं किंवा मांजर..नवर्‍याने आधी दोन पॅराकीट्स आणून दिले. सुरुवातीचे काही दिवस लेक सारखी त्यांच्या मागे..आता दाणे टाकणे, पाणी बदलणे , सगळीकडे असलेला पिसांचा कचरा उचलणे अशी अनेक कामं माझी.. शिवाय हे चिमुरडे असतात पण भयानक कचरा करतात. पिंजर्‍यातून काढले की त्यांना फॅन वर बसायला आवडतं. मग खाली घाण जी मी स्वच्छ करते..
सारांश , छोट्या पक्षांना इतका वेळ द्यावा लागतो तर कुत्र्यासारख्या फॅमिली मेंबर असलेल्याला किती वेळ लागत असेल हा अंदाज आला, आणि मी कुत्रा नको म्हणून ठरव्ले..
ओळखीच्या घरी २ कुत्रे आहेत. त्यांचा म्हणे मूड नसला तर त्यांना स्वतःच्या हाताने भरवावे लागते म्हणे....

आमच्या ओळखीत एक जोडपे, 'एकावेळी एकच ... नवरा किंवा बायको भारतात जातात'. कुत्र्यासाठी असे करतात.
दुसर्‍या एका घरात... मालक कुत्र्याला सोडून भारतात गेले. आणि दोन दिवसानी परत यावे लागले. कारण 'कुत्र्याने खाणे / पिणे बंद केले...

कुत्रा घ्यावा की नको ह्या अगर-मगर की डगरपर किती वेळ काढशील सशल? Proud डिसिजन मेकिंग ह्या पेसनं होत राहिलं तर तिकडे तुझा लेक कॉलेजाला जायला लागून, अपार्टमेंटात वेगळा राहून, स्वतःचा कुत्रा घेऊन पार होईल!

शुगोल, तुम्ही मुलांना दिलेला ऑप्शन आवडला. Happy

स्वतःला जर कुत्रा आवडत नसेल आणि केवळ मुलांसाठी जर कुत्रा घेणार असाल तर काही गोष्टींची तयारी हवी.

१. सगळी जबाबदारी तुमच्यावर पडण्याची खूपशी शक्यता.
२. मुलं जशी मोठी होत जातात तशा त्यांच्या इतर अ‍ॅक्टीव्हीटीज वाढत जातात आणि पेट्कडे लक्ष फक्त वेळ असेल तर थोड्यावेळ खेळण्यात घालवला जातो.
३. नंतर मुलं शाळेत/कॉलेजमध्ये गेल्यावर सगळी जबाबदारी तुमच्यावर पडते.
४. ३-४ तासापेक्षा कुत्र्याला एकटं सोडून जाणं हे योग्य नाही.
५. मुलांना हवं म्हणून प्रत्येक हट्ट काही आपण पुरवत नाही.
६. मुलं एकदा हायस्कूलला गेली की बहुतकरून पेटचा आग्रह धरत नाहीत. त्यांना वेळच नसतो.

मेडिकल इन्श्युरन्स घ्यावाच. प्युअर ब्रीड्साठी तरी मस्ट. जनरल चेक अप कव्हर करत नाही पण आजारी पडले तर उपयोग होतो. वर महिन्याच्या खर्चात मी हा पण धरला आहे.

माझ्या एका मैत्रिणीकडे दोन कासवे आहेत. घरात फिरत राहातात म्हणे. अन गॅलरीत मोठी जाळी घातली आहे व त्यात रंगीबेरंगी पक्षी. ते दोघे सकाळी पक्ष्यांना दाणापाणी अन कासवालाही खायला घालतात/ ठेवतात आणि दहाला कामावर जाऊन ६ ला परत येतात.

मागे सोनेरी मासेही होते तिच्याकडे. एक मेला, मग दुसरा कुणालातरी दिला पाळायला. Happy शिवाय बिल्डिंगच्या खाली जी भटकी कुत्री असतेत, तेही आवडतात दोघांना, नोकरीमु़ळे पाळू शकत नाहीत, तर येता-जाता त्यांचे लाड करतात.

माझ्या एका मैत्रिणीकडे दोन कासवे आहेत. घरात फिरत राहातात म्हणे. >>>

हो तर. हळु हळु पण सगळीकडे संचार चालु असतो. माझ्याकडे छोटुसा अगदी कॉइन साइझचा होता. (तो नंतरही फार मोठा होत नाही....फार तर तळव्याच्या आकाराचा).

तो छोटुसा असताना त्याच्या टबमधुन बाहेर पडुन फिरायला गेला आणि सगळे १५०० स्क्वे. फीट सोडुन मेन डोअरच्याजवळ शु रॅकजवळ येवुन थांबला. त्याचा बाबा घरात शिरताना माझं लक्ष गेलं तेव्हा I lost my heartbeats. एवढा मोठा राक्षसी पाय, ते ही शुज घातालेला त्याच्यावर पडला असता तर ...... पेट्स आणले कि बाळासारखे सांभाळावे लागतात. बिचारे फार उद्योगी असतात. आपल्यालाच केअरफुल रहावं लागतं.

वाघ घ्यायचे बघा.

हात साफ करुन घ्यायचे असेल तर छोट्या कार वर न करता मोठ्या कारवर करून घ्यायचे असते या नियमानुसार छोटा कुत्रा पाळण्यापेक्षा 'वाघ' पाळता येतो का बघा. तेवढी कॉलर टाईट राहील Happy

Hya dhagyachya timing la tod nahi! Sampurna vachun kadhla, ani marathitun typenyapeksha patkan minglish madhun lihitoy, hyala karan pan tasach aahe. Amchya kade hich laat ali aahe. Mulga, vay varsha 11 ani mulgi vay varsh 4 (tila hyatla farsa kalat nahi), ani arthat home minister hyanni ghat ghatlaay. Amchya baykoo kade purvi asankhya manjari (gavthi/deshi) asaychya, ani ek apla deshi kutra dekhil thevla hota kityek varsh. Tyamule prani prem tichyakadun aalay.

Ya adhi, amhi amchya flat madhye manjari palalya. Pan boke thode mothe zhale ki palun jatat. Tyamule to naad sodun dila. Kharatar flat madhye (me punyaat rahato), kutra palane mala manya nahi, karan mala watat ki tyache haal hovu shaktat. Aata mulga "me sagla karin.." asa mhantoy pan to utsaha nakkich mavalnar aahe he mahiti ahe.....

Mala vyaktisha prani awadtat; manajranchya pillana anghol vaigere mich ghalaycho. Pan kutryacha anubhav nahi. Ani kutryache pillu; mazhya matane tari ek navin baby ghari ananya sarkha aahe. Karan te nidaan 6 mahinanyacha hoyistovar tyanna farsa bladder control nasto..ani baryach goshti jase chavne, bhukne, hyacha training dyava lagta..socialization cha dekhil angle aahe...itar kutryan sobat kase interact kartat vaigere...

Shevti aata hya athavdyaat, ek male lab pillu anaaycha tharlaay. Aata hya pudhe nakki kaay ani kasa jamtay te update takat rahin.

Pan, aplya lifestyle madhye baddal he nakki karave lagnar he nischit aahe.....baghuya aata....

आम्ही झक मारली आणि मांजर पाळली असे झाले आहे. कुठे गावाला दोन दिवस जाता येत नाही. मांजरे गाडीत घालूनही नेता येत नाहीत. ( नेता येत असतील तर कृपया मार्गदर्शन करावे ) घरात कोंडून ठेवता येत नाहीत. सुदैवाने शी शू ला बाहेर जाण्याचीच सवय आहे. तसेच मांजरास औषध कसे पाजावे ते सांगावे. शांतपणे व्हेटकडे नेता येत नाही. तिला पिल्ले झाली ती तीन महिने सांभाळली शेवटी पैसे देऊन एका प्राणि मित्राला दिली . मांजरीचा आक्रोश आठवून अजूनही गलबलून येते. शेवटी तिचे ऑपरेशन करून घेतले.त्याबद्दलही अपराधी वाटते. त्यापेक्षा नकोच ते.

आमच्याकडेही बर्‍याच काळापासून कुत्रा आणायचा तगादा चालू आहे. बायकोला लहानपणापासून घरात कुत्रा पाळलेला असण्याचा अनुभव (आणि आवडही) आहे. मलाही आवड* आहे पण तरीही इतके व्यग्र वेळापत्रक असताना नको वाटते. शिवाय जास्तीच्या खर्चात भर हा मुद्दाही सध्या आम्हाला विचारात घेणे आवश्यक आहे. लवकरच मांजर आणणार आहोत. मांजर पाळणे तुलनेत सोपे वाटते (भारतात).

* आमच्याकडे लहानपणी एक मोत्या होता. एकदा शेजारच्या गावी नातेवाईकांच्या लग्नाला आम्ही सगळे त्यालाही घेऊन गेलो. त्या गावातल्या कुत्र्यांनी त्याला अजिबात जवळ केले नाही. तो बिचारा त्रस्त झाला. त्या दिवशी तो तिथे हरवला तो आम्हाला नंतर कधीही दिसला नाही. Sad नंतर मी दोन-तिनदा कुत्रा पाळायचा प्रयत्न केला पण एकही तगला नाही.

गजाभाऊ मांजर पाळल्यावर दोन दिवसापेक्षा जास्त दिवस सगळ्याना कुठे बाहेर जाता येत नाही ही मोठी अडचण आहे....

गजाभाऊ, शेजार्‍यांना पण आपल्या मांजराची सवय करवून द्यावी. म्हणजे गावाला गेले की शेजारी सांभाळू शकतात Happy

शेजार्‍यांना पण आपल्या मांजराची सवय करवून द्यावी >>> +१

आमच्या भारतातल्या घराला पुढे-मागे व्हरांडा आहे. मांजरी तिथे येऊन-जाउन असतात. शेजारच्या काकू त्यांना २-३ वेळा जेवू घालतात. शहरांमध्ये पेट-हॉस्टेल/डेकेयर्स सुरू झालेली बघितली. माझ्या बहिणीचं कुत्र अशा एका ठिकाणी ठेवतात नेहमी .

टण्या, एग्झॅक्टली. भारतात तरी आजवरच्या मार्जारपालनाचा अनुभव असा आहे की मांजरं ही आपल्या शेजार्‍यांकडेही (आपण विशेष प्रयत्न न करताही) बर्‍यापैकी येऊन जाऊन असतात. मांजरांना एका ठराविक काळानंतर भुभूप्रमाणे बांधून घालावे लागत नाही. शेजार्‍यांना कल्पना देऊन ठेवले की फारसे अडत नाही.

दुसरे, पिल्लांच्या बाबतीतही ती लहान असतात तोवरच त्यांचे खाणे पिणे बघायला लागते, नंतर मोठी झाल्यावर ती आपोआपच एकेक करून आपापला मार्ग शोधतात. क्वचितच एखादे उपवर/वधू होईपर्यंत रेंगाळतात. Wink

(हे अनुभव भारतातले आहेत.)

म्हणून फारशी अडचण येईल असे वाटत नाही.

सशल, निर्णय झाला की नाही अजून?
जरा अवांतर पण इथेच लिहीते.
मी विकांताला मैत्रिण वर बराच वेळ वाचन केलं. गेल्या वर्षभरात तिथे भरपूर माहितीचा संग्रह झालाय. तिथला पेट बद्दल धागा खूप चांगला आहे. बर्‍याच जणींनी फायदे, तोटे, जबाबदारी याबद्दल चर्चा केलीये. सकारात्मक पद्धतीने चर्चा झालीये. इथे उगीच नकारार्थी सूरच जास्त आहे. कोणतीही जबाबदारी घेण्यापूर्वी विचार केलाच पाहिजे. पण दोन्ही बाजू नीट समजून घ्याव्यात. शेवटी निर्णय हा त्या त्या कुटुंबाचा असतो आणि अंमलबजावणी सुद्धा घरातल्या सर्वांनी मिळून करायची असते.

तुला काही प्रश्न असतील तर विपूत विचार.

Pages