पेट डॉग घ्यावा?

Submitted by सशल on 29 March, 2016 - 12:24

गेले काही महिने/वर्षं माझा लेक "आपण कुत्रा घेऊ या ना"! असा हट्ट करत आहे. बरेच दिवस ठामपणे "आम्हांला हे जमायचं नाही. तू मोठा झालास की तुझ्या घरी आण हवे तेव्हढे पेट्स" असं उत्तर देऊन त्याला निकालात काढला. आता आजूबाजूचे, माहितीतले, चांगल्या परिचयाचे बरेच लोक घरी कुत्रे आणत आहेत तेव्हा पीअर प्रेशर बिल्ड-अप होत आहे.

आम्ही मुंबईचे; जिकडे माणसांनांच पुरेशी जागा नाही अशा बॅकग्राउंडचे तेव्हा पपी/पेट्स नां आमच्या वैचारीक जगात महत्वाचं स्थान नाही. दोघंही आळशी आणि ही तर स्वतःला नको असलेली जबाबदारी (आर्थिक + भावनिक). तेव्हा केवळ गुड पॅरेन्टींग म्हणून ह्या फंदात पडावं की नाही ह्याचा खूप विचार करते आहे.

आज बेकरीत विषय निघाला तिकडे धनश्री ने काही माहिती दिली. अजूनही ज्यांनां ज्यांनां ह्या विचार मंथनात सहभागी व्हावेसे वाटते त्यांनीं प्लीज इकडे लिहा. मला खूप उपयोग होईल निर्णय घेण्याकरता. मी माझ्या मनातले कन्सर्न्स इकडे लिहीतेच वेळ मिळताच.

ही धनश्री ने दिलेली माहिती:

"माझी डेझी गोल्डन रिट्रीव्हर आहे. आता ती ४ महिन्यांची आहे. आम्ही तिला ७ वीकची असताना आणली. नुसता लोकरीचा गुंडा होता. स्मित पण आता छान रूळली आहे. शांत आहे. खूप माया लावते.

सध्या तिचे शॉट्स + फूड + ट्रीट्स इ. बेसिक गोष्टी साधारण महिना $१०० च्या आत होतात. पण आम्ही तिला ट्रेनर आणि डे केअर लावलं आहे सोशलायझेशन साठी. त्याचा खर्च जास्त आहे. साधारण $१०० पर अवर ट्रेनर आणि दिवसाला $२५-३० च्या रेंजमधे डे केअर. you will find tons of options for dog care/ dog sitter depending upon area. again there is diff in care takers with special training vs general someone walking a dog. We are also exploring this new world. स्मित

कमिटमेंट जोरात आहे पण. १२-१५ वर्ष बांधली जातात. मला हे पचवणं अवघड होतं. दुसरं मूल झाल्यासारखं वाटलं पण फक्त १ महिनाच. स्मित आता मी परत नॉर्मल रूटिनवर येतेय."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लॅब्राडूडल (लॅब्रडोर आणि पूडल मिक्स), पूडल, गोल्डन डूडल (गोल्डन रीट्रीवर आणि पूडल मिक्स) ही ब्रीडस शेड करत नाहीत. किंवा अगदी कमी प्रमाणात शेड करतात.
एक दोन दिवसात सविस्तर लिहीते. पण केवळ मुलाची हौस म्हणून त्या मुक्या प्राण्याला घरात आणू नका. कुत्रा घरात आला की त्याला घरातल्या एखाद्या सदस्या प्रमाणेच वागवा. जर हे होणार नसेल किंवा अवघड वाटत असेल तर (आणि यात काहीही चुकीचं नाही, प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन आहे) कुत्रा आणणं हा निर्णय burden वाटू शकतो.

पेटची मुख्य करुन कुत्र पाळायची मला भयंकर इच्छा आहे. मुले पण अधुनमधुन मागे लागतात. पण घरी आई व नेहा दोघींचा बिग नो नो आहे. सक्खी मावशी कुत्रं चाऊन मेल्यामुळे आईला धास्ती आहे. नेहाने तर कुत्र असेल किंवा मी असाच पर्याय ठेवल्याने शक्यच नाही. Happy मुल आगावपणे मग तू कुठे रहाणार असे म्हणतात. Proud असो. पण विषय एंड आहे. त्यात पाळीव प्राणी म्हणजे एक प्रकारची बांधीलकी येतेच. तेव्हा निवृत्तीनंतर बघु.

पेटची मुख्य करुन कुत्र पाळायची मला भयंकर इच्छा आहे.<< ++१
त्याला वेळ देता येणे सध्या तरी मला शक्य नाही, सध्या २ देशी बोके आहेत .

पा़ळीव कुत्रा बाळगावा आवड असल्यास. मी अजून १२ वरषांनी जिवंत राहिल्यास घेणार आहे एक पिल्लू संभाळायला - लहानपणी १०-१२ वर्षे भटका कुत्रा आमच्या दारात कायम बसायचा, एकदम वाघावाणी होता. पण निरूपद्रवी. काही करायचा नाही कुणाला, तरी नवीन लोक घाबरायचे. घरात आला नाही मोती कधी. पूर्ण गल्ली त्याला तुकडा घालायची. गेला ही आमच्या अंगणात, छोट्या मावसभावाच्या हाताने कोर भाकर खाऊन.

कुत्रा - मांजराचं माहीत नाही पण

मांजरं सहसा टीनएज मुलींसारखी वागतात. काही हवं असेल तेव्हा लाडात येतात. पाहुणे आले की कुठल्यातरी एका खोलीत गायब होतात. आपणच सगळं वेळच्यावेळी, यांच्या मनासारखं केलं तरी तोरा आहेच.>>>
हे जे काही टीनेज मुलींबद्दल लिहिलं आहे त्याला हजारो अनुमोदनं. एकदम परफेक्ट सिंडरेला. मी अनुभव घेतच आहे सध्या. Happy

माबोवर टाकली नसेल कदाचित मी... माबोवर मी लिहीलेले कुणी वाचत नाही ना,, म्हणून
आता एक कारण मिळालं तेव्हा टाकून दिली... Happy

गोगा, आम्ही परत वाचू. Happy

पण मायबोलीवर नाही तर मग डायरेक्टली पुस्तकात टाकता की उभ्या उभ्या?

पेट डॉग घ्यावा? >>>> हा काय प्रश्न झाला? घ्यावा. घ्यावाच. प्रत्येक घरात एक पेट आणि त्यातही डॉग असायला हवाच. २० ठाम कारणं, जी मी स्वानुभवातुन अगादी १००% खरी आहेत असं सांगते -

Copied from Facebook -

1) You can say a foolish thing to a dog, and the dog will give you a look that says 'Wow, you are
right, I never would have thought of that'

2) A dog is the only thing on the earth that loves you more than himself

3) Whoever said Diamonds are a girl's best friend, never owned a dog.

4) Not every person knows, how to love a Dog. But every dog knows how to love a person

5) what a beautiful world it would be, if every one had a heard like a dog.

6) Everyone thinks they have a best dog. And believe me, none of them are wrong.

7) The best therapy to your mental health is 'Fur & Four legs'

8) Dogs do speak, but only to those who know how to listen.

9) Some of our greatest treasures we place in museum. Others we take for walk

10) Old dogs, like old shoes, are comfortable. They might be a bit out of shape and a little worn
around the edges, but they fit well.

11) Dogs are wise. They crawl away into a a quiet corner and lick their wounds and do not
rejoin the world until they are whole once more.

12) The better i get to know men, the more I find myself loving dogs Proud

13) Dogs are better than human beings, because they know but do not tell.

14) Anybody who does not know what soap tastes like, never washed a dog.

15) A dog can't think that much about what he's doing, he just does what feels right.

16) Once you have had a wonderful dog a life without one is life diminished.

17) Dogs don't rationalize. They don't hold anything against a person. They don't see the
outside of a human but the inside of a human ......
18) The average dog is a nicer person than the average person..

19) You think dogs will not be in heaven? I tell you, they will be there long before any one of us.

20) A dog will teach you unconditional love. If you can have that in your life, things won't be
too bad.

>> घ्यावा. घ्यावाच

Happy

अमेरिकन ड्रीम फॅमिली पिक्चर आता बहुतेक हम दो हमारें एक या दो या तीन या ज्यादा और हामारा एक या दो कुत्ता/कुत्तें असं झालं आहे? म्हणजे मूळच्या अमेरिकन लोकांत तसं ते पुर्वीपासून असावं, मी इकडे रुळलेल्या भारतीय लोकांच्यात असं म्हणायला हवं.

आम्ही पण 'हमारा एक' ला कंपनी म्हणुन डॉग आणला आणि आणतच गेलो. बाकी फिश, टर्टल, हॅमस्टर सगळे आले गेले तरी चालतात, पण एक डॉग हवाच.

माझा एक असा अनुभव शेअर करते ज्यानी माझी ४थी आणि ६ वीतली मुलं पण विचारात पडली होती.

एका अमराठी मैत्रीणीनी ५ महिन्यांचं पपी आण्लं. त्यानंतर सुमारे २-३ महिन्यानी तिच्याकडे जाण्याचा योग आला. फॉलची छान वेदर होती म्हणून मी चहा प्यायला पॅटीओत बसू म्हटले. तिचा नकार. सहजच तिच्या बॅकयार्डाकडे लक्ष गेले. लॉनवर अनेक काळे काळे ठिपके दिसत होते. मी चौकशी केली. तर ते ठिपके म्हणजे कुत्र्याची नं. २ असल्याचं कळलं. मी अवाक! झालं असं होतं की मुलांना हवा म्हणून आणि त्यांनी सगळी कामं करु असं सांगितलं म्हणून कुत्रा आणला. (मुलं ५ वी आणि ७ वी ) मैत्रिणीनी आधीच सांगितलं होतं की ती त्याचं काही करणार नाही.(म्हणून तिनी हायजीनचा देखील विचार केला नाही!) नवर्‍याची फिरती आणि सोयीस्कर टाळाटाळ. त्या कुत्र्याचं फिरणं, खेळणं पण होत नसे. त्याची एनर्जी बाहेर पडत नव्हती. तो घरातल्या वस्तू कुरतडून टाकायचा. म्हणून त्याला घरात न आणता पॅटीओतच ठेवला. तर त्यानी पॅटीओ फर्नीचर, झाडं, लॉनमधले पाण्याचे पाइप सगळं कुरतडून टाकले. माझ्या मुलांना हे सगळं ऐकवलं आणि कुत्रा बघण्याच्या निमीत्तानी त्यांना नेऊन दाखवलं. माझी मुलं तेव्हा ३ री व ६ वी एवढी. त्यांना काय समजलं कोणजाणे पण पुढचे काही दिवस कुत्र्याची मागणी झाली नाही. नंतर होत राहिली पण तोवर त्यांच्या अ‍ॅक्टीव्हीटीज वाढल्या होत्या त्यामुळे त्या मागणीला तेव्हढी धार नव्हती.

मी त्यांना प्रॉमीस केलं होतं की ते मिळवते झाले व दुसरं घर घेऊन राहु लागले की मी त्यांना हवा तो पेट घेऊन देईन.

दोघंही नुकतेच जॉब निमीत्तानी आउट ऑफ स्टेट गेले आहेत. दोघांनाही सध्यातरी पेट नको आहेत कारण त्यांना हवं तसं उंडारता येणार नाही याची जाणीव आली आहे.

त्या मैत्रिणीनी तो कुत्रा लगेचच विकायला काढला. दोन महिने तसेच गेले. मग तिनी कुत्रा आणि वरती $१०० देऊन कुत्र्याची पाठवणी केली.

तेव्हा मुलांची हौस खरी असते. पण त्याबरोबर येणारी कामं, जबाबदार्‍या आणि खर्च यातलं काही समजण्याचं त्यांचं वयच नसतं. त्यामुळे पेट आणणे ही संपूर्णपणे एका व्यक्तिची जबाबदारी आहे. त्यात तुमच्या स्पाउसला सुद्धा गृहीत धरु नका.

सशल, एक फु. स. तू कुठलाही पेट आण, पण तुझी "गणपुलीण" होणार नाही हे बघ. Proud

मग डायरेक्टली पुस्तकात टाकता की उभ्या उभ्या? <<< हा बहुतेक उभ्या उभ्या...
.
पण चुकीच्या किनार्‍याने माझ्यावर अन्याय केला आहे.. मला बोलावलेच नाही.... Angry
..
Proud

शुगोल, विचारात टाकणारा अनुभव आहे. पण मैत्रिण 'अमराठी' होती हे सांगण्यामागे काही कारण आहे का? म्हणजे त्याने खरच काही फरक पडेल का? Happy

पराग, अमराठी हे सांगण्यामागे मूळ उद्देश असा होता की तिनी सांगितलेले मी हिंदीत लिहीले होते. मग विचार बदलून मी मराठीतच लिहीलं. बाकी काही नाही.

माझी एक अमेरिकन मैत्रीण आहे. तिच्याकडच्या पेटची संख्या आणि विविधता अश्क्य कोटीतली आहे. -- एक कुत्रा, दोन मांजरी, तीन कासवं, एक स्नेक, एक इग्वाना, फिश टँक त्यात ८ मासे.घरातले सगळे सगळ्या पेट्ची काळजी घेत असतात.

ते मिळवते झाले व दुसरं घर घेऊन राहु लागले की मी त्यांना हवा तो पेट घेऊन देईन >>>> Happy ते मिळवते झाले की आई-वडिलांना कशाला पेट घेउन द्या म्हणतील? मुळात एका विशिष्ठ वयात पेट असावं अशी तीव्र आस असते. आवड, गोडुले गुंडुले पेट्स अगदी हवेहवेसे वाटतात, इतर मित्र-मैत्रिणींकडे असलेले बघून जे काही कारण असेल ते. तेव्हा ते मागणी करतात तेव्हा जमलं तर आणून द्यावं नाही तर नाही. पण बळंच एखादी गोष्ट करायची नाही म्हणून अनरिअलिस्टिक प्रॉमिसं ठोकू नयेत असं मला वाटतं.

शुगोल सल्ला आवडला. "गणपुलीण" करता महाचीटशीट धारकां कडे साकडं घालायला लागेल असं वाटत आहे. Wink

>> मग तिनी कुत्रा आणि वरती $१०० देऊन कुत्र्याची पाठवणी केली.

फ्रेण्डस मधल्या रेचल ची इनसाईड आऊट कॅट आठवली.

सिंडरेला, "ते मिळवते झाले व दुसरं घर घेऊन राहु लागले की मी त्यांना हवा तो पेट घेऊन देईन" हे अनरिअलिस्टीक प्रॉमिस असं का वाटतं? म्हणजे मुलांची आई खरंच घेऊन देईल, पण मुलांनां ते हवं असेल किंवा नको हा वेगळा मुद्दा असेल ना.

एकूण कुत्रं आणायचं तर त्याची सगळी जबाबदारी माझ्यावरच असणार हे समजून घेऊनच विचार करायला हवा असं दिसत आहे.

पण ते कमवते अन स्वतंत्र झाल्यावर हम हमारा लेंगे, तुम तुम्हारा देखो म्हणाले तर गैर नसावं. Lol
आता तुम्ही जाऊन ते उंडारत असताना त्यांचे पेट्स संभाळणार असाल तर मग ठीके. जर ते आपण करणार नसू तर मग त्यांचं ते निर्णय घेऊ शकतात आणि अर्थातच अफॉर्ड पण करु शकतील. आपण घेऊन द्यायची पण गरज नाही.
सिंडरेला म्हणतेय तसं आत्ता ह्या वयात हौस असते आणि मुख्य म्हणजे आपल्या मदतीची गरज असते. Happy

>>एकूण कुत्रं आणायचं तर त्याची सगळी जबाबदारी माझ्यावरच असणार हे समजून घेऊनच विचार करायला हवा

नाही हे तितकंस खरं नाही. माझ्या केस मध्ये मला पण असंच वाटलं होतं. पण आपण जशी सवय लावू - आपल्याला स्वतःला, मुलांना, आणि आलेल्या पेट ला सुद्धा तशी ती घडतात. मूल लहान असेल - म्हणजे साधारण ५-६ वर्षाच्या आत तर पालकांना पेट चं काम पडू शकतं. पण ७+ वर्षांची मुले काही बेसिक गोष्टींची जबाबदारी नक्कीच घेऊ शकतात. नव्हे तर ती त्यांनीच घ्यावी. जसे घरातली काही कामं आपण त्यांना सांगतो तसे पेट हवे असेल तर त्या मधे पण मुलांच्या कामांचा वाटा असतो.

Pages