पेट डॉग घ्यावा?

Submitted by सशल on 29 March, 2016 - 12:24

गेले काही महिने/वर्षं माझा लेक "आपण कुत्रा घेऊ या ना"! असा हट्ट करत आहे. बरेच दिवस ठामपणे "आम्हांला हे जमायचं नाही. तू मोठा झालास की तुझ्या घरी आण हवे तेव्हढे पेट्स" असं उत्तर देऊन त्याला निकालात काढला. आता आजूबाजूचे, माहितीतले, चांगल्या परिचयाचे बरेच लोक घरी कुत्रे आणत आहेत तेव्हा पीअर प्रेशर बिल्ड-अप होत आहे.

आम्ही मुंबईचे; जिकडे माणसांनांच पुरेशी जागा नाही अशा बॅकग्राउंडचे तेव्हा पपी/पेट्स नां आमच्या वैचारीक जगात महत्वाचं स्थान नाही. दोघंही आळशी आणि ही तर स्वतःला नको असलेली जबाबदारी (आर्थिक + भावनिक). तेव्हा केवळ गुड पॅरेन्टींग म्हणून ह्या फंदात पडावं की नाही ह्याचा खूप विचार करते आहे.

आज बेकरीत विषय निघाला तिकडे धनश्री ने काही माहिती दिली. अजूनही ज्यांनां ज्यांनां ह्या विचार मंथनात सहभागी व्हावेसे वाटते त्यांनीं प्लीज इकडे लिहा. मला खूप उपयोग होईल निर्णय घेण्याकरता. मी माझ्या मनातले कन्सर्न्स इकडे लिहीतेच वेळ मिळताच.

ही धनश्री ने दिलेली माहिती:

"माझी डेझी गोल्डन रिट्रीव्हर आहे. आता ती ४ महिन्यांची आहे. आम्ही तिला ७ वीकची असताना आणली. नुसता लोकरीचा गुंडा होता. स्मित पण आता छान रूळली आहे. शांत आहे. खूप माया लावते.

सध्या तिचे शॉट्स + फूड + ट्रीट्स इ. बेसिक गोष्टी साधारण महिना $१०० च्या आत होतात. पण आम्ही तिला ट्रेनर आणि डे केअर लावलं आहे सोशलायझेशन साठी. त्याचा खर्च जास्त आहे. साधारण $१०० पर अवर ट्रेनर आणि दिवसाला $२५-३० च्या रेंजमधे डे केअर. you will find tons of options for dog care/ dog sitter depending upon area. again there is diff in care takers with special training vs general someone walking a dog. We are also exploring this new world. स्मित

कमिटमेंट जोरात आहे पण. १२-१५ वर्ष बांधली जातात. मला हे पचवणं अवघड होतं. दुसरं मूल झाल्यासारखं वाटलं पण फक्त १ महिनाच. स्मित आता मी परत नॉर्मल रूटिनवर येतेय."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी शूम्पी, पण ऑफिसकरता वगैरे निघताना त्याला क्रेट मध्ये टाकून पूर्ण दिवस किंवा जे काही तास असतील ते असं टिचभर जागेत अडकवणं मला मनापासून पटत नाही.

सायो, म्हणूनच सांगतेय मांजर आण Happy ती स्वतःहूनच घरातल्या एका कोपर्‍यात मुटकुळं करून झोप काढेल मंडळी घराबाहेर पडल्यावर.

बरीच लोकं लहान मुलांसाठी असतो तसा प्ले एरिया बनवतात आणि तो मागच्या दाराशी अटॅच केलेला असतो. माझ्या एका मित्रानं केला आहे. दिवसभर त्याची दोन कुत्री मर्जी होइल तसं आत-बाहेर करतात.

शुम्पी बेस्ट पोस्ट आहे.
कृपया पियर प्रेशर किंवा मुलग/नवरा प्रेशरमुळे आजिबात घेऊ नका. सगळी कामं तुमच्या टाळक्यावर येऊन पडतील. स्वतःला खरच इच्छा असेल आणि जर कोन्फिडन्स असेल की मुलं नवरा/बायको नक्की मदत करतील तरच डॉग वगैरे घ्यायचं ठरवा. मांजर हा उपाय त्या मानानी सोपा आहे.
आम्ही आता भारतात जाऊन आलो की घेणार आहे. कुत्र्याची खुप आवड असून पण जास्त कमिटमेंट असल्यामुळे नाही घेणार.

सायो, तो ट्रेनिंगचा भाग आहे. त्या क्रेट पण फार मोठ्या असतात. खुप लोकं तो ऑप्शन घेतात आणि तो वाटतो तितका इन्ह्युमन नाहीये. Happy

सायो, मला ही पटत नाही म्हणूनच तर मला वर्क फ्रॉम होम जेव्हा आलाउड नव्हतं तेव्हा मी कुत्रा घेतला नव्हता Happy

पण क्रेट ट्रेनिंग हे वाइट नाही हेही माझं स्पष्ट मत आहे. माझ्या घरी जेव्हा कोणी लोक कुत्र्याची भिती वाटत असलेले येतात्/येतील तेव्हा येणारी माणसं प्रेमाची आणि मह्त्वाची म्हणून त्याला मी क्रेटमध्ये नक्कीच ठेवणार. नाही हो काही करत तो, फार प्रेमळ आहे , नुसता वास घेइल तुमचा, असं बोलणं आणि येणार्‍या माणसाला वाटणारी भिती एका विचित्र अर्थाने कमी लेखणं हे माझ्याकडून होणार नाही कारण मी पण एकेकाळी त्या भितीमधून गेले आहे.

हो, डोअरला तसं ओपनिंग करून घेता येतं म्हणजे ते आत बाहेर करू शकतात. रस्त्याने जाणार्‍या कुत्र्यांवर खुन्नस म्हणून भुंकणं किंवा काय कसं काय? वॉकला चालला/लीस का? जेवणखाण आटपलं का? वगैरे भुंकुन चौकश्या हा त्यांच्या सोशल लाईफचा भाग पूर्ण कसा होणार? Wink

काही करत तो, फार प्रेमळ आहे , नुसता वास घेइल तुमचा असं बोलणं >>> हो हो, हा अनुभव मला फार वेळा आलाय! Happy कुत्र्याला घाबरणार्‍यांनाच कळते त्यांची अ‍ॅन्क्झायटी, नुस्ता कुत्र्याचा आस्पास वावर असला तरी !!

>>माझ्या घरी जेव्हा कोणी लोक कुत्र्याची भिती वाटत असलेले येतात्/येतील तेव्हा येणारी माणसं प्रेमाची आणि मह्त्वाची म्हणून त्याला मी क्रेटमध्ये नक्कीच ठेवणार.>> तेव्हाची गोष्ट वेगळी आणि ते ठीकही आहे. सवय म्हणून अधूनमधून ठीकही आहे पण घरात कुणी नसताना शिक्षा दिल्यासारखं बंदिस्त जागेत ठेवणं मला नाही पटत.

सशल, उपयोगी धागा आहे. ज्यांच्याकडे लहानपणी घरी किंवा नातेवाइकांकडे पेटस न्ह्वते आणि आता घ्यायची इच्छा आहे त्यांना चांगल्या टीप्स मिळतील.
माझ्या इस्ट कोस्टच्या एक मित्राकडे दोन मांजरी होत्या. अगदी स्वतःच्या मुलीसारखं त्यांच्याविषयी तो बोलायचा. त्यातल्या एकीच्या किडनी ऑपरेशन साठी त्यानी स्वतःच्या खिशातून ३० एक हजार खर्च केले होते. आधी मला वाटले हे जास्तच आहे पण त्याचा एवढा जीव होता त्या मांजरीवर की मग वाटलं आपण लांबून काही जज करणे योग्य नाही.

Sashal..abhinandan tumhi ha vishay discussion la Mandalat..barech owners Asach vatat Mhanun pet anatat..anti mug jamla nail tar Zampi mhanalya te..ignorance!!
amchya kade german shepherd aahe..he is 5 yrs old and we adopted him when he was 6wks old. Dogs asana khup bhari ani positive gosht aahe. Pan tee khup vicharpurvakach Keli pahije.
Kahi points je me consider kelele..
1. Gharatil sarvanchi sammati asel Tar Ani Tar ch dog ghya. Kona ekala ajibat avad nasel tar don't go for it. First six month nantar tyacha far kahi karava lagat nai pan till then love and care should be equal from all of his pack. This period decides his temparament and bonding with the home
2. Apan apla office / daily routine/ household chores etc sambhalun divsatla kiti vel tyala deu shakato. Min 45min in morning and evening is expected. Te jamat nasel tar thod avghad jail. Owner la hee guilty feeling yeta and dogs hee kantalun jattat ghari
3. Mulanchya shala/ office / weekend socialisation etc madhe apan tyala khup vel ekata tar thevat naai na yachahee vichar zala pahije. Karan jasst vel to ektach ghari rahnar asel tar tyacha behaviour madhe change yeu shakato
4. Finally he should be a part of family.. Happy

Maitrayee.. Roz he sagla naai karava lagat.. Daat amhi ghasle nait Ajun Simba che.. Kan Saaf rahtat dogs che barechda .. Once in a 2 months kela tari chalata.. Nail cutting..tumhi jevvdha jasst exercise karun ghyal, tevdhi tyanchi nakha apoaap kami vadhatat..anghol..10divsatun ekda.. First three months no bathing.. Arthat he sagla tumhi kuthli breed nivadta yavar hee depend aahe.
First 6months.. Discipline training (je must aahe pets na)..potty trainings..Drs appointments and khanyach timing evdhach neat karava lagta.. Nantar varshatun ekda vaccination and dog food denar asel tar tyacha kharch evdhach Kay to maintenance..baki fakt and fakt unconditional love and happiness... Happy
Ghari lahan/teenage mule asatil tar tyanchi hee sence of responsibility vadhate coz of pet.. They learn how to take care of another living being.. Pan tarihee thode kalane tyancha vishwa badalat..shala college mitra maitrini etc..so tyachya enjoyment sathi ghenyapeksha ek aplyala sobat mhanun vichar karna jasst barobar hoil..Asa mala vatat..
Konalahee dukhvaycha uddesh naai.. Happy

कुत्र्याला घाबरणार्‍यांनाच कळते त्यांची अ‍ॅन्क्झायटी >>> अरे ते (पेट्स) पण तेवढेच स्ट्रेस आउट होतात. घाबरतात किंवा नुसतेच अस्वस्थ होतात आणि मग त्यातूनच जीव खाऊन भुंकणे , अंगावर धावून जाणे प्रकार करतात.

Shumpi and Sayo..doghinna anumodan!!!
Ha ek discipline cha bhaag aahe ki dogs ne kasa vagav ghari alelya lokanshi.
Ghari alele Loka kiti hee dog lovers asatil tari dog la baher thevane/lamb thevne/ crate madhe thevane yogya..
Ka.. Tar dogs na shikavlele niyam vyaktisapeksha badalu nayet.. Mhanun!
Amchya kade amhi baher compound chya aat thevato or gallery madhe.. Sarvana pets avdatat ase naai and apan sangun bheeti hee kami hot naai he anubhavle aahe.. So we should respect them and keep the dog away.

>>तो ट्रेनिंगचा भाग आहे. त्या क्रेट पण फार मोठ्या असतात. खुप लोकं तो ऑप्शन घेतात आणि तो वाटतो तितका इन्ह्युमन नाहीये.
क्रेट ट्रेनिंग अजिबात वाईट नाही. वाईल्ड लाईफ मधे बरेच प्राणी डेन मधे म्हणजे काहीशा बंदिस्त जागेत राहतात. सुरक्षेसाठी तसेच स्वतःचे घर या भावनेसाठी. त्यामुळे अगदी लाईफ लाँग जरी क्रेट वापरली तरी कुत्रासाठी ते वाईट नाही. अतिरिक्त वापर मात्र टाळावा.

अरे कुटूंब-चर्चा हा ग्रुप कुटूंब ह्या चित्रपटाच्या मा.प्रा. अ‍ॅक्टीव्हिटीजची चर्चा करण्यासाठी होता ना? त्यात कुत्रं पाळायचा धागा का काढलाय ? Proud

मित्रमैत्रिणी घरी आले तर आम्ही त्या आलेल्या लोकांवर अवलंबून क्रेट मधे की बाहेर हे ठरवतो. अनेक वेळा आई-वडील फारसे इच्छुक नसतात पण आलेल्या मुलांना मात्र प्रचंड मजा येते. कुत्र्याने चाटणे हे मला अजिबात आवडत नाही पण मुलगी आणि नवरा यांना काही हरकत नसते. गंमत म्हणजे हे ट्रेनिंग वर खूप अवलंबून आहे.
गेल्या २-३ महिन्यांच्या सहवासातच आम्हाला आमच्या डॉगने ओळखले आहे बहुतेक. ती माझ्या जवळ आली की मला चाटत नाही पण नुसती बिलगते. क्वचित पंजाने "कुरवाळ आता मला" असं सांगते. Happy पण नवरा आणि मुलगी आले की त्यांचे गाल, हात चाटते. बाहेरच्या लोकांसाठी पण हा फरक जाणवतो.

आपल्या भावना समजण्याइतपत हुशार असतात कुत्री. मांजरं पण असावीत तशी. पण फारसा अनुभव नाही.

पग्या Lol असू देत. कुटुंबाने काय फक्त सिनेमासंदर्भात बोलावं का? कुत्र्याबद्दल पण चर्चा करू शकतं बर्का कुटुंब Happy

कुत्री इन जनरल खूप फूड ड्रीव्हन असतात. त्यामुळे छोट्या छोट्या ट्रीट देऊन बरंच शिकवता येते, शिस्त लावता येते. अर्थात वेळ आणि जबाबदारी घ्यावी लागते. त्यामुळे कृपया पियर प्रेशर किंवा मुलग/नवरा प्रेशरमुळे आजिबात घेऊ नका. माझ्या कडे बर्‍यापैकी २ हो ( नवरा आणि मुलगी) आणि मी स्ट्राँग नो अशी स्थिती होती. पण मुलीने ७-८ वर्षं पाठपुरावा केला आणि मी पण आग्रह सोडला. मधल्या काळात ज्या मित्रमैत्रिणीकडे कुत्रं आहे त्यांच्याकडून माहिती, वाचन ह्युमेन सोसायटी तर्फे चालणार रीड टू डॉग असे प्रयत्न केले. मग हळूहळू गोल्डन आणि लॅब्रडोरची भीती खूप कमी झाली.

लहानपणीचा किस्सा सांगितला पाहिजे.

अरेच्चा! गृप परत एकदा चुकलाच का! बरं आता परत दुरूस्त केला .. तेव्हा परत एकदा "बदलून" Happy

मी सर्व नविन पोस्ट्स निवांत वाचते आणि मग काही अनअ‍ॅड्रेस्ड् कन्सर्न्स उरले असतील तर भर घालते ..

कुत्र्याविषयी भीती तयार होण्यामागे एक प्रसंग आहे. लहानपणी १० वर्षांची असताना एका ओळखीच्यांच्या शेतात गेले होते. तिथे बांधावर गजग्याची / सागरगोटे ज्यापासून मिळतात ती झाडे होती. आंब्याच्या कोयीच्या आकाराचे फळ आणि आतल्या बिया म्हणजे सागरगोटे. पण त्या फळावर मोठेमोठे काटे बाभळीसारखे असतात. दोन शेतांमधे डिव्हायडर सारखी ही झाडे असतात बहुदा. घर शेतातच होते. एका बाजूला विहीर वगैरे.
मी आणि एक मैत्रीण खेळत होतो अचानक त्या शेतातला कुत्रा भुंकत आमच्यामागे लागला. आम्ही दोघी घाबरून सैरावैरा पळत सुटलो शेतात. कारण घेरी गेलो तर तो पकडेल, चावेल, दुसर्‍या बाजूला विहीर. मग पळता पळता लांब जाऊन त्या गजग्याच्या झाडात मी पडले. तोवर मागून त्या मावशीच्या मुलाने पळत येऊन कुत्र्याला आवरले होते. पण माझ्या अंगात गजग्याचे काटे घुसले होते. मनावर प्रचंड भीती होती आणि मग पुढे ते काटे काढणं, जखमा बर्‍या होणं इ.इ. चाललं. त्यातून कायमची भीती बसली. ती गेल्या काही वर्षांमध्ये प्रयत्नपूर्वक गेली आहे, अजून जाते आहे. त्यामुळे मुलीने तिच्या वयाच्या ३-४ पासून धरलेला हट्ट शेवटी आता ती ११-१२ ची असताना पूर्ण केला. Happy

मांजरं पण असावीत तशी >>> मांजरं सहसा टीनएज मुलींसारखी वागतात. काही हवं असेल तेव्हा लाडात येतात. पाहुणे आले की कुठल्यातरी एका खोलीत गायब होतात. आपणच सगळं वेळच्यावेळी, यांच्या मनासारखं केलं तरी तोरा आहेच. Proud

मला पण भिती बसायला कारण बिल्डिंगमधला डॉबरमन आणि शेजारच्या बिल्डिंगमधला पोमेरियन कुत्रा.
डॉबरमन आणि तो पामेरियन सतत ऑफ लीश खाली मोकळे असायचे आणि अंगावर यायचे. बरोबर त्यांचे मालक पण नसयचे. अतिषय बेजबाबदार डॉग ओनर्स.
मी २००२ साली लॅब्रेडॉर बद्दल पुस्तक आणून वाचलं, मग तो विषय बॅक बर्नरवर ठेवला आणि २०१२ साली परत नीट सिरियसली विचार केला शेवटी गेल्या म्हणजे १५ सालच्या सप्टेंबरमध्ये सर्च सुरूकेला आणी गेल्या महिन्यात कुत्रा घरी आला Happy

पपी आणण्यामागे पण हाच फोबिया होता. मोठं, फुल्ल ग्रोन डॉग, किंवा शेल्टर मधून ऑलरेडी ट्रेन झालेलं, रुटिन बसलेलं कुत्र आणणं सोपं गेले असतं. पण पपी बरोबर मी ग्रो होणं हे माझ्यासाठी जरूरी होतं. मोठ्या दिसणार्‍या कुत्र्याला मी हात पण लावू शकत नव्हते त्याच बरोबर आधीचा अ‍ॅब्युझ वगैरे अनुभव असेल तर त्याप्रमाणे ट्रेनिंग कधी कधी अवघड होत. म्हणून पपी आणलं. सुरूवातीला तरी तिची ताकद माझ्या पेक्षा खूप कमी होती. आता हळू हळू वाढतेय पण आता त्याची भीती नाही. Happy

आता ट्रेनिंग बद्दल. प्रोफेशनल ट्रेनर तशी फार गरज असतेच असं नाही. चांगल्या ब्रीडरकडून घेतला असेल, डॉगची फॅमिली हिस्ट्री चांगली असेल तर आपण घरी व्यवस्थित शिस्त लावू शकतो. पण फर्स्ट टाईम डॉग ओनरसाठी तरी काही ट्रेनिग घ्यावं असं मला वाटतं. पेट को, पेट स्मार्ट सारख्या चेन्स मधे ताशी $२०-$२५ पासून बेसिक ट्रेनिंग आहे. त्यात सीट, कम, गो, वेट, स्टोप, नो अशा कमांड्स शिकवतात. लीशवर कसं चालावं वगैरे शिकवतात. मस्त असतं हे. Happy आपल्यासाठीच जास्त गरज असते.

ही ट्रेनिंगची रेंज मग ताशी $ ३०-५०-७०-१०० पासून पार काही शे, हजारांवर पण जाते. जसे हा
https://www.cesarsway.com/
पण त्याचे काही लेख चांगले आहेत.

फूडपण असंच. १००% नॅच्युरल, ऑरगॅनिक वगैरे जरा महाग असतं पण फार नाही. स्वस्त ऑप्शन पण खूप आहेत. आपलं फूड खूप जास्त देऊ नये म्हणतात पण भारतात मी कुत्र्यांनी सर्रास दूध भात-पोळी असं खाताना पाहिलं आहे. आणि त्यांना काही त्रास झालेला दिसत नाही. तरी आम्ही डेझीला तिचंच फूड देतो. कधी फळं, काही भाज्या आणि अगदि क्वचित दहि-दूध-भात --- मीठ साखर नाही असा दिला आहे. डेझी मिटक्या मारत खाते. Happy आवडत्या फळात सफरचंद, केळं, आणि सर्वात आवडती भाजी - फ्लॉवर आणि ब्रोकोली. Oh the kid I never got!! असं म्हणलं की लेक उखडते. Lol

ह्या बाफंचं पर्यवसान सशलच्या नवीन पपीच्या फोटोत होणार आहे असं दिसतंय Happy माझी मुलगीपण प्रचंड मागे लागली आहे, तरीही मी कुठल्याही प्रेशरला बळी न पडता माझ्या मतावर ठाम राहुन घरात कुठल्याही प्रकारच्या पेटचा शिरकाव होऊ देणार नाहीये Proud

नकोच मुव्ह होऊ. जोवर अंतरमनातून कौल येत नाही तोवर ही नुसती चर्चाच असू दे.
मला स्वतःला "आता पुढची काही वर्षे अडकली" ही भावना पचवायला वेळ लागला. पण आता प्रत्येक दिवस ज्या आनंदात जातो त्यावरून ही वर्षे मस्त असतील यात शंका नाही.

मला लकी घरी आल्यावर पहिला आठवडा अजिबातच झोप लागली नाही. घरी मनुष्य सोडून अजून कोणी प्राणी आहे ही एक विचित्र भावना होती. सवय व्हायला १ आठवडा लागला. Happy

मुलीवर मात्र खूपच चांगला परिणाम आहे. एकंदरित जबाबदारी ही सगळ्यांची आहे आणि तिने तिचा वाटा नाही उचलला तर डॉग ब्रीडर कडे परत जाणार ही कंडिशन तिला मान्य आहे.

पपी आणलं तर पॉटीट्रेनिंग जरा कष्टाचं आहे. जितके महिने वय तितके तास ते शू होल्ड करू शकतात अप टू ७ - ८ तास. म्हणजे २ महिन्याचं पपी आणलं तर साधारण २-३ तासांनी पॉटी ब्रेक पाहिजे. मग ३-४ तास असे पहिले २-३ आठवडे जरा अवघड जाते. साधारण ४ महिन्यानी ते सलग ५-६ तास होल्ड करू शकतात. पण तरी अ‍ॅक्सिडेंट होऊ शकतो. पण एकदा का ते पूर्णपणे ट्रेन झाले आणि नवीन घरी रूळले, नेहमीच्या क्रेट्/बेड ची सवय झाली की रात्रीची ७-८ तासांची सलग झोप आपल्याला मिळते. पण आपल्याला सकाळी नियमितपणे ठराविक वेळी उठणे मात्र मस्ट आहे विकेंडला सुद्धा!!

<"आता पुढची काही वर्षे अडकली" > ह्म्म
कुत्र्याचे सरासरी आयुष्य आपल्यापेक्षा कमी असते हे कुठेतरी डोक्यात सारखं असतं का ? त्यामुळे अ‍ॅटॅचमेंट कमी नाही का होत ?

Pages