गेले काही महिने/वर्षं माझा लेक "आपण कुत्रा घेऊ या ना"! असा हट्ट करत आहे. बरेच दिवस ठामपणे "आम्हांला हे जमायचं नाही. तू मोठा झालास की तुझ्या घरी आण हवे तेव्हढे पेट्स" असं उत्तर देऊन त्याला निकालात काढला. आता आजूबाजूचे, माहितीतले, चांगल्या परिचयाचे बरेच लोक घरी कुत्रे आणत आहेत तेव्हा पीअर प्रेशर बिल्ड-अप होत आहे.
आम्ही मुंबईचे; जिकडे माणसांनांच पुरेशी जागा नाही अशा बॅकग्राउंडचे तेव्हा पपी/पेट्स नां आमच्या वैचारीक जगात महत्वाचं स्थान नाही. दोघंही आळशी आणि ही तर स्वतःला नको असलेली जबाबदारी (आर्थिक + भावनिक). तेव्हा केवळ गुड पॅरेन्टींग म्हणून ह्या फंदात पडावं की नाही ह्याचा खूप विचार करते आहे.
आज बेकरीत विषय निघाला तिकडे धनश्री ने काही माहिती दिली. अजूनही ज्यांनां ज्यांनां ह्या विचार मंथनात सहभागी व्हावेसे वाटते त्यांनीं प्लीज इकडे लिहा. मला खूप उपयोग होईल निर्णय घेण्याकरता. मी माझ्या मनातले कन्सर्न्स इकडे लिहीतेच वेळ मिळताच.
ही धनश्री ने दिलेली माहिती:
"माझी डेझी गोल्डन रिट्रीव्हर आहे. आता ती ४ महिन्यांची आहे. आम्ही तिला ७ वीकची असताना आणली. नुसता लोकरीचा गुंडा होता. स्मित पण आता छान रूळली आहे. शांत आहे. खूप माया लावते.
सध्या तिचे शॉट्स + फूड + ट्रीट्स इ. बेसिक गोष्टी साधारण महिना $१०० च्या आत होतात. पण आम्ही तिला ट्रेनर आणि डे केअर लावलं आहे सोशलायझेशन साठी. त्याचा खर्च जास्त आहे. साधारण $१०० पर अवर ट्रेनर आणि दिवसाला $२५-३० च्या रेंजमधे डे केअर. you will find tons of options for dog care/ dog sitter depending upon area. again there is diff in care takers with special training vs general someone walking a dog. We are also exploring this new world. स्मित
कमिटमेंट जोरात आहे पण. १२-१५ वर्ष बांधली जातात. मला हे पचवणं अवघड होतं. दुसरं मूल झाल्यासारखं वाटलं पण फक्त १ महिनाच. स्मित आता मी परत नॉर्मल रूटिनवर येतेय."
धनश्री आणि इतरही बर्याच
धनश्री आणि इतरही बर्याच जणांनीं विचारलंय की किती वेळ लागतोय निर्णय घायला
तुला इथे निगेटिव्ह सूर जास्त दिसतोय कारण मूळात मी निगेटिव्ह स्टेशन वरूनच गाडी सुरू केली होती. मी अजूनतरी पॉझिटीव्ह साईडला गेले नाहीये इकडचं वाचून. तेव्हा अजून तरी पपी चा फोटो वगैरे इकडे माझ्याकडून दिसणार नाही. पण सर्व माहितीकरता मी खरंच खूप आभारी आहे.
>>कारण मूळात मी निगेटिव्ह
>>कारण मूळात मी निगेटिव्ह स्टेशन वरूनच गाडी सुरू केली होती
मला नाही वाटलं तसं. खरंतर तू डेटा कलेक्ट करते आहेस या हेतूने मी लिहायला सुरूवात केली. पण मैत्रीण वर सगळं इतकं सविस्तर आणि छान लिहिलंय की परत ते रिपीट करावं असं वाटलं नाही. म्हणून सुचवलं की तिथे पेट चा धागा बघ. निदान जबाबदारी कितपत आहे याचा करेक्ट अंदाज येईल.
हो तिकडच्या एका लेखाची लिंक
हो तिकडच्या एका लेखाची लिंक इकडच्या एका न्यू पे डॉग ओनर ने दिली होती मला. तो लेख वाचला. बाकीचेही बघते.
http://www.manogat.com/node/1
http://www.manogat.com/node/10948
मनोगतवरचा ही लेखमाला मला फार आवडते. तिथेही थोडीफार माहिती मिळू शकेल. 'निगेटीव्ह सूर' मलाही जाणवला त्यामुळे मी लिहून काढलेली माहिती टाकली नाही.
अंजली, लिहून काढलेली माहिती
अंजली, लिहून काढलेली माहिती जर इथे दिली नाहीस तर सूर बदलण्याची थोडीफार शक्यताही उरणार नाही ना?
ती मनोगतवरची लेखमालिका फार
ती मनोगतवरची लेखमालिका फार गोड आहे. धन्यवाद इथे लिंक दिल्याबद्दल.
मला नाही जाणवला काही निगेटिव
मला नाही जाणवला काही निगेटिव सूर खरच.
धाग्याचा विषय कुत्रा पाळावा की नाही असा असल्याने निर्णय घेताना दोन्ही बाजू, पडणारं काम, खर्च, लाइफस्टाइल चेंजेस याची सर्व माहिती असलेली उत्तम.
त्यामुळे उलट एक फायदाच होइल. बरेचदा मुलांची हौस म्हणून , ख्रिसमस गिफ्ट म्हणून कुत्रे घरात येतात आणि मग समजतं की वी आर रियली नॉट अ डॉग पर्सन/फॅमिली आणि मग क्त्र्यांची आबाल आणि मग रवानगी शेल्टर मध्ये. तशा आधी केले मग पस्तावले केसेस तरी कमी होतील सर्व प्रकाराची माहिती असेल तर.
असं आप्लं माझं मत.
आणि निर्णय घेण्याची घाई नकोच. हवा तितका वेळ लागूदे.
मी माझी थॉट प्रोसेस २००२ साली सुरू करून कुत्रा घरी यायला २०१६ साल उजाडलं
शूम्पी, ह्या पोस्ट करता
शूम्पी, ह्या पोस्ट करता धन्यवाद!
आमचं उत्तर ठाम नाही हेच होतं. मुलगा आता तसा मोठा झाला आहे तेव्हा कदाचित तो जबाबदारी घेऊन पार पाडू शकेल अशी एक शक्यता वाटायला लागली म्हणून फेरविचार सुरू केला.
मुलगा आता तसा मोठा झाला आहे
मुलगा आता तसा मोठा झाला आहे तेव्हा कदाचित तो जबाबदारी घेऊन पार पाडू शकेल अशी एक शक्यता वाटायला लागली >> नाही ती शक्यता फार फार कमी आहे सशल
अंजली, आत्ताच ती मनोगतावरची मालिका वाचली. जाम गोड आहे.
आमची लॅब्राडूडल आहे. फार
आमची लॅब्राडूडल आहे. फार म्हणजे फारच कमी शेड करते. म्हणजे अगदीच नाही म्हटलं तरी चालेल. शेड करणारा डॉग नको हा एक महत्वाचा क्रायटेरीया होता. आम्ही तिला आणली तेव्हा तीन महिन्यांची होती. घरीच शू-शी साठी ट्रेन केलं. ट्रेन होई पर्यंत तिचा वावर घरात टाईल्स असलेल्या भागात मर्यादीत ठेवला होता. लवकर ट्रेन झाली. नंतर घरात अॅक्सिडेंटसही झाले, पण पटकन आणि योग्य ते क्लिनर्स वापरून स्वच्छ केल्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही. तिची फर हायपोअॅलर्जिक असल्यानं तिच्या अंगाचा वासही येत नाही. आठवड्याला माझी मोठी लेक बेबी पावडर आणि बेकींग सोडा वापरून तिचे केस विंचरते. त्यामुळे कोको आजूबाजूला आली की इनफॅक्ट एक मंद सुवास दरवळतो ;).
अरे वा! मस्तच अंजली.
अरे वा! मस्तच अंजली.
तुमच्याकडच्या कोको वरच्या खर्चाचा अंदाजही दे शक्य असल्यास (वर धनश्री ने दिला आहे तसा).
अंजली, तुम्हीही घराबाहेर
अंजली, तुम्हीही घराबाहेर पडताना तिला डे केअर ला ठेवता का? इन जनरल एकटे किती वेळ ठेवू शकता ?
आम्ही ब्रीडरकडून आणली तिला.
आम्ही ब्रीडरकडून आणली तिला. रेस्क्यू मधून आणायचे होते पण दोन्ही बाजूंनी ते जमले नाही. ब्रीडर कडून आणण्याचा फायदा म्हणजे तिचे आई बाबा दोघे बघायला मिळाले. दोघांची वागणूक बघून पिल्लांच्या वागणूकीचा अंदाज आला. आमच्या घरातला पेट आणण्याचा हा अगदी पहिला अनुभव असल्यानं काही अनुभवी आणि रेस्क्यूचं काम करणार्या लोकांनी सल्ला दिला होता आणि तो मला पटला. आता पुढचं पिल्लू आणेन ते रेस्क्यू करेन. शिवाय मिनीमम शेड करणे, हायपोअॅलर्जिक या बाकी अपेक्षा पण होत्या.
सुरवातिला तिला घरी आणताना क्रेट, ब्लँकेटस, लीश, कॉलर, नेम टॅग, पाण्याचे-खाण्याची भांडी, त्या खालचा ट्रे, बाहेर फिरायला जाताना शी केल्यास उचलण्यासाठी प्लास्टीक बॅग्ज (हा परत परत होणारा खर्च), घरात अॅक्सिडेंटस झाल्यास क्लिनर्स, डॉग फूड, ट्रीटस, शांपू, कंडीशनर, तिचे दोन मोठे टॉवेल्स, ग्रूमिंगसाठी कंगवे-ब्रश, काही खेळणी इत्यादी गोष्टी आणल्या यातल्या बर्याचशा वन टाईम खर्च या कॅटॅगिरीतल्या आहेत तर काही (उदा. डॉग फूड-ट्रीटस, प्लास्टीक बॅग) परत परत आणाव्या लागतात.
आजकाल कंपन्या पेट इंशुरन्स पण देतात. महिना $३०-$५० असू शकतो. आमच्या इथे पेटस मार्ट या दुकानात बॅनफिल्ड म्हणून दवाखाना आहे, त्यांचा इंशुरन्स पण आहे. सुरवातीला आम्ही तोच घेतला होता. महिना $४० च्या आसपास होता. पण यात सगळे शॉटस, डॉक्टरच्या व्हिजीटस, तिची स्पेईंग सर्जरी, सर्जरीनंतरची कॉलर, काही फुकट औषधं (सँपल्स म्हणून दिलेली) इत्यादी कव्हर झाले / होतात.
डॉग फूडचा खर्च कुठलं डॉग फूड आणि दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात देता यावर अवलंबून आहे. मोठ्या भूभूंचा जास्त होतो अर्थातच. आमची मिड साईझ आहे. तो महिन्याला $२५-$१०० होऊ शकतो. हौसेला मोल नसते, त्यातून आपला प्रेमाचा भूभू, त्यामुळे अगदी ऑरगॅनिक फूडही उपलब्ध असते. त्याप्रमाणे खर्च वाढत जातो.
ग्रूमिंग २-३ महिन्यांतून एकदा करते. तेव्हा हेअर कट, नखे कापून फाईल, कान स्वच्छ करणे वगैरे होते. बाकी तिला घरीच २-३ आठवड्यातून एकदा अंघोळ घालतो. आठवड्यातून एकदा तिचे केस विंचरतो. यापेक्षा जास्त वेळा शांपू लावून अंघोळ घालणे किंवा केस विंचरणे केले तर तिच्या कातडीला त्रास होऊ शकतो असे तिच्या व्हेट ने सांगितले होते. ग्रूमिंगचा खर्च $५० एका वेळेचा.
सगळे विचारात घेता महिन्याला एका भूभूचा खर्च $१००-$१५० पर्यंत येऊ शकतो. यात डॉग केअर, ट्रेनर वगैरे धरले नाहीत. माझ्या लेकीनंच तिला ट्रीक्स वगैरे शिकवल्या. पटकन शिकली. पेटस मार्ट मधे अगदी सुरवातीला बेसिक ट्रेनिंग केलं होतं तेव्हढं तिला पुरलं. नंतर बाकी कमांडस घरीच शिकवल्या. कुठेही गावाला जाताना डॉग केअर मधे ठेवण्याचा खर्च येतो. त्यातून भारतात जाताना तर एकदम महिनाभर नसतो, तो खर्च खूप होऊ शकतो. त्यावर उपाय म्हणजे ज्या मित्रमंडळींकडे डॉग आहे त्यांच्याकडे ठेवता आलं तर बघायचं, त्यांचे भूभू ते गावी जाताना आपण ठेवून घ्यायचे. त्यामुळे भूभू सोशल पण होते.
(क्रमशः)
अंजली, उत्तम माहिती दिलीस.
अंजली, उत्तम माहिती दिलीस.
आता सशल आणि मै च्या
आता सशल आणि मै च्या कुत्र्यांचे फोटो इथे बघितले की सुडोमि म्हणते.
मैत्रेयी, आम्ही इथल्या इथे
मैत्रेयी,
आम्ही इथल्या इथे जायचे असेल तेव्हा घरीच ठेवतो. क्रेट मधे तिचं खाणं, काँग टॉय मधे ट्रीट घालून (त्यानं ती बिझी रहाते) ते ही क्रेट मधे टाकतो. बरोबर काही तिची आवडीची खेळणी असतात. त्यानं ती ३-४ तासांपर्यंत मस्त राहू शकते. बाहेर जायच्या आधी शी-शू उरकणे, तिच्याबरोबर खेळणे, तिला फिरवून आणणे इत्यादी होते. त्यानं ती खूश असते. मग झोपते बर्यपैकी. नाही तर खेळत बसते. आताशा तर ग्रोसरीला (किंवा काही बारीक सारीक कामांसाठी) जायचे असेल तर तिला घेऊन जातो (फार उन अथवा थंडी नसेल तरच). गाडीच्या काचा थोड्या खाली करून गाडीत बसवतो. ती बाहेर आहे या भावनेने ग्रोसरीही पटापट होते ;). ती ही बाहेरची मजा बघत मजेत बसलेली असते. आता पूर्ण पॉटी ट्रेन झालेली असल्यानं केनेल मधे ठेवण्याची गरज नाही. काही दिवसात तिला मोकळंच घरात ठेवून जावू. ३-४ तासांपेक्षा शक्यतो बाहेर रहात नाही. रहायचे असल्यास मैत्रिणीकडे किंवा डॉग केअर मधे ठेवून जातो.
ओके! मस्त माहिती अंजली!
ओके! मस्त माहिती अंजली!
Lowes Hardware Store मधे
Lowes Hardware Store मधे तुम्ही तुमचे पेटस नेऊ शकता. मी अगदी आत दुकानात घेऊन गेले नाहीये पण गार्डन सेंटरला घेऊन गेले होते. तिथे काम करणार्या लोकांकडे डॉग ट्रीटस असतात. ते देतात तुमच्या डॉगीला घेऊन गेलात तर.
लकीने आमचा काँग टॉय फाडून
लकीने आमचा काँग टॉय फाडून टाकला ५ मिनिटात.
काँग स्क्वीझ स्टिक मात्र महिनाभर टिकली.
अंजली, लॅब्राडूडल बद्द्ल
अंजली, लॅब्राडूडल बद्द्ल अजुन काही माहिती असेल तर नक्की सांग. ( ब्रीडर कडून घेताना घ्यायची काळजी वैगरे)
फक्त त्यांच्या अंगाला वास येतो अस पण खूप ठिकाणी वाचल आहे, पण तुझ्या पोस्ट मध्ये येत नाही अस लिहिलयस. ह्या बद्दल पण काही अजून माहिती आहे का?
अरे वा, पेट चा धागा वर आला.
अरे वा, पेट चा धागा वर आला.

आमच्या डेझीबाई मजेत आहेत. आता ७ महिन्यांची झाली. मागच्या महिन्यातच स्पेईंग ची सर्जरी झाली. नेहमी घरभर सतत हिंडणारं पिल्लू पेन किलर्समुळे अचानक तोंड खाली घालून मलूल होऊन बसलेलं अगदी पाहवत नाही. मला खरंच फार मानसिक त्रास झाला त्यादिवशी. पण एकच दिवस. दुसर्या दिवशी बाईसाहेब परत शेपूट हलवत बॅक टू किचन.
आम्ही तिच्याबरोबर केबीन कँपिंगपण केलं. खूप धमाल आली. पहिल्या दिवशी नव्या जागेत असल्याने किंवा बाहेर इतर प्राण्यांच्या चाहुलीने की काय पण अजिबात पॉटी करत नव्हती. काळजी वाटली की परत घरी यावं की काय? पण ५-६ तास जरा रुळल्यावर मग गेली. दुसर्या दिवशी तिला लीश लावून लेक मधे नेलं. पाण्यात खूप खेळली आणि दमून गाढ झोपली.
आम्ही ही आमच्या डॉगी बरोबर
आम्ही ही आमच्या डॉगी बरोबर २/३ ट्रिप्स केल्या आहेत. पेट फ्रेंडली हॉटेल बूक केला की काही प्रॉब्लेम येत नाही.
एकदा क्रुझ वर अलाउड नव्हत म्हणुन "पूच हॉटेल" मधे ठेवले होते काही दिवस.
बॅकयार्ड्ला डॉगी डोअर लाउन घेतले आहे त्यामुळे ५/६ तास आरामात राहातो.
अंजली, तु डॉग चे दात कसे साफ ठेवतेस? किती वेळा ब्रश करतेस?
सशल शेवटी घेतलास का डॉग?
धनश्री, मस्त वाटल वाचुन,
धनश्री, मस्त वाटल वाचुन, डेझीचा फोटो बघितला आहे. फार छान आहे ती.
Pages