आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून  हा नविन धागा .  असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
         रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले.. 
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का? 
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
 अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
 अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता  धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
 अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
 अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
 
ती देविकाच्या आईचं माहेर
ती देविकाच्या आईचं माहेर गोव्यात असेल निधी, गोव्यात शिमगोत्सवला शिगमोत्सव म्हणतात.>> असेल मग तसंच. मी शिमगाच ऐकत बोलत आलेय कायम. एकदा अण्णी आणि पांडू पण शिगमोच म्हणाले.. नाहीतर ते शिमगा असंच बोलत होते.
आज येवा आमच्या कोकणांत... आमच्याकडे शिमगो आज आसा.
कालच्या एपिसोडची पहिली १-२
कालच्या एपिसोडची पहिली १-२ मिनिटं चुकली. दत्ता आणि माधव कसे घरी आले काही दाखवलं का? आई पाय चोळतेय आणि माधव गाढव आरामात पाय पसरून बसलाय. बिचारा दत्ता आपले पाय आपणच चोळून घेत होता.
मी पण 'शिगमा' असंच ऐकलं. ते सोंगं काढणारे लोक ह्याच गावातले ना? मग त्यांना अण्णा गेल्याचं माहीत नाही? ह्यांच्या अंगणात कसे आले ते? मला तर तो अर्चिस फोनवर शुटींग करताना बघून असं वाटत होतं की रिप्ले केल्यावर त्याला बॅकग्राउंडला ती मळवट भरलेली बाई दिसणार.
 पांडू काय माणूस आहे. चक्क दत्ताचा उल्लेख 'ते काळं तोंड वाले' असा केलान त्याने. 
 आणि पूर्वाने पण 'बाबा का?' म्हणून विचारलं त्याला. त्याने ती मशालीची गोष्ट सांगितली ती काही कळली नाही बुवा आपल्याला. पण तो पांडू अॅक्टिंग मस्त करतो वेड्याची. 
तो सोंग काढणारा माणूस घरात घुसताना ह्या लोकांनी अडवलं का नाही त्याला? आणि तो घरात घुसल्यावर एवढे भेदरले का? मला तर तो गणेश वाटतोय. त्या अडगळीच्या खोलीत जमिनीची कागदपत्रे असणार बहुतेक. आर्चिसला दाखवेल तो. पण त्याला मुंबईची माणसं आवडत नाहीत त्यामुळे आर्चिसला इजा पण करेल. काही सांगता येत नाही.
अस्मिता, चिंगचाँग आणि खरवस
अस्मिता, चिंगचाँग आणि खरवस कॉमेन्ट्स
त्या देविकाच्या आईला जरा व्हॉल्युम कमी करायला सांगा रे कोणीतरी. कायम वरच्या पट्टीत बोलत असते.
तो सोंग काढणारा माणूस घरात
तो सोंग काढणारा माणूस घरात घुसताना ह्या लोकांनी अडवलं का नाही त्याला? आणि तो घरात घुसल्यावर एवढे भेदरले का? +++ १
मला तर तो गणेश वाटतोय>>> वाटतोय काय.. आहेच्चे ! आजच्या भागाच्या प्रोमोत दाखवून टाकलं पण
त्या देविकाच्या आईला जरा
त्या देविकाच्या आईला जरा व्हॉल्युम कमी करायला सांगा रे कोणीतरी. कायम वरच्या पट्टीत बोलत असते>> हो काल तिच्या आवाजाशी मॅच करायला तिच्या बाबांनाही वरच्या पट्टीत बोलावं लागलं !
त्या देविकाच्या आईला जरा
त्या देविकाच्या आईला जरा व्हॉल्युम कमी करायला सांगा रे कोणीतरी.
सगळ्या सासवा अशाच असतात!
<< त्या देविकाच्या आईला जरा
<< त्या देविकाच्या आईला जरा व्हॉल्युम कमी करायला सांगा रे कोणीतरी. कायम वरच्या पट्टीत बोलत असते>> तिकां वाटता आवाज मोठ्ठो काढलो कीं बाकी अभिनय काय चाटूंचो आसा !!

धोनीक दिग्दर्शन देवंक होयां ह्या शिरीयलीचां; काय जीवघेणो सस्पेन्स निर्माण केल्यान काल त्येना !!
धोनीक दिग्दर्शन देवंक होयां
धोनीक दिग्दर्शन देवंक होयां ह्या शिरीयलीचां; काय जीवघेणो सस्पेन्स निर्माण केल्यान काल त्येना >>+1
<< सगळ्या सासवा अशाच असतात!
<< सगळ्या सासवा अशाच असतात! >> अभिरामसारख्या सगळ्याच नवरे लोकांच्या ?
भाऊ खन्डोबान्ची सासु पण अशीच
भाऊ
 खन्डोबान्ची सासु पण अशीच असा. कायम डोळे वटारल्यागत बोलती. ठोकळी बरी तिच्या पेक्षा.:फिदी: 
हो, स्वप्ना काल दत्ताचे मला खरच वाटले. आई पण असा भेद भाव करु शकते.:अरेरे: काल मला दत्ता आणी पान्डुचा अभिनय आवडला. पान्डु धमालच करतो.
शिमग्याबाबत- होळी साठी उभे केलेले ( पेटवण्या आधी ) जे मोठे उन्च झाडाचे लाकुड/ खाम्ब असतो, त्यावर जे चढुन जातात त्याना गडे असे म्हणतात. मग खालुन लोकानी त्या गड्याना गुन्डो म्हणजे दगड फेकुन मारायचा. ज्याचा दगड त्या गड्याला लागेल तो माणुस पुण्यवान. मग हे लोक ( गडे) एक मशालीचा पाठलाग करत रानावनातुन पळतात. समोरच्या टेकडीवर असलेली मशाल घ्यायला हे त्या टेकडीवर गेले की मशाल तिथुन गायब होऊन दुसर्या ठिकाणी दिसते. असे रात्रभर दिसते. मग त्यातला एक गडी गायब होऊन वर्षानेच उगवतो असे म्हणतात.
तो गणेशच आहे, आज कळेलच म्हणा.
काल निलीमा बरी दिसत होती.
काल निलीमा बरी दिसत होती. मागे केस बांधल्यामुळे.
<< काल निलीमा बरी दिसत
<< काल निलीमा बरी दिसत होती.>> काय खुष होतली ह्यां वाचून ! चक्क ' निलीमा' ? 'ठोकळी' न म्हणतां !!!
<< तो सोंग काढणारा माणूस ..... घरात घुसल्यावर एवढे भेदरले का? >> टीव्हीमुळे सगळ्या सिरीयलीतली सोंगा आपल्या घरांत वावरतच असतत; सराव झालोहा आपणाक. नाईकांक ती संवय नसतली कारण त्येंच्या घरांत टीव्ही दिसणां नाय. म्हणान भेदरले असतले !!!
चक्क ' निलीमा' ? 'ठोकळी' न
चक्क ' निलीमा' ? 'ठोकळी' न म्हणतां !!! >>
आजचो भाग तू जा नि मी जातय मध्ये वाया घालवल्यानी.
गणेश इलो काय गेलो काय.. काय समजलाच नाय. एवढी सगळी माणसां उभी पण आर्चिस सोबत पण कोण गेला नाय.
ती उलट्या पावलांची काय भानगड???? गणेशाची असतील असा वाटताय तो भायर गेलो तेव्हा.
<< आजचो भाग तू जा नि मी जातय
<< आजचो भाग तू जा नि मी जातय मध्ये वाया घालवल्यानी.>> अरे, छायान काय तोर्यात एंट्री मारल्यान शेवटीं, त्येचां कायच नाय !!!
" जातंय घराक, नाय तर ठोकळी जीव खातली !", सांगतासच ना भायेर;
'ठोकळी' आसंय म्हणानच चांगली वळाखतंय हीं सोंगा तुमची !!!
भाऊकाका (काकू बघतात की नाही
भाऊकाका
 (काकू बघतात की नाही ही तुमची व्यंगचित्रं).
<< (काकू बघतात की नाही ही
<< (काकू बघतात की नाही ही तुमची व्यंगचित्रं).>> तिकां 'माबो'चो पत्तो देवंक काय खुळो कुत्रो चावलोहा माकां ?
आय्यो काकानु, तरीच बिनधास्त
आय्यो काकानु, तरीच बिनधास्त असा तुम्ही.
भाऊ!
भाऊ!
(No subject)
पण ती उलटे पावलं अर्चिसाचीच
पण ती उलटे पावलं अर्चिसाचीच असावीत, त्याने वेंधळेपणाने नानांच तांब्या भांड पाडले (ते स्वच्छ धुवून भरून पण ठेवले नाही परत) त्यात पावले ओली झाली असतील. चाणाक्ष वाचकांच्या हे लक्षात आले असेल की त्यानंतर तो बर्याच खोल्यात गेला तोवर कोरडे झाले असतील पाय पण तरीपण हेच कारण वाटतेय.
छायाबद्दल कोणीच कशी विचारणा
छायाबद्दल कोणीच कशी विचारणा केली नाही?
ते नेहमीसारखं असेल भगवती, रात
ते नेहमीसारखं असेल भगवती, रात गयी- बात गयी. बऱ्याच अनुत्तरीत प्रश्नात अजून एक भर. आधीचा एपिसोड संपला की संपल्या काही गोष्टी किंवा बहुतेक मालिका संपत आली की एकेक उत्तर मिळेल.
बरोबर आहे तुझे अंजू.
बरोबर आहे तुझे अंजू. नाईकांच्या घरात लाईट आहेत, मग त्याने लाईट लावून का नाही बघीतले कोण आहे ते?
आर्चीसाच्या मागे चकवो लागलो
आर्चीसाच्या मागे चकवो लागलो तर?
काय मुर्खाचा बाजार होता
काय मुर्खाचा बाजार होता आज.
घरात चार धडधाकट पुरुष आणि येडा पांडू धरून ५, ५ बाया असे असताना सगळेजण घराच्या ओसरीवर उभे राहूनच , सॉंग शिरलाय घरात म्हणत उभी.
आता, रात्रभर, साँग( दत्तीच्या भाषेत तोंड वेंगाडत) राहिले असते, तर सगळे काय बाहेरच उभे रहाणार होते?
एकटा आर्चिस तेवढा गेला.... ठोकळी नको तेवढी शीर ताणत , सगळ्यांना भाषण देवून वर गेली सुशलयाला आणायला.
घरात काळोख कशाला केलेला तो? आणि छायाला सगळे विसरलेले... ती दिसली नाही म्हणून माई काय बोलल्या नाहीत.
ते बेरीनाना काय खातात कळत नाहीत. जल्ला जात पण नाही आणि गप रवत पण नाही. .....:फिदी:
-------------------------
माका ता पांडू बरा वाटता.. आणि ता पुर्वा. होळीच्या दिवशी लय बोंबा मारली मा.....
---
ते बेरीनाना काय खातात कळत
ते बेरीनाना काय खातात कळत नाहीत. जल्ला जात पण नाही आणि गप रवत पण नाही. ...
  
  
तेच तर मी पन पैल्यापस्न म्हणतै!
ठोकळीचं महत्व वाढवण्यासाठी
ठोकळीचं महत्व वाढवण्यासाठी रोज एक प्रश्न अनुत्तरीत ठेवला असेल, शिरेल संपवताना ठोकळी रुद्रावतार धारण करुन एकेक प्रश्न असा सायंटीफिकली सोडवेलना की बास रे बास
 .
(No subject)
<< ठोकळी रुद्रावतार धारण करुन
<< ठोकळी रुद्रावतार धारण करुन एकेक प्रश्न असा सायंटीफिकली सोडवेलना की बास रे बास >> रुद्रावतार आतांय धुमसताहाच तिच्यात; पण तेंव्हांतरी जरा हंस म्हणाचां तिकां !!! आणि शेवटीं असां झालां कीं माधव काय भुरकटतलो तां बघूंकच नको; मनात्सून जाम कौतुक आसा त्येकां बायलेचां !!
भाऊ
भाऊ
Pages