पेट डॉग घ्यावा?

Submitted by सशल on 29 March, 2016 - 12:24

गेले काही महिने/वर्षं माझा लेक "आपण कुत्रा घेऊ या ना"! असा हट्ट करत आहे. बरेच दिवस ठामपणे "आम्हांला हे जमायचं नाही. तू मोठा झालास की तुझ्या घरी आण हवे तेव्हढे पेट्स" असं उत्तर देऊन त्याला निकालात काढला. आता आजूबाजूचे, माहितीतले, चांगल्या परिचयाचे बरेच लोक घरी कुत्रे आणत आहेत तेव्हा पीअर प्रेशर बिल्ड-अप होत आहे.

आम्ही मुंबईचे; जिकडे माणसांनांच पुरेशी जागा नाही अशा बॅकग्राउंडचे तेव्हा पपी/पेट्स नां आमच्या वैचारीक जगात महत्वाचं स्थान नाही. दोघंही आळशी आणि ही तर स्वतःला नको असलेली जबाबदारी (आर्थिक + भावनिक). तेव्हा केवळ गुड पॅरेन्टींग म्हणून ह्या फंदात पडावं की नाही ह्याचा खूप विचार करते आहे.

आज बेकरीत विषय निघाला तिकडे धनश्री ने काही माहिती दिली. अजूनही ज्यांनां ज्यांनां ह्या विचार मंथनात सहभागी व्हावेसे वाटते त्यांनीं प्लीज इकडे लिहा. मला खूप उपयोग होईल निर्णय घेण्याकरता. मी माझ्या मनातले कन्सर्न्स इकडे लिहीतेच वेळ मिळताच.

ही धनश्री ने दिलेली माहिती:

"माझी डेझी गोल्डन रिट्रीव्हर आहे. आता ती ४ महिन्यांची आहे. आम्ही तिला ७ वीकची असताना आणली. नुसता लोकरीचा गुंडा होता. स्मित पण आता छान रूळली आहे. शांत आहे. खूप माया लावते.

सध्या तिचे शॉट्स + फूड + ट्रीट्स इ. बेसिक गोष्टी साधारण महिना $१०० च्या आत होतात. पण आम्ही तिला ट्रेनर आणि डे केअर लावलं आहे सोशलायझेशन साठी. त्याचा खर्च जास्त आहे. साधारण $१०० पर अवर ट्रेनर आणि दिवसाला $२५-३० च्या रेंजमधे डे केअर. you will find tons of options for dog care/ dog sitter depending upon area. again there is diff in care takers with special training vs general someone walking a dog. We are also exploring this new world. स्मित

कमिटमेंट जोरात आहे पण. १२-१५ वर्ष बांधली जातात. मला हे पचवणं अवघड होतं. दुसरं मूल झाल्यासारखं वाटलं पण फक्त १ महिनाच. स्मित आता मी परत नॉर्मल रूटिनवर येतेय."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लॅब आणि गोल्डन रिट्रिवर दोन्ही शेड भरपूर करतात ना? सीझनली असेल कदाचित , पण तुम्ही ते कसं हँडल केलंत? घरात कार्पेट वर, किंवा फर्निचर वर जिकडे तिकडे केस, स्किन डॅन्ड्रफ इ. हँडल करणे अवघड वाटेल असं वाटतं.

पारु. आजिबात नाही. नवीन डॉग ओनर असाल तर सुरवातीला असे विचार येऊन/करुन अटॅचमेंट आपण कंट्रोल मध्ये ठेवू शकू असे खुळे विचार मनात येतात. पण ते एकदा घरात आले की आपल्याला टोटली गुंडाळून टाकतात. What's left with us is to just accept whatever comes later whenever it comes. Until then, its a fun ride!
Happy

प्रश्न मला नाहीये मै पण तरी उत्तर देतो. कितीही कमी केस असलेली ब्रीड आणली तरी केस घरभर होतातच. नंतर फक्त ते केस आपल्याला दिसेनासे होतात. Lol

पारू, चांगला प्रश्न.

हेअर (की फर?) शेडींग आहेच. पण काही कुत्री ट्रेन होईपर्यंत फर्निचर चे कोपरे च्यु कर, चपला बूट च्यु कर इत्यादी उपद्व्याप करतात. पॉटी ट्रेन होईपर्यंत त्या स्वच्छतेचा प्रश्न.

बाकीच्या खर्चाबरोबर हेही नॉन-ट्रिव्हीयल वाटतं.

>> कितीही कमी केस असलेली ब्रीड आणली तरी केस घरभर होतातच. नंतर फक्त ते केस आपल्याला दिसेनासे होतात.

Happy

आपलेही असतात घरभर Wink तसंच .. (आणि बायकांचे दिसून येतात लांब असल्यामुळे पण सर्व मनुष्यप्राण्यांचे असतात घरभर! :हाहा:)

परु, बुवा म्हणाले तेच खरय.
मझे एक मैत्रिण जिच्याकडे २ कुत्रे आहेत ती सांगते की ती सुरवातीला भयंकर सतत हात धुवायची आता चुकून कधी जेवणात केस आलात्र हा हाचीचा की जिमीचा असा विचार करते Happy

मला महिना झाला तरी घरातल्या केसांचा त्रास होतो. मी लवकरच रुम्बा चा व्हॅक्यूम/मॉप घेणार आहे म्हणजे ते काम थोडं सोपं होइल.

लॅब मॉडरेट शेड करतात. सध्या शेडिंग सिझन चालू झाला आहे.

पपी असताना टीदिंग फेजमध्ये फर्निचर्/शूज असे प्रकार च्यू करणे ज्जस्ती होतं. ते पण एक करण होतं मला पपी नको होतं त्याचं. कारण आम्ही नुकतच नविन घरात आलो म्हणून बेसबोर्ड वगैरे च्यू करण्याची भिती होती मला.

सुदैवाने मला कुत्र्यांची भिती वाटत नाही अजिबात आणि त्यांनीं चाटलं, त्यांचे केस इत्यादी चा त्रास होणार नाही किंवा माणसांच्या बाबतीत होतो तितकाच होईल.

फक्त एका सजीवाच्या जबाबदारीची भिती वाटते. Happy

दोन ट्रेनींग संदर्भातले गमतीशीर किस्से, प्राउड डाॅग ओनरचे:

१. जर्मन शेपर्ड हा बर्यापैकि फरोशस डाॅग मानला जातो. आपल्या पॅक (कुटुंब) मध्ये आपणच श्रेष्ठ आहोत अशी या ब्रिडची जात्याच (गैर) समज असते. तर हा समज खोडण्याकरता मालकाने या कुत्र्याचा पपी असतानाच (फुल ग्रोनचा प्रयत्न कदाचीत सुसायडल ठरेल) कानाचा चावा घ्यायचा मग तो मालकाचं ॲबसोलुट स्वामीत्व स्विकारतो... - इति इंडियन मित्र Proud

२. दुसर्या एका मित्राने त्याच्या लॅबला, पपी असतानाच हि सवय लावली. बॅकयार्डच्या दरवाज्यालगत एक घंटि टांगली, आणि त्याला सू/शी करायला बाहेर नेताना पपीच्या पुढच्या पायाने ती घंटि वाजवायचा नियम पाडला. मी नंतर बघायला गेलो नाहि पण त्या मित्राच्या मते एक-दोन महिन्यानंतर त्याचा कुत्रा, निसर्गाची हाक आल्यावर स्वत:हुन घंटि वाजवुन दरवाजा उघडायची सुचना देऊ लागला... Lol

बुवा आणि शुम्पी थँक्स. "What's left with us is to just accept whatever comes later whenever it comes. Until then, its a fun ride" हे छानच वाक्य आहे Happy
सध्या नवीन पेट आणणं जमण्यासारखं नाही आहे पण काही दिवसांनी फॉस्टर डॉगचे बघीन.

हौ ते चाव्याचं मी काही येडफुकण्याकडून एकलं होतं. Lol बावळट लेकाचे. (कुणी ऑफेंड होऊ नये म्हणून शिरेस शिवी नाही दिली नाहीतर द्यायची इच्छा होती खरं Proud )

बिनधास्त घ्या.
जर त्याच्याशी नाही जमले तर विकायचे असे आधीच ठरवून घ्या..

जर त्याच्याशी जमत नसेल तर विकतानाही जीव अडकणार नाही की जीवाची तगमग होणार नाही.
आणि विकायला जीवावर येत असेल तर याचाच अर्थ जीव लागलाय असे समजून मग पाळायचे. जीव लागला असेल तर त्याला पाळणे हा त्रास वाटणार नाही.

अवांतर - मी स्वता कधी कुठलाही प्राणी पाळू शकत नाही. मला स्वताचेच करायला जीवावर येते तर दुसर्याचे काय करणार. मलाच कोणी पाळले तर बरे असा विचार कैकदा मनात येतो Happy

हो ती दर्वाज्याला बेल टांगायची आयड्या मी पण ऐकली आहे बर्‍याच जणांकडून. इट वर्क्स!

माझ्या एका मैत्रिणीच्या २कुत्र्यांपैकी एक कुत्रा (लॅब) थेरपी डॉग आहे, ती त्याला घेउन हॉस्पिटलमध्ये जात असते.
त्याच्या थेरपी ट्रेनिंगची टेस्ट होती त्यात परिक्षक बाई त्या कुत्र्याच्या कानात जोरात ओरडली तो रिअ‍ॅक्ट करतो का ते बघायला. तो पास झाला पण मैत्रिणीला जाम वाइट वाटलं.

>> कानाचा चावा ??? बाप रे

+१

एका प्राउड डॉग ओनरची कुत्री कधी कधी फार रानटी होते खेळताना तर त्याच्याकडून ऐकलं की कुत्र्याला कुत्र्यासारखंच वागवायला हवं. त्यांनां नसता लळा आणि लाडात आणू नये. ते (कुत्रं) रानटी खेळ खेळायला लागलं तर तो झिडकारल्यासारखं करतो (जे मला बघवलं नाही , पण मला योग्य तर्‍हेने ट्रेन कसं करावं ह्याचं ज्ञानही नाही). पण असं घरच्या मेम्बरला (कुत्रा जरी असला) तरी ट्रीट करणं मला झेपणार नाही.

>>फक्त एका सजीवाच्या जबाबदारीची भिती वाटते.

मग तुझी केस बरीच बरी आहे सशल. मला स्वतःला शाळेत असताना कुत्र्यांनी पाठलाग करण्याचा महाभयकंर अनुभव असल्यामुळे मी कधीच कुत्रं घरात आणणार नाही हे आमच्या पब्लिकला माहित असतं. तरीदेखील तीन विरुद्ध एक मताने काहीवेळा साधक-बाधक चर्चा घडत असतात. शेजारच्यांच्या कुत्र्यांवर प्रेम करा असा प्रेमाचा सल्ला देऊन झाला. मागच्या वर्षी एक फिश टँक पण घेऊन झाली. मी क्लिनिंग करणार नाही या बेसिसवर. सध्या ती रिकामी पडली आहे. पुढच्या महिन्यापर्यंत पुन्हा सुरु केली नाही तर डोनेट करू (कारण मला ते स्टूल झाड ठेवायला हवंय Wink )

असो. टू कट द स्टोरी शॉर्ट मी आमच्याकडे तरी पेट अदर दॅन मासा आणणार नाही Happy गुड लक. अपडेट कर इथेच शेवटी काय ठरतंय ते.

>>मलाच कोणी पाळले तर बरे असा विचार कैकदा मनात येतो

याच्या कानाचा पहिला चावा कोणी घ्याय्चा यावर एक पोल येणार का काय मग Uhoh

वरती काही प्रतिसाद 'कुत्र्याच्या आयुष्याबद्दल' आले आहेत. ही सोडून जाण्याची फेज फार दु:खी असते हे मान्य. पण हा आयुष्याचा भाग आहे. आपल्या प्रत्येकाच्या अयौष्यात हे होणार आहेच - आई-वडिल-काका-मामा-मित्र वगैरे. तसेच आपले पाळीव प्राणी.
माझ्या आईने आमचा वान्या (कुत्रा) गेल्यावर ही लेखमाला मायबोलीवर लिहिली होती. ती पॉझिटिव्ह/निगेटिव्ह आहे हे वाचणार्‍याने ठरवावे.
http://www.maayboli.com/node/1633

टण्या, तुमच्या वानू वर लिहीलेली पूर्ण सिरीज् वाचली होती मी. जितके सर्व भाग वाचताना आनंदी अनुभव आला तितकाच शेवटचा भाग वाचताना दु:खी व्हायला झालं. नातीगोती, मित्र-मैत्रिणी आमच्यासारख्यांकडे जन्मजात असतात, पण कुत्रा हा आपण जाऊन आणणार तेव्हा त्याच्या जन्म, मृत्यू इत्यादीचा आपल्यावर आपल्या मुलाबद्दल जे आणि जसं वाटेल तसाच परिणाम होणार असं वाटतं. तेव्हा आई-बाप ह्या नात्याने जसं आपल्या मुलांचा अंत पहावा लागू नये किंवा त्यासारखं दु:ख नाही म्हणतात तीच भिती कुत्र्याबाबतीत असणं रास्त आहे.

सशल ही घे.... (मोत्या शीक रे... )

"मोत्या शीक रे अ आ ई..., आमच्या लहानपणी कुत्र्याला शिकवायचे हे एकच गाणं होतं," आज्जीच्या या सूचनेवर तिच्या नातीने म्हणजे माझ्या मुलीने,
"शी आज्जी.. अ आ ई काय? आता कुणी कुत्र्याला अ आ ई शिकवतं का?" लगेच शंका काढली. इकडची कुत्री इंग्रजीत भुंकतात हे तिला माहीत होतं.
"आणि मोत्या म्हणजे?"
"अंग मोत्या हे कुत्र्याचे नांव." क्षणात मुलांनी कुत्र्याचे नांव आणि जुन्या पध्दतीचे शिक्षण दोन्ही निकालात काढून आपल्या आजीला फारसं काही कळत नाही असं स्वतः ठरवून टाकलं, आणि आज्जीच्या सगळ्या सूचनांना स्पर्धेतून बाद करून टाकलं.

घरी कुत्रा आणायची चर्चा सुरू झाली त्यादिवशी माझे ग्रह नक्कीच कुठल्यातरी गटारात नाहीतर पाण्याच्या टाकीत उतरले असावेत. तमाम वर्तमानपत्रांच्या राशीभविष्य विभागात नेहमीप्रमाणे वेगवेगळे भविष्य असले तरी त्याचा अर्थ माझ्याबाबतीत 'तुमचे हाल कुत्रा खाणार नाही,' एवढाच होतो. मुळात राशीभविष्याचे आणि माझे काय वाकडे आहे कोण जाणे. पण मी जेव्हा कधी माझे भविष्य बघतो तेव्हा एका वर्तमानपत्रात 'सुंदरी भेटेल' असे असले तर दुसर्‍यात 'खड्ड्यात पडाल, संभाळून रहा' असे नक्की लिहीलेले असते. 'अचानक धनलाभ' कधीतरी येतो वाट्याला पण तो धनलाभ म्हणजे मित्राने उसने घेतलेले दहा वीस डॉलर फक्त परत येतात. भारतातला पोपटशास्त्र्यांकडचा पोपट जाऊन ते 'पॉल द ऑक्टोपस' च्या मदतीने भविष्य सांगू लागतील तेव्हाच काहीतरी बदल होईल अशी आशा आहे.

शेजार्‍यांकडे कुत्रा आलेला बघून घरात मुलांनी 'आपल्यालाही एक कुत्रा हवा' असा हट्ट धरला. खरं तर मी कुत्र्याला अगदी वाघापेक्षाही घाबरतो. वाघ नेहमी पिंजर्‍यात असल्यामुळे असेल, मला त्याची कधीच भीती वाटली नाही. पण कुत्रा हा प्राणी कधी आणि कुठे भेटेल काही सांगता येत नाही. लहानपणी 'कुत्रा चावला की पोटात इंजेक्शने घ्यावी लागतात,' ही माहीती आईवडिलांनी मनावर ठासवून ठेवल्यामुळे मला कुत्र्याऐवजी डोळ्यासमोर इंजेक्शने दिसतात. लहानपणी माझे काही मित्र, कुत्रा म्हणजे 'नेमबाजीचा सराव करायचे निशाण' असं मानून कुत्रा दिसला की दगड भिरकावायचं काम अगदी मनापासून करायचे. पण मी मात्र कुत्रा दिसला की पळायचं तत्व पहिल्यापासून बाळगून होतो. गम्मत म्हणजे माझ्या एकाही मित्राच्या वाटेला कुठलंही कुत्रं गेलं नाही पण मी बाहेर पडलो की अनोळखी कुत्र्यांनादेखील माझ्याशी शर्यत लावायची हुक्की यायची. यातली एकही शर्यत मी कधी हरलो नाही नाहीतर....

आमच्या लहानपणी कुत्र्याचे दोनच प्रकार असायचे. भटका आणि पाळलेला. म्हणजे ज्या कुत्र्याला सकाळ संध्याकाळ एकाच घरी फुकट जेवायला मिळतं तो पाळलेला आणि उरलेला श्वानमंडळ हे भटक्यांमधे धरलं जात असे. आता कुत्र्यांमधे सतराशे साठ प्रकार असतात ही माहीती मला हल्लीच म्हणजे अमेरिकेला आल्यावर कळली. हे सगळे प्रकार फक्त अमेरिकन नावांचेच असतात, हे कळल्यामुळे भारतातले कुत्रे वेगळे आणि अमेरिकन वेगळे असा मी स्वतःचा समज करून घेतला. मग मला शिकवण्यासाठी इंटरनेट उघडून त्यावर चिवावा, पोमेरियन, बुलडॉग, सेंटबर्नाड म्हणजे काय हे फोटो दाखवून मुलांनी माझं बौध्दिक घेतलं. आणि मला कुत्रा या विषयात एक कोर्स पूर्ण केल्याचं समाधान मिळालं.

'चिवावा' नामक एक श्वानप्रकार आणून तो कुठल्याश्या नटीप्रमाणे पर्समधून फिरवावा असं एकीचं म्हणणं पडलं. पण 'इतका छोटा कुत्रा चुकून पायाखाली आला आणि त्याचा एकादा अवयव मोडला तर काय घ्या,' असं म्हणत मी चिवावाला माझा विरोध दर्शवून त्याची कारणं पुढे केली. कुत्रा फिरवायला रस्त्यावर जाताना मला काखेत पर्स घेऊन फिरावे लागणार याची भीती होती. मग एकदम 'सेंट बर्नाड' म्हणजे 'जो कुत्रा घरात आणल्यास सगळं घर व्यापून टाकेल, आणि मालकाला म्हणजे मला घराबाहेर जाऊन रहावं लागेल,' तो कुत्रा आणावा असं दुसरीचं म्हणणं पडलं. कुत्र्यासाठी बापाला घराबाहेर काढण्याची योजना माझ्या लगेच लक्षात आली, आणि मी ती ही तातडीने फेटाळून लावली. राष्ट्रपती ओबामाने 'पोर्तूगीज वॉटरडॉग' घेतल्यापासून माझ्या साताठ मित्रांनी त्यांचं कुत्रं हे 'पोर्तूगीज वॉटरडॉग' वंशावळीशी कसं जवळचं नातं ठेऊन आहे हे मला सांगितलं होतं. त्यात त्यांच्या कुत्र्याला राष्ट्रपतींघरच्या श्वानाप्रमाणे चार पाय आणि दोन कान आहेत यापलिकडे मला तरी काही साम्य दिसलं नव्हतं. 'अलास्कन हस्की' नामक एक कुत्रा असतो हे पण मुलांनी मला सांगितलं पण यात मला काही नवल वाटलं नाही, कारण पेलीनबाईंची वक्तव्ये ऐकल्यापासून मी अलास्काबद्दल काहीही ऐकले की मला 'हसकी' असं सांगण्याअगोदरच हसू येतं. या कुत्र्याचा आणि हसण्याचा काहीही संबंध नाही हे पण मुलांनी मला सांगितलं, पण असला कुत्रा पाळला तर घर कायम अलास्का सारखं थंड ठेवावं लागतं या सबबीवर मी ती ही कल्पना फेटाळून लावली. सांगून आलेल्या प्रत्येक कुत्र्यामधे मी काही ना काहीतरी खोड काढणार हे मुलांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी 'कुत्रा कुठला ते नंतर ठरवू, आधी कुत्र्यासाठी करायला लागणारी तयारी तर करू,' या तत्वावर त्यादिवशीच्या वाटाघाटी संपवल्या.

कुत्रा पाळायचाच असं ठरलं असेल तर ब्रीडरकडे जायलाच हवं असा सल्ला माझ्या मित्राने दिला. त्याच्याकडे गेल्यावर्षीपासून एक कुत्रा असल्याने तो या विषयात निष्णात असल्याचं स्वतः म्हणाला. मला आधी ते 'बिल्डर' ऐकू आलं.
"घर बांधून देतो तो बिल्डर आणि कुत्रा देतो तो ही बिल्डरच का?" या माझ्या प्रश्नाला,
"हे बघ. एका अर्थाने ब्रीडर कुत्रा बांधूनच देतो पण ते आपण नंतर बोलू," असं म्हणून माझा मित्र 'मेड टू ऑर्डर' कुत्रा बांधणार्‍या एका ब्रिडरकडे आम्हाला घेऊन गेला.
"तुम्हाला कुत्रा हवा आहे ना? मग आज ऑर्डर नोंदवा, आणि चार सहा महिन्यानी तुम्हाला हवा तसा कुत्रा घेऊन जा," असं त्याचं म्हणणं पडलं.
अमेरिकेत दुकानामधून 'टाचणीपासून हत्तीपर्यंत, म्हणजे Pin To Elephant काहीही मिळू शकते असे भारतातले आमचे मास्तर आम्हाला नेहमी सांगत. पण पण 'मेड टू ऑर्डर' कुत्रा मिळवायला ऑर्डर देऊन वाट बघावी लागणार हे काहीतरी नवीनच ऐकत होतो.
"लगेच घरी नेता येईल असा एकादा कुत्रा मिळेल का हो?" मी भीत भीत विचारलं
"लगेच?" "आगे जाव भाय, फोकट में खालीपिली टाईमपास कायताय," असा चेहर्‍यावर भाव आणत त्याने एक मेन्यूकार्ड काढून माझ्या हातावर ठेवलं.
"आधी हे मेन्यूकार्ड बघा आणि कुत्रा निवडा."
'इथे हे लोक कुत्रा जीवंत विकणार की...' हा शंका माझ्या मनात येते न येते एवढ्यात माझी त्या कार्डाच्या उजव्या बाजूला नजर पडली, आणि 'मेड टू ऑर्डर' कुत्र्याच्या किम्मतीत मला एकादी गाडी विकत घेता आली असती हे माझ्या लक्षात आलं.
कुत्र्याच्या एका पिल्लाची किंमत पाहून मला फेफरं यायचं शिल्लक होतं. उगाच नाही लोक कुत्र्याला काखोटीला मारून फिरत. एवढे पैसे देऊन मी कुत्रा विकत घेतला, तर मी तो बँकेच्या लॉकरमधे ठेवला असता.
"तुला कुत्र्याची किंमत किती असेल असं वाटलं?" मित्राने माझ्या चेहर्‍याकडे पाहून म्हणाला.
"१००/१५० डॉलर असेल," मला वाटलेला आकडा नाईलाजाने दसपट केला.
"१०० डॉलर? अरे हल्ली १०० डॉलरमधे रस्त्यावरच्या कुत्र्यालाही 'हाड' करता येणार नाही तुला," माझा मित्र.
"म्हणजे? कुत्र्याला 'हाड' म्हणायला देखील आपण पैसे मोजायचे?" मी फक्त खाण्याच्या हाडाचे पैसे हिशोबात धरले होते.
'मला वाटतं, तू एकादं बेवारशी कुत्रा शोध. तो परवडेल तुला.... कदाचित,' तो म्हणाला. बेवारशी कुत्र्यांच्या वाटेला मी स्वतः म्हणून कधीच गेलो नव्हतो. आताही त्या भानगडीत पडण्यात अर्थ नव्हता.
'तसं नाही रे. पण इकडे बेवारशी कुत्रा म्हणजे त्याच्या मालकाने टाकलेला कुत्रा. आपल्याकडे पूर्वी कश्या टाकलेल्या बाय....'
'कळलं कळलं,' मी लगेच त्याचं वाक्य तोडलं. मुलं बरोबर नसली तरी बायकोसमोर हे ज्ञान मला दाखवायचं नव्हतं.
'म्हणजे, मोठा झालेला, नीट शिकवलेला पण मालकाने सोडून दिलेला कुत्रा तू घे,' तो मला म्हणाला. मलाही ही कल्पना आवडली आणि मी लगेच बेघर कुत्र्यांच्या घराची वाट धरली.

अमेरिकेतला बेवारशी कुत्रा हा बेवारशी नसतोच, तो फक्त हवापालट करायला आल्यासारखा मालकपालट करायला आलेला असतो, हे मी नवीन शिकलो. त्या कुत्राघर चालवणार्‍याने कुत्र्याबद्दल काहीही बोलायच्या आधी असंख्य फॉर्म मला भरायला लावले. त्यात माझी, माझ्या बायकोची, आणि आम्हा दोघांच्या सात पिढ्यांची चौकशी करणारे प्रश्न होते.
'तुम्हाला बायको अगर नवर्‍याला मारहाण केल्याबद्दल कधी अटक झाली होती का?'
'तुमचे अगर तुमच्या बायकोची आधी झालेली लग्नं?'
'पुढील दोन वर्षात तुम्ही तुमच्या बायकोला, अगर तुमची बायको तुम्हाला घटस्फोट देण्याची शक्यता आहे का?'
'तुम्ही दिवाळखोर आहात अगर गेल्या सात वर्षात दिवाळखोरी केली होती का?'
'तुमच्या घराण्यात कुणाला वेड लागल्याचा इतिहास आहे का?'
असले असंख्य प्रश्न त्याने आम्हाला विचारले. त्यात 'वेड लागल्याचा इतिहास' म्हटल्यावर बायकोने माझ्याकडे मराठीत टाकलेला कटाक्ष त्याला इंग्रजीतही कळला. खरं तर या प्रश्नाला मी उठणार होतो, पण आत्तापर्यंत घालवलेला वेळ बघता पुन्हा कुत्राशोध करण्यात अर्थ नाही म्हणून बसून राहिलो.
"आता फक्त दोन गोष्टी राहील्या. आम्ही तुमच्या घराची तपासणी करून ते कुत्र्याला रहायला योग्य आहे की नाही ते बघू."
"ही तपासणी कधी होईल?"
"ते आम्ही आधी सांगू शकत नाही. अचानक येऊन तपासणी केल्यावर आम्हाला खरं काय ते कळेल. त्याशिवाय तुम्ही कुत्रा पाळायला योग्य आहात, असे सर्टिफिकेट तुम्हाला निदान दोन वर्षं ओळखणार्‍या शेजार्‍यांकडून आणावे लागेल."
हा मनुष्य बेवारशी कुत्रा मला देणार होता, की त्या कुत्राघरामधे माझी सोय करणार होता हेच मला कळेना. पण तरी फुकटात कुत्रा मिळतोय हे तरी बरंय असा विचार करत आम्ही घरी आलो.

आता कुत्रा घरी येणारच तेव्हा आपलं घर 'कुत्रा प्रूफ' करणं आवश्यक होतं. मुलांनी या बाबतीत भलताच उत्साह दाखवला.
"आधी आपण बाबांना कुत्र्याशी बोलायच्या क्लासला पाठवू," एकीचं म्हणणं पडलं.
"मला?" आता मलाच शाळेत पाठवायचा बेत ठरायला लागला.
"मग तुम्ही इंग्रजी बोलताना चुका किती करता? आपल्या कुत्र्याला कसं समजणार?" आता मी बोलताना 'स' ऐवजी 'श' म्हणतो कधीतरी, आणि त्यामुळे कुत्र्याला 'सिट' म्हणताना गोंधळ होईल पण त्यासाठी मला शाळेत पाठवायचं?
"त्यापेक्षा आपण बाबाला सायकॅट्रीस्टकडे पाठवू. म्हणजे कुत्रा जवळ आला तरी तो घाबरणार नाही," दुसरी म्हणाली.
"आता वेड्यांच्या डॉक्टरकडे?"
"सायकॅट्रीस्ट म्हणजे काही वेड्यांचा डॉक्टर नाही, पण तो डोकं ठिक करतो."
"नाहीतरी यांना गरज आहे सायकॅट्रीस्टची," तिच्या आईने पण तिचीच बाजू घेतली.
"पण कुत्र्याला ट्रेनिंग देण्यासाठी आपण बाबाला ट्रेनरकडे पाठवूया," पहिलीने अजून एक शाळा शोधली.
"आता मला शाळेत पाठवा, डॉक्टरकडे न्या, FBI करून तपासणी करा, अजून कुत्र्याचा विमा, त्याच्या डॉक्टरचे पैसे भरतो. अजून काय काय करू?" मी ओरडत सुटलो पण माझ्या या चिडण्याने कुणाला काहीही फरक पडला नाही.

एवढं करून एक कुत्रा घरी आला. पहिले सात आठ दिवस मुलांनी कुत्र्याला फिरवून त्यांची हौस भागवून घेतली. त्यानंतर कुत्रा आणि मी दोघेच 'एकामेकांसाठी उरलो'. हल्ली मी सकाळ संध्याकाळ हातात प्लॅस्टीकच्या पिशव्या घेऊन कुत्र्याबरोबर घराबाहेर फिरतो. दोरीचं एक टोक कुत्र्याच्या गळ्यात आणि एक टोक माझ्या हाताला बांधून मी कुत्रा नेईल तिथे जात असतो. बोलायचं असलं की कुत्र्याशी गप्पा मारतो. ओरडायचं असलं की कुत्र्याच्या अंगावर ओरडतो. कुत्राही माझ्या अंगावर भुंकायचं सोडत नाही. बाकी सगळं शिकला तर त्याला एकच गोष्ट येत नाही. ती म्हणजे 'मोत्या शीक रे अ आ ई..'

***काल्पनिक***

गोगा, लोल.

>>तुम्हाला बायको अगर नवर्‍याला मारहाण केल्याबद्दल कधी अटक झाली होती का?'
'तुमचे अगर तुमच्या बायकोची आधी झालेली लग्नं?'
'पुढील दोन वर्षात तुम्ही तुमच्या बायकोला, अगर तुमची बायको तुम्हाला घटस्फोट देण्याची शक्यता आहे का?'<<<

हे जरी काल्पनिक लिहिले असले तरी, खरे असु शकते.

एकाने दुसरे लग्न केले, पण त्याची बायको काहीच महिन्यात त्याला कंटाळली त्याचे कुत्रा प्रेम पाहून.
तिने बाहेरून फोन करून हा माणूस डॉग अभ्युझर आहे सांगितले व नवर्‍याला त्रास दिला.

तेव्हा पॉसिबल आहे अशी कारणे.
---

आम्ही जेव्हा तेव्हा पिल्लंच आणली ती बरी वाटतात.

जन्मात (माझ्या) कुत्रा/ मांजर पाळायचं नाही हा निश्चय आहेच. त्याला जर कोणी सुरुंग लावलाच तर या धाग्यातले मुद्दे कामी येतील. मुलं मोठी होतात, पेट्स मोठेच होत नाहीत, इतकाच एक मुद्दा मला पुरेसा आहे, पोराला इतकं हार्शली नाही सांगता येणार ना!!
अनकंडीशनल प्रेम इनफंट पण करतात, मुलं मोठी होऊच नये असंही अनेकदा वाटतं, पण म्हणून पेट्स!!! नो वे.

अमितव, पेट्स मोठेच होत नाहीत साठी +१ Happy I don't have time, energy or patience to raise a kid that never grows up.

प्राणी आणि पेटस् इन जनरल आवडत नसतील तर फक्त मुलांच्या हट्टापाई घेणे मला अनावश्यक वाटतं. आपण चांगले पालक म्हणुन मुलांसाठी अगणीत गोष्टी करत असतो, ही गोष्ट त्यांच्या मनासारखी आत्त्ता झाली नाही तरी त्यांचंही अख्खं आयुष्य पडलंय पेटस् चा अनुभव हवा असेल तर तो घेण्यासाठी असं वाटतं.

>>कानाचा चावा ??? बाप रे<<

गुगल इट; देर आर बंच आॅफ इंटरेस्टिंग स्टोरीज...

गोगा Lol

मस्त जमली आहे! धन्यवाद इकडे दिल्याबद्दल.

अमित, असे विचार स्वार्थी, इनसेन्सिटिव्ह वगैरे वगैरे असा गिल्ट कॉन्शन्स देणारे भेटले नाहीत का अजून? Happy

Pages